शापित भाग आठ

 शापित भाग ८

✍️सोनाली जाधव

मागील भाग इथे वाचा

👇

भाग सात

माधव खूप वेळ राधाचा फोटो छातीशी धरून रडत होता. मामांनी पण त्याला रडू दिले. त्याच मन मोकळे होऊ दिलं.

बाहेर गाडीचा आवाज येतो तसेच मामा माधवजवळ येऊन सांगतात "उठ माधव. आई आली वाटतं तिच्यासमोर तू असा जाऊ नको. तिला संशय येईल."

माधव तसाच उठून आपल्या रूममधे निघून जातो. बेडवर पडून राधाचा फोटो बघत बघत रडत राहतो. पूर्ण रात्र तो तसाच पडून राहिला.

दुसऱ्या दिवशी माधव उठला तो काही तरी निर्धार करूनच.

"राधा मी तुला न्याय मिळवून देणार. तुझे गुन्हेगार नक्की पकडले जातील. तू नक्की मुक्त होशील."

माधव सकाळी उठून मामाकडे गेला.

" मामा पुढे काय झाले?" त्याने सरळच विचारलं.

पुढे !.....एक दीर्घ श्वास घेऊन मामांनी पुढची हकीकत सांगितली.

"राधा आणि तिचे आई वडील जवळ जवळ रात्रभर तसेच मृत अवस्थेत पडले होते. त्यांना स्पर्श करायची कुणाची ही हिम्मत होत नव्हती. रात्रभर कुणीही घराबाहेर पडले नाही. शेवटी सावकाराने काहीबाही कारणे सांगून पोलिसांना बोलवलं. मला आणि तुझ्या वडिलांना जेव्हा हे समजले आम्ही तडक गावाकडे निघालो. आम्ही पोहचलो तेव्हा पोलिस पंचनामा करत होते.राधाचा मृतदेह अजूनही तसाच झाडावर टांगलेला होता.डोळे आणि जीभ बाहेर आले होते.मुंग्यानी कुठून कुठून कुरतडले होते. पक्ष्यांचे चोची मारण्याचे निशाण जागोजागी दिसत होते.

तिच्या मृतदेहाची अशी विटंबना पाहून तुझ्या बाबांना खूप मोठा धक्का बसला ते जागीच बसले. मला ही ते बघणे अशक्य होत होते पुर्ण दुर्गंधी पसरली होती. तिच्या वडिलांचा ही मृतदेह तसाच पडला होता. पोलिसांनी आम्हाला जवळ जाऊ दिले नाही. त्यांची ती अवस्था पाहून अंगाची लlहीलाही होत होती.मी ओरडून बोललो.

अरे निर्दयी लोकांनो, काय केलं हे. सोन्यासारखे एक कुटुंब तुमच्या मूर्खपणामुळे नष्ट झालं. पाप्यानो कुठे फेडणार ही पाप?

मी खूप शिव्या शाप दिला सगळ्यांना.पोलिसांनी राधाचा मृतदेह उतरवून घेतला. तिच्या आईचा ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आणि तिघांचे मृतदेह घेऊन एक रुग्णवाहिका तडक गावाबाहेर निघाली.

पोलिसांनी माझी व तुझ्या बाबाची चौकशी केली.आम्ही कोण ?कुठे राहतो? यांचा आणि आमचा काय संबंध वगैरे वगैरे .बाकी त्यानेही सामूहिक आत्महत्या केली असं सांगून केस बंद केली.

पोस्टमोर्टॉम झाल की बॉडी तुम्ही घेऊन जा असे सांगून निघूनही गेले. माझा राग शांत होत नव्हता.मी त्या दुष्ट सावकाराच्या अंगावर धावून गेलो. त्याची कॉलर पकडून त्याच्या दोन तीन मुस्कट्यात मारली. त्याच्या माणसांनी तेव्हा मला जोरदार मारहाण केली. तेव्हा पासून हा माझा पाय असा आहे. मामांनी आपली पँट वर करत माधवला दाखवले.

"तुला नक्की शिक्षा होईल. ती तुला सोडणार नाही." असं म्हणत मी तिथेच बेशुद्ध झालो.

पुढे तुझ्या बाबांनी मला दवाखान्यात ऍडमिट केलं आणि त्यांनीच त्या तिघांचाही अंतिम संस्कार केला.

"आणि त्या सावकाराचे काय झाले मामा?" माधवने प्रश्न केला.

"तो दुष्ट दुसऱ्याच दिवशी गावातून पळून गेला. कुठे गेला आजवर कुणालाही माहीत नाही.

"मग पुढे? माधव पुन्हा बोलला.

"पुढे जे झाल ते अतिशय भयानक होते. पूर्ण गावात रोगराई पसरली विचित्र पद्धतीेची. लोकांना अचानक पक्षाघाताचा(paralysis )अटॅक येऊ लागले. त्यांचे अंगावरचे मास गळू लागले. गावात उपासमारीची वेळ आली लोक स्वतःची जनावरे खाऊ लागली. एवढंच काय तर एकमेकांना मारून खाऊ लागली.

त्या गावात आत्ता कुणाचीही जाण्याची हिम्मत होत नव्हती. ते पूर्ण गाव पिशाच्च होऊन गेलं."

"मग मामा ते दिवसा झोपलेले असतात आणि रात्रीच कसे उठतात बर".माधवचा पुन्हा प्रश्नृ

"त्या गावाची अतिशय खराब अवस्था झाली होती. त्या गावाची रोगराई दुसऱ्या गावात येऊ नये म्हणून खूप प्रयत्न करण्यात आले.सरकार जरी शाप वैगरे मानत नसली तरी आजूबाजूचे गावातले लोक मानत होतेृ त्यांनी एका अघोरी बाबांना बोलवून त्या गावात पाठवले.त्या बाबानेच त्यांना दिवसा झोपून राहायचं असं आदेश केला.त्यांच्या अघोरी शक्ती पुढे त्यांचं काही चालले नाही.

त्यांनीच गावाच्या सीमेवर जे मारुतीचे देऊळ आहे तिथे मोठा हवन केला ज्यामुळे ते पिशाच सीमा ओलांडून येऊ शकत नाही.

"पण मग त्यांनी त्यांना मुक्त का केलं नाही." माधवने विचारलं.

हो त्यानी खूप प्रयत्न केला पण त्यांना ते शक्य झालं नाही. त्यांनी एकच सांगितल ती आत्मा खूप पवित्र होती. यांनी तिचा घात केला. यांना तिचा शाप भोगावाच लागेल.यांची मुक्ती फक्त तोच करू शकेल.बस एवढं बोलून ते निघून गेले.

"तो, तो कोण? मामा."

मामा त्याच्या या प्रश्नावर काहीही न बोलताच निघून गेले.

माधव आता जास्तच गुंतत जातं होता.त्याला काय करू म्हणजे राधा मुक्त होईल हेच ध्येय दिसत होते.

माधव त्याच्या रूममधे इकडून तिकडे फेऱ्या मारत होता.तेवढ्यातच त्याचा फोन वाजतो.

समोरून एक बाई बोलत असते.
"हॅलो!माधव बोलता आहात का?"

"हो मीच बोलतोय बोला". माधवने उत्तर दिले.
"तुम्हाला आत्ता ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलमधे यावं लागेल. तुमच्यासोबत एक पेशंट होता त्याची प्रकृती खूप गंभीर आहे त्याला तुमच्याशी काही तरी महत्वाचं बोलायचं आहे."

माधव तसाच तडक निघाला.

हॉस्पिटलमधे त्याच्यासोबत बस मधला एक प्रवासी होता तो अंत्यंत गंभीर होता.व्हेंटिलेटर चा आवाज येत असतो.तो तोंडावरचा ऑक्सिजन मास्क काढून माधवचा हात हातात घेऊन तोडक्या मोडक्या शब्दात त्याला सांगतो, 

"ती तुझी वाट बघते आहे ,मुक्ती साठी." असे म्हणून त्याच्या हातात काहीतरी देऊन तिथेच त्याने प्राण सोडला. 

माधव एकदम स्तब्ध झाला. दोन मिनिट तिथेच उभा राहिला आता व्हेंटिलेटरचा आवाज बंद झाला होता. त्याला नर्सने बाहेर जायला सांगितले .

तो बाहेर बेंचवर डोक्याला हात लावून गुडघ्यात डोकं घालून बसला होता. अचानक त्याच्या लक्षात आले, हातात काही तरी आहे.

त्याने मूठ उघडली त्यात एक चांदीची पैंजण होती.

"हे काय आहे? मला का बरं दिलं त्याने."माधवचे विचारचक्र सुरू होते की तेवढ्यात तिथे आकाश येऊन पोहचला.

"माधव !तू इकडे कसा?" त्याचे ते शब्द ऐकून माधव भानावर आला.

"तू काय करतो आहे इकडे?" माधवने उलट प्रश्न केला.

"मला तुमची केस देण्यात आली आहे." आकाश बोलला.

"वा! ग्रेट  आकाश मला तुला काही तरी खूप महत्वाचे सांगायचे आहे."

"हो मला ही खूप काही जाणून घ्यायचे आहे." असे म्हणत आकाश आतमधे गेला.

आकाश आला तसा माधव त्याला लगबगीने बाहेर घेऊन गेला. दोघं एका शांत जागी जाऊन बसले.

"बोल माधव काय सांगणार होतास तू?"

माधवने मामाने जे काही सांगितले ते सगळे आकाशला सांगितले.

"खूप भयानक आहे हे माधव. आपल्याला काही तरी तर केलंच पाहिजे." आकाश बोलला.

"हो मी ही तेच विचार करतो आहे. पण कसं आणि कुठून सुरू करू तेच नाही समजत. तू माझी मदत करशील ना?"

"हो नक्कीच! माझं कामच आहे ते." माधवचा हात हातात घेऊन आकाश बोलला.

माधव घरी आला तेव्हा त्याची आई समोरच बसली होती.

"माधव कुठे गेला होतास ?" आईने विचारले. 

"हॉस्पिटल."

"का?" आईने विचारलं 

"माझ्यासोबतचा एक मुलगा सिरीयस होता. त्यालाच भेटायला गेलो होतो."

"तुला मी या सगळ्यात पडू नको म्हणून बजावलं होत ना." आई रागातच बोलली.

"हो आई पण आता पडावंच लागेल मला."

एवढंच बोलून तो रूममधे निघून गेला.

माधव हातात ती पैंजण घेऊन विचार करत बसला कुठून सुरूवात करू. त्याला अचानक आठवलं ते अघोरी बाबा.;ते नक्कीच काही तरी दिशा दाखवतील. पण ते कुठे भेटतील मला? मला तर त्यांचं नाव काय होते हे ही माहित नाही. असं म्हणून माधवने त्याचा लॅपटॉप उघडला.लत्याने गुगलवर अश्या अघोरी लोकांबद्दल सर्च केलं.

असे साधक गिरनार पर्वताजवळ राहतात आणि अजून अश्या काही ठिकाणं त्याला भेटली.

त्याने नक्की केलं उद्या सगळ्यात आधी आकाशला भेटायचं आणि याबद्दल सांगायचं.

तो हातात ती पैंजण घेऊन बेडवर आडवा पडला. सतत एकटक तो त्या पैंजणाकडे बघत होता तेव्हा अचानक रूममधले वातावरण बदलले. खिडकीची उघडझाप होऊ लागली.

गार वारा सुटला. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. त्याला समोर एक खूपच काळोखाने भरलेली खोली दिसली. त्यात एक अतिशय शुभ्र वस्त्र परिधान केलेली एक स्त्री खाली मान घालून रडते आहे असे त्याला दिसल. तो तिच्या जवळ जातोय तिला स्पर्श करणारच ...

तेवढ्यातच त्याच्या हातून ती पैंजण खाली पडली आणि सगळं गायब झालं. त्याला क्षणभर काही सुचलंच नाही काय झालं ते. दारावर कुणी तर थाप मारल्याच्या आवाजाने त्याची तंद्री तुटली तसा तो खाडकन उभा राहिला. त्याने ती पैंजण उचलून पटकन उशी खाली ठेवल . चेहरा घामाने डबडबलेला होता तो पुसला आणि दरवाज्याच्या दिशेने गेला.

दारावर त्याची आई त्याला आवाज देत होती.

काय आहे पैंजणाचे रहस्य ??

त्याला कोण दिसत होती ??

पाहुयात पुढे 

क्रमशः

पुढील भाग इथे वाचा

👇

भाग नऊ

वरील कथा सोनाली जाधव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

    


Post a Comment (0)
Previous Post Next Post