शापित भाग तीन

 शापित _भाग ३

✍️ सोनाली जाधव

मागील भाग इथे वाचा

 👇

भाग दोन

माधव तिथून उठला आणि पुढे पुढे जाऊ लागला. त्याला मागून त्याला कुणी  तरी बघतय असच सारख वाटत होते पण त्यांनी मागे वळून बघितले नाही, किंबहुना त्याची हिम्मतच झाली नाही.

बसचे सगळे प्रवासी निराश दिसत होते. इथून कधी आणि कशी सुटका होईल याची कुणालाच काही कल्पना नव्हती. माधव स्वतः ही खूप हताश होता. त्याच्या हाताखाली चार गाड्या होत्या, जागोजागी नोकर होते. लाचारीची अशी परिस्थीती त्याने कधीच अनुभवली नव्हती. तो श्रीमंतीत वाढलेला होता, एकुलता एक होता. परदेशात शिक्षण घेत होता. सगळ काही छान सुरू होत. अगदी नजर लागेल असेच आणि खरच नजर लागली त्याच्या सुखाला. वडिलांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे माधवचे सगळ जगच बदलले. माधव विचारांमध्ये गुरफटून गेला.  डोळ्यात पाणी पण येत होते.

"आई माझी वाट बघत असेल. मी इथून कसा बाहेर पडू? हे!! ईश्वरा माझी मदत कर!" माधव मनातल्या मनात बोलत होता.

त्यांनी सर्वत्र नजर फिरवली एक वेगळीच निगेटिव्ह एनर्जी त्याला जाणवत होती. जणू काही या पुढे अजून ही काही तरी भयंकर होईल. अतिशय भयंकर मानवाच्या विचारा पलीकडे.

तसेच काहीसे होणार होते .



माधवला आणि इतर कुणालाही काय करावे ते सुचत नव्हते. गावात परत जायची कुणाची ही हिम्मत नव्हती. सकाळच्या त्या दृश्याने माधव व सोबतचे ते चार जण आधीच खूप घाबरले होते. त्यातून एकाला ते सहन न झाल्याने ताप भरला होता. ड्रायव्हर कंडक्टर सगळे प्रयत्न करून थकले होते. आता तर गाडीतले डिझेल पण गळत होते आणि ते कधीही संपू शकेल याची शक्यता नाकारता येत नव्हती.

मोबाईलला नेटवर्क काय पण बॅटरी पण नव्हती. माधव काही लोकांना सोबत घेऊन जंगलाच्या दिशेने पाणी वैगरे काही मिळतंय का म्हणून  गेला. पण तो ही खूप थकला होता. कालपासून त्यानेही अन्न पाणी घेतले नव्हते .

तरीही सगळी शक्ती एकवटून तो पुढे गेला पण निराशाच कुठे ही काही नव्हतं. फक्त आणि फक्त काट्याची झाडे. तसेच सगळे परत आले.


आत्ता उन्हं उतरू लागली होती. सगळे प्रवासी उपाशी, तहानेने व्याकूळ होऊन मलूल दिसत होते. पुढे काय हाच प्रश्न सर्वांसमोर उभा होता. दिवस तर कसा बसा पार पडला पण रात्री काय?

सकाळी पाहिलेली दृश्य आठवली तरी अंगाला काटा येत होता.


आता बऱ्यापैकी अंधार झाला होता. कुणीही काही ही बोलत नव्हते 

बाहेर गारवा वाढला होता.

पूर्णिमा जवळ असल्याने चंद्रप्रकाश बरा वाटत होता.

तेवढ्यातच त्या  भयाण शांततेचा अंत झाला तो एका कर्कश दरवाजा उघडण्याच्या आवाजाने. त्या आवाजाने सगळ्याच्या हृदयाचे ठोके चुकवले. माधवच्याही अंगाला सर्रकन काटा आला.

"ओ माय गॉड!" त्याच्या तोंडातून अचानक हे शब्द ऐकून सगळे जन त्याच्या कडे बघू लागले. काय झाल? काय होईल ? याचा यत्किंचितही विचार न करता माधवने सगळ्यांना हळूच सांगितलं, "बसमधे बसा अजिबात आवाज करू नका."

काय झाल कुणी काही समजण्याआधीच सगळे भरभर बसमधे चढले. माधवने दरवाजा खिडकी सगळ काही बंद करून सीट खाली सगळ्यांनी लपून बसा अस सांगितलं.

कुणालाही काही कळतं नव्हत अस का करायचं आहे म्हणून.

तेवढ्यातच एका पाठोपाठ अनेक दरवाजे उघडण्याचा आवाज येऊ लागला. असंख्य लोक एकत्र विव्हळत आहेत असे आवाज, रडायचे ओरडायचे चित्र  विचित्र आवाज येऊ लागले.  जोराचा वारा सुटला झाडाची पाने सळसळू लागली. हे सगळ समजण्यापलीकडचे होते.

माधव पण खूप घाबरला होता. काय करावं काही ही सुचत नव्हतं .

त्याने फक्त  इशारा करून चूप  रहा असं सगळ्यांना सांगितलं ....

आवाजाचा जोर वाढतच होता पण कुणाची ही तिकडे बघण्याची हिम्मत होत नव्हती. माधवने हिम्मत करून खिडकीच्या फटीतून बघायचा प्रयत्न केला. समोरचे ते भयानक असे  दृश्य पाहून कुणीही जागीच बेशुद्ध पडेल. .... समोर असंख्य लोक, लोक काय ?पण भुतासारखे लोकं दिसत होते. सकाळी जिथे एक चिटपाखरूही नव्हते तिथे आता जत्रा भरली होती. ते दुसरे तिसरे कुणी नसून सकाळी जी प्रेतं पहिली तीच लोकं असावीत बहुतेक, माधवने मनात विचार केला. ते जरी बसपासून बरेच दूर असले तरी दुरून पण त्यांची भयानकता जाणवत होती.

हात पाय नुसतेच लटकल्यासारखे वाटत होते. सगळे जण पक्षाघात झाल्यासारखे डावी बाजूकडे वाकलेले दिसत होते. चेहरा आहे नाही काहीं  ही समजत नव्हते. काही भागाचेचे मास लोंबकळत होते.

माधवला दुरूनच थोड फार जे काही दिसत होते तेच इतकं विदारक आणि भयानक होते की जवळून बघणे म्हणजे अशक्यच.

"ती सगळी गावातीलच लोक असावीत बहुतेक!" माधव स्वतःशीच पुटपुटला. आता जवळ जवळ तीनशेच्या वर लोक जमा झाली होती आणि  सगळी एक पाय ओढत ओढत त्या विहिरी जवळच्या झाडापाशी जाऊन थांबली. एकंदरीत काय सुरू आहे हे जरा समजणे कठीण होते. सगळे प्रवासी जीव मुठीत धरून गच्च डोळे मिटून देवाचा धावा करत होते. 


ती सगळी पिशाच होती. समोरचे दृश्य पाहून माधव फक्त कयासच लावू शकत होता.

ती सगळी पिशाच झाडाजवळ वाकून काही तरी विनवण्या केल्या सारखी हावभाव करत होती. जणू काही त्यांना कुणी तरी गुलाम बनवले आहे आणि त्यातून सुटकेसाठी ते प्रयत्न करता आहेत.

परिस्थिती फारच विचित्र होती. हे सगळं सुरूच होते की कुणी एकाने बसच्या खिडकीतून बघण्याचा प्रयत्न केला. समोरचे दृश्य बघून त्याच्या तोंडून जोरात एक किंकाळी निघाली.

किंकाळीच्या त्या आवाजाच्या दिशेने सगळ्या पिशाच्चानी पाहिले .

माधव आता समजून चुकला होता की बास्स आता आपला खेळ खल्लास !!! आज आपण इकडे मरणारच आणि कुणाला आपल्या मरणाची माहिती ही मिळणार नाही. सगळे प्रवासी त्या किंकाळीने इतके घाबरले की सगळ्यांनीच खिडकी बाहेर पाहिले.

समोर जे काही होते ते बघून काही जन जागीच बेशुद्ध पडले. हातपाय लटपट करू लागले.ललहान मुले बायका रडू लागली वृध्द व्यक्ती देवाचा धावा करू लागली.

आता प्रवासी आणि पिशाच असे समोरासमोर एकमेकांना बघत होते. काही मिनिट अशीच गेली आणि त्या सगळ्या पिशाचानी बसकडे आपला मोर्चा वळवला .

आता मृत्यू आणि प्रवासी यात फक्त आणि फक्त काही मीटर  अंतर शिल्लक राहिले होते.

आता पुढे काय होईल या बद्दल सगळ्यांना च कळले होते.

माधव जोरात ओरडला, "सगळ्यांनी कृपया शांत रहा. आवाज करू नका आणि खिडक्या लाऊन सीट खाली लपून जा. काहीही झालम तरी बाहेर निघायचं नाही."

सगळे फटाफट सीट खाली लपून गेले तोंड दाबून ठेवायचा आणि हुंदके दाबायचा आवाज तेवढा येत होता.

समोरून येणाऱ्या त्या टोळीचे आवाज मात्र वाढू लागले. गुरर्गुर करायचे किंकाळ्याचे दाताचा विचकट आवाज .

माधव धीर एकवटून बघतच होता.

जसे जसे ते जवळ येऊ लागले तसे तसे त्यांचे ते भयानक रूप दिसू लागले.

गालाची खोबने बसलेली दात बाहेर आलेले, डोळे लाल झाले होते आणि सतत रक्ताच्या धारा त्यातून वाहत होत्या. जीभ लटकल्या सारखी दिसत होती. त्यांची चालण्याची गती फारच हळू होती. सगळे जण पाय ओढत ओढत चालत होते. माधव सगळं खिडकी आडून बघत होता. आत्ता कोणत्याही क्षणी आपल्यावर हल्ला होणार आणि आपण आज इथे मरणार अशी त्याची पक्की समजूत झाली होती.

त्याला आईची आठवण येऊ लागली डोळ्यातून पाणी येऊ लागले.

वडील जाऊन काहीच तर दिवस झाले होते आणि आता मी पण .

माझ्या आईचे काय होईल ह्या सगळ्या विचाराने त्याला अधिकच रडू येऊ लागलं.

बस आणि ते  भुतं यात फक्त आता दहा फुटाच अंतर बाकी होते .


आता पुढे काय होईल माधव या सगळ्यातून कसा वाचवेल स्वतःला आणि इतरांना वाचूया पुढच्या भागात.


क्रमशः

पुढील भाग इथे वाचा 👇

भाग चार

वरील कथा सोनाली जाधव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित.


    


Post a Comment (0)
Previous Post Next Post