अंतिम निर्णय
✍️ सोनाली जाधव
सहा महिन्यांपूर्वी
प्रिया आणि प्रशांत सोबत एकाच कॉेलेजमध्ये शिकलेली.
प्रिया आधुनिक विचारांची तर प्रशांत थोडा शांत आणि जुन्या विचारांचा.
प्रिया मधे निर्णय घेण्याची कमालीची क्षमता तर प्रशांत थोडा स्लो होता ,पण त्यांचा शांत आणि सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा स्वभाव प्रिया ला खूप आवडायचा.
म्हणतात ना प्यार अंधा होता है, तसच काही तरी .
प्रिया मूळची कोल्हापूरची पण शिक्षणासाठी पुण्याला हॉस्टेल मधे रहात होती.
प्रिया आणि प्रशांत खूप छान फ्रेन्ड होते ,प्रिया सतत प्रशांत कडे त्याच्या घरी जात असे ज्या मुळे घरच्या लोकांसाठी ही ती आता परिचयाची झाली होती.
पण ते म्हणतात ना एक चेहरे पे काई चेहरे लगा लेते हे लोग
वरून खूप छान आणि प्रेमळ दिसणाऱ्या प्रशांत च्या फॅमिली ला बघून प्रिया ला आपल भविष्य इथेच आहे अस वाटू लागले होते .
लोक सागळी परिचयाची च होती .
सगळे तीच खूप कौतुक करायचे ,तिचे खूप लाड केले जायचे.
ती नेहमी या घरात येत होती खात पीत होती हवं ते घेतं होती त्या साठी कधी तिला कुणी अडवल नाही.
तिथेच राहणारा प्रशांत हा कधी तिच्या मनात बसला तिला
ही कळलं नाही आणि असच एका दिवशी तिने त्याच्या जवळ आपलं प्रेम कबूल केलं आणि घरच्यांनी ही कबुली दिली ,झालं मग तिच्या मनासारखं शुभ मंगल सावधान.
नुकतच लग्न झालेली प्रिया स्वतः ला आरश्यात बघून गालातल्या गालात हसत होती.
लग्ना नंतर मुलींचं सौदर्य अजूनच खुलून जाते अस म्हणतात ते काही खोटं नाही.कारण
तीच लग्न तिच्या आवडीच्या च मुलाशी झालं होत.
आरश्यात पाहता पाहता ती हरवली होती . नव वधू चे ते दिवस च खुप वेगळे असतात,एक ओढ एक भीती आणि अश्या खूप काही भावना तिच्या मनात सतत येत असतात,
क्षणात आनंद तर क्षणात अश्रू तिच्या डोळ्यांत दिसतात.
नववधू ची ही अवस्था फार विचित्र टप्यावर असते .
प्रिया पण अश्या च काही श्या मनस्थिती त होती ,पहिल्या रात्रीच्या आठवणीं ने स्वतः ला आरश्यात पाहून लाजेने पार ती गोरी मोरी झाली होती.
प्रिया अशी स्वतः मधे च हरवली होती तेवढ्यात सासू चा आवाज तिच्या कानी पडला.
"प्रिया !प्रिया! अग्ग ये प्रिया "सासूच्या आवाजाने ती भानावर आली .
साडीचा पदर डोक्यावर घेत घाई घाई ने ती खाली उतरली व किचन मधे गेली.
"काय ग किती आवाज दिला ऐकू येत नाही का ,ही काय वेळ आहे का उठण्याची बाहेर तुझे सासरे चहा साठी ताटकळत बसले आहेत." सासू ने रागावत च सांगितले.
सासू च हे बोलण तिला आवडल नाही कारण या आधी त्या कधीच अश्या बोलल्या नव्हत्या.
प्रिया अपराधी स्वरात ... "सॉरी आई ही साडी ची पिन मला लावता येत नव्हती म्हणून उशीर झाला ,आई मी ड्रेस घालू शकते का ?"अस ती पूर्ण बोलते न बोलते तोच आई ने 'अजिबात नाही आपल्या परिवारात अस काही चालत नाही या पुढे विचारू पण नको.",अस म्हणत तावातावाने सासू बाई किचन च्य्या बाहेर निघाल्या.
प्रिया थोडी नाराज झाली पण आता तो विषय बाजूला ठेवून चहा करण्यात व्यस्त झाली.
पूर्ण दिवस चहा , नाश्ता,जेवण काम आवरण्यातच च निघून गेला . सगळी कामं आटपून ती थोड्या वेळ आपल्या रूम मधे आराम करायला गेलीच होती तेवढ्यात च गावात च राहणारी सासू ची धाकटी बहिण व तिच्या मुली घरी आल्या.
आधी तिने दुर्लक्ष केलं पण आलाच खालून आवाज" प्रिया! अग ये प्रिया ,!'
खाली जाण्याशिवाय काहीं पर्याय नव्हता.
प्रिया ला खर तर खूप थकल्या सारखं वाटत होतं पण तरी ती खाली आली आणि हसत हसत सगळ्या क्या पाया पडली आणि परत किचन मध्ये गेली.
सासू ची ही बहिण म्हणजे अगदी बनेल बाई घरी आली की सासू चे कान भरले च म्हणून समजा .
त्यातून त्या मुली खूप आगाऊ घर भर पसारा करून जात
एका महिन्यात च प्रिया ने सगळ्यांना बरोबर ओळखलं होतं.
चहा नाश्ता सगळ झालं होतं ,लगेच सासू बाईंनी स्वयंपाक चा हुकूम सोडला , सगळ आवरता आवरता रात्री चे अकरा वाजले.
आता खर तर प्रिया ला खूप वैताग येत होता ज्याच्या साठी मी हे सगळं करतेय तो कुठे आहे पण .
प्रशांत रात्री उशिरा घरी आला तोवर प्रिया झोपुन गेली होती.
लाईट च्या उजेडा मुळे तिला जाग आली .प्रशांत ला बघता च तिला खूप भरून आलं.
प्रशांत तीला जवळ घेऊन विचारत होता काय झालं म्हणून पण ती काही ही बोली नाही .
थोड रागावून च तिने प्रशांत ला विचारलं "प्रशांत मी लग्न तुझ्याशी च केलय ना नक्की ?"
"अरे हो अस काय बोलतेय 'प्रशांत बोलला
"पण तू कुठे असतो घरात मी फक्त तूझी वाट च बघत बसायची का ,तू पूर्ण दिवस कुठे गायब असतो लग्न होऊन महिना झाला पण आपण साधं कुठे बाहेर सुद्धा गेलो नाही पूर्ण दिवस मी घरची काम च करत असते या साठी लग्न केलं होत का आपण?"
प्रशांत ला तीच म्हणणं पटत होतं पण तो काहि बोला नाही .
तिला जवळ घेऊन दोघं पण झोपी गेले.
रोजचा दिवस तसाच जात होता ,प्रिया ची लग्ना आधी ची लाईफ खूप छान होती आई वडील दोघं ही खूप आधुनिक विचाराचे होते.हवं ते ती घालत होती शॉर्ट पासून तर जीन्स पर्यंत सगळ कस मनासारखं होत.सकाळी लवकर उठण तिला माहित नव्हत , किचन मधे ती कधी जात नव्हती .
लग्ना आधी तीच आयुष्य हे तीच च होत कुणी तिला कंट्रोल करत नव्हत.
प्रशांत एक चांगला मुलगा होता पण परिवार थोडा जुनाट विचाराचा होता.
प्रिया आणि प्रशांत सोबत एकाच कॉेजमध्ये शिकलेली.
प्रिया आधुनिक विचारांची तर प्रशांत थोडा शांत आणि जुन्या विचारांचा.
प्रिया मधे निर्णय घेण्याची कमालीची क्षमता तर प्रशांत थोडा स्लो होता ,पण त्यांचा शांत आणि सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा स्वभाव प्रिया ला खूप आवडायचा.
म्हणतात ना प्यार अंधा होता है, तसच काही तरी .
प्रिया मूळची कोल्हापूरची पण शिक्षणासाठी पुण्याला हॉस्टेल मधे रहात होती.
प्रिया आणि प्रशांत खूप छान फ्रेन्ड होते ,प्रिया सतत प्रशांत कडे त्याच्या घरी जात असे ज्या मुळे घरच्या लोकांसाठी ही ती आता परिचयाची झाली होती.
पण ते म्हणतात ना एक चेहरे पे काई चेहरे लगा लेते हे लोग
वरून खूप छान आणि प्रेमळ दिसणाऱ्या प्रशांत च्या फॅमिली ला बघून प्रिया ला आपल भविष्य इथेच आहे अस वाटू लागले होते .
तिचे आई वडील आधी लग्ना ला विरोध करत होते पण तिच्या हटा पुढे काही करू शकले नाहीं.
लग्ना आधी प्रिया खूप वेळा या घरात आली होती .
तिने या लहान सहान गोष्टी कधी नोटीस केल्या नाही.
आधी तर ती तिला हवं ते स्वतः घेऊन घेत होती .हवं ते खात होती पण आता ती या घरातली एक सदस्य असून ही प्रत्येक गोष्टी साठी तिला विचारावं लागत होतं ,आपले पणा तर वाटत च नव्हता पण प्रत्येक क्षणी ती घाबरलेली असायची ,थोड काही चुकल तरी तिला बोलणी बसायची ,तिचा असा विचार केला च जात नव्हता.
प्रशांत तर काही च बोलायचा नाही . दिवसे दिवस हे सगळ वाढतच गेलं होत.
तिला त्या ही पेक्षा जास्त राग यायचा तो प्रशांत चा तो कधी च काही बोलायचा नाही ,हा असा का वागतो आता हे च तिला समजेनास झालं
प्रिया ही एम बी ए झाले ली चांगली शिकलेली मुलगी होती .
लग्न झालं तस ती आपल करियर वैगरे सगळ विसरलेच पण आता तिला वाटायला लागलं हे सगळ कुठ पर्यंत आणि कधी पर्यंत मी अस स्वतःच आयुष्य वाया घालवते आहे माझं आयुष्य माझं शिक्षण करियर हे पण तितकंच महत्त्वाचं आहे.
रांधा वाढा उष्टी काढा हे आयुष्य नको मला.
आज प्रशांत आला की मी बोलणार च त्याच्याशी
नेहमी प्रमाणे आजही तो उशिराच घरी आला पण ती आज झोपली नाही.
"प्रशांत ऐकतोय ना !"प्रिया बोलली
"हो बोल ना " -प्रशांत
"मी जॉब करू का रे?,म्हणजे मी शिकलेली आहे ,जॉब या आधी पण केला आहे मी ,मग आता करू का या पुढे?"
प्रशांत तिच्या जवळ येऊन बसला तिचा हात हातात घेऊन बोलायला लागला.
"खर तर माझी काही च हरकत नाही ग पण तुला माहिती आहे ना आई बाबा नाही ऐकणार
आधीच मी त्यांच्या मना विरुद्ध जाऊन हे लग्न केलं आहे म्हणून ते माझ्यावर रागावले आहेत."
हे सगळ ऐकताच प्रिया च्या पाया खालची जमीन च हादरली
"काय ?मना विरुद्ध हे तू मला आधी का नाही सांगितले
तरीच मी विचार करत होते आई माझ्या शी अस का वागता म्हणून ,का मला सारखं बोलता का मला माझ्या मनासारखं काही करता येत नाही."
प्रिया रडू लागली.
प्रशांत " तस नाही ग!
मला तू पण हवी होती आणि ते पण !
मला वाटल होईल सगळ नीट हळू हळू "
"पण या सगळ्यात माझी काय चूक होती
मी का अस गुलामी च जीवन जगू" प्रिया रडत रडत बोलत होती.
"मला त्यांच्या विषयी काही तक्रार नाही पण तू मला फसवल
मी किती स्वप्न घेऊन या घरात आली होती ,
माझं कोड कौतुक नाही की लाड नाही कधी एक प्रेमाने हाक सुधा नाही ,प्रत्येक वेळी घालून पडून बोलण ,
त्यातून तू कधी एका शब्दाने ही कधी बोला नाही ,मी हे सगळ फक्त तुझ्यासाठी च सहन करत होते आणि तू काय केलंस मला या आधी का सांगितलं नाही ,ते काही नाही मी जॉब बद्दल उद्या घरात बोलणार मग तू साथ दे अथवा नको देऊ."
पूर्ण रात्र प्रिया हाच विचार करत होती की ,काय करू जे सुरू आहे ते तसच राहू देऊ की मग काहीं तरी निर्णय घेऊ
ती पूर्ण पणे कन्फ्युज झाली होती.
दुसऱ्या दिवशी प्रिया उशिरा च खाली उतरली ते पण ड्रेस घालून च
तिला बघून सासू बाई चा पारा चढला
"हे काय तुला मी ड्रेस घालायला नाही सांगितलं होत ना मग तरी तू ----
ती एक ही शब्द बोली नाही ,तिने सरळ बाबा समोर नोकरी चा मुलाखती चा पेपर धरला आणि बोलली "बाबा आज मी या नोकरी साठी मुलाखती ला जाते आहे ,तुमची काही हरकत नसेल तर आशीर्वाद द्या.
नाही दिला तरी ही मी जाणार ."
तीच हे रूप बघून बाबा आणि प्रशांत दोघं पण हैराण झाले
आई मात्र कुरकुर करत च होती ,
"पहिलं प्रशांत म्हणून सांगत होती ही मुलगी करू नको ,चांगली मी माझ्या भाची शी तुझ लग्न करून देणार होती तर तुला ही नतवी आवडत होती ,पहिलं ना कसे रंग दाखवते आहे."
प्रिया खर तर प्रशांत च्या बोलण्या ची वाट बघत होती .
पण आज पण प्रशांत गुपचूप उभा होता तो तिच्या बाजूने एक ही शब्द बोलला नाही.
प्रिया च्या डोळ्यात पाणी आल पण तिने मोठ्या हिमतीने ते येऊ दिलं नाही आणि आई ना काही ही न बोलता ती सरळ देवघरात गेली देवाच्या पाया पडली आणि सरळ फाईल घेऊन घरातून बाहेर पडली ती कायमची च
आत्ता सध्या स्थितीत
प्रिया चा मोबाईल वाजला तशी ती भाना वर आली आज ती एक सुप्रसिद्ध कंपनी ची सीईओ आहे.
भूतकाळ आज ही तिच्या मनाला चटका देऊन जातो.
त्या दिवशी तिने एक निर्णय घेतला होता आज जर प्रशांत ने माझी बाजू घेतली नाही तर हा दिवस या घरातला शेवटचा दिवस असेल ,जो नवरा बायको च्या आत्मसन्मानाची रक्षा करू शकत नाही ,जो तिची स्वप्न पूर्ण करू शकत नाही तो नवरा म्हणवण्यास योग्य नाही.
ती त्या दिवशी घरातून बाहेर पडली तिला जॉब पण मिळाला ,सासू ला तिने कळवल की ती माहेरी जातेय .
पुढे कोर्टाची डीवोर्स नोटीस च आली फक्त , प्रशांत खूप शॉक झाला त्याने प्रिया ला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण काही ही उपयोग झाला नाही. प्रिया आजही फक्त प्रशांत वरच प्रेम करते पण आत्मसन्मान बाजूला ठेवून प्रेमाचा पाढा वाचन तिच्या मनाला पटल नाही.कोणतही नात हे विश्वासावर च टिकून असत .विश्वास हा स्टिकर सारखा असतो एकदा का निघाला की पुन्हा आधी सारखा बसत नाही.
प्रिया ने जे केलं ते योग्य होत की अयोग्य कमेंट करून नक्की सांगा
लेखक - सोनाली
वरील कथा सोनाली जाधव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.
Khup chaan hoti Katha....aani jar navra ch saath det nasel aani family accept karat nasel tar ka rahaych ashya thikani....tine agdi yogya nirnay ghetla
ReplyDeleteCorrect decision
ReplyDeleteCorrect decision ahe
Deleteनिर्णय घेण्याची घाई केली असे वाटते. सासरी राहुनही नौकरी करू शकली असती. हळूहळू प्रशांत मध्ये ही हिंमत आली असती. प्रेम विवाह होता ना त्यंचा तो ही आई च्या विरोधात... संसार मोडायला नको होता
ReplyDeleteयोग्य निर्णय अतिशय.
ReplyDeleteमुळात तो प्रामाणिक नाही. परिस्थिती तिच्या समोर न ठेवताच लपवालपवी करून लग्न केलं .
ReplyDeleteतीची एकदा फसवणूक केली
, दुसऱ्या वेळेसही तीची बाजू घेतली नाही. मग तीने तीसर्यांदा फसवणूक होईल म्हणून वाट बघायला हवी होती का?
अतिशय सुंदर व वस्तुस्थिती ला धरून असलेली ही कथा खुप काही शिकवून जाते. सर्वानी वाचावी अशी छानच कथा
ReplyDeleteअगदी बरोबर निर्णय घेतला आहे प्रियाने
ReplyDeleteCorrect decision
ReplyDelete