ती मी नव्हेच भाग अंतिम

 


"ती मी नव्हेच अंतिम 

✍️ सौ. उज्वला रहाणे 


मागच्या भागात आपण पाहिले. शशांकला त्या काकांनी बरेच सागितले. त्याचा घरातील फोटोही शशांकच्या लहानपणीच्या फोटोशी मिळताजुळता नक्कीच काहीतरी आहे.


  सकाळी उठून परत तेच धागेदोरे शोधायचे, कोणत्या ना कोणत्या प्रकरणाचा छडा लावायचा. शशांकचे मन सुन्न झाले.

   

  विचारातच त्याला झोप लागली हे त्याला कळलेच नाही. इतक्यात शीला त्याला उठवत होती. "अरे बघ तुझा फोन वाजतोय."


  "हो बघतो." फोन पोलीस स्टेशनवरून होता. तो ताबडतोब तयार झाला. सुरेशने त्याला हटकले. म्हणाला, "तु दवाखान्यात चालला आहेस तर मला पण येऊ दे तुझ्या बरोबर!"


  "बाबा आत्ता नको दुपारी घेऊन जातो,"  म्हणत तो गेला. सुरेशने शीलाला विचारले.


    "का ग शोभा बरी आहे ना? काही कमी जास्त तर नाही ना? मला का नेत नाहीत तुम्ही दवाखान्यात?"


" हो बाबा ती बरी आहे. आज देतीलच डिस्चार्ज." एवढेच उत्तर दिले. कारण इतर कामे करत बसले तर बाबा दहा प्रश्न विचारतील. त्यापेक्षा अभ्यास परवडला. अभ्यास करती आहे हे बघून काही विचारणार नाहीत  म्हणत ती अभ्यासाला बसली.


  इकडे शशांक पोलीस स्टेशनवर पोहचला.शोभाची चांगलीच पिटाई झाली होती. वकिलांचे देखील जामीनासाठी प्रयत्न चालू होते.

    शोभाला शशांक समोर आणले गेले. पोलिसांनी विचारले. "हा पोरगा कोणाचा?"

 शोभा म्हणाली, "माझाच!" चांगली सोलली होती तरीही खोटे बोलत होती.


   शशांकने परत तिच्याकडे पाहिले. शोभा म्हणाली, "शशांक वाचव मला. आई ना रे मी तुझी?"

"आई तू आई नाहीस आई नावाला कलंक लावू नकोस."


   "शशांक कसा पलटलास? अरे काय हे? हो आई लाज वाटते मला? आई खरे सांग मला तु कोठून उचललेस?"


"नाही रे?"


" परत पोलीस खाक्या हवा का बोल! सगळे खरे तेच सांग." पोलिसांनी परत तिची पिटाई केली.


  शोभा आता पुरती मार खाऊन थकली होती. तिने पाणी मागितले आणि सुरेशला बोलवायला सांगितले.


"हा कोण सुरेश?" पोलीसांनी विचारले. 

"हो ते माझे बाबा. बोलावतो त्यांना." शशांकने पोलिसांना सांगितले.

  

शशांकने बाहेर येऊन मामाला फोन केला. "मामा घरी जाऊन शीलाला व बाबांना घेऊन पोलीस स्टेशनवर पोंहचाल का? तुम्ही बरोबर असणे गरजेचे आहे. फक्त दवाखान्यात जायचे आहे असे सांगा शीला आहे तुमच्या मदतीला."


   "नक्कीच बेटा येतो मी घेऊन."  मामा शीलाकडे पोंहचले. मामाला अचानक पाहून सुरेशच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तरीही आहे त्या परिस्थितीला तोंड द्यावे लागणार म्हणत सूरेश मामा व शीला बरोबर निघाला.


    रिक्षा पोलीस स्टेशनवर थांबली. गेटवर शशांक उभा होता. "अरे हे काय दवाखान्यात जायचे सोडून पोलीस स्टेशनवर कशाला घेऊन आलास मुकुंदा?" सुरेशने मामाला विचारले.


  "चला भावोजी आत," मुकुंदने हाताला धरून आत नेले. समोरचे दृश्य पाहून सुरेशला चक्कर आली. पण हे सगळे सभांवीत होतेच.


शोभाने सुरेशला पाहून गळाच काढला. "सुरेश वाचव मला."  इतक्यात परत शशांकने पुढील टेप वाजवली.


सुरेश सावध झाला. "बाबा आता तरी शहाणं व्हा." शीलाने कळकळीने बाबांना बोलली.

"हो बाळा खरच पुरता वाहवलो होतो मी. पण निच बाई मला अंधारात ठेवून किती पुरुषांना भुलवत होती देव जाणे."

शशांक तिथेच उभा होता. परत पोलिसांनी शोभाला विचारले, "सांग हे दोन्हीही मुलं कोणाची?"


   इतक्यात सुरेश चवताळून बोलला, "नाही ही मुलगी फक्त माझी आहे तिची आई देवाघरी गेली. म्हणूनच हिच्याशी मी लग्न केले."

" मग हा मुलगा?"

"तो तिचा - -नाही तो पण तिचा नाही. बोल शोभा बोल."


  "हो तो मी पळवून आणलेला मुलगा आहे सदन घरातून."

" काय??.. "पोलिसांनी परत एक सणसणीत पणे तिच्या गालावर मारली, "बोल पुढे!"


  "हो बोलते पण मारणे थांबवा हो! हे सगळे मी पैशासाठी केले. चांगल्या घरातील आहे तो? त्याचा हरवलेल्या नंतर शोध चालू झाला. त्याचे तंतोतंत वर्णन करणाऱ्या जाहिराती सगळीकडे झळकत होत्या. मग मी व माझ्या मोरक्याने त्याच्या पटणाऱ्या खुणा चटके देऊन मिटवून टाकल्या."


   'म्हणजे आपल्या उजव्या दंडावरील भाजल्याची खूण म्हणजे हिचेच कृत्य? काय किती निष्ठूर आहे ही बाई? म्हणजे आपण नक्कीच त्या जोडप्याचा मुलगा तर नाही आहोत. पण हे कसं सिध्द करायचं.' शशांक विवंचनेत.


  "ऊद्या पोलिसांना त्या जोडप्याला हिच्या समोर आणून उभे करून विचारायला लावायचे," शीलाने शशांकला आयडिया दिली.


  खरच मग ठरले. सगळे घरी परतले. शोभा मात्र मार खाऊन निपचित पडली होती. वकिल सुरेशकडे खाऊ कि गिळू या नजरेने पाहत होता.


घरी जाताना कोणीच कोणाशी बोलत नव्हते. वातावरण बघून मामा देखील शीला बरोबर तिकडेच राहीला.

 

  नेहमी प्रमाणेच सकाळी ते जोडपे दहाच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या गेटसमोर येऊन विनवण्या करू लागले.


आज मात्र पोलीस डिपार्टमेंटने त्यांना आदराने आत नेऊन बसवले. शशांक, मामा, बाबा, शीला सर्वच वेळेनुसार पोलीस स्टेशनवर पोंहचले.


शशांकला पाहताच सभ्य गृहस्थ उभे राहिले. "बेटा कालच तू भेटलास आणि आज लगेच ही आदराची वागणूक. लावलास का रे तपास माझ्या मुलाचा." शोभाची अवस्था फारच बेक्कार झाली होती.


  पोलीस कदम समोर आले. "बोल आता अजून काय काय लपवले आहेस. तुला आता जेलची हवा खायला पाठवतो.. तुझा मोरक्या सडतोय बघ जेलमध्ये. शेवटी पापाचा घडा भरला तुझा."


    शोभा फक्त पापण्या हलवत होती. इतक्यात दोन पोलीस शिपाई त्या जोडप्याला घेऊन आले.


शशांक, शीला, शोभा, मामा तिथेच उभे होते. शशांकला पाहताच ते गृहस्थ म्हणाले, "बेटा काय आहे रे सगळे? हे पोलीस काय करतायेत काही कळत नाही."


  "हो थांबा बघूया तुम्ही शांत रहा. तुमच्या घरी जे काका राहतात त्यांना बोलवता येईल का इकडे."


" अरे काय चाललय हे सगळं?"


" सांगतो अंकल तुम्ही थोडे शांत रहा. बसा इथे." शशांकने दोघांनाही पाणी दिले.


     इतक्यात एका लेडीज कॉन्स्टेबलने शोभाला खेचत आणत या दोघांच्या समोर ऊभे केले. शोभाला धड ऊभे राहता येत नव्हते. अगदी पिंजारलेले केस साडी अस्ताव्यस्त, अंगभर माराच्या खुणा, एकदम भिकारीण दिसत होती.
ती समोर येतातच ती सभ्य स्त्री ओरडली. "हिच ती भिकारीण अशीच होती ती! हिच आसणार. हिनेच पळवले माझ्या राजूबाबूला!


कुठे आहे माझं बाळ, कित्येक वर्षे झालं शोधतो आहे आमचं लेकरू. दे, सांग कुठे आहे. नाहीतर पोलीसांच्या आधी मीच तुला गोळी घालते." शांत स्त्री खुप बेभान झाली होती. तेवढ्यात ओक्साबोक्शी रडायला लागली.


    इतक्या वर्षांनी कसं हिनं हिला ओळखले. सगळेच आश्चर्यचकित झाले.


    सत्य समोर आले. शोभा ग्लानीत होती. तिने शशांककडे बोट दाखवून सांगितले, "हे तुझं लेकरू आहे."

 

"काय हा माझा राजाबाबू!"


   "हो तुझाच आहे ग बाय! मी आजपर्यंत एक खोटे लपवण्यासाठी सतत एक एक खोटे बोलत राहिले.पैसा माझे सर्वस्व होते.मग तो कोणत्याही मार्गाने मिळो. त्यासाठी मी माझे सर्वस्व देखील पणाला लावून टाकले.सगळे मिळवले. पण इज्जत हरवून बसले. आता यातून माझी सुटका नाही. सुरेश माफ कर. तुला, शीलाला आणि शशांकला मी फसवले."


सुरेश म्हणत शोभा जमीनीवर कोसळली. डॉक्टर येईपर्यंत तिची प्राणज्योत मालवली. सिव्हीअर हार्टाटॅक डॉक्टरांनी डेथ सर्टिफिकेट दिले. सुरेश बघत राहिला. जाता जाता शोभा खरे बोलून गेली.


शशांकला काहीच सुचत नव्हतं. इतक्यात ते काका आले. ती सभ्य स्त्री आनंदाने ओरडली. "माळीकाका हा बघा आपला राजूबाबू ! सापडला. किती मोठा झाला आहे बघा. रोज मला ओरडायचात  ना नाही मिळणार.बघा मिळाला माझा राजूबाबू." 


काका बघतच राहिले.' काल घरी आलेले हे पोर? नक्की काय खोळ आहे?'


   पोलिसांनी त्यांना माहिती पुरवली. काकांनी त्यांच्या समाधानासाठी शशांकचा उजवा दंड तपासला काळा निळा चक्क भाजलेला व्रण!


  बापरे किती भयानक आहे सत्य, राजूबाबू म्हणून काकांनी चक्क शशांकला मिठी मारली. शशांकला काहीच सुचत नव्हते.


  सुरेश निपचित पडलेल्या शोभाच्या देहाकडे बघत होता. खरच कोणत्या जन्मीचे भोग तू भोगलेस शोभा असे विचारत होता. शीलाला तर नक्की काय करायचे हेच सुचत नव्हते.

शेवटी पोलिसांनी शोभाची बॉडी आत नेली. सगळे सोपस्कार झाल्यावर तुमच्या ताब्यात देण्यात येईल असे मामाला सांगितले.


वकिल तिथेच होता. त्याला जामीन मिळत नव्हता. वकिलांकडे पाहताच शशांकच्या लक्षात आले.


  खिशातून त्याने सुरेशच्या सहीचे कोरी कागद सुरेशकडे दिली. "बाबा यापुढे अशी कोणतीही चूक करणार नाहीत ना?" शशांकने सुरेशला चांगलाच दम दिला.


सुरेश म्हणाला, "हो करणार अजुन एक चूक? आता कोणती?" शीलाने घाबरून विचारले.


  सुरेश त्या सभ्य गृहस्थ जवळ गेला. शशांकचा हात त्यांच्या हातात देत म्हणाला, "तुमची अमानत तुमच्या स्वाधीन करतो आहे. पण सगळेच या बाबतीत अज्ञानी होतो. चला झाले गेले विसरून जाऊया.आता नवीन आयुष्याला सुरुवात करूया."


  त्या दोघांनी शशांकला मीठी मारली. सन्मानाने घरी घेऊन आले. बरोबर शीला, सुरेश व मामाही होते.


    न राहून सुरेशने परत शशांकला एक विनंती केली. "शशांक एक काम करशील?"


" बोला ना बाबा! विनंती नको ह्क्काने सांगा."


  सुरेशने शीलाला जवळ बोलावले व विचारले , "शीला शशांकबद्दल तुझं मत काय?"


आज पहिल्यांदा शीला शशांककडे बघून लाजली. शशांकची आई लगबगीने जाऊन देवासमोर साखर ठेवून आली.


माळी काका म्हणाले, "राजूबाबू चार बांगडीवाल्या गाडीतून सगळे देवदर्शन करून या. तोपर्यंत आम्ही नवरा बायको पुरणपोळीचा स्वयंपाक करून ठेवतो."

   

मामाने आज्जीला फोन केला. "नातीने नशीब काढलं तुझ्या. तयार रहा आरतीचे ताट घेऊन. नात जावयाला घेऊन येतो आहे. अगदी सहकुटुंब सहपरिवार!"

   दुरवरून या प्रसंगाला साजेस गाणे वाऱ्याच्या लहरींबरोंबर कानावर पडत होतं.


        "खेळ कुणाला दैवाचा कळला,

    मी असो, तू असो, हा असो,कुणी असो.

    दैवलेख कधी कुणाला टळला.

    हार कुणाची? जीत कुणाची

    झुंज चालली दोन मनाची


समाप्त :


©️®️सौ. ऊज्वला रवींद्र राहणे

तुम्हाला ही कथा आवडेल. 👉 सावित्रीचा वसा

धन्यवाद वाचकहो कथामालिका लिहण्याचा माझा एक आगळावेगळा प्रयत्न, कसा वाटला अभिप्राय द्यायला विसरू नका! धन्यवाद 🙏🙏


वरील कथा सौ. उज्वला रहाणे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post