ग्रहण

 ग्रहण  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️स्वाती वक्ते



आई मी येतेय गं. डब्बा घेतला. बाय.

आई म्हणाली, "अगं रिया  थांब हा मोबाईल राहिला तो ठेव. अगं काय बाई किती घाई. किती दगदग. मी किती दिवस असेल गं तुझ्या आयुष्यात लग्न कर आणि सेटल हो बाई आता". आई सकाळी सकाळी काय गं हा विषय रिया  म्हणाली.रियाने  आईच्या हातातला मोबाईल घेतला आणि म्हणाली बरं बाय.. आईने रियाला बाय केले आणि निवांत बसली आणि रियाच्या विचारात भूतकाळात गेली किती समंजस मुलगी आहे. कोणत्याही परिस्थितीत रडत न बसता मार्ग काढून पुढे जाते आणि आपल्यालाही सहारा देते. काहीतरी मागच्या जन्मातील पुण्य असेल म्हणुन अशी मुलगी देवाने दिली.

तिला आठवले की रियाचे बाबा अचानक रियाच्या बारावीच्या गणिताच्या पेपर च्या वेळी कार्डीक अरेस्टने   गेले. दुसऱ्या दिवशी पेपर होता. आणि रियानी वर्षभर छान अभ्यास केला.पण त्याही परिस्तिथीत न डगमगता सर्व नातवाईक घरी असतांना पेपर ला गेली आणि सर्वानी मना केले तरी गेली. कारण तिला माहित होते की बाबा गेले आपले छत्र हरविले आणि एकमेव जे उदरनिर्वाहचे साधन होते तेच गेले. त्यांचे स्वप्न पूर्ण करणे आणि कुटुंबाला घरात मोठी मुलगी म्हणुन आधार देणे  हेच तिचे कर्तव्य आणि जबाबदारी अहे आणि ह्याही परिस्थितीत परीक्षा देऊन रियाला बारावीला 90%मार्क्स मिळाले. रियाला इंजिनीरिंगला प्रवेश मिळाला असता घरातील आर्थिक परिस्थितीचा विचार करून रियाने बी. एस. सी. कॉम्पुटरला प्रवेश घेतला आणि कॉलेज मधून आल्यावर घरी मुलांच्या  शिकवणी घेणे सुरु केले.घरी लहान भाऊंही नववीत होता त्याची जबाबदारीही आता होती.रियाचे बाबा कृषी विभागात सहायक होते. त्यांचे काही पेन्शन आणि रियाचे शिकवणीचे पैसे ह्यातून दोघांचे शिक्षण आणि घर चालवीने मोठ्या मुश्किलने होत असे.

रियाला ग्रॅज्युएशन झाल्यावर एका सॉफ्टवेअर कंपनीत बी एस सी कॉम्पुटर असल्यामुळे जॉब मिळाला. तो करत तिने स्वतःचे पोस्ट ग्रॅज्युएशन तसेच भावाचे इंजिनीरिंग पूर्ण केले. भावाला चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळाला. आता रियाची जबाबदारी सपंली असे तिला वाटले तोपर्यंत तिच्या मामाने तिच्यासाठी चांगले स्थळ आणले आणि थाटामाटात रियाशी  लग्न लावून दिले. लग्न झाल्यावर मांडव परतीसाठी रिया माहेरी आली. दुसऱ्या दिवशी समर रियाला परत  नेण्यासाठी कारने  यायला निघाला आणि मध्येच उभ्या ट्रकला गाडी स्पीड मध्ये असल्यामुळे धडकली आणि ऑन द स्पॉट ड्राइव्हर समर आणि त्याचा मित्र ह्यांचा मृत्यू झाला.रियावर परत एकदा मोठे संकट आले. रिया सासरी आई आणि भावाबरोबर गेली पण अपशकुनी म्हणुन सासरच्यांनी रियाला घरातून काढून दिले. आता दुःखाचा मोठा डोंगर रियावर कोसळला. रियाला ह्या दुःखातून कसे सावरावे हा प्रश्न सर्वांसमोर होता. पण पंधरा दिवसांनी रियाने परत कामाला सुरवात केली. भेटीला येणारे जाणाऱ्यांनाही रियाचे सांत्वन कसे करावे कळत नव्हते पण रिया मात्र खम्बिरपणे परिस्तिथी हाताळत होती. दिवसामागून दिवस गेले. रियाच्या भावाचे म्हणजेच मयूरचेही लग्न झाले त्याची बायकोही नौकरी करणारी होती. पण लग्न झाल्यावर सहा महिन्यांनीच मयूरने दुसरे घर घेतले आणि वेगळा निघाला.

आता रिया आणि रियाची आई दोघीच घरात होत्या रियाचीही आता तिसी उलटली होती.रियाने नौकरी बरोबर समाज सेवाही सुरु केली. एका संस्थेशी जुळून गरीब  दहावी, बारावीच्या मुलांना  गणित मोफत शिकविणे तिनी सुरु केले. ऑफिसमधून आल्यावर ती क्लासेस घ्यायला जायची रिया जीव ओतून शिकवायची त्यामुळे खुप मुलांना चांगले मार्क्स मिळत.तिचा हा सेवाभाव बघून बऱ्याच संस्थानी तिचा सत्कार केला वृत्तपत्रातही तिच्या कामाची दखल घेण्यात आली. रिया अश्याप्रकारे दुःख विसरून स्वतः ला कामात गुंतवून जगत होती. रियाच्या आईच्या डोळ्यासमोरून हा सर्व भूतकाळ जात असतानाच बेल वाजली. रियाच्या आईचे डोळे भूतकाळात जाऊन पाणावले होते.

  तिने दार उघडले तर कुरियर वाला होता. त्यात यु ट्यूब कडून रियाला दहा लाख सबस्क्रॅयबर झाल्यामुळे भेटलेले बटन होते.रियाच्या आईला ते बघून खुप आनंद झाला तिने लगेच रियाला फोन लावून बातमी कळवली रियाचा  आनंद गगनात मावत नव्हता. रियाने एक गणित आणि विज्ञान  शिकविण्यासाठी स्वतःचे युट्यूब चॅनेल सुरु केले आणि ते थोड्याच दिवसात खुप प्रसिद्ध झाले.  ते बघून खुप मुलांनी  अप्रतिम यश मिळविले. रिया स्वतःच सॉफ्टवेअर मध्ये कामाला असल्यामुळे स्वतःची वेबसाईट बनवली त्यात खुप सारे अभ्यासाचे मटेरियल टाकले.

यु ट्यूब कडून बटन मिळाले हा आनंद शेअर करण्यासाठी रियाने  अजयला फोन लावला."हॅलो अजय, एक आनंदाची बातमी आहे ओळख बघू. "

 अजय म्हणाला,"तुला प्रमोशन मिळाले. "

रिया म्हणाली,"अरे नाही रे."

अजय म्हणाला, "मग तु लग्न करणार. "

रिया म्हणाली, "अरे जाऊ दे मूड ऑफ नको करुस." मीच सांगते. मला यु ट्यूब कडून दहा लाख सबस्क्रॅयबर मिळाल्याबद्दल बटन मिळाले."

अजय म्हणाला, "काय सांगतेस, अभिनंदन, पार्टी तो बनती है."

रिया म्हणाली, "अरे हो अजय हयाचे सर्व श्रेय तुलाच जाते. तुच मला हे सर्व सुचविले आणि सर्व मदतही केली. त्यामुळे आज नक्की आपण पार्टी करू."

अजय हा एक मध्यम वर्गीय एका जुनिअर कॉलेज मध्ये अकरावी बारावीला गणित शिकवत होता. रियाची आणि अजयची ओळख त्याच संस्थेत झाली जिथे रिया मोफत ऑफिस नंतर गणित शिकवत होती तिथेच अजयही  शिकवत होता. अजयचेही यु ट्यूब चॅनेल होते आणि त्यानीच ही आयडिया रियाला दिली होती. पण अजय सोबत पी एच. डी. ही करत असल्यामुळे त्याला नियमितपणे व्हिडीओ बनवून अपलोड करायला वेळ मिळत नव्हता.पण रिया नियमित व्हिडिओ अपलोड करत असल्यामुळे आणि तिचे व्हिडीओ पण खुप सोप्या भाषेत असल्यामुळे. तिनी एक वर्षात दहा लाख सबस्क्रॅपबरचा पल्ला गाठला.

रिया आणि अजय पार्टीसाठी एका हॉटेल मध्ये भेटणार होते. रिया घरी गेली. छान तयार झाली आणि आईला सांगून अजयला पार्टी देण्यासाठी हॉटेलला गेली. तिनी आईलाही पार्टीसाठी येण्याचा आग्रह केला पण तिच्या आईला भजनासाठी जायचे होते म्हणुन नको म्हटली.

रिया सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसून तयार होऊन पार्टीला गेली अजय आधीच तिथे आला होता. पहिल्यांदा रियाला नटलेले बघून अजय तिला पाहतच राहिला. रियाने अजयला हाय केले अजय तिच्याकडे एकटक बघत होता. रिया त्याच्या डोळ्यापुढे चुटकी वाजवून  हॅलो लक्ष कुठे अहे असे विचारते. अजय भानावर येऊन म्हणतो तुझ्याकडेच बघत होतो रिया. आज तु खुप सुंदर दिसतेस.

 रिया त्याला म्हणते, "थँक्स अजय ".

 मग मेन्यू कार्ड हातात घेऊन रिया अजयला विचारते. "काय ऑर्डर करू. "अजय म्हणतो,"काहीही कर रिया . जे तुला आवडते तेच मलाही नक्की आवडेल "रिया म्हणते पण मी पार्टी देत आहे तर तुझ्या आवडीचे ऑर्डर करू या. नेहमी मीच ऑर्डर देते."

अजय मेन्यू कार्ड घेऊन नेहमीप्रमाणे रियाच्याच आवडीचे ऑर्डर करतो.रिया हसते . अजय रियाला म्हणतो,"मला खुप दिवसाचे तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे.

रिया म्हणते, "बोलना मग बिनधास्त. परवानगी कसली घेतो."

अजय म्हणतो,"तु नकार  देशील ह्याची भिती वाटते आणि आपली मैत्रीही तुटेल "

रिया हसून म्हणते, "असे काय बोलणार आहे. आणि आपली मैत्री एव्हडी सहजासहजी तुटणार नाही. बिनधास्त बोल."

अजय सर्व हिम्मत एकवटून एक गुलाबाचे फुल देऊन रियाला विचारतो, "माझ्याशी लग्न करशील  रिया,"

रिया काहीही उत्तर न देता शांत बसते.

अजय म्हणतो, "अगं काहीतरी बोल पण मैत्री तोडू नको प्लीज.तु नाही म्हटले तरी चालेल तुझ्यासारखी मैत्रीण आहे. ह्या आशेवर पूर्ण आयुष्य एकटा जगेल पण दुसऱ्या कुणाशी लग्न करणार नाही."

हे ऐकून रिया म्हणते, "अजय, असे करू नको, मी एक दुसऱ्याच्या आयुष्याला लागलेले ग्रहण आहे. माझ्या आयुष्यात येणारे लोक मला सोडून जातात आणि तुझ्याशी लग्न करायला मलाही आवडले असते पण मला तुला गमवायचे नाही असे म्हणुन रियाच्या डोळ्यातून अश्रू वहायला लागतात."

अजय रियाचे स्वतःच्या रुमालाने अश्रु पुसून म्हणतो, "असे काहीही होणार नाही रिया. माझ्यावर विश्वास ठेव. तुला माझ्याशी लग्न करायला प्रॉब्लेम नाही हे ऐकून मला खुप चांगले वाटले. मी उद्याच काकूंशी म्हणजे तुझ्या आईशी बोलतो आणि आपण लवकर लग्न करू."

रिया म्हणते, "नको अजय मला कुणाच्याही आयुष्यात ग्रहण लावायचे नाही."

अजय म्हणतो, "काही काळजी करू नकोस रिया मी कधीही तुला सोडून जाणार नाही."

पार्टीनंतर अजय रियाला सोडायला घरी जातो आणि रियाच्या आईला रियाचा हात मागतो रियाही लग्नाला तयार हे ऐकून आई खुप खुश होते आणि जवळचाच मुहूर्त बघून दोघांचे लग्न लावून देते रियाचा भाऊंही लग्नाला येतो. लग्नानंतर रियाची आई रियाजवळच राहते रिया नौकरी सोडून फुल टाईम स्वतःचे कोचिंग क्लास सुरु करते. अश्या प्रकारे रिया मुलांना घडविण्याचे काम करत सुखी होते...

स्वाती वक्ते, पुणे

ही कथा वाचुन पहा

👇

हृदयस्थ

Post a Comment (0)
Previous Post Next Post