तुम अगर साथ हो ... भाग तेरा

 तुम अगर साथ हो ... भाग तेरा 




"येस...."


रात्री साडेअकरा वाजता झोपण्याच्या तयारीत असलेल्या गगनच्या मोबाईलवर मेसेज झळकला. त्याने घाई घाईत उघडून पाहिला तर फक्त तेवढा एकच शब्द रैनाने पाठवला होता. पण त्या एका शब्दानेही त्याचे काळीज पंख लावून उडायला लागले. तिने ऑफिशियली होकार दिला होता. त्याने रिप्लाय द्यायला कीबोर्ड उघडला पण मध्येच थांबला. 'नेमकं काय रिप्लाय देतात अशा मेसेजला?' त्याला प्रश्न पडला. 'जाऊ दे, ती समजून घेईल.' फक्त एक आनंदाने हसणारा ईमोजी पाठवून  मोबाईल बंद करून ठेवून दिला आणि झोपण्याचा प्रयत्न करु लागला. पण झोप लागेल कशी!


"खडूस... मला वाटलं निदान एका शब्दाचा तरी मेसेज करेल." फोन बंद करून उत्सुकतेने गगनच्या रिप्लायची वाट पाहणारी रैना पुटपुटली. 


पार्किंग लॉटमध्ये नेहमीप्रमाणे गृपचा कल्ला चालू होता. कार्तिक, झुबेर आणि अनिकेत मिहीकाची नक्कल करून दाखवत होते.

"येस मॅम, आय विल डू इट. ते काय झालं की माझ्या मावस बहिणीच्या चुलत नणंदेच्या आत्ते दिराच्या काकूचा ॲक्सिडेंट झाला. अगदी जीवघेणा हो. आता इतकं जवळचं नातं म्हटल्यावर मॉम डॅड भेटायला गेले आणि सोबत मलाही नेलं. त्यामुळे असाईनमेंट कंप्लीट नाही झालं. प्लिज मॅम प्लिज प्लिज मला फक्त आजचा एक दिवस द्या. तुमचे उपकार मी जन्मभर नाही विसरणार हो."  नसलेले अश्रू पुसण्याचा अभिनय करत कार्तिक म्हणाला. 


"अरे ए नालायका, किती ती ओव्हर ॲक्टिंग करतोय. मी अजून थोडे एमोशन्स ऍड केले होते... अशा विरघळल्या होत्या सुचेता मॅम की बास्स." थोडी उशीरा आलेली मिहीका वैदेहीच्या हातावर टाळी देत म्हणाली. हसून हसून सगळ्यांची पुरेवाट झाली होती. 


"मिही... पण एक्झॅक्टली कुणाला काय झालं होतं ते कळलं का मॅमना ?" हंसिकाने विचारले.


"सोड यार मला तरी कुठं कळत होतं बोलताना, ते मी असंच ठोकून दिलं होतं. ॲक्च्युअली मी विसरले होते असाईनमेंटबद्दल. पण आज मी कबूल केल्याप्रमाणे घेऊन आलीय बाबा." सॅकमध्ये डोकावून बघत मिहिका उत्तरली. 


"आय होप सगळ्यांनी आणली असेल फाईल, राईट? चला मग जाऊ क्लामध्ये बसू. " हर्षलने विचारले. तो गृपचा अघोषित विश्वस्त होता, सगळ्यांनी काळजी घेणारा. 


"हो, हो " म्हणत सगळ्यांनी परत एकदा कन्फर्म केलं आणि ते निघाले, फक्त रैनाला सोडून. कारण तिचा फोन वाजला होता, गगनचा कॉल आला होता. 


"एक मिनिट, तुम्ही पुढे व्हा. मी हा कॉल घेऊन येते. थोडं महत्वाचे आहे, यू नो." 


"ओके, मी बॅग घेऊन जाते तुझी. ये तू." तिची बॅग घेत वैदेही म्हणाली. आणि थांबवेपर्यंत निघून ही गेली. 


गगन दवाखान्यात तर रैना अभ्यासात असायची तरीही दिवसातून काही वेळ दोघे कॉलवर किंवा मेसेजमधून बोलत असत. तिचे नवीन रिलेशनशिप स्टेटस् रैनाने सगळ्यांपासून लपवले होते. अगदी तिची जवळची मैत्रिण हंसिकालाही सांगितले नव्हते. कारण तिला ती चिडवाचिडवी वगैरे करून घ्यायचे नव्हते. त्यांची मैत्रीण म्हणून एक नॉर्मल कॉलेज लाईफ एंजॉय करायचे होते. 


गगन रैना दोघे एकमेकांसोबत खूश होते. त्यांना नव्या प्रेमाची गोड अनुभूती होत होती. जी व्यक्ती मनापासून आवडली होती तीच जीवनसाथी होणार होती. अडचण एकच होती की एकमेकांना भेटता येत नव्हते. तरीही लाँग डीस्टन्स मधील मजा, हुरहुर अनुभवत होते.


 कॉल संपवून रैना वर्गात आली. काही मिनिटांत सुचेता मॅम वर्गात आल्या. आपल्या करड्या आवाजात त्यांनी घोषणा केली.


"गुड मॉर्निंग एव्हरीवन, परवा सांगितल्याप्रमाणे आज सबमिशनची शेवटची संधी आहे. ज्यांनी अजूनपर्यंत केलं नसेल त्यांनी प्लीज आत्ता लगेच जर्नल्स टेबलवर आणून ठेवा." 


लगेच टेबलावर जर्नल्सचा ढीग लागला. रैना  तिच्या सॅकमध्ये शोधा शोध करत होती पण तिचे जर्नल मिळत नव्हते. तिच्या चेहऱ्यावरील रंग साफ उडाला. ती प्रचंड घाबरली होती. तिच्या मागे बसलेल्या हर्षलचे तिच्याकडे लक्ष गेले.


"काय झाले?" त्याने खुणेने विचारले.


"माझं जर्नल मिळत नाही." रडवेल्या चेहऱ्याने तिने उत्तर दिले. 


"तू आणलं होतं ना? चुकून रूमवर तर नाही राहिलं?"


"नाही रे, मी येताना कन्फर्म केलं होतं." 


"मला वाटतं सगळ्यांनी सबमिट केलं आहे. अं, रैना फक्त तू राहिलीस." मॅम तीक्ष्ण सुरात म्हणाल्या. 


"हो मॅम, देतेय." हसऱ्या चेहऱ्याने रैनाने सांगितले. पण प्रत्यक्षात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. 


हर्षल उठून उभा राहिला. "मॅम, रैना तर एकदम ओबिडीएंट स्टूडेंट आहे तर ती सबमिशन नक्की करेलच. पण मला एका टॉपिकमध्ये डाऊट आहे. तुम्ही क्लिअर कराल का आता?"


डाऊट म्हटल्यावर सुचेता मॅम खूश झाल्या. त्यांना मुलांनी प्रश्न, शंका विचारलेले आवडायचे. शंका येते म्हणजे मुलं खोलवर अभ्यास करत आहेत, त्यांची जिज्ञासू वृत्ती जागृत आहे असा त्याचा अर्थ आहे असे त्यांना वाटे. त्यांनी होकार दिल्यावर हर्षलने नेमका असा प्रश्न विचारला ज्याच्या एक्स्प्लेनेशनला बराच वेळ लागला असता.


  त्याच्या अपेक्षेनुसार लेक्चर संपेपर्यंत मॅम शिकवत राहिल्या आणि सबमिशनचा विषय मागे पडला. तास संपल्याची घंटा वाजली आणि मॅम वर्गाबाहेर निघाल्या. दारापर्यंत जाऊन त्या मध्येच थांबल्या आणि मागे वळून म्हणाल्या,

"मिस रैना आता तुम्ही सबमिशनचे कष्ट नाही घेतले तरी चालेल कारण यू हॅव ऑलरेडी लॉस्ट दी मार्क्स." 


रैना सुन्न झाली. तिची मेहनत अक्षरशः वाया गेली होती. भरलेल्या डोळ्यांनी ती सॅक उचलून वर्गाबाहेर पडली. 


"मी खरंच निघताना चेक केलं होतं, बॅगमध्ये जर्नल होतं. इन फॅक्ट मी वर्गात जायच्या आधी सुध्दा पाहिलं होतं." मागोमाग आलेल्या हर्षलला ती म्हणाली 


"मग फक्त दहा मिनिटात कुठे गायब झालं?" तो विचार करत होता. "तू बॅग कुठे ठेवली होतीस?"


"मला कॉल आला तेव्हा वैदेही घेऊन गेली होती." 


"ओह... मला एक सांग, तू बॅक अप घेतला असशील ना?" 


"हो, ठेवलाय मी ड्राईव्हवर."


"चल मग पटकन प्रिंट आऊट काढून आणू. मॅमना रिक्वेस्ट करू, हवं तर माफी मागू. तुझे इंटर्नल मार्क्स जाता कामा नये." 


हा एक प्रसंग मोठा धुराळा उडवणार होता. 



क्रमशः 

1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post