मैं तो मर के भी तुझको चाहुंगी ।
✍️ सोनाली जाधव
शीर्षक थोडे फिल्मी आहे ना. असणारच कारण ही गोष्ट पण कोणत्या फिल्मपेक्षा कमी नाही.
मुंबईच्या धावपळीत रुग्णवाहिकेचा आवाज काही विशेष नाही. रोजचच आहे ते पण आज विशेष होते. कारण आज एक नाही दोन रुग्णवाहिका एकाच दिशेनं वेगाने जात होत्या.
ही गोष्ट आहे नीरजा आणि निरवची .
कालचा दिवस
निरव सामानाची बांधाबांध करत होता. उद्या तब्बल पाच वर्षानंतर तो भारतात परत येणार होता. या पाच वर्षात त्याने खूप मेहनत केली होती. दिवसरात्र स्वतःला कामात झोकून दिले होते. त्याला जी संधी मिळाली होती त्याच सोनं करायचं होत. त्याच कारण ही तसच होतं. त्याने सगळा सामान बांधला खूप सारी गिफ्टस् घेतली होती. प्रत्येकासाठी काही तरी नक्कीच होते. आई बाबा, ताई भाऊ, मित्र आणि स्पेशली नीरजासाठी. नीरजा त्याची बाल मैत्रीण होती. मैत्रीणीपेक्षा ही जास्त होती खर तर पण या पाच वर्षात तो तिच्याशी नीट बोलू पण शकला नाही.
रात्र भर त्याला झोप येत नव्हती. सकाळी लवकर उठून भारताची फ्लाईट पकडायची होती.
"बसलो बाबा एकदाच," निरव स्वतःशीच पुटपुटला.
अमेरिका ते भारत जवळ पास तेरा ते चौदा तासाचा प्रवास होता.
निरव डोळे मिटून बसला त्याला त्याचा भूतकाळ आठवत होता.
निरव आणि नीरजा एका चाळीत शेजारी शेजारी राहत होते. परिस्थिती दोघांचीही बेताचीच होती. दोघे पण सोबतच जवळच्या नगरपालिकेच्या शाळेत शिकत होते. राहणीमान आणि स्वभाव दोघं ही परिवाराचा साधाच होता. निरव तसा खूप हुशार होता नीरजा ठीकठाक होती. निरव घरात मोठा असल्याने त्याला प्रत्येक गोष्टीत तडजोड करावी लागे. आई वडिलांची मेहनत परिवाराच्या गरजा पूर्ण करण्यास कमी पडत होती. निरव पण खूप मेहनती होता. त्याला लहान वयातच जवाबदारीची जाणिव झाली होती. कुणाचा दळण आणून दे ,कुणाचे डबे पोहचवून दे, रद्दी विकून दे असं करून करून तो स्वतःचा शाळेचा खर्च भागवत असायचा .
गरीबी त्याने जवळून पहिली होती म्हणून त्याच्या मनात एकच ध्येय होते. जन्माला गरीब म्हणून आलो पण मरताना गरीब म्हणून मरणार नाही.
त्याला खूप मोठं व्हायचं होत. आई वडिलांना सुखी बघायचे होते. तो जेव्हा कधी त्याच्या बाबांची चप्पल बघायचा त्याला खूप रडायला यायचं. जागोजागी सांदा मारून त्याचे बाबा ती वापरत असायचे.
आईचे हात पण काम करून करून रखरखीत झाले होते. त्याने लहानपणापासूनच खूप मेहनत केली होती तेव्हा कुठे आज तो या स्थानावर येऊन पोहचला होता.
नीरजाची घरची स्थिती पण खूप काही वाईट किंवा खूप चांगली अशी नव्हती. ठीकठाक होती. तिला मुळात अभ्यासात फारसा रस नव्हता तिला कलेची विशेष आवड होती. निरव तिला नेहमी सांगायचा कलेने फक्त मन भरत पोट भरायला पैसाच लागतो. अभ्यासात लक्ष दे म्हणून, तिला तो आवडायचा पण त्याचे सल्ले मात्र आवडायचे नाही. ती लहानपणापासूनच त्याच्यावर प्रेम करत होती. तो जिथे ती तिथे निरवची शेपटी म्हणून सगळे तिला चिडवायचे. तिचे एकच स्वप्न होत निरव सोबत संसार करायचे. निरवला ही ते माहीत होते पण त्याने कधी ही तिला स्पष्ट काही सांगितले नाही. बघू पुढे असंच सतत म्हणयाचा.
निरव आणि नीरजा आता तरुण झाले होते. निरवने स्कॉलरशिप मिळवून चांगले शिक्षण घेतले होते. दोघांची ही परिस्थिती आता आधीपेक्षा बरी झाली होती. घर तेच होते पण आता बऱ्यापैकी सुख सुविधा त्यात होत्या. कॉलेजसोबत पार्ट टाईम जॉब निरव करत होता, घरी लहान मुलांना शिकवत असे. एकंदरीत तो खूप मेहनत करत होता. त्याच एकच ध्येय होते अमेरिकेला जाऊन जॉब करायचा आणि खूप पैसा मिळवायचा. त्या अनुषंगाने तो सतत खूप अभ्यास आणि मेहनत करत होता.
नीरजा थोडी वेगळी होती तिला आर्टमधे इंटरेस्ट होता तिला कविता करायला आवडायच्या. तिने नृत्य ही शिकले होते. तसे दोघं ही दोन टोकं होते पण एकमेकांशिवाय त्यांचं जरा ही भागत नसे. निरव डोळे मिटून सगळं आठवत होता.
लहानपणी जेव्हा निरव खूप आजारी पडला होता तेव्हा पूर्ण रात्र नीरजा त्याच्याजवळ बसून होती. त्याला कुणी काही बोलले तिला अजिबात चालत नसे. त्याच्यासाठी ती नेहमी भांडायला तयार असायची. त्यांचे परिवार , मित्र ओळखी पालखी सगळ्यांना पूर्ण विश्वास होता की ही जोडी made for each other आहे असे.
तिला ही तेच वाटायचं पण तिने निरवला कधी स्पष्ट विचारलं नाही. त्याने ही कधी स्पष्ट काही सांगितले नाही.
आणि एक दिवस निरव हातात एक पाकीट घेऊन तिच्यासमोर उभा होता. चेहर्यावरून तो खूपच खुश दिसत होता. नीरजा येताच त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि गोल गोल फिरू लागला. नीरजाला काही समजत नव्हते. त्याने ते पाकीट तिच्या हातात दिलं.
नीरजाने ते पाकीट उघडुन पाहिलं त्यात एक अपॉइंटमेंट लेटर होते. त्याला अमेरिकेत जॉब मिळाला होता. सहा महिन्याची ट्रेनिंग मग फुल टाईम जॉब ऑफर होती. सुरवातीला कमी पेमेंट होते पण सोबत शिक्षण करून पार्ट टाईम जॉब करायचा होता. निरवची इतक्या दिवसाची मेहनत कामी आली होती. ती त्याच्यासाठी खुश होती पण थोडी दुःखी ही होती कारण त्याला पुढच्या आठवड्यात जायचे होते. तीच दुःख तसं तर निरवच्या ही लक्षात आले होते. पण त्याने तिकडे दुर्लक्ष केले. तो लेटर घेऊन निघून गेला. तो खूप खुश होता. त्याचं स्वप्न पूर्ण होणार होते. तिने तिचे दुःख समोर जरी दाखवलं नसल तरी निरवला सगळं समजत होते. त्याने तरीही तिला काही स्पष्ट सांगितले नाही. तो खूप भित होता तिच्यावरचं प्रेम त्याला बंधन वाटत होतं. त्याला अजिबात कोणत्याही बंधनात सध्या तरी अडकायच नव्हतं.
निरवला आज खूप शांत वाटत होते. भारतात पोहचल्यावर सगळ्यात आधी तो नीरजासमोर त्याचं प्रेम कबूल करणार होता. लग्न करूनच तो परत अमेरिकाला परत जाणार होता. त्याने सगळं प्लॅन करून ठेवलं होतं. त्याची आतुरता खूप वाढली होती. तो सारखा घड्याळ बघत होता. अजून खूप वेळ बाकी होता पोहचायला. त्याने येण्याबद्दल कुणालाही काही ही सांगितले नव्हते.
इकडे निरव अमेरिका गेल्यावर
निरव अमेरिकेला निघून गेला. नीरजाचे रडून रडून डोळे सुजले होते. आता तिला कशातही मन लागत नसायचं. दिवसेंदिवस ती खूप मलूल होत होती. पण तिने याबद्दल निरवला काहीही सांगितलं नाही. त्याला त्याच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून ती कधी ही त्याला काही सांगत नसे.. तिने बाकी लोकांना ही त्याला काही सांगायचं नाही म्हणून वचन घेऊन घेतल होते.
त्यांचे दोघांचे कॉमन फ्रेंड होते. सुरवातीला निरवचे message यायचे कॉल पण यायचे. तो अमेरिकाबद्दल भरभरून बोलायचा त्याचा उत्साह बघून नीरजाची हिम्मत व्हायची नाही काही बोलायची. हळू हळू ते ही बंद झाले. तो कामात इतका गुरफटून गेला की त्याला जराही वेळ मिळत नसे. त्याच्याशी आता जास्त संपर्क होत नव्हता.
नीरजा आता जास्तच डीप्रेस होत होती. डिप्रेशनमुळे तिला किडनीचे प्रोब्लेम होऊ लागले आणि तिची प्रकृती जास्तच खराब झाली.. तरी ही तिने निरवपर्यंत ही बातमी पोहचू दिली नाही. निरवचा कंपनीसोबत पाच वर्षाचा करार होता. तो त्या आधी येऊ शकत नव्हता.. त्याला जर कळले तर तो सगळं सोडून परत येईल आणि त्याचे स्वप्न अपूर्ण राहील म्हणून तिने त्याला काही ही कळू दिले नाही.
तिचा पूर्ण विश्वास होता की निरव येईपर्यंत तिला काही ही होणार नाही.
तिचे फ्रेंड्स आणि फॅमिलीने तिला खूप समजवले निरवला सांग म्हणून. पण ती तिच्या मतावर ठाम होती. इतर कुणी ही त्याला काही सांगायचे नाही असेही वचन तिने घेऊन घेतले होते. निरवला या बाबतीत काही ही कल्पना नव्हती. तो त्याच्याच विश्वात गुंग होता.
आजचा दिवस
नीरजाची प्रकृती खूपच खराब झाली होती म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी ambulence आली होती.
इकडे निरवचे विमान भारतात येऊन पोहचले होते. त्यांनी घरी जाण्यासाठी टॅक्सी बुक केली. तो खूप खुश होता अजून किती वेळ म्हणून सारखा विचारत होता. आणि एकच जोराचा झटका टॅसीला लागतो ड्रायव्हर आणि निरव दोघं ही टॅक्सीच्या बाहेर फेकले जातात. ड्रायव्हर जागीच ठार होतो. निरवला बराच मार लागतो. तो बेशुद्ध होतो.
नीरजा आणि निरव दोघं ही मृत्यूच्या दारात उभे होते .
आणि योगायोगाने एकाच हॉस्पिटलमधे दोघं ही रुग्णवाहिका आवाज करत भरधाव वेगाने जात होत्या. हे दृश्य जरी मुंबईला नवीन नसले तरी आज काही तरी खूप अघटीत घडले हे मात्र नक्की होते.
निरव आणि नीरजा दोघं ही एकच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात.
निरवबद्दल कुणाला ही काही कल्पना नसते. तो अपघात विभागात आय सी यूमधे असतो तर नीरजा पण दुसऱ्या आई सी यू मधे ऍडमिट असते.
नीरजाच्या केस मध्ये आता काही ही होणे शक्य नसते. तिने तिची पूर्ण विल पॉवरच खरं तर गमावलेली असते जगण्याची इच्छा उरलेली नसते. ती आता कोणत्याही क्षणी मरणार हे नक्की होते. तिला ही ते माहीत असते म्हणून ती नक्की करते की माझ्या उपरांत माझे हृदय दान करण्यात यावे.
इकडे निरवची परिस्थिती ही खूप वाईट असते. त्याला इंटर्नल मार लागलेला असतो. त्याची हृदयाची व्हॉल्व निकामी झालेली असते. पोलिस त्याच्याबद्दल माहिती काढतात आणि त्याच्या परिवाराला कळवतात. नीरजासोबत तिचा परिवार सोबत निरवची फॅमिली ही असते. सगळे मित्र ही असतात. निरव इथे याच हॉस्पिटलमधे ऍडमिट आहे हे कळल्यावर त्यांना खूप धक्का लागतो सगळे तिकडे पळत जातात. निरव बेशुद्ध अवस्थेत आय सी यूमधे पडलेला असतो. त्याची लवकरात लवकर हार्ट सर्जरी करावी लागेल त्याला एक हार्ट डोनर हवा आहे असे डॉक्टर सांगतात.
इकडे नीरजाच्या कानी ही बातमी पडते आणि ती निरवला भेटण्याची जिद्द करते. तिला व्हीलचेअर बसवून तिकडे घेऊन जातात. ती निरवला पाच वर्षांनी बघते. त्याला बघून तिला पुन्हा जगण्याची इच्छा होते पण निरवला एक हार्ट डोनर हवा आहे असं जेव्हा तिला कळते तेव्हा ती निरवचा हात हातात घेऊन त्याला म्हणते, "i love you निरव पण तू खूप उशीर केलास रे "आणि तिथेच आपला प्राण सोडते. बेशुद्ध अवस्थेतही निरवच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत असते. सगळीकडे दुःखाची लहर पसरते.
दोन महिन्यानंतर
निरव आता बरा झाला होता. नीरजाबद्दल अजून ही त्याला काही ही माहीत नव्हते . तो सतत तिच्याबद्दल विचारायचा पण कुणी ही त्याला काही ही सांगितल नाही.
आता त्याला तिचा खूप राग येत होता. मी एवढ्या मोठ्या संकटातून वाचलो आणि ती मला भेटायला ही आली नाही. तो तिच्याबद्दल काही काही बोलू लागतो तेव्हा त्यांचा एक कॉमन फ्रेंड असतो रवी त्याला हे सगळ सहन होत नाही. तो निरवला जोरात ओरडून बोलतो,
"गप्प बस निरव एक शब्दही नीरजाबद्दल बोलू नको. तुला काय माहिती आहे तिच्याबद्दल. तू एक नंबरचा स्वार्थी आहेस. तू तिला सोडून अमेरिकेला निघून गेला. ती तुझी वाट बघत बघत मरून गेली पण जाता जाता तुला जीवनदान देऊन गेली .तुला काय माहित रे तुझ्या शरीरात जे हृदय आहे ते ..... तुला काय माहित प्रेम काय असते ते. तिने तुझ्यासाठी स्वतःचा जीव दिला आणि तू श्या..."
अस बोलून तो रागारागाने निघून गेला हे ऐकून निरवच्या छातीत एक जोरदार कळ निघाली. तो जमिनीवर कोसळला. त्याला हॉस्पिटलमधे ऍडमिट करण्यात आले. पण नीरजाचे हृदय बळकट होते त्याने त्याला मरू दिलं नाही.
काही दिवसांनी निरव घरी परतला नीरजाचा फोटो छातीशी लाऊन रडू लागला. तोच नीरजाचा आवाज आला, "मैं तो मर के भी तुझको चाहूंगी."
समाप्त
वरील कथा सौ. सोनाली जाधव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.