शापित भाग तेरा

शापित भाग १३

✍️ सोनाली जाधव 

मागील भाग इथे वाचा 

👇

भाग बारा

माधव आकाशकडे जातो.  राधाच्या पत्राविषयी सर्व काही सांगतो.

"आपल्याला लवकरच काही ना काही केले पाहिजे, आता जास्त उशीर होता कामा नाही." माधव बोलतो.

"हो मी माझ्या एका मैत्रिणीला याबद्दल सगळं काही सांगितले आहे आणि ती आपली न्यूज कवर करायला तय्यार आहे. फक्त तिला मी तिथल्या पिशाच्चबद्दल काही ही सांगितले नाही. हे सर्व बाहेर पडायला नको. आपल्याला फक्त धनाच्या साठ्याबद्दल न्यूज दाखवायची आहे. मी उद्याच माझ्या सर्च टीमला घेऊन जाऊन तिथे सर्च करतो. तिथे काही ना काही नक्की सापडेल आणि नाही सापडला तर आपण खोटे पुरावे तय्यार करू.

तूही माझ्या सोबत चल. सगळ्यात आधी आपण तिथली सर्व घरे बाहेरून बंद करून देऊ म्हणजे काही प्रोब्लेम व्हायला नको."आकाश माधवला सांगतो.

"वाह!!तुझा प्लॅन ग्रेटच आहे. मला विश्वास आहे तो नक्की यशस्वी होईल. आता फक्त वाट बघायची ती त्या सावकाराची तो नक्की आपल्या जाळ्यात फसेल."

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दोघं ही भल्या पहाटे राधापूरकडे निघतात. गावातली सगळी घर बाहेरून लाऊन घेतात. मग आकाश त्याच्या सर्च टीमला फोन करून बोलवून घेतो. त्या टीममधे काही हवालदार आणि श्वान पथक असते. ते एक दीड तासात तिथे पोचतात पण श्वान पथकातील कुत्री काही केल्या गावात यायला तय्यार होत नाही. याचे कारण माधव आणि आकाशला माहीत असते पण त्या श्वान पथकाला समजत नाही की असं का होत आहे. आकाश त्यांना बाहेरच थांबायला सांगतो. आता आकाश, माधव आणि बाकी सर्चींग टीम गावात शोध घ्यायला लागतात.भीमा च्या सांगण्या वरून ते गावाचं मागच्या बाजूला शोध घेतात. खूप वेळ शोध घेतल्या वर त्यांना तिथे काही पैस्यानी भरलेल्या बॅगा आणि सोन्याचा ऐवज भेटतो. आजून काही वेळ शोध घेतल्य वर बराच ऐवज भेटतो. आता जवळपास संध्याकाळ होत आली होती. माधव आणि आकाश सगळ्या टीमला फटाफट निघायच्या सूचना देतात. सगळा ऐवज घेऊन सगळे लोक तिथून परत शहरात येतात

"ही न्यूज अजून कुठेही बाहेर पडता कामा नाही." आकाश सगळ्यांना सांगतो.

दुसऱ्या दिवशी आकाश त्याच्या मैत्रीणीला फोन करून बोलवूनघेतो. आज ते भीमाला ही सोबत घेतात.काल जे काही त्यांना तिथे सापडले ते सर्व दाखवतो.

"हे सगळं जिथे सापडला आहे तिथे तू माझ्या सोबत चल आणि ही न्यूज कव्हर कर. ही न्यूज सर्व देशात विदेशात पसरली पाहिजे. ज्या कुणाची ती जमीन असेल त्यांना सरकार वीस टक्के त्यातून बक्षीस देईल असं जाहीर कर." आकाश तिला सांगतो.

आकाश माधव आणि ती न्यूज रिपोर्टर सगळे आपल्या टीमसकट राधापुरकडे जायला निघतात.

गावात गेल्यावर  त्यांना सगळ्या घरांची दारे तुटलेली दिसतात पण आता दिवस असल्याने  कोणताही धोका नाही म्हणून ते दुर्लक्ष करतात. माधव आणि आकाश कसेबसे सगळ्या घराची दारे लाऊन घेतात.

भीमा तिला घेऊन सावकाराच्या जमिनीकडे जातो. हीच ती जमीन आहे इथेच सगळं सापडलं आहे. तुम्हाला हीच जागा दाखवायची आहे. ती ठरल्याप्रमाणे सगळी न्यूज कव्हर करते.

ती न्यूज आता वाऱ्यासारखी पूर्ण देशात पसरते. वर्तमानपत्रातून छापून येते. सगळीकडे तिची चर्चा सुरू असते.

जवळपास आता आठ दिवस होत आलेत.

"माधव मला नाही वाटत याचा काही उपयोग होईल असे! आता आठ दिवस झाले पण कुणीही दावा करायला आले नाही."

"नाही आकाश अजून थोडी वाट बघ. नक्की येईल कुणी ना कुणी. आपण कुठे तरी चुकतो आहोत".

माधव विचार करतो कुठे तरी काही तरी चुकते आहे आपले. पण काय?

मग अचानक त्याला क्लिक होत . 

"ओहह!येस!येस! आकाश आपण एक चूक केली ."

"काय?" आकाश विचारतो.

"गावाचं नाव. गावाचं नाव आपण राधापुर असे सांगितले आहे. जे त्याला माहितच नाही. कारण त्या गावाचं नाव आधी शक्तीपुर होते."

"ओह्! एस यू आर राईट."

"चल फास्ट पुन्हा न्यूज केली पाहिजे."

"अरे नाही त्याची काही गरज नाही. आपण न्यूज एडिट करायला लावू. त्यात नाव बदलता येईल."

"वाऊ! मग तर काही प्रोब्लेम नाही."

ती बातमी पुन्हा एडिट होऊन गावाचं नाव बदलण्यात आले. आता ती जागा जागेचा मालक यांची नावे ही सांगण्यात येतात.

इकडे एका दुसऱ्या देशात एक पिळदार शरीरयष्टीचा पुरुष उपडा पडलेला असतो. त्याच्या अवती भवती मुली असतात. त्या त्याची मालिश करत असतात. एक काळे कपडे घातलेला पुरुष पळत पळत येतो आणि त्याच्या कानात काही तरी कुजबुज करतो. तसा तो उठून बसतो आणि सगळ्यांना तिथून जायला सांगतो. हातात मोबाईल घेऊन तो न्यूज बघत असतो.

"नमस्कार आताच हाती आलेल्या बातमीनुसार हे गाव राधापुर नसून शक्तीपूर आहे आणि आठ दिवसापूर्वी इथे जवळ जवळ १००कोटी किमतीचा ऐवज सापडलेला आहे. पुरातत्व खात्याच्या माहितीनुसार हा ऐवज जवळ जवळ ५००वर्ष पूर्वीचा आहे. बघुया काय म्हणतात आहे ते."

"हा तर सर  आमचे प्रेक्षक हे जाणून घ्यायला उत्सुक आहेत. काय सांगणार तुम्ही ह्या सापडलेल्या धनाबद्दल त्यांना " (अर्थातच सगळ खोटं खोटं नाटक )

"हे अतिशय जुन्या बनावटीचे दागिने आहेत. जवळ पास ५००वर्षापूर्वीचे आणि याचे मूल्य १००कोटी तरी असावे असा आमचा अंदाज आहे." (पुरातत्व विभागाचा साहेब म्हणून भीमाच बोलतो.)

धन्यवाद सर.

तर हे होते पुरातत्व विभागचे तज्ञ.......

"हे गाव फार वर्षापूर्वी कोणत्या तरी साथीच्या रोगामुळे  पूर्णपणे नष्ट झाले आहे. खूप वर्षापासून इकडे कुणी ही फिरकत नाही.

ही जमीन इथल्याच कोणत्या सावकाराची आहे असे सांगितले जाते आहे. पण दुर्दैव आज इकडे हे बक्षीस घेण्यासाठी कुणी ही नाही. ह्या मालमत्तेवर आता पूर्णपणे सरकारचा अधिकार असणार आणि ज्याची ही जमीन आहे त्यांना सरकार कडून २०टक्के म्हणजे जवळ जवळ २०कोटी बक्षीस म्हणून देण्यात येतील. पुढच्या आठ दिवसात जर कुणी दावेदार आला नाही तर सरकार ही पूर्ण मालमत्ता स्वतःच्या ताब्यात घेईल.

अधिक माहितीसाठी इन्स्पेक्टर आकाश यांना तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता."

आकाश आणि माधवने जसे सांगितले अगदी तशीच न्यूज बनवण्यात आली होती. ही न्यूज बघून त्या माणसाच्या तोंडाला पाणी सुटते.

"अरे च्यामायला ही तर आपलीच जमीन दिसतेय. गाव पण आपलंच आहे की. जरा कॉल कर तर कोण तो आकाश आहे त्याला."

आकाशच्या मोबाईलची रिंग वाजते. नंबर  बाहेरच्या देशाचा असतो तो मोबाईल स्पीकरवर करतो.

"हॅलो इन्स्पेक्टर आकाश स्पीकिंग."

"हॅलो मी मोहनराव बोलतोय."

"हा बोला."

"ज्या जमिनीवर धनाचे हंडे सापडले ती जमीन आमची आहे."

हे ऐकून माधव आणि आकाश दोघं ही सावध होतात.

"कोण तुम्ही कुठून बोलता आहात."

आकाश इशर्याने फोन टॅप करायला सांगतो.

"मी मोहनराव व्हिएतनामवरून बोलतो आहे. फार वर्षापूर्वी जेव्हा गावात एक महाभयंकर साथीचा रोग पसरला होता तेव्हा मी माझा जीव वाचवण्यासाठी इकडे आलो होतो.

माझे पूर्ण परिवार त्यात नष्ट झाले होते. म्हणून मी होते नव्हते तेवढे घेऊन इकडे कामासाठी आलो. आज मी ती न्यूज पहिली त्यात तुम्ही जी जमीन दाखवली ती माझीच आहे".

"बघा साहेब तुम्ही जे कुणी बोलता आहात जर ती जमीन तुमची असेल तर तुम्हाला त्या संबंधी पुरावे द्यावे लागतील आणि इकडे यावं लागेल. तुमची पूर्ण शहानिशा केल्याशिवाय सरकार काही देणार नाही." आकाश बोलतो.

"हो नक्कीच साहेब. मी दोन दिवसांनी येतो." असे म्हणून त्याने फोन ठेवला.

त्याचा फोन ठेवताच माधव आणि आकाश नाचू लागतात.

"बघ आकाश मी म्हटल्याप्रमाणे तो आपल्या जाळ्यात सापडला आहे."

"येस माधव! आता लवकरच राधाला न्याय मिळेल. पण ऐक ही बातमी बाहेर जाता कामा नये. असे लोक खूप चालाक असतात. त्यांची माणसे आधी पाठवतात पूर्ण माहिती काढतात मगच ते स्वतः येतात."

"हो आकाश हे आपल्यातच राहील."

त्याचा फोन आता टॅप झाला होता. त्याची वेळोवेळी लोकेशन आकाशला माहिती पडत होती.

अखेर तो दिवस आला. तो त्याच्या भल्यादांडग्या अंगरक्षकासोबत पोलिस स्टेशनमधे येतो.

माधव त्यावेळी तिथेच असतो.

आकाशकडे त्याचे फोटो असतात म्हणून त्याला ओळखणे सोपे होते .

"नमस्कार आकाश साहेब येऊ का आत?".

आकाश मुद्दाम वर मान न करताच या असे इशाऱ्याने सांगतो.

काही तरी फाईल चाळण्याची नाटक करतो. मग त्याच्याकडे बघून विचारतो, 

"बोला काय काम आहे?"

हात पुढे करत तो म्हणतो, "मी मोहनराव सावकार. परवा तुमच्याशी त्या जमिनीबद्दल बोललो होतो."

आकाश मुद्दाम थोडा विचार करण्याचं नाटक करतो .

"अरे हो हो ते शक्तीपुरवाले का"?

"हो तोच मी."

माधव मागे बघून हे सगळं बघत असतो. त्याला इथेच दोन गोळ्या घालाव्या अस त्याच्या मनात येते. तो रागाने लाल झालेला असतो पण आता या क्षणी काही ही करणे चुकीचं आहे म्हणून तो पेपरमागून सगळे ऐकत असतो.

मोहनराव काही कागदपत्रे स्वतःच ओळखपत्र आकाशसमोर ठेवतो.

आकाश ते स्वतः जवळ घेऊन तपासायला लागतो. एका हवालदारला बोलवून याची सत्यता तपासा अस सांगून त्याला पाठवून देतो.

"बरं तर मोहनराव तुम्ही कुठे राहता आता?"

"मी व्हिएतनामला. हे घ्या माझा पासपोर्ट."

"काय काम करता? नाही म्हणजे हे दोन अंगरक्षक सोबत आहेत म्हणून विचारतो." आकाश विचारतो

"माझा एक आयात निर्यातीचा व्यापार आहे. मी इकडे शक्तिपुरला शेतीचा माल आयात निर्यात करत होतो. तिथे काही वर्षांपूर्वी...."

"आई नो! आय नो!"

आकाश त्याला मधेच थांबवत बोलतो. तेवढ्यात तो गेलेला हवालदार परत येऊन आकाशच्या कानात काही तरी कुजबुजत बोलतो.

ते ऐकून आकाश मोहनरावला चला असा इशारा करतो आणि माधवला ही ओके असा इशारा करून राधापुरकडे जायला निघतो .


आता पुढे काय ?

राधा आणि बाकी गावाला न्याय मिळेल का?

वाचू या पुढच्या भागात 

क्रमशः 

वरील कथा सोनाली जाधव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित.

3 Comments

  1. तुम्ही पुढचा भाग टाकलाच नाही आहे कधीपासून

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post