ती मी नव्हेच भाग ४
✍️ सौ. उज्वला रहाणे
मागच्या भागात आपण पाहिले शीलाला
आता फक्त बाबांची तब्येत महत्वाची होती.
या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी तिला आता कोणाच्यातरी आधाराची गरज वाटत होती.
म्हणून ती मामाला फोन करण्याच्या संभ्रमात होती. आता शशांकच्या आताच्या एकंदरीत वागणूकीवरून तर शशांक बदललेला वाटत होता. पाहूया शीला कशी शशांकची मदत घेते.
"शशांक खरच तु बदलला आहेस? नक्कीच तुझ्यावर विश्वास ठेवू?" शीला शशांकला म्हणाली.
"आता काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल शीला?"
" काही नको आता फक्त मला मदत कर."
शीलाने आणि शशांकने प्लॅन बनवला. शशांक त्यानुसार सुरेश आणि शीलाशी बोलताना तोंडसुख घेऊ लागला. व शोभाच्या बाजूने आहे हे दाखवू लागला.
"चल आई हे लोक असेच आहेत. किती जीव तोडून यांना पटवून दिले तरी. यांचे शेपुट वाकडे ते वाकडेच. मला पण नाही राह्यचे आता." शोभाला शशांक मधील अचानक झालेला बदल अचंबित करून गेला. तीला थोडा संशय पण आला.
शशांक तसा हूशार होताच. त्याने ताकास सुर लागू दिला नाही. तो शोभाला घेऊन आत बेडरूममध्ये गेला. जाताना त्याने शीलाला डोळ्याने खुण केली.
शशांकने शोभाला विचारले. "आई आता काय करायचं?" सावधगिरीने शशांकने पॅन्टच्या आतल्या खिशात फोन रेकॉर्डिंग करण्यासाठी ठेवला होताच.
शोभाने विचारले, "तु मागच्या सारखे रेकॉर्ड तर करत नाही ना माझे संभाषण?"
"नाही ग मला वाटलं होते. बाबा आणि शीला माझ्यावर विश्वास ठेवतील. पण तेच खरं रंगबदलू निघाले. आता तुझ्या शिवाय तरी मला कोण आहे?" शशांकने शोभाला आपल्या जाळ्यात पुर्णपणे अडकवले.
शोभा म्हणाली, "आता या सुरेशला रस्त्यावर आणायचे. त्याची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली पाहिजे. तु त्याचाच मुलगा आहे हे सिध्द करायचे. एकदा हे सगळं आपल्या हातात आले की, येथून रातोरात पळ काढायचा.
अरे बावळट आहे तो सुरेश, त्याला थोडे शरीरसुखाची अमिष दाखवले कि पुरता विरघळून जातो. मला त्याची नस कुठे आणि कशी दाबायची हे माहिती आहे. शशांक फक्त तू आता तयारीला लाग.
माझ्या ओळखीचे एक वकील आहेत. ते करतील आपल्याला मदत." शोभा तिचे एक एक प्लॅन शशांकच्या कानावर घालत होती.
शशांक काही दुधखुळा नव्हता. तो मस्त रेकॉर्ड करत होताच. 'किती भयंकर आहे ही बाई खरच सडून मरेल. काय काय प्लॅन हिच्या डोक्यात शिजतात.कठीण आहे सगळे. असो.
आता हिच्या प्लॅन मध्ये सामील होऊन हिला पोलीस स्टेशनवर घेऊन जाऊ. एकदा पोलीस ठाण्याची हवा खाल्ली कि, येईल ताळ्यावर. पण शेवटी असले लोक म्हणजे, सुंभ जळले तरी पीळ जळत नाही.'
"आई चल आपण काही तरी निमित्त करून बाहेर पडू आणि तुझ्या वकीलाला भेटूया."
" हो चल," शोभा आता पुरती शशांकच्या जाळ्यात फसली होती.
शशांक बाथरूमचे निमित्त करून आत गेला. केलेले रेकॉर्डिंग शीलाला पाठवले.
फोन करून सांगितले. "काहीही बोलू नकोस आणि तुझ्या फोनवर सेव्ह असलेले माझे नाव बदल दुसऱ्या नावाने माझा नंबर सेव्ह कर." शीला पण शशांक सांगत होता त्याप्रमाणे करत होती.
त्याने शीलाला सांगितले, "मी वकीलाकडे जाऊन येतो. तोपर्यंत तू पोलीस स्टेशनवर फोन करून पोलीसांना बोलावून घे. त्यांना माझी जुनी व नवी दोन्हीही व्हिडीओ क्लिप ऐकव."
"ओके", शीलाने शशांकला मेसेज केला.
शोभा तयार होऊन शशांक बरोबर बाहेर पडणार इतक्यात सुरेशने तिला हटकले.
"कोठे निघालात? आता नव्याने दिवे लावायला?"
"तुला काय देणे घेणे आमचे आम्ही पाहू. तब्येत बरी नाही माझी. शशांक बरोबर दवाखान्यात जाते आहे." शोभाने हजरजबाबी उत्तर दिले.
"ठीक आहे लवकर या", सुरेश बोलला. शोभा हो म्हणून बाहेर पडली. जाताना ती शशांकला म्हणाली. "बघ म्हणाले होते ना तुला हा माझ्या शिवाय राहूच शकत नाही. आज बघ कसा चोळामोळा करते त्याचा. मग सगळे आपलेच."
"अग शीलाचे काय?"
"शशांक एकदा तिला तु जबरदस्तीने वापर मग ती तुझीच." कुत्सित भावनेने शोभा हसली.
शशांक मनातून खुप चिडला होता. त्याला वाटलं इथेच सगळे संपवावं. आपल्याला जेल झाली तरी चालेल पण दोन आयुष्य तरी वाचतील.
शशांक व शोभा वकिलाकडे पोंहचले. शोभा वकिलाच्या केबीनमध्ये गेली व शशांक बाहेर बसला. फटीतून तो आतले सगळे बघत होता ऐकत होता. त्या वकिलांची किळसवाणी नजर शोभाच्या सर्वांगावर फिरत होती.
लाळघोटेपणा करून वकील शोभाशी बोलत होता. शशांकला आता हा सगळा प्रकार किळसवाणा वाटत होता.
"आजची रात्र मग तुमचे काम झालेच बघा." वकिल म्हणाला.
"बघते नक्की नाही सांगू शकत"..शोभा म्हणाली.
शशांक आता खाऊ कि गिळू या बाईला या नजरेने तिच्याकडे पाहत होता. पण त्यांने धीर धरला. प्रकरण जास्त हातघाईवर आले तर शोभाला संशय येईल. म्हणून तो शांत बसला.
इतक्यात त्याने शीलाला मेसेज केला. पोलिसांना आत्ता नको बोलावूस. तिला रंगेहाथ पकडता येणार आहे. शीला सावध होतीच तिने OK लिहिले.
वकिलांकडून घरी येताना शोभा शशांकला म्हणाली, "काही कागदपत्रे तयार करावी लागतील. त्यासाठी मला रात्री बोलावले आहे. रात्रीचा वेळ निवांत मिळतो ना मग थोडी चर्चा पण करता येते. तू मला वकिलाकडे सोड व घरी सांग तुझ्या मित्राकडे आई राहिली. मला तिच्या सुरक्षितेच्या दृष्टीने जे योग्य वाटले ते केले."
शशांकला माहीत होतेच शरीरसुखाची चटक हिला शांत बसू देणार नाही. ती आज जाणारच. तोही शोभाला हो म्हणाला. कारण आता सावज त्याच्या जाळ्यात पुर्णपणे अडकत चालले होते.
दोघेही घरी पोंहचलं. सुरेशने विचारले, " काय म्हणाले डॉक्टर."
" काही नाही टेंशन खुप घेतले आहे. त्यासाठी हवापालट करा." म्हणत ती बेडरूम मध्ये गेली.
तिच्या मागे सुरेशही गेला. ही साडी बदलत होती. अर्धवट बदलेल्या साडीत परत सुरेश अडकला. ही कोण, कसे फसवलं हे सगळं विसरून परत तिच्या जाळ्यात गुंतला. आणि नको ते करून बसला.
या सगळ्यात एका क्षणीक सुखासाठी तिने समोर केलेल्या कागदावर त्याने सह्या देखील केल्या.
शोभाचे काम झाले. सुरेशला जे हवं ते तिने त्याला दिले. आता रात्री वकिलांला खुश करायचे होते.
आता तिला काही कागदपत्राची पुर्तता करण्यासाठी वकिलांकडे जायचे होते. तेही रात्री. शशांकला काही समजत नव्हते असे नाही. तो बरोबर सावध होताच.
सुरेशचा फायदा घेऊन कोऱ्या कागदावर शोभाने सह्या घेतल्या होत्या. ते कागद तिने शशांककडे दिले. शशांक तर आता अर्धा डाव जिंकला.
त्याने परत त्या कागदाचा फोटो काढून शीला पाठवला. शीला घाबरली.
"घाबरू नकोस, या बावळट बाईने ती कागद माझ्याकडे दिली आहेत. पण एवढे होऊनही बाबा कसे परत परत तिच्या जाळ्यात अडकतात हेच कळत नाही ग." तो शीलाला म्हणाला.
"हो हेच मला समजत नाही." शीला पण म्हणाली, "असो. पुढे काय?"
"मी आता आईला घेऊन वकिलांकडे जातो आहे. तु पण पोलींसाना घेऊन तिकडे पोंहच. म्हणजे रंगेहाथ तिला पकडू व्हिडीओ क्लिप तयार आहेच." शीलाने शशांकने वेल प्लॅन बनवला.
कारण पोलिसांना बोलावताना त्यांना पुरावे लागतात. शशांक थातूरमातूर कारण सांगून शोभा बरोबर बाहेर पडला.
जाताना शोभा म्हणाली, "ते सह्या घेतलेली कोरे कागद आहेत ना तुझ्या बरोबर शशांक? का विसरलास घरी? फार महत्वाचे आहेत ते?"
"हो आई आहेत बरोबर कसा विसरेल? (त्यामुळे तर तुझा खेळ संपणार आहे. महत्वाचे काम तर तुच केलेस!)" तो मनातल्या मनात बोलत होता.
"आता एक काम कर मी वकिलाशी बोलते तोपर्यंत तु या कागदाची झेरॉक्स काढून घेऊन ये दोन कॉप्या असलेल्या बऱ्या."
शशांकला माहिती होते हि आपल्याला का पिटाळते आहे. कोऱ्या कागदाच्या झेरॉक्स घेऊन काय करणार आहे? पण त्याचेही काम सोपे झाले.
ती आत जाताच ह्याने शीलाला फोन लावला. "ताबडतोब निघ पोलीसांना फोन लावून जागेची माहिती दे मी बाहेर उभा आहे."
शीलाने लगेच पावले उचलली. मोठे कोणीतरी हवं म्हणून त्या ठिकाणी मामाला पण बोलावले.
मामा पण कसलेच आढेवेढे न घेता संकटातील भाच्चीला वाचवण्यासाठी हजर झाला.
पोलीस येताच शशांकने काचेच्या फटीतून बंद दरवाज्याच्या आतील दृश्य पोलिसांना दाखवले.त्यानुसार पोलीसांनी व्हिडीओ क्लिप देखील ऐकली. शशांक म्हणाला, "आता तुम्ही निर्णय घ्या."
पोलीसांनी बाहेरून नेमप्लेटवरील नंबर वरून त्या वकिलांला फोन लावला. "अर्जंट मॅटर आहे. केस घ्याल का?"
वकिलांनी 'नाही हो आता रात्र झाली. आणि मी बाहेर गावी आहे', असे सांगितले. परत पोलीसांनी नवीन दुवा भेटला.
पोलीसांनी लेडीज पोलीसही बोलावून घेतले. ताबडतोब दार तोडून रंगेहाथ विचित्र अवस्थेत दोघांनाही पकडले. वकिल म्हणाला, "असे कोणाच्याही केबीनमध्ये परवानगी शिवाय तुम्ही कसे घुसता?"
पोलीसांनी त्याचीच टेप त्याला ऐकवली. "तुम्ही बाहेरगावी होता ना, मग तुमची लाईट चालू दिसली तुम्ही नसताना चोर घुसले का? ही शहानिशा करण्यासाठी आम्ही आलो. तसे आम्हाला आदेश असतात. परवानगीची गरज नसते हो वकीलसाहेब! हे तुम्हांलाही माहिती आहे, नाही का?"
लेडीज पोलीसनेही हिला रंगेहाथ पकडले. चांगल्या चार शिव्या देखील हासडल्या. "तुम्ही लोक म्हणजे स्त्री जातीला काळिमा अहात.!."
"शशांक, बघ रे काय चालले आहे."
"आई मलाही माहित नाही. मी तर झेरॉक्स आणायला गेलो होतो." शशांकने हुशारीने उत्तर दिले.
दोघांनाही पोलीस घेऊन गेले. इकडे शीला व शशांकने सुटकेचा निश्वास टाकला. सुरेशला काहीच कळू दिले नाही. कारण सुरेशला परत हिने वासनेच्या बळी पाडून सुटका करून घेतली असती.
शीलाने मामाला घट्ट मिठी मारली. "आमचे एवढेसे लेकरू किती सहन करत होते. वेळोवेळी विचारले तरी कधीच कसलाच थांगपत्ता लागू देत नव्हते."
"मामा, शशांक मदतीला धावून आला म्हणूच हे शक्य झाले." मग शशांकच्या चांगल्या वाईट दोन्हीही बाजू शीलाने सविस्तर मामाला सांगितल्या.
मामाने शशांकचे मनापासून आभार मानले. दोघांनाही घरी येण्याची गळ घातली. पण उद्या परत पोलीस स्टेशनवर जावे लागेल. बाबा एकटेच घरी आहेत आणि बाबांना अद्याप काही कळू द्यायचे नाही. असे सांगून दोघांनीही नकार दिला.
"मामा शीलाच्या बाबतीत निर्धास्त रहा तिच्या केसालाही धक्का लागणार नाही. यापुढे शीलाचे शील सांभाळण हि जबाबदारी माझी आहे.
उद्या सकाळी या पोलीस ठाण्यात आणि मुख्य म्हणजे यातले आज्जीला काहीही सांगू नका. त्यांना या वयात आणखी त्रास नको." शशांक मामाला म्हणाला.
शीला आणि शशांक घरी परतले. सुरेश उठून तिघांना घरात शोधत होता.
"अरे तिघेही कोठे गेला होतात. आई कोठे आहे?"
" बाबा आईला दवाखान्यात दाखल केले आहे. थोडा अशक्तपणा आहे. त्यामुळे चक्कर येते. सोडतील उद्या." शशांकनेच खोटे उत्तर दिले.
"मी आता जेवन करून जाईल दवाखान्यात तिच्या सोबत. तुम्ही काळजी नका करु."
आता पुढे काय होणार. सुरेशला सगळा प्रकार समजल्यावर तो कसा रिअॅक्ट होणार? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुढील भागात :::
क्रमशः
©® सौ. ऊज्वला रवींद्र राहणे
वरील कथा सौ. उज्वला रहाणे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.