सदर कथा माझी 'अनघा लिखिते' असून, मी माझ्या स्वतःच्या परवानगीने तो "शब्दचाफा” या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी देत आहे. सदर कथेचे हक्क लेखिकेकडे (माझ्या कडे) राखीव असून परवानगीशिवाय वरील लेख कुठेही वापरू नये.
कथा - मेघा-मल्हार भाग २
शेखर मेघा कडे बघत मधाळ आवाजात :- नमस्कार, मी शेखर.
मेघा ओशाळते, पराग तिच्या कडे बघून गालातल्या गालात हसतो.
घरी शेखरची आई आणि मुलगा ओंकार. शेखरला पाहताक्षणी मेघा आवडते. बघण्याचा कार्यक्रम, मग जेवण आणि नंतर मग तो तिला गणपती पुळ्याला जाण्यासाठी स्टॅण्ड वर सोडायला जातो. मेघा तिच्या अटी अशा सांगते की त्याने नाहीच म्हणावे. त्याची एकच अट असते की फक्त आणि फक्त ओंकार ची आई व्हावे, दुसरं मुल नको.
मेघा त्याला वेळ मागते. लक्झरी बस लागलेली असते. ती बस मध्ये बसते. बस हलल्यावर मेघा मोकळा श्वास घेते. जाताना शेखर मोठ्या अपेक्षेने तिच्या कडे बघतो, तिचा चेहरा निर्विकार असतो. कारण, आईला दिलेला शब्द पाळलेला असतो, बस.
मेघा बाहेरचे सृष्टी सौंदर्य न्याहाळत असते. कानात हेड फोन असतो. पुढे आल्यावर ट्रॅफिक जॅम झालेली असते. त्यामुळे बस थांबते. पाच-दहा-पंधरा मिनिटे जातात. लोकांचे पेशन्स् सुटायला लागतात. काही हौशी मंडळी आधीच उतरून पुढे जाऊन पाहून परततांना दिसतात. मेघा एकाला विचारते की काय झालं ? तो सांगतो की दरड कोसळली आहे. दिड-दोन तासा पेक्षा जास्त वेळ लागणार आहे.
मेघा :- बाप रे !! सध्या आपण कुठे आहोत ?
तो व्यक्ती :- आंबा घाट.
बस मधील सोबत आलेले, खाली उतरून पावसाचा, निसर्गाचा आनंद घेण्यात दंग असतात, मेघाच एकटी बस मध्ये असते. तेवढ्यात बाजूला एक कार येऊन थांबते. बराच वेळ काही हलण्याचे चिन्ह दिसत नाही, म्हणुन कारमधील ड्रायव्हींग सीटवरील व्यक्ती विंडो खाली करतो आणि मान बाहेर काढून बघण्याचा निष्फळ प्रयत्न करतो, मेघाला हसुच येतं. ती पुन्हा मोबाईल मध्ये डोकं घालते, तो कारवाला बाजुच्या बस कडे नजर टाकतो आणि चमकतो. पण पुन्हा पुढे पाहत बसतो. मेघा ची नजर त्याच्या कडे जाते, तिला तो मल्हार असल्याचा भास होतो.
ती पुटपुटते :- काल पासुन का सारखा तोच येतोय मनात, डोक्यात आणि आता नजरेसमोर सुद्धा.
ती डोळे बंद करून घेते. कारवाला तिच्या कडे बघतो आणि बघतच राहतो थोडावेळ. त्याच्या तोंडून पुसटसे निघते, "मेघा...." ती ऐकते डोळे उघडून पाहते. दोघांची नजरानजर होते. मल्हार हात हालवतो. तिच्यानी न राहून हात हलतो. तो कारचे दार उघडून खिडकीजवळ येतो.
मल्हार :- कुठे ?
मेघा :- गणपती पुळे. तु... नाही तुम्ही ?
मल्हार मागे वळून आश्र्चर्याने बघत विचारतो :- आम्ही ? नाही मी एकटाच जातोय गणपती बाप्पा दर्शन घ्यायला.
मेघा :- आत बस ना, भिजतोय.
मल्हार :- मला आजही आवडतं भिजायला. तु येतेस का, आपण सोबत जाऊ. आपल्याला एकाच ठिकाणी जायचे आहे, तर सोबत जाऊ.
मेघाला पण मोह आवरत नाही, ती बॅग घेऊन खाली उतरते, जाताना ड्रायव्हरला सांगते. मल्हार कार मध्ये बसतो. तो खूप आनंदात असतो. मेघा कार मध्ये बसण्याऐवजी गाड्यांच्या रांगा ओलांडून हॉटेलमध्ये जाते. दोन प्लेट गरम गरम कांदाभजी आणि तिथल्या मुलाला चहा घेऊन यायला सांगते. तिच्या मागे मागे तो मुलगा थर्मास घेऊन येतो. ती कार मध्ये येऊन बसते आणि त्याच्या जवळुन चहा घेऊन मल्हारला देते आणि एक ती घेते.
मल्हार :- तुला अजुन लक्षात आहे आपला विक पॉइंट - गरम गरम भजी आणि चहा.
मेघा :- मी तिच आहे आणि तु.
मल्हार :- तुला काय वाटतं ?
मेघा :- माहीत नाही.
मल्हार :- मी तोच आहे मल्हार मोकाशी, मुलांचे थोडीच आडनाव बदलतं. तुझं आडनाव काय आहे आता ?
मेघा दिर्घ उसासा टाकत :- हं. तेच. मी लग्न नाही केलं.
मल्हार :- का ? थांबली होती का ?
मेघा :- हो.
मल्हार :- मग त्या दिवशीच का नाही थांबली. बारावर्ष थांबावे नसते लागले. हाच दिवस होता नं २६ जुलै. आजही २६ जुलै आहे. ईतका का राग आला होता की न बोलता निघून गेली, नंतर सगळ्यांशी संपर्क तोडुन टाकले. मुंबई पण सोडली.
मेघा :- तु पण चार पावलं पुढे नाही आलास. माझं रागावणं तर स्वाभाविक होते.
मल्हार :- मी पण रागात होतो, माझं चुकलं होतं. मी तुझे "नाही" गृहीत धरले होते पिकनिक साठी आणि दुसऱ्या दिवशी तु भेटायला येणार कळल्यावर स्वप्ना म्हणाली की बरेच दिवसांपासून मेघाशी भेटणं होत नाही तर मी आणि अनिमेष पण येतो. म्हणुन ते दोघे आले होते. मी नव्हते बोलविले.
मेघा :- मी उगाच चिडले तिच्या वर आता पश्र्चाताप होतोय. तिची माफी मागायला हवी. तुझ्या नंबर असेलच नं.
मल्हार :- हो. बट, शी इज नो मोअर.
मेघा उडालीच :- काय !!
मल्हार :- त्या दोघांचा कार ॲक्सिडेंट झाला. त्यांचे लग्न होऊन आठवडाच झाला होता.
मेघा :- मला खूप दुःख होतंय, मी स्वतः या गोष्टी साठी कधीच माफ नाही करू शकणार.
मल्हार :- मेघा, आयुष्यात एखादी गोष्ट तुटण्या येवढी ताणु नये.
मेघा :- हो रे. चुकलय माझे.
मल्हार :- तु माझ्या साठी लग्न नाही केलं नं ?
मेघा :- हो. वाट पाहत होते. शेवटी आज आई-वडीलांच्या हट्टाखातर मी आयुष्यात पहीला मुलगा पाहीला. मुलगा नाही एका मुलाचा वडील आहे, बायको वारली, आई थकली आहे, म्हणुन तडजोड. त्याचा होकार आहे. तो माझ्या आई-वडीलांसह मला स्विकारायला तयार आहे.
मल्हार :- तुझा काय निर्णय आहे.
मेघा :- सध्या तरी काही समजत नाही, द्विधा मनःस्थितीत आहे. तुझा संसार कसा सुरु आहे ?
मल्हार :- अच्छा !! छानच सुरू आहे. शांत-शालीन बायको आहे. कधीच चिडत नाही, मी खूप प्रेम करतो तिच्या वर. दिवस रात्र सोबत असतो. तिच्या मुळेच आज स्वत:चा थ्री-बी एच के फ्लॅट, फोर-व्हीलर आणि अजून ईतर लक्झरी लाईफ मेंटेन करु शकतो. बाबा गेले, आई आहे, पण मुल-बाळ नाही.
मेघा :- ओ !!
बराच वेळ शांततेत जातो. तेवढ्यात आईचा फोन येतो.
आई :-........
मेघा :- काय ? शेखर चा फोन होता लगेच. अगं पण..... मी सांगितले होते की मला वेळ हवा आहे...
आई :- .........
मेघा :- बरं, मी आज मंदिरात जाऊन आल्यावर कळविते होकार. तोवर तुम्ही प्लीज, सध्या बोलु नका. मला बाप्पांचा कौल घ्यायचा आहे.
ती फोन ठेवते.
मल्हार :- अभिनंदन !!
मेघा :- लग्नाला आई आणि बायकोला घेऊन येशील.
मल्हार हसत :- आई येईल. पण ती नाही येऊ शकणार.
मेघा :- का ?
मल्हार :- तिला वाईट वाटेल तिची होणारी सवत दुसऱ्याशी लग्न करते आहे आणि मला पण.
मेघा :- तुला काय वाईट वाटायचं, तु लग्न करून मोकळा झाला आणि तिच्या वर प्रेम पण करतो.
मल्हार :- हळू बोल, तिला ऐकु जाईल ना. ती मागे तर बसली आहे.
मेघा :- आर यु जोकींग ?
मल्हार :- नो. ती काय बॅग मध्ये आहे.
मेघा :- काय कंम्प्युटर ?
मल्हार :- हो मॅडम. तुमच्या शिवाय दुसरं कोणीच नाही माझ्या आयुष्यात. मी सुद्धा वाट पाहत होतो, शोधत होतो. शेवटी आज सापडल्या, पण मला उशीरच झाला वाटतं.
मेघा :- नाही मल्हार अजून उशीर नाही झाला.
मल्हार :- वील यु मॅरी मी ?
मेघा :- हो. पण माझी अट आहे की माझ्या आई-वडीलांसह मला स्विकारायला हवं.
मल्हार :- मान्य. खरंतर हे मी बारा वर्षांपूर्वीच ठरवले होते. आज आपली भेट अचानक होईल असे वाटले नव्हते. मी पण आईने आग्रह केला म्हणून गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला निघालो होतो. काल पासून तुझी खूप आठवण येत होती. आई म्हणाली एकदा देवाला मनापासून माग. खूप जागृत देवस्थान आहे, मानलं बुवा.
मेघा :- तु मानत नव्हता नं ? मी पण जर आज शेखर सानेंना भेटायला आले नसते, तर आपली भेट झाली नसती. म्हणजे आपल्या आईमुळे आणि गणपती बाप्पा मुळे पुन्हा भेटलो.
हळूहळू गाड्या पुढे जाऊ लागतात, पावसाचा जोर वाढु लागतो, मल्हार काचा वर करतो. जोरदार विज कडाडते, तशीच मेघा मल्हारला बिलगते. मल्हार तिला जवळ घेतो आणि.....
मल्हार :- आय लव यु.
मेघा :- लव यु टू.
एफ एम ९२ वर गाणं सुरू होतं...
"रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन...
भीगे आज इस मोसम में लगी कैसी ये लगन..."
आणि मेघा-मल्हार बारा वर्षांनी पुन्हा जवळ येतात, कायमचे.
समाप्त
अनघा लिखिते.