शापित भाग दोन

 शापित ...  भाग २

✍️ सोनाली जाधव.

मागील भाग इथे वाचा

👇

भाग एक

माधवला खूपच गाढ झोप लागली.


सकाळी जाग आली ती बसच्या जोरात ब्रेकच्या आवाजानेच .


माधव खडबडून जागा झाला. एक क्षण तर त्याला काहीच सुचलं नाही. सगळं जणु काही स्वप्न आहे असच वाटत होते. मग हळूहळू त्याला जाणीव झाली की तो एका बसमधे बसला आहे आणि बस कुठे तरी जोरात धडकली आहे.


तो लगबगीने खाली उतरला. समोर एका झाडाला बस जोरात धडकली होती ज्यामुळे बसचे पुढचे पार्टस बर्यापैकी तुटले होते. टायर पण फाटले होते. ड्रायव्हर कंडक्टर एकमेकांवर आरोप करत होते, लहान मुले रडत होती. जो तो काही ना काही तर्क लावत होता.


मग माधव पण त्यात सामील झाला."काय झाल हो साहेब? हे कोणते गाव आहे ? आपण कुठे आहोत?" असे एक एक प्रश्न त्याचे सुरूच होते.


कंडक्टर त्याच्यावर जोरात खेकसला, "अहो साहेब दिसत नाहीं का काय चाललय? इथे आम्ही परेशान आहोत तुमचं काय उगाच मदे मधे."


कंडक्टरचे ते शब्द ऐकून माधव थोडा वरमला आणि मागे जाऊन बसला.


खूप वेळा नंतर लक्षात आले की, "अरे ते बघा समोर एक गांव दिसतं." तो सगळ्यांना सांगू लागला.


मग काही लोक तिकडे बघू लागली .


एक उजाड ओसाड गाव होत ते. 

"तिथे  कुणीच कसं दिसत नाही पण?" माधव बोलला.


"अरे हो ना," बाकीच्या लोकांनी पण दुजोरा दिला.


"चला बघुयात काही मदत मिळते का?" अस म्हणून माधव उठला. आणखी दोन चार माणसं सोबत घेतली .


"अरेच्चा!! अरे इकडे मनुष्य तर सोडाच पण साधं एक चिटपाखरू ही दिसत नाही." एक मुलगा मधेच बोलला. तसेच सगळे जण आजूबाजूला बघू लागले.

  "अरे हे गाव तर लई विचित्र वाटत आहे, चला परत जाऊ." एक मनुष्य बोलला. पण काही तरुण त्याला हसू लागली. "काय काका एवढ्यातच घाबरले तुम्ही तर. चला बघुयात की काय होत नाही आम्ही आहोत की." म्हणत पुढे पुढे जाऊ लागली.


गावाची  सीमा जशीच त्यांनी पार केली अचानक वातावरणात गारवा जाणवू लागला. वादळ सुटले. प्रचंड दुर्गंधी येऊ लागली.


माधव या सगळ्यात खूप शांत होता. तो आजूबाजूला बघत बघत निरीक्षण करत पुढे जात होता.


जवळच त्याला एक विहीर दिसली. यात थोड फार पाणी मिळतंय का बघण्यासाठी तो विहिरीत डोकावला पण त्यात झाडपाला शिवाय काहीच नव्हतॆ. विहीर खूप खोल होती. त्यातून पण खूप दुर्गंधी येत होती. माधवला एकदम शिसारी आली आणि तो पटकन मागे सरकला. समोर एक भले मोठे पिंपळाचे झाड होते. माधव एकटक त्या झाडाकडे बघत होता. त्याला हे सगळ कुठे तरी आपण या पूर्वी पण पाहिलं आहे असॆ सारख वाटत होत. पण कुठे? कधी? काहीच आठवत नव्हतॆ. तो बेभान झाल्यासारखा नुसताच झाडाकडे बघत राहिला.


तेवढ्यात मागून एकाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तशी त्याची तंद्री तुटली.

"अरे काय झालं? काय पाहता  आहात तुम्ही?" त्या माणसाने माधवला विचारलं.

"अरे काही नाही सहजच" अस म्हणत माधव पुढे निघून गेला .


बस जवळ उभ्या असलेल्या लोकांनी आवाज दिला.

"अरे आहे का कुणी तिकडे?" एक जण ओरडूनच म्हणाला.


"अरे पाहतोय आम्ही धीर धरा जरा." असॆ इकडून एक जण ओरडुन म्हणाला.

 माधवने सगळ्यांना सांगितलं, "अस करूयात आपण त्या घरात जाऊन बघू. तुम्ही बाकी तिकडे जा, आम्ही इकडे जातो."


सगळ्यांनी होकार दिला .


माधव एका घराबाहेरूनच, "अरे आहे का कुणी घरात. प्लीज आमची मदत करा. हॅलो आहे का कुणी?" म्हणत म्हणत दार वाजवू लागला. पण घरातून काहीच प्रतिक्रिया येत नाही हे पाहून त्याने आत जाण्याचा निर्णय घेतला.


तो आत जाणारच होता तेवढ्यात पुढे गेलले काहीं तरुण जोरात बाहेर ओरडतच आले.

"अरे, अरे, काय झालं असं काय करताय भूत बघितल्यासारखे?" ते काका हसून बोलले .


त्यांच्या तोंडून एक ही शब्द निघत नव्हता. श्वास चढला होता.


माधवने त्यांना आधी शांत होण्यास सांगितलं. एक दोन मिनिटांनी त्यांनी थरथरत्या आवाजात माधव आणि इतर मंडळी ना जे काही सांगितलं ते अतिशय भयानक होते.


ते बोलू लागले.

"त्या घरात प्रेतच प्रेत आहेत आणि त्याच नाही तर प्रत्येक घराची तीच स्थिती आहे. घरातली लोक अस्तावस्त पडलेली आहेत. लोकच काय तर प्राणी जनावरे ते पण तशीच आहेत सडलेली, कुजलेली."


हे ऐकून सगळे एकदम घाबरले. माधव लगबगीने त्या घरात शिरला. घरात खूपच घाण वास येत होता. घरात सगळीकडे प्रेतच प्रेत होते. बायका, पुरुष, वृध्द, लहान मुले, प्राणी हे सगळ दृश्य अतिशय भयानक होते. त्याला त्या वासामुळे ओकारी येऊ लागली. तो तसाच तोंडावर हात ठेऊन बाहेर निघाला.  


थोडा वेळ थांबून माधवने सगळ्यांना सांगितले.

  "ऐका या बाबतीत कुणीही काही बोलायचं नाही. उगाचच सगळे घाबरतील. आपण लवकरात लवकर इकडून निघुयात. चला लवकर."  असे म्हणून माधव आणि बाकी सगळे धावतच बसकडे गेले. बस मधल्या लोकांना काय चालू आहे याची काहीच कल्पना येत नव्हती. ते दुरूनच फक्त कयास लावत होते. जसे सगळे बस जवळ पोहचले सगळ्यांनी प्रश्नाचा भडिमार केला.


"अरे काही बोलणार का? कुणी आहे का गावात? काही मदत मिळेल का आपल्याला?"


"अरे काका कुणीच नाही ह्या गावात. मला वाटत हे गाव कुठे तरी दुसरीकडे शिफ्ट झाल आहे." माधवने मनातली भीती चेहऱ्यावर न येऊ देता सांगितलं.


"बर्र मग हा का असा पळत होता? ओरडत होता? भूत बघितल्यासारखा." कंडक्टरने विचारले.


"अरे नाही नाही साप बघून घाबरला तो. बस बाकी काही नाही."


माधवच्या उत्तराने सगळी जण आपापसात कुजबुजु लागली.


माधव आणि त्याच्या बरोबरची सगळी मंडळी एकामेकाकडे बघत होती. त्यांच्या चेहऱ्यावरवर भीती स्पष्ट दिसत होती. ते निमूटपणे झाडाजवळ जाऊन बसले.


आता इकडे येऊन जवळ जवळ दोन तास होत आले होते.


सगळेच लोक खूप निराश आणि हताश झाले होते. बायका पोर एकमेकाला घट्ट पकडुन बसले होते. मधेच कुणी तरी रडत होते. भूक आणि तहानमुळे सगळे बेजार झाले होते. कंडक्टर आणि ड्रायव्हर पण आता प्रयत्न करून करून थकले होते. सगळीकडे एक निराशेचे सावट पसरलेले दिसत होते. म्हातारी माणसं देवा जवळ आळवणी करतं होते. नरक यातना की काय म्हणतात ना ती हीच असावी असच वाटत होते .


माधव गर्दीतून थोडा पुढे जाऊन एका दगडावर बसला. त्याने खिशातून एक सिगारेट काढली आणि ती ओढू लागला.


आपण ह्या बसमधे का  बसलो? हे सगळ का घडतय असा सगळा विचार करू लागला. माधव समोर त्या भयानक अश्या गावाकडे बघत होता. त्याला एक लक्षात आले की, गावातली लोक मेली आहेत. कदाचित कोणत्या रोगप्रसार झाला असेल. पण झाड झुडपे काहीच कसे नाही? आणि  इकडे या बाजूला किती हिरवळ आहे पक्षी पण दिसत आहेत. हे सगळ खूप विचित्र आहे कल्पनेच्या पलीकडचे. माधव असा बराच वेळ विचार करत बसला.


बराच वेळ तो बसून होता .


माधवला जणू काही मागून कुणी तरी पाहत आहे असाच भास होत होता. त्याने झर्रकन मागे वळून पाहिले. मागे झाड झुडपे असाच सगळा परिसर होता.


जाऊ दे, भास आहे अशी स्वतःची समजूत घालून तो तिथून उठला.


एका झाडामागून दोन डोळे चमकले.


कोण असेल तिथे? गावाचं अखेर रहस्य काय आहे? माधव तिथून सुखरूप निघेल का?


पाहुयात पुढच्या भागात.

क्रमशः

पुढील भाग इथे वाचा

 👇

भाग तीन



वरील कथा सोनाली जाधव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

    


Post a Comment (0)
Previous Post Next Post