नाते गोड गुलाबी भाग दोन

 नाते गोड गुलाबी : भाग दोन.

अपर्णा कुलकर्णी 

मागील भाग

अप्पू नेहमीप्रमाणे त्याच्याशी वागत होती, बाबाकडे काय झाले ते सांगत होती पण हा अभी मात्र चिडलेलाच होता. तिने शेवटी चिडून विचारले
"तुझे लक्ष आहे का माझ्या बोलण्याकडे ?? मी कधीची बोलतेय तू मात्र काहीच बोलत नाहीस."
तो म्हणाला "काय बोलू मी आता. ठीक आहे मला समजल बाबांना भेटून तुला खूप आनंद झाला आणि तिकडे त्यामुळेच राहिलीस तू. काल रात्रभर तुला माझी माझ्या हाताची गरज पडलीच नसेल ना ठीक आहे. मला झोप येतेय मी झोपतो".
आता अप्पूच्या लक्षात आले की मी रात्री इथे नव्हते म्हणून हा चिडला आहे. मग ती त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली "खरंच मी बाबाकडे राहायला जाऊ का अभी ?"
मग तर अभी खूपच चिडला आणि डोळे मिटून झोपला. अप्पू त्याच्या जवळ जाऊन झोपली आणि त्याचा हात पकडला. अभिने तो सोडवून घेतला आणि म्हणाला "काल नव्हतो ना मी तुझ्या जवळ पण तरीही झोपलीसचना तशीच आज पण झोप".
बिचारी अप्पू, ती म्हणाली "नाही झोपले मी काल रात्री एक मिनट पण नाही झोपले. आणि मी इकडे आल्यावर घरच्यांनी मला सांगितले तुझी किती चिडचिड होत होती तू किती अस्वस्थ होतास ते. पण मी बाबांच्या आग्रहामुळे तिथे थांबले आणि ते बाबा आहेत माझे एखादा दिवस मी माझ्या माहेरी राहू शकत नाही का ?? इतका का चीडचीड करत आहेस तू ? मी इथे असले तरीही भांडत असतोस आणि आल्यापासून मी एकटीच बोलतेय तू असाच चिडलेला आहेस. ठीक आहे नसेल द्यायचा हात तर नको देऊस. झोपते मी".

हे ऐकून अभीला त्याची चूक समजली आणि आपण उगाच का चिडतो नेहमी हिच्यावर असा प्रश्न त्याला पडला. त्याने अप्पूची माफी मागितली आणि तिचा हात घट्ट पकडुन झोपले दोघेही.

बघता बघता अप्पू आणि अभीच्या लग्नाला ८-९ महिने उलटले होते. अभीच्या बाबांचे एक फार्म हाऊस होते तिथे थोडे काम करून घ्यायचे होते म्हणून घरच्यांनी अभी आणि अप्पूला तिथे जाऊन काम करून घ्यायला सांगितले. दोघेही तिथे गेले आणि बाबांनी जे काही सांगितले होते ते काम करून घेतले. पण सगळं होता होता उशीर झाला त्यामुळे तिथेच राहून दुसऱ्या दिवशी परत जाण्याचा विचार केला आणि घरी तसे कळवले. रात्र झाली होती पण फार्म हाऊस खूप आवडले होते अप्पूला. दोघेही बाहेर मोकळ्या हवेत गप्पा मारत बसले होते, पावसाळ्याचे दिवस होते आणि बघता बघता पावसाने हजेरी लावली. अप्पू पावसात गेली पण अभी मात्र आडोशाला उभा होता. अप्पूला पाऊस खूप आवडत असे. त्यामुळे ती चिंब भिजली आणि अभीला बोलावू लागली पण तो गेला नाही. लांबूनच तिच्याकडे पहात राहिला.

अप्पू मुळातच खूप सुंदर दिसत होती. त्यात भिजलेल्या अवस्थेत तिचे सौंदर्य अजुनच खुलून येत होते. अप्पूकडे अभी पहातच राहिला होता. अप्पूला कडकडून घट्ट मिठी मारावी असा विचार त्याच्या मनात आला पण त्याने तो दूर सारला. तेवढ्यात वीज कडाडली आणि अप्पूने घाबरून धावत अभीला मिठी मारली. तिच्या ओल्या अंगामुळे तिच्या भरलेल्या नितंबंचा स्पर्श अभीला जरा जास्तच स्पष्ट जाणवत होता आणि हा स्पर्श त्याला सुखावत होता.
अप्पू म्हणाली "मला विजांची खूप भीती वाटते अभी".
तसा अभी भानावर आला आणि घाबरु नकोस मी आहे ना तुझ्या जवळ. पुन्हा विजा कडाडल्या पुन्हा अप्पू जास्तच बिलगली आणि अभीने तिला जोरात आवळून घेतले. 

अप्पू रूममध्ये आली तेंव्हा शिंकत होती. अभी तिच्यावर ओरडला "तुला सांगत होतो ना नको जाऊस पावसात तरीही गेलीस बघ झाली ना आता सर्दी. हे घे गोळी" म्हणून त्याने त्याच्या बॅगमधून गोळी काढून तिला दिली.

"इथेही तू गोळ्या घेऊन आला आहेस का डॉक्टर अभी ??"

"हो माझ्याकडे नेहमीच अशी बेसिक औषधे असतात. डॉक्टर आहे मी, कधीही गरज पडू शकते". 

दोघेही झोपले होते पण पाऊस अजूनही सुरूच होता आणि विजांच्या कडकडाटाने अप्पू झोपू शकत नव्हती, अभी तिला म्हणाला "तू माझ्या जवळ सरकून झोप भीती थोडी कमी होईल".
अप्पू जवळ येऊन झोपली पण तिची भीती कमी होईना. विजांचा कडकडाट सुरूच होता. आवाज झाला तशी पुन्हा अप्पूने अभीला मिठी मारली. अभिने सुद्धा तिला खूप प्रेमाने जवळ घेतले. "घाबरु नकोस अपर्णा आज मी रात्रभर तुला असाच जवळ घेऊन झोपेन. तू झोप शांतपणे". दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. जरा वेळाने विजांचा कडकडाट कमी झाला.

अप्पू जराशी बाजूला होण्याचा प्रयत्न करू लागली कारण अभीचा तिच्या सर्वांगावर न कळत झालेला स्पर्श तिला मोहरुन टाकत होता. तसे अभीने तिच्या कमरेत हात घालून तिला आपल्या जवळ ओढले. आता दोघात खूप कमी अंतर उरले होते. अभी तिच्या डोळ्यात बघत होता आणि हळू हळू त्याचा हात कमरेवरून वर सरकत होता, अप्पूने डोळे मिटून घेतले, "माझ्या जवळ असण्याने तुला फरक पडतो अपर्णा ??" अभिने विचारले तसे तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले आणि पुन्हा स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. पण अभिने तिला हलू सुद्धा दिले नाही.
"सोड ना अभी ?"
" खरंच सोडू ?" असे अभिने विचारल्यावर ती लाजून लाल झाली. अभीने तिच्या मानेत हात घालून तिला जवळ घेतले आणि त्याचे ओठ तिच्या कपाळावर ठेवले. अप्पू खूपच सुखावली. त्याने पुन्हा तिच्या दोन्ही डोळ्यांना हळूच ओठांचा स्पर्श केला आणि पुन्हा तिच्या गुलाबी गालांवर त्याचे ओठ ठेवले. दोघांनी एकमेकांना खूप घट्ट मिठी मारली. अभी तिच्या स्पर्शाने, त्या सुखाने खूप सुखावला होता. रात्रभर दोघे एकमेकांच्या मिठीत होते. त्यांची मधुचंद्राची रात्र पूर्णपणे पार पडली नसली तरी सुरुवात मात्र नक्कीच झाली होती.

दोघेही जरा अवघडलेल्या अवस्थेत होते. दुसऱ्या दिवशी अप्पूला घरी सोडून अभी क्लिनिकमध्ये गेला. अप्पू दिवसभर घडलेल्या घटनेचा विचार करत होती. आभिचे क्लिनिक मध्ये लक्ष लागत नव्हते. रात्री घडलेल्या घटनेचा तो ही विचार करत बसला होता. तो जरा लवकरच घरी आला. अप्पू त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली. तेंव्हाही तो विचारच करत होता. अप्पू त्याला अस्वस्थ पाहून म्हणाली "काय झालं अभी ?? बरं वाटतं नाही का तुला ??"
तो म्हणाला "मी ठीक आहे अपर्णा पण मला तुझ्याशी थोडे महत्त्वाचे बोलायचे आहे". 

त्याने दार लावून घेतले आणि अप्पूच्या जवळ येऊन उभा राहिला. अप्पूची धडधड वाढली. "मला माफ कर अप्पू, काल आपल्यात जे काही घडले ते घडायला नको होते, तू एक श्रीमंत घरात लाडकोडात वाढलेली मुलगी आहेस. तू अभ्यास करत नव्हतीस त्यामुळे तुझ्या बाबांनी आपले लग्न लावून दिले आणि माझ्या घरच्यांनी माझ्यावर दबाव आणल्यामुळे मी ही ते केले. पण आपल्या नात्यात एक मर्यादा राखली होती आपण जी काल मी ओलांडली. त्यामुळे मला माफ कर".
अप्पू त्याच हे बोलणं ऐकून खूपच रडू लागली. "काल जे काही झालं ते घडायला नको होत तुला अभी ??"
"तुला नको होते का म्हणजे ?? तुला हवे होते का अपर्णा ??"
"मी तसं म्हणाले नाही पण तू माझी माफी मागत आहे म्हणजे जे काही झालं त्याचा तुला पश्चाताप झाला आहे असे वाटत आहे मला. हे बघ मी या घरात आल्या पासून कधीतरी कुठल्याही गोष्टीची तक्रार केली आहे का?? या घरातील लोक मला खूप आवडतात आणि त्यांच्या सोबत मी आनंदाने रहाते ना. कधी कुठल्या गोष्टीची अवाजवी अपेक्षा केली आहे का मी ??"
"तसे अजिबात नाही अपर्णा. तू खूप लाघवी आहेस, गोड आहेस. तुझ्या स्वभावामुळे माझी पूर्ण फॅमिली तुला खूप प्रेम देते. अनेकदा अनेक गोष्टी केल्या आहेत तू या घरासाठी. माझ्या घरच्यांना मी केलं नसेल इतकं प्रेम दिलं आहेस तु. पण मी तरीही अशी चूक करायला नको होती."

  "तुला काल एकदा तरी वाटलं का जे काही झालं ते मी नाईलाजाने केलं. त्यात माझी मर्जी तुला दिसली नाही का ? तुला खरंच असं वाटत का मी हे नाते ही माणसं जपणार नाही ?? आणि तू सुद्धा जे काही केलं ते मनापासून वाटलं म्हणून केलं नाहीस का ? मी एक दिवस बाबांकडे राहिले तर तू अस्वस्थ असतोस, झोपत नाहीस, चिडचिड करतोस, मला कधी कुठून यायला उशीर झाला तर काळजीने व्याकुळ होतोस, नवऱ्याचा अधिकार गाजवतो. ते प्रेम नाही का ?? मग आज त्या अधिकार, हक्क गाजवला तर तू माफी मागतोय ?? हो मी मान्य करतो काल मी मनापासून तुझ्या जवळ आलो अपर्णा. त्या वेळी कोणत्याच गोष्टीचं भान राहिलं नाही मला. मग तरीही असं का बोलतोस अभी ?? आणि अजूनही हे सगळं तुला घडायला नकोच होत असं वाटत असेल तर मी जायला तयार आहे तुझ्या आयुष्यातून अगदी कायमची".
हे ऐकून अभी शॉक झाला. अप्पू खरंच जायला निघाली तेंव्हा अभिने तिचा हात पकडुन तिला थांबवले. तिने हात झटकून टाकला. अभिने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढून घेतले तेंव्हा अप्पू म्हणाली "नको घेऊ मला जवळ मला जाऊदे माझ्या बाबांकडे".
"आता तुला या बंधनातून मी सोडेन असं वाटत का तुला??" असे बोलून अभीने त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकले आणि दीर्घ चुंबन घेतले. 

बघता बघता अप्पूने खूप चांगल्या मार्कनी एम.ए पूर्ण केले आणि पुढे पी.एचडी करण्याचा निर्णय घेतला.अभीला आज तिचे सगळ्यात जास्त कौतुक वाटत होते आणि अप्पू बायको असल्याचा अभिमान.

समाप्त 

लेखिका : अपर्णा कुलकर्णी.


वरील कथा अपर्णा कुलकर्णी यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post