तुम घना साया


                 तुम घना साया  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ सिंधू बागवे 

एक पत्र तुझ्यासाठी….कशी सुरवात करू लिहायला? काय  म्हणू तुला ऐ…मी तुला अगदी काहीही ..काहीही म्हणायचे आणि तू हसण्यावारी  न्यायचास  🍫. आता या वळणावर जिथे तू सोबत नाहीयस…मी तुला काय म्हणू? 

तसं तर मी तुला रोजच लिहीत असते. आज जरा निवांत  असताना तुझा माझा प्रवास नजरेसमोरून सरकला….आयुष्य एका अशा ठेहरावावर असताना …जिथे आला दिवस जगणं चालू होतं…. तू माझ्या आयुष्यात आलास….स्वप्नं घेवून…आणि जाणवलं अरे हे सारं माझ्या bucket list मध्ये धूळ खात पडलयं. जगायचं राहून गेलय…..कुठेतरी  कधीतरी वाचलेलं प्रत्यक्षात अनुभवत होते ‘The best love is unexpected, you meet them by fate and it’s an instant connection’.  एक चैतन्य पसरलं, मरगळ झटकली आणि माझी मी नव्याने जगण्याच्या प्रेमात पडले….. thanks to you….तू म्हणजे् माझ्यासाठी …ज़िन्दगी धूप, तुम घना साया 💕

अगदीच छोटा होता आपला एकत्रित प्रवास. पण मी तो  पुरवणार आहे माझ्या शेवटापर्यंत. खरं तर मला ना  तुला परत एकदा  भेटायचयं, तुला पहायचयं…पण हे निव्वळ अशक्य, अवघड आणि दुरापास्त. तू तुझ्या -माझ्यात शांततेची, अबोलपणाची एक भिंत उभी करून ठेवली आहेस… मी कितीही तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तरीही पोहोचू  शकत नाही पण मनुष्य आशावादी असतो. मी ही आहे. मी खूप विनवण्या केल्या तुला एकदा मला भेट, तू नाही भेटलास…. बोलतही नाहीस माझ्याशी. मी रोज तुला लिहीत असते, माहीत असूनही की तू माझे इमेल्स, मेसेजेस नाही वाचतं. पुन्हा एक आशा ….कधीतरी वाचशील.. मला बोलायचं खरतर तुझ्याशी खुप खुप भरभरुन बोलायचयं…पोहोचायचयं तुझ्यापर्यंत….ऐकशील का?

बहुधा नाही …म्हणूनच मी मग लिहीत असते तुला.

रिकाम्या डोक्यात सतत एकच विचार असतो what went wrong? माझं काही चुकलं असेल का ?पण काय ते सांगशील का ?

मी खूप वाट पाहिली रे तुझी…. बघ ना आज हा वळीवाचा पाऊस  बघताना मन पार ढवळून निघालं. तुला आठवते ?  तू मला म्हणाला होतास…एक उनाड दिवस,पाऊस, तू आणि मी …..नाही ….. तू आपला उल्लेख ‘us’ असा करायचास… पाऊस सुरू झाला आणि माझं तुझी वाट पहाणं शिगेला पोहोचलं…म्हणजे कसं ना की…

           जाने कैसे बितेगी ये बरसाते….

           मांगे हुऐ दिन है मांगी हुई राते…..

                       💕गुलज़ार 💕 

तुझ्या अंतरंगातला पाऊसही संपला का रे? पण माझा राहिलाच ना पाऊस जगायचा तुझ्यासोबत….

आज पण मला आठवतंय एकदा मी तुला काहीच न सांगता  गायब होते, अगदी दीड दिवस नव्हते दिसले तुला तर तू किती अस्वस्थ झाला होतास, किती मेसेजेस केले होतेस आणि मी आल्यानंतर  गोड रागमिश्रित वॉर्निंग दिली होतीस… किती काळजी वाटली होती तुला माझी. 

ऐ …..मी तेव्हाच सांगितलं होत ना तुला….माझं तुझ्यावर प्रेम  असल्याचं…..💞तू माझ्यासोबत अक्षय्य असणार होतास….. आठवतयंना? माझ्या नकळतच माझ्यात तू  कधी घर केलस मला कळलचं नाही. मी तुझ्याशी  मनातलं बोलत गेले वेळोवेळी आणि कायमची तुझ्यात गुंतवणूक करून बसले माझ्या ह्दयाची. You were totally into me.

तुला आवडायचं माझं तुझ्याकडे एक्सप्रेस होणं…हो ना ? अगदी सगळं शेअर करायचे मी तुझ्याकडे. माझं त्रासणं, चिडचिड करणं, आनंदी असणं, माझ्या achievements, माझं धडपडणं, माझं हसणं, कधी कधी तू मला गायलाही सांगायचास… आपण भेटलोही नव्हतो, एकमेकांना पाहिलही नव्हतं पण आपण एकमेकांसाठीच होतो.

आणि एक तोही दिवस आला जेव्हा आपण प्रत्यक्ष  भेटायचं ठरवले. मी आले होते तुझ्या शहरात  काही कामानिमित्त आणि आपण थोड्यावेळासाठी भेटलो.खूप सुंदर क्षण होते ते. तुला पाहताना मला जराही असं नाही वाटलं की आपण  एकमेकांना पहिल्यांदाच पाहतोय.…खूप excitement होती आणि मला तुझ्यासमोर छान यायचं होतं पण तू उशीर केलास आणि मी रागावले होते तुझ्यावर आणि अगदी अवतारात आले होते तुला भेटायला. पण तु जेव्हा  मला म्हणालास न ‘ तुला कळत कसं नाही …तू मला कशीही आवडतेस’ खूप भारी moment होती ती  माझ्यासाठी ….आयुष्यभर राहिल…आपल्यात शब्दांची गरजच नव्हती. तुझ्याशी खूप  बोलायय म्हणणारी मी काहीच बोलत नव्हते. किती सुंदर feelings  असतात, शब्दांपलिकडल्या.  मला तो सगळा आनंद लुटायचा होता   आयुष्यभर जपून ठेवण्यासाठी. जेव्हा आपण एकत्र नसू तेव्हा  आठवणीतून पुन्हा पुन्हा जगण्यासाठी. मला एक क्षणही वाया  नव्हता घालवायचा तू सोबत असतानाचा. तू मला लॉंग ड्राईव्हला नेल, आपण उलगडत गेलो….खूप गप्पा केल्या आपण…तुझ्या नजरेत निव्वळ कौतुक होत माझ्यासाठी…खूप भारी feeling असतं रे … आणि निरोप घेताना माझ्या कपाळावर आपले ओठ टेकवलेस.  खूप अमूल्य क्षण होता तो माझ्यासाठी. तुला आवडायचं माझं भव्य  कपाळ . पण मला न तुझ्यापासून दूर नव्हतं व्हायचं रे…. त्या क्षणी  एक घट्ट मिठी मारायची होती तुला….. विरघळून जायचं होतं तुझ्या श्वासात तुला कळलचं नाही ते आणि मलाही नाही सांगता आलं तुला….एक हुरहुर घेवून परतले मी अरे….खूप गोड नातं होतं आपलं. भन्नाट लाड केलेस तू माझे. 

पण नंतर नंतर तू फार अबोल होत गेलास …माझ्या भरभरून लिहिण्यावर,एक्सप्रेस होण्यावर फक्त ईमोजी  शेअर करू लागलास. खूप रूखरूख वाटायची …काय झालं कधीच सांगितलं नाहीस.एक गैरसमज मनात ठेवून खूप दूर गेलास माझ्यापासून. एक ओझं घेवून वावरतोयस तू….एक सुचवू का? आज अनंतचतुर्दशीच्या  दिवशी त्या  ओझ्याचं विसर्जन कर आणि बघ खूप रितं वाटेल तुला…

आठवणींच कसं असतं की नविन आठवणी create झाल्या की जुन्या आपसुकचं मनाचा खोल तळ गाठतात. मी नाही तो  option माझ्यासाठी ठेवलाय. There is nothing beyond you for me…तुला कळतयं का तू माझा निरोप घेतलायस, माझ्या नकळत.  पण मी अगदी आजही तिथेच आहे, जिथे तू मला सोडून गेला होतास. तुझ्यासोबतच्या गप्पांमधला प्रत्येक क्षण जिवंत आहे माझ्यामनात.काय काय विसरू हे सांगण्यासाठी ये ना फक्त एकदा  तिथेच....कसं असतं ना कोणतही नातं संपवताना ते शांतपणे बोलून वेगळं केलं ना की त्या नात्यात कडवटपणा नाही रहात. त्या दोन  व्यक्ति  जेव्हा केव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा निश्चितपणे आनंदाने  भेटतात. आपणही बोलुयात please.   नकोत मला काही  वचनं,नाही विचारणार पुन्हा तुला ‘तू माझाच आहेस का?’ ये न, एकदा तुला पहायचय फक्त. तुला साठवून घ्यायचय स्वत:त.... तुझं माझ्याशी असं   अबोला धरणं, खोल जखमा करून गेलय रे. फक्त एकदाच  पहा  दुरून माझ्या डोळ्यात अन् सांग तुझी उणीव मी कशी भरून काढावी.... तुला गमावून मी फार एकटी पडलेय रे.

मला एकच सांगायचयं  तुला…

मला आपल्या नात्याबद्दल कधीही संभ्रम आणि संमिश्र भावना  नव्हती. खूप clear आणि sorted होते मी आपल्याबाबतीत….तूमाझ्यासाठी पहिल्यादिवशी होतास तोच आजही आहेस आणि  कायम राहशील….nothing changed for me. मनाच्या एकाकोपऱ्यात मी जपलयं आपलं ‘us’ असणं आणि माझ्या ‘me’time मध्ये मी पुन्हा पुन्हा जगत रहाते  सगळं….  अन् बरं का वेळी अवेळी ते मंतरलेले क्षण माझ्या चेहर्यावर हसू पसरवतात. मी अगदी  काही काळासाठी तुझी होते हे माझ्यासाठी खूप सुखद होतं.  माझ्या आयुष्यात तुझी एक खास जागा आहे, हक्काची आणि कधीही न बदलणारी. 

समाप्त 

तुझी प्रतिक्षा कायम राहिल मला…..

तुझी….कुणीही नसलेलीSindhu Bagwe

Post a Comment (0)
Previous Post Next Post