शापित भाग अकरा

 शापित भाग ११

✍️ सोनाली जाधव


मागील भाग इथे वाचा

👇

भाग दहा

त्याच ते बोलणे ऐकून माधव थोडा संभ्रमात पडला. तेवढ्यात तिथे आकाश येतो.

"अरे माधव मी भीमा आहे राधाचा मानलेला भाऊ."

दोघं ही आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघत असतात.

"मग तू इतके वर्ष कुठे होतास ? आणि त्या गावात काय करत होतास?" माधवने विचारलं

"मी इतक्या वर्षापासून तिथेच होतो."

"कसं शक्य आहे तू जर तिथे होतास तर मग जिवंत कसा ? आणि आम्ही आलो तेव्हा कसा दिसला नाही तू?" माधवचे प्रश्न संपता संपत नव्हते.

"मी तिथेच राधाच्या घरात राहत होतो. दिवसभर तिथेच राहायचो रात्र होण्याआधी मंदिरात येऊन जायचो."

"पण मग तू तिथे का थांबलास तिथून पळून का आला नाही?" आकाशने विचारले.

"मी राधाला वचन दिले होते तिला सोडून कधीच जाणार नाही म्हणून पण ती मला सोडून गेली मग मी प्रन घेतला जोवर तिला न्याय मिळत नाही मी इथून जाणार नाही."

"त्या दिवशी आम्ही तिथे अडकलो होतो तर मग तू आम्हाला सावध का केलं नाही? किती जणांचे प्राण वाचले असते". माधवने भीमाला सांगितले.

"मी तुम्हाला जंगलातून बघत होतो. मी खूप प्रयत्न ही केला सांगण्याचा पण हिंमत  झाली नाही. मागे  एकदा एक लुटमार करणाऱ्यांचे टोळी गावात आली होती. मी त्यांना अडवायला गेलो तर त्यांनी मला खूप मारले आणि धमकी ही दिली जर मी कुणाकडे काही बोललो तर मला जीवे मारतील. मी घाबरून काही बोललो नाही. ते रोज रात्र होण्याआधी दरोडे टाकायला निघून जायचे आणि सकाळीच परत यायचे. हे गाव भुताटकी आहे हे  त्यांना माहीत होते. इकडे कुणी ही येत नाही म्हणून रोज लुटलेला माल आणून लपवत असत. पण एकेदिवशी काही कारणाने ते जाऊ शकले नाही आणि त्याच दिवशी त्यांचा त्या पिशाच्चानी अंत केला.

"पण मग तू खात पित काय होतास."

"मी मंदिरा जवळचे पाणी पीत होतो आणि जंगलातून जे मिळेल ते खात होतो कधी कधी मंदिरात लोक काही ठेऊन जायचे ते खायचो".

"मग ते अघोरी बाबा आले होते त्यांचं काय?" माधवने विचारले.

ते बाबा खरोखर चमत्कारी होते मी त्यांना जेव्हा याबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी त्या सगळ्या पिशाच्चाना काबूत करून दिवसभर झोपून रहा असा आदेश केला. राधेला मुक्ती देण्यासाठी ही खूप प्रयत्न केले पण ते शक्य झाले नाही. त्यांनीच ह्या मंदिरात मला राहण्याचा आदेश दिला इथे मी सुरक्षित राहील असं ही सांगितले. एक दिवस तू येशील आणि माझ्यासकट यांना सगळ्यांना मुक्त करशील अशीही ग्वाही त्यांनी दिली.

त्या दिवशी तू दगडावर बसला होतास तेव्हा मी तुला मागून बघत होतो. आणि परवा जेव्हा तुम्ही दोघे राधाच्या घरात गेले तेव्हाही मी तुला बघत होतो. तेव्हा मला तुझे नाव माधव आहे हे समजले म्हणून मी सकाळी तुझ्याजवळ आलो."

"हे सगळ खूप विचित्र आहे." आकाश बोलला .

माधव पण विचारात पडला.

भीमा त्यांना त्या दिवशी जे काही घडले ते सगळे आता सांगतो.

"तो दिवस मी कसा विसरेल त्या दुष्ट सावकाराने राधाला एखाद्या जंगली श्र्वापदासारखे झाडाला बांधून ठेवले होते.

तो तिच्यावर काही काही आरोप करत होता. जसं मला ही बातमी समजली मी धावत तिकडे गेलो. मी खूप प्रतिकार केला पण त्याच्या माणसासमोर माझं काही चालले नाही. त्यानी मला बेदम मारले. मग मला कुठल्या तरी अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलं.

दुसऱ्या दिवशी जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा सावकार कुण्या एका माणसाबरोबर बोलत होता. मी खोलीच्या खिडकीतून ऐकण्याचा प्रयत्न केला.

"काय बोलत होते ते?" माधवने विचारलं.

तो दुसरा मनुष्य जो पाठमोरा उभा होता. तो बोलला, "तू हे काय केलंस त्या मुलीचा जीव का घेतला? आता गावात पोलिस येतील उगाच आपण गोत्यात यायचो."

सावकार बोलला, "काही काळजी करू नको. मी तिला मारले नाही गावातल्या लोकांनी मारले आहे."

"ते कसं काय?" तो दुसरा माणूस बोलला.

"मी गावातली दोन तीन लहान मूल पळवली आणि तिनेच त्यांना मारले. ती डाकीण आहे अशी अफवा पसरवली. लोकांनी माझ्यावर विश्वास केला आणि तिला दगड मारले ज्यात ती मेली. तिचे आई वडील ही मेले." सावकार बोलला

"हे ऐकून मला खूप दुःख झाले पण मी माझा हुंदका आवरला आणि पुढे ऐकू लागलो."

"तिला आपण मानवीय अवयव तस्करी करतो हे समजले होते. शिवाय तिने माझ्या मुलाला ही मारले तर तिला शिक्षा तर झालीच पाहिजे होती." सावकार बोलला.

"पण गावातल्या लोकांचं काय कधी न कधी त्यांना ही सत्य काय ते कळेलच की."

"त्यांची ही सोय केली आहे मी." अस म्हणून त्याने एक बॉटल त्याला दाखवली. "हे एक जालीम विष आहे खास बाहेर देशातून मागवलं आहे मी. याच्या एक थेंबाने शंभर माणसे मरतात. पण मी यांना असं  मारणार नाही. त्या मूर्ख राधाने माझ काम अजूनच सोपं केलं आहे. तिने जो श्राप दिला आहे न तो मीच खरा करून दाखवणार."

"तो कसा ?"

"मी हे विष गावाच्या पिण्याच्या पाण्यात कालवणार. हळू हळू सगळी लोक खूप आजारी पडतील. याचा असा असर होईल की लोक एकमेकांना खाऊ लागतील आणि  त्यांना वाटेल की हे सगळे राधाच्या श्रापामुळे होत आहे त्यामुळे त्यांची कुणी ही मदत करणार नाही. मग मी सगळं घेऊन इथून दूर पळून जाईल कुणालाही माझा संशय येणार नाही."

"पोलिसांचं काय?" 

"त्याची काही काळजी नाही. राधा आणि तिचे पूर्ण परिवार नष्ट झालं आहे. कोण तिच्या बाजूने उभं राहील? पोलिसांना थोडं खर्चपाणी दिला की ते ही केस बंद करून देतील."

त्याच सगळं बोलणं मी ऐकत होतो पण त्याला हे माहीत नव्हतं. मी तिथून निघण्याचा खूप प्रयत्न केला पण मी निघू शकलो नाही. त्या नीच माणसाने स्वतःचा परिवारही तिथेच सोडलं आणि तो ते विष पाण्यात कालवून तिथून पळून गेला.

त्याचा त्या विषाचा परिणाम फक्त मनुष्यावर नाही तर जनावरांवर आणि शेत जमिनीवर ही झाला. सगळी पीक नष्ट झाली. प्राणी बिचारे तरफडून तरफडून मेले. लोकांनी अक्षरशः एकमेकांना खाल्ले.

मी खूप दिवस तिथेच पडून होतो. त्यांनी सुरवातीला मला खायला प्यायला दिले पण मी खाल्ले नाही. कारण मला जगायचे होते. काही दिवसानंतर गावातून आवाज यायचे बंद झाले. मी डोकावून बघितले तर सगळ गाव नष्ट झाले होते. मी कसाबसा तिथून बाहेर पडलो. जंगलातच खूप दिवस लपून राहिलो.

सगळं  त्या दुष्टाने केलं पण नाव राधाचे खराब झाले. राधाच्या श्रापामुळे असे झाले असेच सगळ्यांना वाटते. ते जरी खरे असले तरी शंभर टक्के खरे नाही.

त्या गावाच्या नाशाला जबाबदार तो सावकार आज मजेशीर जीवन जगत असेल. त्याला शिक्षा झालीच पाहिजे माधव. राधा आणि सगळ्या गावाला न्याय मिळालाच पाहिजे." भीमा माधवचा हात धरून रडू लागला. 

माधव आणि आकाश हे सगळ ऐकून एकदम थक्क झाले.

"ओ माय गॉड ! इट्स सो टेरीबल." आकाश बोलला.

माधवचाही संताप संताप होत होता.

"आई विल कील हिम!" माधव जोरात भिंतीवर हात आपटत बोलला.

भीमाचे सगळं बोलणं ऐकून माधवच्या डोक्यात एक  प्लॅन येतो.

"आकाश जर आपण काही लालच देऊन त्याला इकडे बोलावलं तर."

"म्हणजे?" आकाश बोलला. 

"म्हणजे असं की आपण त्या गावात  धनाने भरलेले हंडे सापडले आहेत असं टीव्ही वर दाखवू आणि ते ज्यांच्या जमिनीवर आहेत त्यांना त्यातून सरकार २० टक्के देईल अस ही सांगू. ज्यामुळे तो लालची माणूस नक्कीच गावात परत येईल."

"आणि नाही आला तर?" आकाशने विचारले.

"तो नक्की येईल बघ आता. तो जास्त दिवस लपून नाही राहू शकत शिवाय भीमाने सांगितल्याप्रमाणे तिथे त्या दरोडेखोरांनी लुटून आणलेला माल लपवला आहेच की."

"हमं!!"  आकाश पण यावर विचार करायला लागला.

"माधव तसा तुझा प्लॅन छान आहे पण न्यूज रिपोर्टर तिथे यायला तय्यार होतील का?"

"पैसे दिले की सगळं होतं आकाश. आपण त्यांना बाकी काही सांगयाचे नाही आणि सगळी घर आपण बाहेरून कुलूप लावून बंद करून टाकू."

"ओ के!मी न्यूज रिपोर्ट्सची व्यवस्था बघतो." असे म्हणून आकाश तिथून निघून गेला .

माधवला पूर्ण विश्वास होता की हा प्लॅन नक्की यशस्वी होईल.

माधव भीमाजवळ काही वेळ बसतो. भीमा त्याला सांगतो की राधा त्याची खूप आठवण करायची. तिने तुला खूप पत्र पण पाठवले पण तू एका ही पत्राचे उत्तर का दिले नाही?

भीमाच्या या प्रश्नाने माधव थोडा चक्रावून जातो.

"मला पत्र लिहले? कधी? पण मला तर आज वर एकही पत्र मिळाले नाही." 

"असे कसे? मीच तर पोस्टात टाकून यायचो तुमच्या या शहरातल्या पत्त्यावर."

भीमाच्या बोलण्याने माधव थोडा व्यथित होतो. तो भीमाचा निरोप घेऊन तडक घरी जातो.

काय होईल पुढे 

माधव आणि आकाशचा प्लॅन यशस्वी होईल का?

राधाची पत्रे माधवला भेटतील का??

 वाचा पुढच्या भागात

क्रमशः

वरील कथा सोनाली जाधव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित.
   


    

1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post