तू मिले दिल खिले (अक्षरचाफा कथा स्पर्धा)
✍️ ऋतुजा वैरागडकर
येशील ना.....
सांग प्रिये तू येशील ना....
साद मनीची ऐकून येशील ना.... प्रीत माझी जाणून घेशील ना.... सांग तू येशील ना....
या कवितेच्या ओळी वाचून तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या.... अभिराज तिच्यासाठी कविता लिहायचा, नुसत्याच कविता नाहीतर प्रेम-कविता लिहायचा.
आज त्याची कवितेची डायरी घेऊन बसली होती ईशाना ...
त्या डायरीतला एक एक पान पलटवताना तिच्या काळजाचा एक एक तुकडा खाली पडत होता, बाजूलाच लग्नाचा अल्बम ठेवलेला होता, नकळत तिचे डोळे त्या अल्बम कडे वळले, इच्छा नसतानाही तिचे हात आपसुकच अल्बम कडे सरसावले , आपसूकच डोळेही लागले, हृदयाची स्पंदने वाढली, अल्बम उघडले आणि डोळे उघडताच पहिल्याच फोटोवर तिच्या डोळ्यातले मोती टपकले... ईशाना साठी ते फक्त अश्रू होते पण अभिराज साठी ते मोती होते, त्याने ते मोती कधीच डोळ्यातून निघू दिले नव्हते, डोळ्यात साठवून ठेवले होते, अल्बम च्या पहिल्या फोटो मध्ये दोघे एकमेकांच्या हातात हात घालून बसलेले एकमेकांकडे स्मित हास्य करत, एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालत... ईशानाने त्या संपूर्ण फोटो वरून हात फिरवला आणि डोळ्यात साचलेल्या मोत्याची माळ तुटून पडली आणि त्या दिवशी दहा वर्षानंतर पहिल्यांदा ईशाना ढसाढसा रडली.....
कुणीतरी खांद्यावर हात ठेवला, ईशाना पलटली , बघितल तर बाजूला अभिराज होता...
“ अभिराज... असं म्हणत ईशाना त्याला बिलगली,
“ हे काय इशू अशी रडतेस तू, हे मोती (तिच्या डोळ्यातला एक थेंब बोटावर घेऊन) यांना असं वाया घालवू नकोस ग आणि हे काय अवस्था करून ठेवली, चल उठ फ्रेश हो आणि छान एखादी नवी साडी नेस....
ईशाना फ्रेश झाली आणि नवी साडी नेसून साजशृंगार करून रूम मधून बाहेर आली, तिला बाहेर अभिराज दिसलाच नाही तिने अभिराज ला आवाज द्यायला सुरुवात केली,
“ अभि... अभि कुठे आहेस तू?. हे बघ चेष्टा नको, मला चेष्टा आवडत नाही माहितीये तुला, अभी आता समोर ये...” ती अभिला शोधत शोधत पुन्हा रूम मध्ये केली आरशासमोर उभी राहिली आणि बघतच राहिली, जेव्हा ती आधी नटायची तेव्हा तरी तिने स्वतःला कधी नीटस बघितलंही नव्हतं पण आता ती स्वतःला निरखू लागली तिला प्रश्न पडला की, खरंच ही मी आहे? खरच इतकी छान दिसते मी?..ती मनातल्या मनात पुटपुटली कितीतरी वर्ष झाली ईशाना ने साज शृंगार केलाच नव्हता, ऑफिस व्यतिरिक्त कुठे बाहेर जाणेही टाळत होती, खूप वेळ आराश्या समोर उभी राहून तिने अभिची वाट बघितली पण तो आलाच नाही...
कुणीतरी खांद्यावर हात ठेवण्याचा भास झाला बघितलं तर तिची छोटीशी पिल्लू होती – अनाया.
ती चिमुकली आईचे डोळे पुसत,
“ इशू तू का रडतेस?.( अनाया नी ईशानाला कधीच आई म्हटल नव्हत, अभिराज ईशु म्हणायचा म्हणून तीही ईशू म्हणायची )
काय झालं?..
“ नाही ग पिल्लू, तू चल मी तुला जेवायला देते...” असं म्हणत इशाना उठली, तेव्हा तिच्या लक्षात आलं अभि आलाच नव्हता सगळे तिथे भास होते, अनाया नी पुन्हा आवाज दिला
“ ईशु चल ना ग, भूक लागली आहे...
“आले ग पिल्लू...
दोघींनी जेवून घेतलं आणि आपल्या रूम मध्ये गेल्या. अनायला झोप लागली पण ईशानाला काही झोप लागत नव्हती, तिनी रावी ला फोन केला ( रावी तिची बाल मैत्रीण ,त्याच शहरात राहायची ) खूप वेळ फोनची रिंग वाजत राहिली पण कोणीच फोन उचलला नाही.
दिवाणच्या कडेला पाठ टेकून ईशानाने डोकं टेकून डोळे मिटले, थोड्या वेळात तिच्या मोबाईलची रिंग वाजली तिने फोन उचलला,
“ हलो ईशू, आय एम सो सॉरी , मी तुझा फोन रिसीव नाही केला. मी बिट्टू ला झोपवत होते ना, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी यार..”
“इट्स ओके, मी सहजच केला होता ग, मला ही कळायला हवे होते, तुला ही तुझी काम असतात...”
“ इशू सॉरी यार, काय झालं? का अपसेट आहेस ?
“आज अभिची खूप आठवण येत होती मला, आणि तो परत आल्याचा भास झाला....
“ इशू तू आता शांत झोप मी तुला उद्या भेटायला येते...
“ ओके बाय गुड नाईट ...
ईशाना ने फोन ठेवला, झोपण्याचा प्रयत्न केला पण तिला झोप काही येईना, पुन्हा कवितेची डायरी उघडली
“ झुळ झुळ वारा
त्यात मातीचा सुगंध
तुझ्या माझ्या प्रीतीचा
हा वेगळाच गंध”
ईशानाला पहिली भेट आठवली त्याच्या ऑफिस मध्ये एन्ट्री होताच पाय अडकून पडणार तेवढ्यात अभिराज ने आपल्या एका हाताने तिला आधार दिला दुसऱ्या हाताने तिच्या डोळ्यावर आलेल्या केसांच्या बटा बाजूला केल्या त्या तिरप्या नजरेतून ईशानानी अभिराज ला पहिल्यांदा पाहिलं होतं...
“ नजर ने नजर से कुछ कहा
ये नजर यु ना देख हमारी तरफ
नही तो ये नजर झुक जाएगी
फिर झुकी हुई नजरो से नजर नही मिला पायेंगे
काही मिनिटे दोघेही त्याच अवस्थेत होते आजूबाजूच्या कलिग मुळे दोघे भानावर आले...
घड्याळाचा आलाराम वाजला आणि इशू पण भानावर आली सकाळचे सहा वाजले होते, ती भराभर उठून कामाला लागली आणि अनायाच सगळं निपटवून ऑफिसला गेली. आज तिला रावी ला भेटायचं होतं.
ईशाना ऑफिस मधून डायरेक्ट रावी ला भेटायला गेली...रावी तिथे येऊन बसली होती....
रावीच लक्ष गेलं
“हाय इशू....
“हाय...ईशू छोटीशी स्माईल करत..
“ काय झालं ईशू ?
ईशाना ला अगदी रडूच आलं आणि ती रडतच,
“ आय मिस्ड अभि, मला त्याची खुप आठवण येत आहे.....
“ ईशु स्टोप इट नाउ , तो तुझ्या लाईफमध्ये नाही आहे, सो यु स्टेबल नाऊ, तुला तुझ्या अनायासाठी स्टेबल व्हायचय, विसर त्याला, तो विसारलाय ग तुला... तुला का कळत नाही आहे...अशीच त्याच्या आठवणीत जगत राहिलीस ना तर तुझी लाईफ स्पोईल होईल, त्याला काहीही फरक पडणार नाही आहे, तो तिकडे मस्त मजा करतोय...
“तू एक काम कर काही दिवस सुट्टी घे आणि आई-बाबांकडे मुंबईला जा तुला बरं वाटेल आणि अनायाला पण काही दिवस चेंज होईल....”
“ नाही ग ,बॉस सुट्टी नाही देणार...
“सोड ग लाथ मार त्याला, तडक अँप्लिकेशन दे आणि फडक निघ, तो सुट्टी देण्याची वाट बघू नकोस...
थोड्या वेळ गप्पा झाल्या, कॉफी घेतली आणि दोघी आपापल्या रस्त्याने निघाल्या...
दुसऱ्या दिवशी सकाळी ईशाना नी ऑफिस मध्ये आठ दिवसाच्या रजेचा अप्लिकेशन दिला ,बॉस ची वाट न बघता ती थेट मुंबईला गेली, गोवा ते मुंबई चा सफर तिच्यासाठी खुप रोमांचकारी असायचा पण यावेळी कसाबसा वेळ गेला, एअरपोर्टवर तिचे बाबा तिला रिसिव्ह करायला आले होते... खूप वर्षानंतर ईशाना मुंबईला गेली... एक दिवस ती अनायाला घेऊन पार्कमध्ये गेली, अनाया खेळत होती, आणि इशू बाकावर बसून होती, तितक्यात तिथे एक पसत्तीशी चा माणूस आला, इशू समोर उभा राहून
“ हाय, मी अनिरुद्ध...
“ह...ईशाना ,फक्त मान हलवत....
तो हसून , तुमचं नाव ह आहे...
“हे बघा मिस्टर .. अस म्हणत तिने मान वर केली आणि बघताच राहिली...
गोरागोमटा,उंचापुरा, कसलेली बॉडी, चेहऱयावर तेज...
“ सॉरी, माझं नाव ईशाना...
“ओह, छान नाव आहे...
त्यानी त्याचा पूर्ण बायोडाटा दिला आणि निघाला...
तो तिच्या आई-बाबांच्या फ्लॅट च्या बाजूला राहायला आलेला होता, दोघांची ओळख झाली हळूहळू मैत्री झाली.
इशानाच्या बॉस नी तिला कामावरून काढून टाकले होते म्हणून ती आता काही महिने तरी तिकडेच राहणार होती, अनिरुद्ध ला इशू हळूहळू आवडायला लागली, त्याचं घरी येणे-जाणे वाढलं आहे, अनाया सोबत त्याची छान फ्रेंडशिप झाली, ति त्याला अनि म्हणायची, जशी ईशाना ला इशू...
काही महिन्यानंतर इशाना तिच्या घरी परत गेली, तिने दुसरा जॉब शोधायला सुरुवात केली, एक दिवस अनाया ने अनिरुद्ध ला इशानाच्या मोबाईल वरून फोन केला,
“ अरे माझी अनु डार्लिंग, कशा आहे माझा बच्चा....
“मला तुझी आठवण येतेय... येना तू इकडे”
“आलो असतो ग ,पण तुझ्या इशू ला नाही आवडणार...ok मी विचार करतो...तू फोन ठेव नाही तर ममा रागवेल...
काही दिवसानंतर अनिरुद्ध ईशान कडे आला, घरी दाराची बेल वाजली तिने दार उघडलं
“ अनिरुद्ध तुम्ही इथे ?”
“हो मला तुझ्याशी बोलायचं होतं”
“ या ना, बसा...
“ मी वायफळ बोलण्यापेक्षा डायरेक्ट मुद्द्यावर येतो, तो गुडघे जमिनीवर टेकवून उजवा हात समोर करून
“ मला तू आवडतेस, माझी अर्धांगिनी होशील का? माझ्या हातात हात देशील का....? असं डायरेक्ट विचारल.
इशाना स्तब्ध उभी होती, पण तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले, तो उठून तिच्या समोर उभा राहिला “काय झालं? तू उत्तर दिलं नाहीस
“हे बघा अनिरुद्ध हे पॉसिबल नाहीये , माझा एक पास्ट आहे आणि मला एक मुलगी पण आहे, मी ह्या गोष्टी नाकारू नाही शकत...
“ मी नाकारायला सांगतच नाहीये, अगं तुझ्या पिल्लू शी तर माझी छान गट्टी जमली आहे आणि राहिला प्रश्न तुझ्या पास्टचा तर त्याच्याशी मला काहीही फरक पडत नाही... तो तुझा पास्ट होता आणि आत्ता... मी तुझ्यासमोर तुझा वर्तमान उभा आहे....”
“ विचारणार नाहीस , काय आहे माझा पास्ट...?
“ नाही जेव्हा तुला सांगावसं वाटेल ना तेव्हा तू सांग”
“ तू जेवढा चांगला वागतो आहेस तेवढा चांगला खरंच तू आहेस का?
“ माझं बोलणं तुला खोटं वाटते”
“ बोलण तर त्याचंही खोटं नव्हतं पण घात झालाच... मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा?”
एक मिनिट थांब, अनाया कम हियर बेटा
“ ही... तुझा जीव की प्राण आहे ना, मग हिच्या डोक्यावर हात ठेवून मी शपथ खातो, जीव गेला तरी तुला सोडणार नाही ...
ईशाना गप्पच होती, तिने आनायला रूम मध्ये पाठवला आणि बोलायला सुरुवात केली,
अभिराज....
अभिराज नाव होतं त्याच, आमचं लव्ह मॅरेज होतं, लाइफ खूप छान चालली होती, दीड वर्षातच आनाया झाली, तो कामाच्या निमित्ताने बाहेर असायचा, रात्री रात्री उशिरा यायचा कधीकधी तर रात्रभर बाहेर असायचा. कामाचा व्याप असेल म्हणून मी सोडून द्यायची,कधी त्याला प्रश्न नाही केला, की काय रे बाबा इतकं काय काम असत की तू घरी येऊ शकत नाहीस, विश्वास....विश्वास होता माझा त्याच्यावर, स्वतःपेक्षा जास्त... कारण नवरा बायको च नात फक्त प्रेम आणि विश्वासावरच चालत....नाही का... पण एक दिवस मला कळलं कि त्याच त्याच्या कलिग सोबत अफेयर सुरू आहे, माझा विश्वास नाही बसला, कारण तेच विश्वास..... या शब्दानेच माझा घात केला, त्याच्या मित्राने मला असे काही फोटो दाखवले की ते बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला,पण तो नाही ऐकला, तो तिच्यासोबत निघून गेला कधीही न परतण्यासाठी, तो माझ्यावर जीवापाड प्रेम करायचा, माझ्या डोळ्यातले अश्रू कधी बघवले नाही त्याला, मग असं काय झालं की तो मला सोडून तिच्याकडे गेला या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही मिळालेले नाही, रडत रडत सगळे सांगत होती....
तरुण बाईने अक्ख आयुष्य एकट्याने जगणं किती कठीण असत हे त्याला नाही कळलं. पण मी जगले माझ्या अनासाठी ,सिंगल पॅरेंट असूनसुद्धा तिच्यासाठी सगळं केलं....
अनिरुद्ध नी हळूच तिला जवळ घेतलं, तुझा होकार असेल तर मी घरी सांगतो...
“मला माझ्या काही प्रश्नांची उत्तर हवीत”
“बोल...”
“लग्न झालं आणि उद्या जाऊन तुला तुझं मूल हवं असेल आणि ते झालं तर माझ्या अनाया ला अंतर तर देणार नाहीस ना....?
“मी तुला विश्वास देतो, तुमच्या दोघांव्यतिरिक्त मी माझ्या आयुष्यात कुणालाही येऊ देणार नाही....”
“आता तर तू तयार आहेस ना लग्नाला?”
तिने होकारार्थी मान हलवली
“ हो, पण माझ्यासाठी हे सोपं नाही आहे, हे सगळं मी माझ्या अनाया साठी करतीये तिच्या बेटर लाईफ साठी, आणि हो माझी मनाची तयारी व्हायला थोडा काळ लागू शकतो, तुम्ही समजून घ्याल ना....
तो हसला आणि तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी अनुरुद्ध दोघांची फॅमिली घेऊन त्याच्या घरी आला, सगळ्यांना बघून तिला आश्चर्य वाटलं, सगळे लग्नाच्या तयारीने आले होते अनिरुद्ध च्या बहिणीने तिला तयार केलं, घरच्या घरी लग्न विधी पार पडला आणि नेहमीसाठी अनिरुद्ध तिला आणि अनायाला त्याच्या घरी घेऊन गेला.
पहिल्या रात्री ईशानानी अभिराज ची डायरी उघडली त्यातली एक कविता वाचली
“ डोळे मिटता तूच दिसायचास
डोळे उघडतानाही तूच दिसायचास
आता हे डोळेही थकले
तुला बघून
माझं विश्व पूर्ण झालं
तुझी जागा कुणीतरी घेऊन”
या कवितेच्या ओळी वाचून तीनी डायरी जाळली आणि नेहमी करिता अभिराज चा विषय संपवला.
काही वेळाने अनिरुद्ध रूम मध्ये आला, इशाना बेड वर घुंघट ओढुन फिल्मी स्टाईल मध्ये बसली होती, त्याने हळूच तिचा घुंघट वर केला आणि
तू मिले, दिल खिले
और जीने को क्या चाहीये
तू मिले, दिल खिले
और जीने को क्या चाहीये
ना हो तू उदास
तेरे पास पास
मै रहुंगा जिंदगी भर
सारे संसार का प्यार
मैने तुझं ही मे पाया
तू मिले, दिल खिले
और जीने को क्या चाहीये
हे गाणं गुणगुनू लागला, तिनी मान वर करून त्याच्या डोळ्यात बघितलं, त्याच्या डोळ्यात तिला फक्त प्रेम दिसलं, निरपेक्षित प्रेम, तिनी त्याला आलिंगन घातलं आणि स्वतःला अर्पण केलं....आणि अनिरुद्ध सोबत नवीन जीवनाची सुरुवात केली....
समाप्त