प्यार का गम

 # प्यार का गम (अक्षरचाफा कथा स्पर्धा)


✍️ शोभा  गोडबोले जोशी


वो तेरे प्यार का गम....



कामात पूर्णपणे गढलेल्या अनघेच्या कानावर  मुकेशचा दर्दभरा स्वर आला.क्षणभर तिचे डोळे भरून आले. खालचा ओठ वरच्या दाताने घट्ट आवळला गेला.ती वेदना थेट तिच्या मस्तकात गेली. काही वेळ असाच गेला.मोठ्या निग्रहाने तिने डोळ्यातले पाणी व अस्वस्थ मनावर ताबा मिळवला."अपनी किस्मत ही कुछ ऐसी थी के दिल टूट गया" हे तिला मनोमन पटले आहे.



उत्तम  शिक्षण घेतल्यानंतर जेंव्हा अनघेला छानशी नौकरी मिळाली तेव्हा स्वर्ग तिच्यासाठी केवळ दोन बोटांवर होता.नव्या jobमधे हळूहळू रुळत होती. टीम मधे काम करणारे सगळेच चांगले होते.दिवसातले 10/12 तास एकत्र काम करतांना सहजच एकमेकांची जास्त जवळून ओळख होत होती.गेले चार पाच महिने तिला जाणवत होते की "अनय" तिच्यात जरा जास्तच  intrest घेतोय. आधी काळजी मग खुशी असे करता करता ती त्याचा गंभीरपणे विचार करु लागली.शेवटी तो दिवस उजाडला जेव्हा अनय ने तिला मागणी घातली. हे जरी अपेक्षित असले तरी आई बाबां चा निर्णय त्यांचे मत तिच्यासाठी खूपच महत्त्वाचे होते.दोन्ही घरचे एकत्र जमले. मन मोकळ्या गप्पा झाल्या.अनयच्या घरचे आनंदात परतले.बाबांचे म्हणणे पडले सगळे कसे ठीक ठाक आहे. तूही आता लहान नाहीस योग्य तो निर्णय घेऊ शकतेस.आई मात्र खूप वेळ गप्पच होती.तुला काय वाटतेय ते स्पष्ट सांग,असे जेव्हा विचारले तेव्हा म्हणाली वरवर बघता सगळं कसं साजिरं गोजिरं आहे, कदाचित हा माझा संशय असेल मला वाटतयं ते एकत्र तर आहेत पण एकमेकां सोबत नाहीत.वरवर बघता बोट दाखवावे असे काहीच नाही.चांगला देखणा मुलगा, छान job उत्तम शिक्षण,लग्न झालेली बहीण. कुठे कसलीच जबाबदारी नाही.पण काहीतरी थोडसं खटकतेय हे मात्र निश्चित.तो जरा"गुलछबू" वाटतो. हे काळजीचे कारण असू शकते,यावर माझा व बाबां चा विश्वासच बसत नव्हता.आम्ही मनसोक्त हसलो.आई ने परत तो विषय वाढवला नाही.

पुढचे दिवस खरेदी, लग्न  यातच भुर्रकन उडून गेले.बघता बघता सुट्टी पण संपली. आम्ही कामावर join झालो.



 आता अनयची अधूनमधून भुणभुण सुरु झाली तू  वेगळे department मागून घे.दोघे एकाच ठिकाणी काम  करतो ते बरे नाही दिसत.मला तर यात काही problem वाटत नव्हता.पण रोज तीच ती चर्चा नको म्हणून मी  boss कडे तसा अर्ज दिला.दोन चार वेळा आठवण पण करुन दिली.एक दिवस त्यांनी मला cabin मधे बोलावले.काय problem आहे हे विचारले यावर अनयचे काय म्हणणे आहे हे  मी त्यांना सांगितले.Boss आमच्या बाबांच्या वयाचे दोन मिनिटे शांत बसले मग म्हणाले तू change मागू नकोस.या महिन्यात तुझे promotion due आहे.नवीन department ला गेलीस तर परत काही काळ थांबावे लागेल.त्यापेक्षा अनय ला change घेऊ दे.गोष्ट तशी सरळ, पटण्यास सारखी होती. दोन तीन दिवसांनी अनयने परत एकदा विषय  काढला मी boss बरोबर झालेले बोलणे त्याला सांगितले.आता पुढचा प्रश्न होता त्याने change मागण्याचा.यावर त्याने ठाम नकार दिला.तुझ्या आधी मी join झालो,तेव्हा तुझ्या आधी मलाच प्रमोशन मिळेल.तू हट्ट सोड. नवीन ठिकाणी अर्ज कर, जमवून घे हे तो मला परत परत सांगत होता.मग मी फार ताणले नाही एकतर नवे नवे दिवस होते आमचे. सकाळचे भांडणं रात्र होता होता विरघळून जायचे. एक दिवस निवांत बसले होते.तो फोन वाजला.फोन वर स्नेहल होती लग्नाला येता आले नाही म्हणून मनापासून माफी मागून झाली. येत्या 8/10 दिवसात घरी येऊन पाहुणचार घ्यायचा विचार आहे असे ही म्हणाली. सध्या काय करतेस?नवे काही करायचा विचार आहे का? अशी सुरु झालेली चर्चा थांबली ती एका मस्त business  proposal वर. मी तिला हवी होते.कामाचे स्वरूप, बरोबरीने काम करणारी मैत्रिण आणि मिळणारा पगार त्या जोडीने इतर सुविधाही मोठ्या आकर्षक होत्या."मी विचार करते मग सांगते" ह्या बोलण्यावर फोन बंद  झाला. होकार द्यावा या निर्णयाला मी आले होते.रात्री जेवतांना अनयला हे सांगितले.मला वाटले तो खुश होईल पण त्याचा आवाज ,हावभाव, चेहरा एकदम बदलला.मला न विचारता निर्णय घेतला यावरून खूप  बोलला. मी तर आश्चर्य चकितच झाले.तो म्हणाला मी तुला फक्त department  बदल म्हणत होतो. job नाही.एवढा पगार कसा देणार आहे ती तुला ?शिवाय अधून मधून tour त्या वेळी घराची जबाबदारी कोण घेणार ?मी सर्व नीट सांभाळेन असा शब्द दिला, तेव्हा तो शांत झाला.हे माझ्यासाठी नवीन होते.मला वाटले तो  खुश होईल,मदतीचा हात देईल.पण झाले उलटे अर्थात  नवा job स्विकारायचा  माझा निर्णय झाला होता.



काही केल्या अनय चे वागणे त्याची प्रतिक्रिया ही मनातूून दूर  होत नव्हती. त्याकडे सध्या तरी संपूर्ण दुर्लक्ष करावे लागेल अशी परिस्थिती होती आधी "अक्षय" ची चाहूल नंतर त्याचे लालन पालन यात दिवस भराभर पुढे सरकत होते.नवा job घेतला.माझे tour अक्षय चे मोठे होणे यात  कधी त्याचे आजारपणं कधी शाळेच्या मिटींग, कधी माझे आई बाबा तर कधी अनय चे आई वडील यांची दुखणी खुपणी सुरुच असत.मला लक्षात आले यात अनय ने ना कधी मला मदत केली ना धीर दिला.या आघाड्यांवर लढतांना माझी होणारी दमछाक बघून आई ने मावशी माझ्या मदतीला दिल्या. मला मदतीची गरज होती तर त्यांना आधाराची. मनाला आता जरा "सुकून "लाभला होता. 



तरुण वय सगळ्यातून मार्ग  काढायला शिकवते इकडे अनय चे ऑफिस ठीक सुरु होते तो ज्या प्रमोशन ची वाट बघत होता ते त्याला न मिळता दुसर्‍यालाच मिळाले तेव्हा upset होऊन अद्वा तद्वा बोलणारा नवाच अनय मी बघितला.घरात मदत न करणारा,गोड बोलून सर्व जबाबदारी ढकलणारा.वेळ प्रसंगी फक्त स्वतःचाच विचार करणारा.चांगले खाणे,चांगले कपडे,नवे परफ्यूम यांची भरमसाठ  खरेदी करतांना त्याच्या मनात  मला लहान मोठी gift वा अक्षय साठी त्याच्या आवडीचे काही तरी घ्यावे हे लक्षात आलेच नाही बाबांची खरेदी बघून अक्षय जेव्हा हट्ट करी तेव्हा उद्याचा वायदा करुन तो विषय टाळत असे.हा अनय मी या आधी कधीच कसा नाही बघितला याचे मला आश्चर्य वाटे.अक्षय जस जसा मोठा होत गेला तसतसा त्याला हवे नको तो माझ्या कडे मागू लागला.



अक्षय मोठा होत होता.12 ची exam झाली. बदल तर हवा होताच. त्या दिवशी आधी मुव्ही नंतर dinner चा plan ठरला होता.अनेक दिवसांनी तिघे एकत्र बाहेर पडणार होतो.मनात  विचार केला तेव्हा, लक्षात आले असा प्रसंग  "बरसो बीत गये" नंतर आज उगवलाय. सिनेमा हाॅल मधे जाऊन बसलो.मी आपली  नजर इकडे तिकडे फिरवून बघत कोणी ओळखीचा चेहरा दितोय का ते.एवढ्यात शेजारच्या खुर्चीतून hi असा आवाज आला.मला तर पूर्ण अनोळखी चेहरा होता तरी मी हसले.एवढ्यात अनय पुढे होऊन म्हणाला अरे माधवी तू इथे काय करतेस ती हसून म्हणाली मी सिनेमा बघायला आलेय. तुम्ही पण त्या साठीच आला असाल ना? यावर  आम्ही सगळे मनमोकळे हसलो.मी माधवी कडे बघत होते. काळी सावळी पण एकदम smart. एकदा बघितल्यावर. निदान परत एकदा तरी नजर गेलीच पाहिजे, असे काही तरी तिच्यात होते हे नक्की. कुरळ्या केसांचा पोनी मानेच्या वर जरा जास्तच उंच बांधला होता. कपाळावर साडीला मॅच करणारी भली मोठी टीकली. खोल गळ्याचा स्लीवलेस ब्लाऊज.कानात चमकणारे लांबच लांब लोलक.गळा मात्र ओका बोका. उजव्या हातात मोठ्या डायलचे घड्याळ आणि मोठयाच्या मोठया अंगठीने मधले बोट पूर्ण झाकलेले.मी तिच्या कडे परत एकदा निरखून  बघितले.या वेळेस मनाने कौल दिला पहिल्या नजरेत जेवढी भासते तेवढी काही सुंदर नाहीए मी विचारात गढली होते. अनय मला हलवून विचारत होता कुठे जाऊन पोहचलीस "काश्मीर का कन्या कुमारी".आम्ही जेव्हा एकत्र काम करायचो तेव्हा आमच्या टीम चा हा ठरलेला डायलॉग होता. विचारात गढलेली व्यक्ति मग भानावर येऊन म्हणे "तुझ्या समोर इथे ह्रदयात". मी हे बोलणार तोच माधवी म्हणाली डोळे मिचकावत म्हणाली तुझ्या समोर इथे ह्रदयात. तिची नजर आणि हावभाव बघून मला कसेसेच झाले.अनय सांगत होता ही माझी टीम मेट आहे एवढ्यात सिनेमा सुरु झाला.हातातल्या पाॅप- काॅर्न ची देवाणघेवाण झाली.मध्यंतरात अनयने आमच्या साठी काॅफी व माधवी साठी आईस टी आणला.तिला साधा चहा किंवा काॅफी आवडत नाही म्हणे.सिनेमा संपला बाहेर पडता पडता माधवी म्हणाली बाकी काही ठरले नसेल तर डिनर एकत्रच करु या अक्षय म्हणाला "आज नको आज आम्ही खूप महिन्यांनी बाहेर पडलोय परत कधी तरी ठरवू." यावर माधवी म्हणाली मला अनयशी उद्याच्या मिटींग संदर्भात महत्त्वाचे बोलायचे आहे. घरी गेल्यावर फोन करणार होते, आता अनायसे भेट झालीच आहे तर संपवून टाकते.हे ऐकून अक्षय नाराज झाला. मी माधवी ला सांगून पाहिले उद्या सकाळी लवकर call करा.यावर फार महत्त्वाचा विषय आहे,आजच बोलणे गरजेचे आहे असे सांगत माधवी आलीच आमच्या बरोबर.पुढचे तीन तास त्यांच्या दृष्टी ने आम्ही दोघे त्या टेबलावर नव्हतोच .ना आम्हाला हवे ते पदार्थ ऑर्डर करता आले.ना एकत्र बसून आम्ही जेवण केले,ना गप्पा मारल्या.मी पण आधी त्या कंपनी अनय बरोबर काम केले होते. मला ती कंपनी,ते विषय हे सगळे माहित होते.  जेव्हा दोन चार वेळा मी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा अनय जरा जोरात म्हणाला तुला कंपनीची नवी पाॅलीसी माहित नाही.मधे बोलू नकोस.मी  आणि अक्षय न बोलता पुढचा पूर्ण वेळ बसून होतो.कधीतरी त्यांचा "फार महत्त्वाचा" विषय संपला.बील दिले. माधवीला तिच्या घरी सोडून आम्ही घरी आलो. एक प्रश्न सतत मनात घोळत होता तो असा की अनय ला माधवीचे घर कसे माहित?आजची भेट ही अचानक होती का तो plan चा एक भाग होता.तिच्या आवडी निवडी अनयच्या कशा बरोबर लक्षात होत्या.मी माझीच समजूत काढत राहिले, दोघेही एकाच ठिकाणी काम करतात.दिवसाचे अनेक तास एकत्र असतात.अशा वेळी अशा गोष्टी सहज लक्षात रहात असतील.मी अशा गोष्टींचा विचार करता कामा नये.हे मनाचे कोते पण आहे.मीnormal वागायचा प्रयत्न करत होते.अक्षय मात्र रागाने धुमसत होता.आम्ही घरी आलो.अक्षय धाडकन  दार उघडून, बुटांचा जोरजोरात आवाज करत त्याच्या बेडरुम मधे निघून गेला.मी पण माझे आवरले. अनय कपडे बदलून आला. काहीच निराळे घडले नाही असे भासवत माझ्याकडे  दुर्लक्ष करत, पाठ फिरवून एका क्षणात घोरु लागला.मी टक्क डोळ्यांनी झालेल्या घटनेचा विचार करत पडून राहिले.न बोलता माझी व्यथा भिजल्या उशीला कळली.


   


अक्षय चा बाबा वरचा राग अजूनही निवळला नव्हता.मी परत एकदा सर्व plan ठरवायचा प्रयत्न केला.अक्षय नी साफ शब्दात तो हाणून पाडला.अनय मात्र काही घडलेच नाही अशा थाटात वावरत होता. त्याचे वागणे इतके सहज  नैसर्गिक होते की मनात आलेल्या किंतू परंतु चे तिथल्या तिथे विसर्जन व्हावे.पुढचे दोन दिवस मी अनयशी बोलण्याचा प्रयत्न करत होते.त्याला म्हणाले "अरे वयात येतोय तो. एकदा जर मनात अढी बसली तर ती निघणे अवघड होईल.एकदा त्याच्याशी बोल. परत plan करु आपण ".यावर मला असल्या फालतू गोष्टींवर बोलायला,विचार करायला वेळ नाही " हे तो मान उडवत बोलला. दरवाजातून आत येतांना अक्षय ने ते ऐकले व म्हणाला बाबा तुलाच काय मलाही वेळ नाही या फालतू गोष्टींचा विचार  करायला.



अक्षय चा12 चा result छान लागला.घरात रहायचे नाही हे त्याने मनाशी पक्के ठरवले होते. परगावी ॲडमीशन घ्यायची आणि घरा पासून दूर जायचे.आज बाप लेक परत एकदा आमने सामने आले.बाहेर गावी पाठवणे मला जमणार नाही हे म्हणणे अनय ने लावून धरले. या क्षणा पर्यंत या बोलण्याला असे वाकडे वळण लागेल हे माझ्या लक्षातच आले नाही.अनय चे बोलणे मला अजिबात आवडले  नाही मी पटकन बोलून गेले मला नाही जड त्याला बाहेर पाठवणे.हे ऐकले आणि अक्षयला एकदम भरुन आले. मला गच्च मिठी मारत तो म्हणाला.आई मी ही मदत कधीच विसरणार नाही.आता या वेड्याला कोण समजावणार की ही मदत नाही तर ते कर्तव्य आहे.



पुढचा महिना दीड महिना अक्षयची तयारी करण्यात गेला.बघता बघता माझं घरटं रिकामं झालं.मी स्वतःला कामात गुंतवून घेतले.कधी विचार करतांना लक्षात यायचे की अनय आणि माझ्यात सुसंवाद तर सोडाच संवाद ही होत नाही किती दिवस झाले आम्ही हात हातात घेऊन गप्पा मारल्या नाहीत. Long drive ला गेलो नाही.चांदणे अंगावर पांघरून एकमेकात गुंतलो नाही.सध्या अनय ची घरी येण्याची वेळ नक्की नसते.घरी येई तो बरेचदा dinner करुन मी वाट बघत बसे,फोनवर मेसेज करत असे त्यावर  मला उशीर होईल तू जेऊन घे एवढेच उत्तर येई.एके काळी मी म्हणजे अनयचे सर्वस्व होते.पुुढे काय बदल होत गेले कळलेच नाही.एक मात्र खरे आमचे समांतर आयुष्य सुरु झाले. माझा job बदलण्याचा निर्णय चुकीचा घेतला गेला होता का ,अक्षय ला बाहेर शिक्षणा साठी पाठवले हा निर्णय चुकला याचा निर्णय करतांना मनात वावटळ उठे.यातून बाहेर येण्यासाठी मी जो जो त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करे तो तो जास्तच अलिप्त होई.



गेले दहा दिवस मी tour वर होते.रात्री उशीरा परतले.गरम काॅफी घेतली.प्रवासाचा  खूप शीण जाणवत होता. बेडवर पडले खरी पण अनय चा अजूनही पत्ता नव्हता.फोन केला तर उचलला नाही,मेसेज ला उत्तर नाही. एवढ्या रात्री काय अर्जंट काम असेल ते कळत नव्हते.वाट बघता बघता झोप लागली.मनाशी ठरवले होते की उद्या रविवार आहे त्याच्या आवडीचे जेवण ,आवडीचे खाणे पिणे करु.मग या विषयावर सविस्तर बोलू 



जागी झाले. बघते तर शेजारी अनय ढाराढूर झोपलेला. पटकन आवरून घेतले. मावशींना दहीभात, आलु पराठ्याची तयारी करायला  सांगितली. on line खव्याच्या जिलेबीची ऑर्डर दिली. सोलकढी करुन ठेवली.थोड्या वेळात अनय उठून बाहेर आला. आम्ही गच्चीत बसून छान काॅफी घेतली.त्याला म्हणाले आज घरीच आहेस  ना? महत्त्वाच्या मिटींग  तर नाहीत ना ? मी जेवणाचा छान बेत आखला आहे. नंतर पान खायला बाहेर जाऊ. जो मिळेल तो सिनेमा बघू रमत गमत घरी येऊ.माझा उत्साह बघून तो मस्त हसला. म्हणाला आज मी निवांत आहे "तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे" माझ्या मनात आले आज किती दिवसांनी आम्ही खळखळून हसलो. नव्या दिवसाची सुरुवात तर भारी झाली होती.



अनय शीळ घालत खाली उतरला.गाडी,हवा पेट्रोल चेक करतो म्हणाला.मी जरा वेळ बसून राहिले.उठून किचन मधे जावे, असा विचार  करतेय तोच अनयचा फोन वाजला.नंतर मेसेज आला.बघतेय तो माधवी चा मेसेज होता "काल रात्री मज्जा आली आज दुपारी भेटू मी एक नवा flat बघितला आहे.मला खूप  आवडला आहे त्याचे कागदपत्र  आज साईन करायचे आहेत आठवणीने चेकबुक आण."मला खरंच तो मेसेज वाचायचा नव्हता.सहज नजर पडली.मग काय  म्हणतेय या उत्सुकतेपोटी वाचला खरा, तेव्हा पाया खालची जमीन सरकली.मनाची समजूत 


घालत होते. मी वाचलेय ते खरे नाही. बोलण्यात आणि वाचण्यात खूप फरक असतो. मी समजूत घालत होते, पण ह्रदयाची धडधड  काही केल्या कमी होत नव्हती.



गाडीची साफसफाई करुन अनय वर आला फोन चेक केला.पटकन उठून आत जातांना म्हणाला मी जेवायला नाहीए.अर्जंट मिटींग  ठरली आहे कदाचित रात्री यायला उशीर होईल.मी त्याचा हात घट्ट धरला.खाली बसवले.आवाजावर ताबा ठेवत म्हणाले माधवी बरोबर आहे ना मिटींग. काय दोघे मिळून flat घेताय का? इतके सगळे घडतेय तुझ्या आयुष्यात एका शब्दानेही मला सांगावे,माझ्याशी बोलावे अशी इच्छा झाली नाही का?आता पर्यंत शांत असलेला आवाज हळू हळू चढला, तो ऐकून मावशी बाहेर आल्या. मी भानावर आले म्हणाले, मावशी आमचा कार्यक्रम थोडा बदलला आहे. तुम्ही  गॅस ओटा आवरुन गेलात तरी चालेल.अचंबित होऊन  त्यांनी एक नजर माझ्याकडे आणि एक नजर अनय कडे टाकली.झटकन खाली मान घालून त्या घाईघाईत निघून गेल्या.



मला वाटले होते की हा प्रश्न ऐकून तो म्हणेल असे काही नाही,तुझा गैरसमज होतोय. आम्ही चांगले मित्र आहोत.नेहमी आपल्याला वाटते की हवे तसे  आणि हवे तेच घडावे.पण ते  काही वेळा शक्य नसते.एक क्षण माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने बघत अनय म्हणाला आता तू माझा फोन पण चेक करायला लागलीस की काय? मला चालू विषय  दुसरीकडे भरकटलेला नको होता. मी त्याला  वाजलेला फोन आणि आलेला मेसेज माधवीचा आहे हे कळले म्हणून फोन बघितला हे सांगायचा प्रयत्न  केला.पुढे म्हणाले तिला निरोप देणार होते की तू खाली आहेस , नंतर फोन करशील.पण मेसेज वाचल्यावर मला काही कळतच नव्हते काय बोलावे ते.मला हा  अनपेक्षित, फारच मोठा धक्का होता.शाॅक मधे गेलेली व्यक्ति एक तर बोलणे विसरते अथवा भान विसरून आरडाओरडा करते किंवा हमसून हमसून रडू तरी लागते.मला हा एवढा जबरदस्त धक्का होता की माझे शब्दच हरवले. माझे काय चुकले हे विचारतांना दाटून आलेल्या कंठावर नियंत्रण ठेवणे अवघड जात होते.मला अजूनही वेडी आशा वाटत होती की अनय शेजारी बसेल मला म्हणेल अग सध्या कामाचे लोड जास्तच आहे म्हणून उशीर होतो.तिथेच एकत्र बसून काही तरी खातो.माधवी एकटी आहे.म्हणून मी तिला मदत करतोय घर घेण्या साठी.यात माझा सहभाग फक्त मदत करण्या पुरताच मर्यादित आहे.मी मोठ्या विश्वासाने त्याच्या डोळ्यात खोलवर बघेन. त्याचे नितळ स्वच्छ मन मला दिसेल. एक घट्ट मिठी मारून आजवर साचलेली जाळी जळमटं दूर होतील. परत एकदा आम्ही एक होऊ.मी त्याच्या या उत्तरा ची वाट बघत होते.पण प्रत्यक्षात काहीतरी वेगळेच घडले.



मधले शांततेचे ते क्षण संपता संपत नव्हते.एका  झटक्यात त्याने मला स्वतःपासून वेगळे केले. तुसड्या आवाजात तो म्हणाला "मला कंटाळा आलाय तुझा."नकोच वाटते तुझ्याशी बोलायला. तशीही तुला माझी आधीही गरज नव्हती आता ही नाहीए.अक्षय ला पण फक्त तुझीच ओढ आहे बाहेर किती जण माझी काळजी घेतात हे कळले तर तुझा हा तोरा,हा अभिमान  कापरा सारखा उडून जाईल.माधवी तर नेहमी म्हणते मी तिच्या आयुष्यात आहे हे तिचे भाग्य आहे.तिला माझे वागणे बोलणे कपडे,खाणे पिणे  खूप मनापासून आवडते.तिला मी आवडतो म्हणून मलाही ती आवडते.बरं झालं आजच हा विषय निघाला ते.  होय आम्ही flat बघतोय. एकत्र राहणार आहोत free bird होऊन जगायचे ठरवले आहे. आता मला ना कुठली जबाबदारी हवी आहे ना बंधन. हवा आहे तो मुक्त सहवास.येत्या दोन महिन्यात सगळे निश्चित होईल. मग सांगेनच तुला. तोवर हवे तर तू माहेरी जा.हे घर पण मी विकणार आहे.तुझ्याकडे पैसाही भरपूर आहे .दोघे स्वतंत्र पणे जगू या.ऐवढे बोलून तो निघून गेला.आता कधीतरी धुमकेतू सारखा उगवे.दोन  तीन वेळा त्याच्याशी शांतपणे बोलायचा प्रयत्न केला.पण त्याचा निश्चय झाला होता.



दोन दिवस सुट्टी होती.अक्षय ला बोलावून घेतले  आई बाबांना पण या म्हणून निरोप दिला. तसाच निरोप अनय च्या आई बाबांना पण दिला.अजून कोणाला कसलीच कल्पना दिली नव्हती.अक्षय येत आहे त्याला आपण भेटणार या आनंदात  सगळे घरी जमले.अनय कालच तोंड लपवून बाहेर निघून गेला.तो कुठे जाणार हे नव्याने माहित करुन घेण्याची गरज मला तरी वाटली नाही.सगळे जमले अनय बाहेर गेलाय तो नंतर येईल यावर फारशी प्रश्नोत्तरे झाली नाहीत.आज मावशींनी साधा पण चविष्ट स्वयंपाक केला होता टोमॅटो सूप,पावभाजी,गाजर हलवा आणि पुलाव हसत खेळत जेवणं पार पडली.आईचे दोन तीन दा मला बाजूला घेऊन विचारून झाले अनय कुठे गेलाय अजून नाही आला कधी येणार ?  सगळी जमली आहेत आज तरी त्याने घरी थांबायचे.



जेवणं झाली. सुस्तावून सगळे एका ठिकाणी  बसलो होतो.मी बोलायला सुरुवात केली मावशी म्हणाल्या तुमचे चालू दे मी येईन नंतर चहा पाण्याचे बघायला.मी त्यांना थांबवले म्हणाले मावशी तुम्ही पण family member आहात. इथेच थांबा मला फार  महत्त्वाचे बोलायचे आहे  काही तरी गंभीर घडले आहे हे आता कुठे सगळ्यांच्या ध्यानी आले.चिडीचूप होऊन माझे बोलणे ऐकून लागले.अनयचे आधी व नंतर चे वागणे,अक्षयशी ताणलेले संबंध घरादाराची पर्वा न करता फक्त स्वतःचाच स्वार्थ  बघायची वृत्ती हे सर्व  नजरे आड करत आज पर्यंत मी त्याला केलेला सपोर्ट. आज त्याचे माधवीशी असलेले संबंध आणि त्याने आता घराबाहेर पडायचा घेतलेला निर्णय. हे मी जस जसे सांगत गेले तसतसे सगळे आधी अचंबित नंतर हताश दुःखी झाले.मी माझा निर्णयही त्यांना सांगितला .मी म्हणाले की घटस्फोट घेणार आहे पण या घराचा अक्षय चा खर्च  काही प्रमाणात तरी त्याने उचलावा अशी मागणी करणार आहे. जी चूक मी केलीच नाही त्या साठी मी उरलेले आयुष्य खाली मान घालून काढणार नाही.अनय स्वतःला स्वच्छंदी म्हणवतो ही बेजबाबदार वृत्ती आहे.हा उच्छृंखल पणा आहे. अशा वृत्तीला वेसण तर घातलीच पाहिजे.ती गरज आहे.म्हणून मी हे घर आणि दर महा एका मोठ्या रकमेची मागणी कोर्टात करणार आहे. आज माझा कंटाळा आला म्हणून हा दुसरी कडे जातोय उद्या तिचा कंटाळा आला तर तिसरीकडे जाईल.मला हे वागणे मान्य नाही.हे कुठेतरी  थांबायला हवे. म्हणून हा निर्णय मी घेतला आधी माझे मन, माझा  स्वाभिमान याच्या आड येत होता. गेले काही दिवस मी  यावर खूप विचार केला मनाला समजावले नंतरच हा निर्णय घेतला.आई जेव्हा तू त्याला पहिल्यांदा भेटलीस तेव्हा म्हणाली होतीस बाकी सगळे ठीक आहे पण "गुलछबू" वाटतो. तेे ऐकून मला हसू आले होते. कारण मी वेडी त्याच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.माझे वेगळे अस्तित्व आहे याचा मला विसर पडला होता.तू मात्र एका भेटीतच अनयचे अगदी यथार्थ वर्णन केले होतेस.


या धक्क्यातून सावरायला दोन्ही घरांना थोडा वेळ लागला.माझ्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले.मला सगळ्यात जास्त  चिंता अक्षय ची वाटत होती.माझा अनय पासून विभक्त होण्याचा निर्णय त्याला मान्य होता.मी अनय कडे पैशांची मागणी करावी हे त्याला आधी पटले नव्हते.ही किंमत त्याच्या उच्छृंखलपणा ची आणि माझ्या आत्मसन्मानाची आहे हे जेव्हा समजावून सांगितले तेव्हा त्याला ते एकदम पटले.


अनयला माझ्यापासून लवकर मुक्ति हवी होती माझ्या मागण्या त्याने लगेच मान्य केल्या.अक्षय चे पुढचे शिक्षण, माझा job सगळे सुरु आहे. आला दिवस तर मावळतो. रोज नवी शिकवण देऊन जातो. मुकेशचा दर्दभरा स्वर कधी तरी कानावर पडतो. क्षणभर का होईना जखमेवरची खपली निघते.मुकेश गात असतो



"मुस्कुराता भी अगर 


तो छलक जाती नजर


अपनी किस्मत ही कुछ ऐसी थी 


कि दिल टूट गया"


शोभा गोडबोले जोशी.

तुम्हाला हे वाचायला आवडेल.

👇

ती आणि तो




Post a Comment (0)
Previous Post Next Post