ती मी नव्हेच भाग तीन

   "ती मी नव्हेच" ३

✍️ सौ. उज्वला रहाणे 

भाग दोन

मागच्या भागात आपण पाहिले शशांकला सुरेशने थप्पड मारली.पण शशांकने आपली बाजू मांडली.आता शशांक काय ऐकवणार सुरेशला?


   "बाबा ऐकायला वेळ आहे तुम्हाला मग ऐकाच."


   शशांकने शोभा आणि त्याच्यामध्ये झालेल्या संवादाची आॉडिओ ल्किप रेकॉर्ड केले होती. त्याचा आॉडिओ सुरेशला ऐकवू लागला.


  एक,एक वाक्य ऐकताना सुरेश पण मनाने कोसळत होता.


    बापरे किती भयानक हे सगळं, सुरेश कोसळला. बाबा बाबा करत शशांकने त्यांच्या चेहर्‍यावर पाणी मारले. उठून बसवले. "शशांक हे कशासाठी केलेस तु?" शोभा शशांकला विचारत होती.


 " हो मला माहीत होतं तु नक्कीच पलटी मारणार म्हणूनच रेकॉर्ड केले. बाबा ठीक अहात तुम्हीं आता उर्वरित भाग मी तुम्हाला नंतर ऐकवतो."


 " हो मी बरा आहे. पण शीलाला बोलावून घे.

तुर्तास मला शीलाच्या आधाराची गरज आहे."


  "हो ठीक आहे बोलावतो शीलाला.शशांकने शीलाला मेसेज केला. बाबांची तब्येत बरी नाही. तू घरी ये." शीला मैत्रीणीला घेऊन घरी आली.


    घरातील चित्र पाहून  थातूरमातूर कारण देऊन तिने मैत्रीणीला घरी पाठवले. गरज लागली तर बोलावते. असे म्हणाली.




    सुरेश जवळ येऊन बसली. "काय होतय बाबा डॉक्टरांना बोलावू का?"


"नको नको मी ठीक आहे."




"पण तू किती सहन करत होतीस बाळा! मी पुरता वाहवलो आहे. या दलदलीत फसलो आहे ग!"


" काय झाले बाबा?"


  "थांब शीला मी सांगतो सगळे."  शीलाला शशांकने सगळा वृत्तांत सांगितला. जो तिला आधीच माहित होता.


   "शीला मला माफ करशील? खरं तर मी जे वागलो आहे त्याला शिक्षा कठोर हवी आहे. वाटल्यास जेलची हवा पण मी भोगायला तयार आहे. आज सगळे तुम्हाला सांगून मी स्वतःहाच पोलिसांच्या स्वाधीन होणार."


  "अरे काय शशांक काय बोलतोस.मी कशी राहणार तुझ्याशिवाय. मला कोण आहे?" शोभा रडण्याचे नाटक करत होती.


    "एक अक्षरही बोलू नकोस शोभा. किती मनापासून प्रेम केले तुझ्यावर माझ्या प्रेमाची अशी परतफेड. शी किळस येते तुझी. किती धातांत खोटे बोलत आहेस आणि बोलत होतीस.


   शीला वारंवार मला जागे करत होती. पण पुरता अडकलो होतो तुझ्यात.


पण माझ्या प्रेमाची तु मात्र प्रतारणा केलीस. चालती हो माझ्या डोळ्यासमोरून." सुरेश रागाने बेफाम झाला होता.


    शीलाने परत त्याला शांत केले. शशांक माफी मागत होता..पण सुरेशला तोही आता डोळ्यासमोर नको होता.


  थोड्या वेळाने सुरेश शांत झाला. शशांक काही न बोलता तिथेच मान खाली घालून उभा होता. शोभाचे रडणे चालूच होते. शीला मात्र  अचानक आलेल्या या संकटाने पुरती भांबावून गेली होती.


  यातून कसा मार्ग काढायचा या विवंचनेत सुरेश होता. त्याचे मन सांगत होते. शशांक सरळ मुलगा आहे. बस्स थोडा वाहवला आहे. पण त्याला चांगला मार्गदर्शक मिळाला तर तो सुधारेल.


  पण शोभाचे काय? ती रंगबदलू सरडा. खरच कुलटा! वेळीच सावध केले. शशांकने. तो विचार करू लागला.


   शीला उठली.  बघता बघता घड्याळात एक वाजत आला होता. कोणाच्याच पोटात अन्नाचा एकही कण नव्हता. स्वयंपाकघरात गेली. गॅसवर खिचडी चढवली.




  शीला परत सुरेशने शीलाला आवाज दिला." मला थोडे बोलायचं आहे. बाहेर ये."


   "शीला मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे."


" बाबा आत्ता नको. तुम्हांला सध्या आरामाची गरज आहे. आणि तुम्ही आज आॉफीस मध्ये कळवले का येणार नाही म्हणून. आता तुम्ही कोठेही बाहेर जाणार नाही."


   शीलाने खिचडी केली. सर्वाना बोलावले. शशांक तिला मदत करत होता. पण ती शक्यतो तर त्याची मदत नाकारत होती.


  शोभा पण विषय बदलून काही तरी थातूरमातूर कामाचा बाउ करत होती. शीलाने तिच्याकडे दुर्लक्ष केले.


"बाबा आज कोणताच विषय नको. माझ्या दृष्टीने तुमची तब्येत महत्वाची आहे. तेंव्हा हा विषय इथेच थांबवू."  शीलाने  सुरेशला स्कत ताकीद दिली.


   "हो मी पण तेच म्हणते झाले गेले विसरून जाऊ सगळेच एकमेकांना माफ करूया आणि परत नव्याने सुरूवात करू." शोभाने आपले म्हणणे मांडले.

  

  "कसली सुरूवात कसला शेवट. सगळे माफ करण्याच्या पलिकडे गेले आहे शोभा. अशी माफीची भाषा तुझ्या तोंडात शोभतच नाही. कृपया माझ्या नजरेसमोर थांबू नकोस." सुरेश त्वेषाने बोलला.


"आई थोडं धीराने घे. प्लीज आता कोणताच विषय नको." शीलाने शांतपणे शोभाला समजावले.




    शशांक पण दातओठ खाऊन शोभाकडे बघत होता. शोभा शशांकला म्हणाली, "शशांक थोडं माझ्याबरोबर आत येतोस?" शशांकने चक्क नकार दिला. त्यालाही आता बाबांची तब्येत जास्त महत्वाची वाटत होती.


     शीलाने बाबांना थोडा आराम करायला सांगितला. खिचडी खाऊन सुरेश तिथेच लवंडला.

शशांकने पांघरूण आणून त्यांच्या अंगावर घातले.

शीला शांतपणे सुरेशच्या पायाशी बसून विचार करू लागली.


    'खरच सगळे कसे अवघड होऊन बसले आहे. मार्ग कसा काढायचा? आज्जीला आणि मामाला सांगूया का?


   शेवटी पाणी तर गळ्यापर्यंत पोंहचलं आहे. मार्ग तर काढावा लागणार.ही बया सगळे हडप करून नक्कीच आम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही.


   हे प्रकरण महाभयंकर आजून या नंतर कोणाला हेरून ठेवले असेल हिने देव जाणे!..'


    शशांकच्या मनातही याशिवाय वेगळे विचार नव्हते. त्याचे मन त्याला शीलाशी बोलायला सांगत होतं. त्याने दोनदा प्रयत्नही केला. पण शीला शशांकचे कोणतेच म्हणने ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.


    इतक्यात सुरेशला जाग आली. त्याने शीलाला पाणी मागितले, शीला पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात जात होती. तितक्यात तिला शोभाच्या बंद दरवाज्यातून शोभा कोणाशीतरी बोलत असल्याचे ऐकू आले. 'बघ आता शशांक, सुरेश कि शीला' एवढेच तिच्या कानी पडले.


   'बापरे म्हणजे हिचा काहीतरी प्लॅन शिजतोय. आता वेळीच सावध व्हायला हवे. बाबांना सांगितले तर त्यांच्या तब्येतीवर परिणाम होणार. काय करू?


    घेऊ का शशांकची मदत? नक्की तो तर शोभाच्या कटात सामील नसेल ना? शीला परत अडचणीत आली. तोही नाटक तर करत नसेल ना?'


  इतक्यात शशांक स्वयंपाकघरात आला. "अग पाणी दे ना बाबांना!केंव्हा पासून ते तुला बोलावत आहेत तुला!"


  हो आले, म्हणत शीला पाणी घेऊन आली. बाहेरच्या हालचालीवरून शोभा सावध झाली.


   झोपेतून उठलेल्याचे नाटक करत बाहेर आली. शीला मात्र आता खुपच अस्वस्थ होती. तिने मनाचा कौल स्विकारला व शशांककडे मदतीचा हात मागितला.


   शशांक देईल का तिला मदतीचा हात. का तोही बदलेल? शोभाची अवस्था आता काय होणार?या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहूया पुढील भागात.


क्रमश:


©️®️ सौ.ऊज्वला रवींद्र राहणे

भाग चार


वरील कथा सौ. उज्वला रहाणे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post