ती मी नव्हेच - भाग (१)
✍️ सौ. उज्वला रहाणे
" अग! दिवे घासूनपुसून लख्ख कर सगळी तयारी करून ठेव, मग मी पुजा करेल." आईने म्हणजेच शोभाने शीलाला सांगितले.
"शीला सगळे शिकून घे बाय, आता तूझं लग्न करायला लागणार. नाहीतर सासरची लोक म्हणायची, आई गेली आणि सावत्र आई आली. काही संस्कार केले नाहीत. माझे नाव खराब होईल ग बाई!" शीला घरातील कामे मन लावून करायची, त्याचबरोबर अभ्यासही करायची.चांगलीच हुशार होती. परिस्थिती माणसाला शिकवते.
नाममात्र वळण लावणे हे फक्त नावापुरते, पण दिवसभर शीलाला राबवणे घरकामात गुंतून ठेवून तिला शिक्षणापासून वंचित कसे ठेवता येईल, हे काम मात्र सावत्र आई शोभाला चांगले जमत होते.
शीलाला हे कळत का नव्हते?म्हणजेच चांगलेच कळत होते. आता ती पण लहान नव्हती. चांगलीच नववीत शिकत होती. नेहमीच पहिल्या पाचात असायची.
पण नाईलाज होता. बापानेच स्वतःचे चोचले पुरविण्यासाठी, शीलाचे कारण पुढे करून,तिला आई हवी म्हणून शोभा सावत्र आई घरात आणून ठेवली होती.
शोभा ही शोभाच होती.तिच्याबरोबर एकावर एक फ्री असा तिचा मुलगा शशांक पण तिने घरात आणला होता.
शीलाने बापाला खुपदा सांगितले. "बाबा मला आई नको आहे ! मी आता चांगली समजुतदार आहे. आईचे सुख मला थोडेच लाभले. पण तीच संस्काराची शिदोरी मला आयुष्यभर पुरेसी आहे. मी मोठी झाले. चांगले वाईट मला चांगले समजते. माझ्या आईच्या अजारपणात अनुभवाने मी खुप शाहणी झाली आहे."
पण तिचा बाबा ऐकेल तो पुरूष कसला? शीलाच्या मातृत्वाचे गोंडस नाव देऊन आपलं अफेअर घरात आणले.
येताना एक पार्सल घरात आले शशांक. साधारण शीलापेक्षा दोन वर्षांने मोठा. वय लहान असले तरी त्याची किळसवाणी नजर शीलाला कळायची. एकदा , दोनदा बापाला सांगण्याचा प्रयत्न शीलाने केला होता,पण शोभा म्हणजेच सावत्र आईने मध्ये पडुन शिताफीने प्रकरण मिटवले. तो तुझा मोठा दादा आहे,हे कारण देऊन. मग ह्यामुळे शंशाकचे चांगले फावले होते.
त्याचा बहिण या नावाखाली शीलाला होणारा स्पर्श तिला किळसवाणा वाटायचा. शीला नावाप्रमाणेच आपलं शिल जपायचा प्रयत्न करायची तर, शोभा नावाप्रमाणेच शोभा करण्यात पटाईत होती.
शीला दिवसेंदिवस मनात कुढत होती. शोभा मात्र दिवसेंदिवस वाढत होती. बाप दिवसभर कामानिमित्त बाहेर, ती बोलणार तरी कोणाला?
रात्री घरी आल्यावर शीलाशी मोजकेच बोलून बायकोच्या मिठीत बाबांची रात्र सजायची. यांचे प्रेमाचे चाळे बघून शोभाच मुलगा शशांक चेकाळून शीलाकडे बघायचा. तिला हा सगळा प्रकार किळसवाणा वाटायचा,पण मनातले ती बोलणार तरी कोणाला? तिला हे मैत्रीणींना सांगायलाच शरम वाटायची.
"मान सांगावा जनाला अपमान सांगावा मनाला" असा बाणा होता शीलाचा. आजोळची वाट तर बापाने केंव्हाच बंद केली होती.
मामा,आज्जी आडून आडून तिला विचारायचे. "कशी आहे ग , येतेस इकडे आजोळी ?तुझी काळजी वाटते ग!" पण शीला उडवाउडवीची उत्तरे देउन वेळ मारून न्यायची.
शीला शाळेत जायची, पण शांतच असायची मैत्रिणीही खोदुन खोदुन विचारायच्या, पण तिकडेही ती काही बोलायची नाही, खरं कारण सांगायची तिला लाज वाटायची. आजचा प्रकार मात्र सगळा शीला जरा सहनशक्तीच्या बाहेरच गेला होता.
सकाळी बाबा आॉफीसला गेल्यावर, शीला अभ्यास करत होती. तिकडे शोभाने मोर्चा वळवला आणि शीलाला म्हणाली. "काय शीला मोठी बॅरिस्टर होणार काय? कामं बघ किती पडलीत आवर."
शीला म्हणाली, "नाही जमणार मला! परिक्षा तोंडावर आली आहे." तिने उत्तर दिले.
"काय उलट उत्तर देतेस ?"असे म्हणून शोभा आकांडतांडव करू लागली. रागात तिने शीलाला मारले.
शीला रडत होती. तिला समजावण्याचा बहाणा करत शशांकने तिला जवळ घेऊन, तिच्याशी थोपटत सलगी केली.
ती जोरात ओरडली आणि शशांकच्या हाताला जोरात चावा घेतला. शोभाच्या लक्षात प्रकरण आले. तिने मुलाला मागे खेचले.
स्वतःच्या आणि शशांकच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी शीलावर ओरडली, "हा तुझा अभ्यास का? एवढा भाऊ समजूत घालतो आहे. तु चावलीस त्याला. येऊ दे तुझा बाप, बघच आता !"
शीलाला कळेचना नक्की काय चालले आहे. का मारले हिने ? माझ्याशी सलगी केली हिच्या मुलांने, माझे शिल वाचवण्यासाठी मी त्याला प्रतिकार केला. यात चूक काय माझी होती का?
"येऊ दे बाबांना आज सोक्षमोक्ष लावूनच टाकूया! नाहीतरी मलाही आता कंटाळा आला आहे या सगळ्या गोष्टीचा. आई आणि भाऊ या पवित्र नात्याला हा काळिमा आहे तुम्ही दोघं." असं म्हणुन शीला अभ्यासाचा पसारा आवरुन स्वयंपाकघरात गेली.
शीला सगळे अस्ताव्यस्त स्वयंपाकघर आवरत मनात केलेल्या अभ्यासाची उजळणी करत होती. तसे तिचे लक्ष लागतच नव्हते.
इतक्यात बाजूच्या रूममधून मायलेकाचा संवाद तिच्या कानावर पडला. शशांक म्हणत होता," आई मला शीला हवी आहे. तु कसा शोधलास बकरा तिचा बाप, तुझ्या शरीराची भूक भागवायला. मग माझं काय?
रोज तुझे त्या पुरूषाबरोबरचे चाळे बघताना माझी पण भूक चाळवते. मग मला शीला माझं सावज वाटते. नाहीतरी काय आहे माझं तिचं नातं?"
"मला शीला मिळालीच पाहिजे नाहीतर तुझे पितळ उघडे करेल. माझ्या खऱ्या बापाला कसे फसवलं ते समोर आणेल."
"बापरे! हे काय आपण ऐकले." असं म्हणत शीलाही खुप भयभयीत झाली होती. तिला खरतर कोणाच्या तरी आधाराची गरज होती. परत शीलाने दरवाजाला कान लावले. शोभा शशांकची समजूत घालत होती.
"शशांक देणार आहे तुला शीला मिळवुन, पण थोडी कळ काढ. ती सहजासहजी फसणारी मुलगी नाही. आधी तिच्या बापाला मला पुरेपूर लूटू दे, सगळी संपत्ती माझ्या नावावर झाली कि मी मोकळी."
"कारण तिचा बाप सहजासहजी हे सगळं मला देणार नाही. तुला तर मुळीच नाही. लेक शीला त्याची सर्वस्व आहे."
"त्यासाठी मला थोडी खेळी खेळावी लागणार आहे. नाहीतरी तुझं सत्य तरी तुला माहीत आहे का ? तु काय माझे पितळ उघडे करणार?"
"माझं काय सत्य ?" शशांक कावरा बावरा होऊन शोभाला विचारू लागला. "ऐकायचं तुला? शोभा म्हणाली, पण त्याआधी आधी माझं सत्य काय ते ऐक." शोभा शशांकला सांगू लागली.
"शशांक माझ्या बापाने पैसे पाहिले फक्त पैसे , माझं लग्न केले तेंव्हा, त्याने त्याचा स्वार्थ पाहिला. त्याची कुळात गेलेली जमीन वाचवली आणि मला विकले एका चक्क म्हातार्या सावकाराला.
त्यावेळी मी होते अवघी अठरा वर्षांची होते. नुकतीच तारुण्यात आलेली आणि नवरा साठ वर्षांचा. सांग मला! म्हातारड्याकडे तरी काय होतं? ना माझी शारीरिक भूक भागवायला ताकद ना पैसा. नुसता नावाला सावकार होता तो! खायची वांदे नुसते.
मला लहानपणापासून नटण्या सजण्याची हौस होती. बापाकडे सगळाच दुष्काळ. मला काय मिळाले? ना सासरी ना माहेरी कसलेही सुख. मग मी दिले सोडून मी सासर आणि माहेर दोन्हीही. "
"मग मीच शोधला माझ्या सुखाचा मार्ग, रोज नवी खेळी खेळण्याचा नटून थटून मी रस्त्यावर बसू लागली. मला आता सगळ्याचीच भुक लागली होती."
"आता यापुढे तुझं सत्य ऐकायचे आहे ना !मग ऐकच तू पण भिकारी आहेस.तू पण रस्त्यावरच पोर आहेस. मी तुला आपलंसं केले. रोज नवीन पोर कडेवर घेऊन भीक मागायची. मिळालेली मिळकत रात्री आमच्या भिकार्यांचा दादा त्याच्या हवाली करायची. त्या दादाची नजर मला रात्रीची सोबत मागायची."
"मी ही द्यायची कारण मला माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोण तरी हवाच ना! मग माझ्याकडे पैसा यायचा. त्यात मी माझी सगळी हौस भागवायचे."
"रोज नवा गडी नवे राज्य". भीक मागायला कडेवरच रोज नवनवीन लेकरू रोज ते बदलायचे. मला काहीच फरक नव्हता. ते थोडेच माझ्या म्हणजेच आपल्या रक्तामांसाचे असायचे किंवा होते"
" हा माणूस, या शीलाचा बाप असाच एकदा माझ्याकडे आला. मला विचारले येतेस का? मी ही हो म्हणाले. कुठे काय विचारले नाही."
"त्यावेळेस तू कडेवर होता. मी म्हणाले, साहेब लेकरू उपाशीपोटी काय खायला द्या. उगाच काकुळतीने मी बोलले. त्यानं हॉटेलात नेलं, चांगलचुगंल खायला दिले. चांगला श्रीमंत वाटत होता. याला गटवायचं असं मी ठरवलं. "
"तशी त्याची नजर माझ्या सर्वांगावर फिरतच होती. त्या नजरेतून मला वासना दिसलीच.तसे मीही माझं पण राहणीमान लोकांच्या नजरा खिळवून ठेवण्यासारखेच ठेवायची. "
"मग नजरेला नजर भिडली. हॉटेलची वरची रूम त्यानं बुक केली. तुझ्या दुधात गुंगीचे औषध टाकून तुला ते पाजले आणि बाजूला झोपवून टाकले. एका दिवसांची चांगलीच कमाई झाली माझी."
"मग या माणसालाही माझी चटक लागली होती. रात्री तो दलाल दादा, दिवसा हा. मलाही तेच हवे होते. एक दिवस याने मला त्याची कहाणी सांगितली. बायको आजारी एक पोर पदरात आहे. घरदार सगळे, सगळे सुख आहे. पण शरीरसुख नाही. मग मला विचारलं तू माझी होशील?"
"मला काय आयतंच सावज मिळालं. कर्मधर्मसंयोगाने तुच त्यावेळी माझ्या कडेवर होता. मी ही खोटेच सांगितले. मलाही नवरा नाही. तो अपघातात गेला. हे पोर पदरात आहे त्यामुळे मला पोटापाण्यासाठी हे सगळं करावे लागते. मी काम शोधते पण काम नाही मिळत."
"मग काय दोघांचीही भूक सारखीच. बायको मरेपर्यंत त्यांने मला वेगळं घर करून ठेवलं. पुढे याच्या बरोबर आले पळून. तो भिकार्यांचा दादा मला शोधत होताच, त्याने मला शोधून काढलेच ,पण त्याला पैसा खाऊ घालुन त्यालाही गप्प केलं."
"हा माणूस दिवसरात्र माझ्याकडेच पडलेला असायचा. बायको गेली आणि मग मला आणलं या घरात. त्याच्या पोरीची आई म्हणून."
माझ्यावर आता तुझी जबाबदारी अपघाताने आलेली. कोणाला माहित आहे तू कोणाचा? फक्त मलाच माहित आहे. तुही अनाथ. या माणसालाही वाटतं तू माझाच मुलगा आहे. हा सगळा तुझा आणि माझाही इतिहास. समजलं!"
"आता याचे कर्ज चुकवायचे आहे. आता दुसरं सावज शोधायचं आहे. पहिल्या सारखा दम नाही याच्यात आता. म्हणून सांगते आता गपगुमान रहा तुझीही सोय लावते मी. घाई नको करू. तुला तुझी कमाई देते. मग तुझा मार्ग वेगळा माझा वेगळा."
शीलाने हे सगळे ऐकले होते. "बापरे किती भयानक वास्तव्य आहे. चक्क वेश्या आपल्या घरात वावरते आहे. आईच्या पावित्र्याने पावन झालेले घर याची ही अवस्था?" शीला मनात म्हणाली.
"नाही आज सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा. बाबांना सगळी हकिकत सांगून टाकायची. आणि आपण पहिले घरातून बाहेर पडायचे". तिने ठरवलं
आपण मामाकडे जाऊ पण बाबांचे काय? त्यांना कसे समजवणार? समजा आपण जरी सगळे सांगितले तरी त्यांना पटणार का? कारण ते तर आता शोभाच्या हातातले खेळणे झाले आहेत. शीला विचार करत होती. समाजात अश्या विकृत प्रवृत्तीचे लोक राजरोसपणे फिरत आहेत.
नेहमी पुरूषचं वाईट नसतो हे सिद्ध झालं. बायकाही त्याला अपवाद आहेत.ह्याचे जिवंत उदाहरण ती उघड्या डोळ्यांनी पाहत होती. या गलिच्छ दलदलीतून आपण कसे बाहेर पडायचे.
एक फार मोठं रहस्य तिच्याच घरात दडले होते. इतक्यात बंद दरवाजा उघडला. शीलाने स्वतःला सावरले आणि ती उरल्या सुरल्या कामाला लागली. मार्ग लवकरच काढावा लागणार नाही तर आपल्या नशिबाची हे शोभा करायला हे दोघेही मागेपुढे पाहणार नाहीत.
शेवटी रात्रीच्या गर्भातच उद्याचा उष:काल असतो. डोळे आणि मन भयभयीत झाले होते. मनाची घालमेल चालूच होती. शीला वाट पाहत होती बाबांच्या सुरक्षित खांद्याची. तिला आता बाबांना घट्ट मिठी मारून सुरक्षित व्हायचे होते आणि बाबांना पण सुरक्षितता देणे एवढेच तिचे ध्येय होते.
शशांक तर सत्य ऐकून पुरता कोसळला होता. तर शोभा आता आपलं पितळ कोण उघडकीस आणु शकणार नाही या भ्रमात वावरत होती.
शिलाचा बाबा मात्र सगळ्याच बाबतीत अज्ञानी होता.
शीला फारच अस्वस्थ होती. इतक्यात दाराची बेल वाजली. "बाबा आले वाटते,हो पण आल्या आल्या तमाशा नको. माणूस थकुन भागुन येतो. आपणच हळुवारपणे हा विषय हाताळला पाहिजे".
"आता कळूच द्यायला नको शोभाला, तिचे कारनामे,आपल्याला कळाले आहेत हे!" असं मनात ठरवुन, आपण त्या गावचे नाही या अविर्भावात शीलाने दार उघडले.
"अरे किती वेळ दार उघडायला ? मला वाटले, तुम्ही सगळे कोठेतरी बाहेर गेला कि काय !" शीलाच्या बाबाने विचारलं.
"हो ! बाहेर या असल्या लोकांच्या बरोबर!" मनातल्या मनातच शीला बोलली.
"बाबा चहा घेणार ना?" शीलाने बाबांना विचारले.
"हो चालेल! आई कुठे आहे ?" ,शीलाच्या बाबाने शोभाची चौकशी केली.
"असेल रूममध्ये", असे म्हणत शीला स्वयंपाकघरात चहा करण्याकरता वळली.
"अरे वा मस्त संधी आहे. म्हणजे शीला काहीच बोलली नाही. आयतीच संधी मिळाली. चल शशांक दाखवू तुझा हात त्यांना किती चावली शीला तुझ्या हाताला ते!" शोभा शशांकला आर्जव करत होती.
"आई कृपया शांत रहा. कृपया मला काही कोणाला दाखवायचे नाही." शंशाक म्हणाला.
"अरे ! हे काय ,असा कसा पलटलास?" शोभा घाबरली.
" हो आई!मला काही कोणाला दाखवायचे नाही. जिथे कोणतेच नातं खरे नाही तिथे कशाची अपेक्षा करायची." शंशाक शांतपणे म्हणाला.
"अरे !काय बोलतोस शशांक? भिकारी तो भिकारीच तू! तुला वैभव मिळत असतानाही तुला भिकेची डोहाळे लागले आहेत." शोभा करदवली.
"काहीही समज जे आपलं नाही ते आपलं नाही. मग ते नातं असो वा वैभव? मी आता सज्ञान आहे. चांगले वाईट मला समजत आहे. परिस्थितीने शिकवलं बस्स! मी माझा मार्ग शोधेल. नाहितर मी अडसरच आहे प्रत्येकांच्या मार्गात." शंशाक शोभाला झीडकारत म्हणाला.
" अरे !हे काय,म्हणजे तू नक्कीच काय करणार?सगळे सत्य उघडकीस आणणार का?" शोभाची आता चांगलीच पाचावर धारण बसली.
"शशांक काही भलतं सलतं नको करू! थोडक्यासाठी मी म्हणाले ना, देते तुला शीला मिळवून आणि भरपूर डबोलं पण. हे सगळे वैभव आपलेच आहे राजा. " शोभा शंशाकला भुलवण्यासाठी म्हणाली.
"आई एक शब्दही पुढे बोलू नकोस. नाही ऐकवत मला. खुप किळस येते तुझी आणि तुझ्या संस्काराची.रोज जे बघायचो त्याचेच आचरण करायचो ग, चांगले, वाईट शी sss!"
"पण आज सगळे ऐकून डोळे उघडले. क्षणिक सुखासाठी माणूस काय काय करून बसतो. एकदा त्याची चटक लागली कि, माणूस आपलं सर्वस्व हरवून बसतो. "
"आजुबाजुचे चांगले त्याच्या नजरेतून सुटून जातं. शोधतो फक्त सावज आपल्या शरीराची भूक भागवण्यासाठी. मग तो कोणत्याही थराला पोहचतो.जे आज माझं झाले आहे. "
" मी तुझ्या वाटेत येणार नाही. पण माझ्या सगळ्या चूका मी सुधारणार. निदान माफीचा साक्षीदार तरी होणार." शंशाक अगदी दृढतेने म्हणाला.
"अग शोभा कोठे आहेस? "अचानक आलेल्या आवाजाने शोभा आणि शशांकने विषय मिटवला.
"आले,आले !!थोडा डोळा लागला होता चहा करते." शोभा शीलाच्या वडीलांच्या हाकेला ओ देत म्हणाली.
"नको शीलाने केलाय. तुझाही केला आहे असे वाटते . ये घेऊन. "सुरेशने म्हणजेच शीलाच्या बाबांने डोळा मारत तिला चिमटा काढला.याचा हा प्रकार परत शशांकच्या नजरेतून सुटला नाही.
शोभा स्वयंपाकघरात गेली दोन कप चहा तिला टेबलवर झाकून ठेवलेला दिसला. नक्कीच आपला व शशांकचा असणार. तिने दोन्ही कप घेऊन बाहेर आली. शशांकला एक कप बेडरूम मध्ये नेऊन दिला. "घे बाळा चहा प्यायलावर बरे वाटेल", असे शोभा शंशाकला म्हणाली.
आपला कप बाहेर घेऊन आली. सुरेश जवळ जाऊन बसली."मग काय राणी आज काय? शांत रहाली ?" सुरेशने विचारलं.
"थोडे आज मला बरं नाही वाटत", म्हणत तिने सुरेशला दुर केले.
" ठीक आहे रात्री उत्तम औषध देतो तुला."असं म्हणत सुरेशने जाताना बाजूच्या रूमकडे डोकावलं.
शीला अभ्यासात मग्न होती.तर पुढच्या रूम मध्ये शशांक चहाचा कप बाजूला ठेवून खिडकीतून बाहेर बघत असल्याचे त्याने पाहिले.
शोभाने दोघांचे कप उचलून सिंकमध्ये नेऊन ठेवले.सुकलेल्या कपात पाणी घालण्याची तसदी पण तिने घेतली नाही.
परत शशांकच्या रूममध्ये आली. चहा तसाच होता. शशांकने हात देखील लावला नव्हता. तो काहीतरी लिहित असल्याचे तिने पाहिले. चला अभ्यास करत आहे वाटते. अशी तिने मनाची समजूत घातली.
" शशांक चहा घे."
"मला नको आहे." शशांकने ओरडून सांगितले. नेमके तेच बोल सुरेशच्या कानावर पडले.
"काय झालं काय बिनसले शशांक?",सुरेशने विचारले.
"काही नाही बाबा. अभ्यासात मन लागत नाही म्हणून चिडचिड होते आहे. परिक्षा जवळ आली ना!" बाबा म्हणताना शंशाकची जीभ चाचरली.
"अरे !थोडे फिरून ये फ्रेश वाटेल." सुरेश म्हणाला.
"बघतो !"शशांक उत्तर दिलं. सुरेश रूमच्या बाहेर पडताच शशांक आईला म्हणाला.
"ह्या सज्जन माणसाला तु तुझ्या जाळ्यात अडकवलेस. मी आता सगळे सांगणार. "
" शशांक प्लीज!" शोभा त्याला अडवत होती,पण शशांक मनाने पुरता कोसळला होता.
"आई मला आडवू नकोस. माफी तरी मागून सुधारण्यासाठी मला माझा मार्ग शोधू दे. आईचा हात झटकून तो तिरीमिरीने रूमच्या बाहेर आला.
काय करणार शशांक? पाहुया पुढच्या भागात.
क्रमशः
✍️ सौ. उज्वला रहाणे