माहेरी सुनेने केलेली मदत सासरी आवडत नाही

 माहेरी सुनेने केलेली मदत सासरी आवडत नाही 

✍️सौ. ऊज्वला रवींद्र राहणे


   दोन पिशव्या भरून गळ्यात पर्स अडकवून आज्जीला बाय् बाय् करून मिनलने हाततल्या दोन पिशव्या स्कुटीच्या डिकीत ठेवल्या. गळ्यातील पर्स समोर हॅडलला अडकवली. स्कुटीला किक् मारत म्हणाली,"आई मी येताना शाळेतून आरूला घेऊन परस्पर आईकडे जाईल. 


    आजकाल मिनलला कारण तिला माहेरी जाणे गरजेचे होते.आईवडिलांची ती एकुलती एक होती. 


  कारण थंडीमुळे आईचा संधीवाताचा आजार चांगलाच बळावला होता.त्यामुळे सध्या ती आजारी असायची आणि बाबांचा स्मृतिभ्रंशचा आजार त्यामुळे बाबांच्या कोणतीच गोष्ट लक्षात राहत नसे. मिनलला पण तसा पुर्ण वेळ त्यांना देणे शक्य नव्हतं आणि विश्वासू मदतनीस ती शोधत होती पण ती पण तिला मिळत नव्हती. 


    सावकाश जा ग म्हणत आज्जीने हातातल्या वातीला जोरदार पिळ दिला आणि घरात नजर टाकली.


   इतक्यात मानसीची सासू म्हणजेच आज्जीची सुन गीता पदराला हात पुसत आज्जी जवळ येऊन बसली. "काय ग आवरलं का काम गीता" आज्जीने विचारले.


    "हो चाललयं काम काय संपणार माझं?" तुम्हाला चहा हवा का ते विचारायला आले होते."प्रश्नार्थक मुद्रेने गीताने आज्जीला विचारले. 


   "काय ग काय झाले तुझा चेहरा एवढा का पडलेला? आज्जीने गीताला विचारले.


  " काही नाही हो बघितले ना दोन पिशव्या भरभरून घेऊन मिनल कुठे गेली कळतय ना!" कुठे म्हणजे अर्थातच माहेरीच ना!"आज्जी म्हणाल्या.


    पण आई ही काय पध्दत झाली? माहेरी भरभरून द्यायची? पण मी म्हणते आईवडिलांना  घेताना कसं काही वाटत नाही.


   गीता समोरून घेऊन जाते ना तुझ्या चोरून तर देत नाही ना? हा मिनलचा गुण घेण्यासारखा बघ! आणि देऊ दे ना काय बिघडले? ती कमावते आहे.आईवडिलांची एकुलती एक पोर ती नाही तर कोण करणार?आज्जी सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करत होत्या.


    पण आई?..

    काही आई वगैरे नाही, तिच्या आईवडिलांची काही अडचण असेल म्हणून घेऊन गेली असेल. आपल्याला काय करायचे. 


   "मला एक कळते गीता,डोळ्याने दिसते ते पाह्यचे पण तोंडाने नाही बोलायचं. तरच समाधान लाभते. किंमत पण राहते." 


    "पण आई हे सगळं मिहिरला कसे चालते. करावी मदत पण इतकी मला नाही पटत. तुम्हांला पटते ना करा मग तिचे कौतुक.


 शेवटी माझं मीठ आळणी ते आळणीच" म्हणत तणतणच चहा गीता करायला स्वयंपाकघरात गेली.


  आज याचा सोक्षमोक्ष लावायचाच मिहीर आल्यावर. नेहमी काय सतत माहेरी जाणं जाताना भरभरून घेऊन जाणं,आम्ही पण कोट्यधीश थोडेच आहोत. मनाशीच पुटपुटत गीताने चहा आणून आज्जीच्या समोर ठेवला.


   आज  प्रकरण चांगलेच तापलय म्हणत चुपचाप आज्जीने चहा घेतला.कपबशी बाजूला सारून जपमाळ घेऊन बसल्या.


  गीताने पण उरलेली कामं आटोपली दुपारची जेवणे उरकली. संध्याकाळी नेहमीप्रमाणे मिहिर, मिनल आणि छोटू घरट्यात परतली.


  संध्याकाळची ड्युटी मिनलची. ती फ्रेश होऊन आली सर्वांना चहा केला.रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. आज्जी पतवंडाबरोबर गप्पा मारत बसल्या.


    मग पेपरमध्ये डोळे खुपसून बसलेल्या मिहिरला गीता म्हणाली. मिहीर आजकाल जास्तच होते आहे हं. काय झाले आई? "अरे किती तो मिनलचा माहेरचा ओढा? पिशव्या भरभरून घेऊन जाते.


  " हे बघ मी विचारत नाही, काय नेते, का नेते, मी आपलं तुझ्या कानावर घातले." बस्स शेवटी आपण पण कोट्यधीश नाहीत ना! "


  मिहिरने शांतपणे ऐकून घेतले. तो उत्तर देणार होता पण आज्जीने त्याला डोळ्याने खुण करून गप्प राह्यला सांगितले.


   पण सासुबाईंचे बोल मिनलच्या कानावर पडले. तिला कळले काही तरी यांच्या मनात चालले आहे. तिने भाजी फोडणीला टाकली आणि कुकर लावले कणिक मळून ठेवली.बाहेर आली.


  मिहिरच्या बाजूला बसत म्हणाली, "मिहिर जरा कुकरच्या शिट्ट्या मोजा आणि भाजी करपणार याकडे लक्ष ठेवशील." 


 "अग हे काय मी आहे ना त्याला कशाला सांगतेस बायकी कामं?" गीता बोलून गेली.तेच तर बायकी कामं नाही सांगत माझी थोडी मदत करायला सांगते. प्रसंगानुरूप थोडी मदत केली तर काही हरकत नाही. काही अडचण आहे म्हणूनच सांगितले. हक्क आहे ना त्याच्यावर मिनल शांतपणे बोलली. 


    आई मला वाटलेच तुम्ही हे बोलणार म्हणूनच मी तुम्हाला समजले या शब्दात बोलले.


    आई आशीच माझ्या माहेरी अडचण आहे.मी हक्काची म्हणून तिकडची सगळी कामे मला  करावी लागतात. 


      कारण इथे निदान मी तुम्हांला मिहिरला माहेरी मदत करते हे तुम्हाला पटत नाही.तरीही आई मी ती मदत करणार? 


   "आई माझे आईवडील थकले आहेत.बाबांना स्मृतिभ्रंश. त्यामुळे विसरभोळे पणा त्यांचा खुप वाढला आहे. कोणाला किती पैसे दिले हे सुध्दा त्यांच्या लक्षात राहत नाही. 


    परवा तर ATM मधून पैसे काढताना पैसे घेतले पण कार्ड तिथेच विसरले. मागचा भला माणूस होता. त्याने काढून कार्ड हातात दिले.

 

  अश्या कित्येक गोष्टी आहेत त्यांच्या लक्षातच राहत नाहीत, आई पण संधीवातामुळे हैराण असते.त्यामुळे मला सगळे करणे गरजेचे आहे. 


   मान्य आहे आपण कोटयाधीश नाही आहोत. पण मी पण कमवते त्यातले थोडे मी त्यांना देऊ इच्छिते. 


    पण खरे सांगू आई माझे आईवडील खुप स्वाभिमानानी आहेत. ते माझ्या देऊ केलेल्या मदतीला नाकारतात. लग्न झाले मुलीची म्हणजे  मिळकत पण ते परक्याचे धन समजतात. 


  आई आज जे काही भरभरून नेते ना तिकडे, ते त्यांच्याच पैशाने घेतलेले सामान असते.फक्त त्यांच्या डिमेनशिया या आजारामुळे डॉक्टरांनी त्यांना एकटे बाहेर जाण्यास मनाई केली.


  आईला संधीवातामुळे सगळे करणे जमत नाही. म्हणून मी इकडे सगळे आणते आणि घेऊन जाते.


  जवळच पडलेल्या पर्समधून तिने तिच्या बाबांचे पासबुक, चेकबुक आणि ATM कार्ड सासुबाईं समोर ठेवले. " आई पिशव्या घेऊन जाताना तुम्ही पाहता मग मला सरळच का नाही विचारत.अडून अडून का विचारता." 


 कधी एखाद्या फोन करून जरी माझ्या आईला विचारलं असतं तर बऱ्याच गोष्टीचा खुलासा झाला असता. 


  चला कुकरने आवाज दिला मला.पोळ्या घेते करायला. म्हणत मिनल स्वयंपाकघरात गेली.मिहिरपण उठून गेला.

 

    गीता आज्जीजवळ जाऊन बसली आज्जी म्हणाल्या " गीता मी म्हणाले ना, काहीतरी आईवडिलांची अडचण असेल म्हणून घेऊन गेली असेल? थोडं धीराने घ्यावे वेळ कोणाला सांगू येत नाही. केस उगाच पांढरे नाही झाले माझे." 


  गीताला मनातून पटले होते. पण बोलून तर गेली होती आधीच.

 

  "बोलताना नेहमी  विचार करावा. काय पटतंय ना?अग तु मनाने खुप चांगली आहेस पण कधीतरी असं काहीतरी बोलून जातेस आणि तुझ्या सगळ्या चांगल्या गोष्टीवर पाणी  पडतं." आले का लक्षात?आज्जीनी गीताला समजून सांगितले. 


  "हो आई यापुढे काळजी घेईल" म्हणत आज्जी  जवळ खेळत असलेल्या आपल्या नातवाची गोड पापी घेत सगळे विसरून स्वयंपाकघरात मिनलला मदत करायला गेली.!


   गीता बोलली आणि  विसरून पण गेली. पण मिनलचं मनाला ते लागलं त्याचे काय?..

  

✍️  सौ. ऊज्वला रवींद्र राहणे 


  वरील कथा सौ. ऊज्वला रवींद्र राहणे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post