तू चाल पुढे तुला ग भिती कुणाची

 तु चाल पुढे तुला ग भिती कुणाची!...  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ उज्वला राहणे 

    आई कोण होते ते ? सोनियाने आपल्या भाषेत  शिल्पाला विचारले. सोनियाची भाषा फक्त शिल्पालाच अवगत होती. अग दुरचा भाऊ आहे माझा?अग काही कामानिमित्त शहरात आले म्हणून मला भेटायला आले.समजल्या सारखा चेहरा करून सोनिया बाहेर गेली. हल्ली थोडं थोडं एकटी बाहेर पडायला शिकली होती.

   आजुबाजुच्या लोकांना ती परिचयाची असल्याने शेजारी पाजारी पण सोनियाची प्रेमाने काळजी घेत. त्यामुळे शिल्पा थोडी निर्धास्त असत. 

 "आजचे मरण ऊद्यावर" म्हणत पडलेला पसारा आवरण्यात शिल्पा गुंतली.कदाचित नेहमीच या

 प्रसंगाला तोंड द्यावे लागणार असे वाटते. 

  शिल्पा खरच अविनाश मध्ये गुंतत चालली होती. 25 वर्षेॉ पुर्वीच्या प्रेमप्रकरणाने परत डोके वर काढले होते.कारण दोघेही आता गुंतलेल्या बऱ्याच नात्यातून मोकळे झाले होते.

 अविनाश  व शिल्पा अगदी खरच 25 वर्षेॉनी भेटले. चक्क फेसबुकवर. एकमेकांच्या फ्रेंडलिस्टीत. मग फ्रेंड रिक्वेस्ट, मग मेसेंजर वर चॅटिंग,ऐकमेंकाच्या फोनची देवाणघेवाण आणि मग सुखदुःखाच्या गोष्टी सुरू झाल्या.

  अविनाश एकटाच होता.तर शिल्पाचा घटस्फोट झालेला. एक मतीमंद मुलगी आणि ती दोघीच.

अविनाश आणि शिल्पाचे लग्नाच्या आधी प्रेम होते.पण धोक्याच्या वयातल.जिथे फुलायला अनंत अडचणी. मग न फुलताच ते कोमेजून गेले. दोघेही दोन ध्रुवावर गेले. तिथेच पुर्णविराम. 

  

    प्रेमपत्रातील आणाभाका पत्रात राहिल्या. ती पत्रे देखील आठवणीच्या कप्प्यात सरकली. सुयोग्य स्थळ येताच शिल्पा विवाहित तर दुखावलेला अविनाश पुढील शिक्षणाच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात शिफ्ट.

   पवित्र प्रेम प्रेममनात विसावले. दोघेही एकमेकांना विसरून गेले. शिल्पा आपल्या संसारात रममाण झाली. त्यावेळी एवढे मोबाईल नव्हते. त्यामुळे संपर्क तुटलाच मधून मधून काही कारणास्तव तिला अविनाशची आठवण यायची. मग देवाकडे प्रार्थना जिथे असेल तिथे सुखी असू दे!

    खरच आता नव्याने तो परत माझ्या जिवनात आला. एक मन म्हणत होते काय हरकत आहे नव्याने सुरुवात करायला? पण समाज? आणि मुख्य म्हणजे सोनिया या वयात नवीन बाबाला स्विकारेल का?

    पण मी एकटीच हा विचार करते? अविनाशचे काय? त्याच्या मनात माझ्या विषयी कोणती भावना असेल? नव्याने परत तो तयार आहे का हे नवीन नाते जोडायला?

 पण बोलण्यातून तर दिसते नक्कीच त्याचे अजूनही तेवढेच प्रेम आहे माझ्यावर!पण त्याचा इतिहास तर काही माहिती नाही.उगाच एकटा आहे यावर आपण कसे निघालो नवीन नाते जोडायला? खरच मन वढाय वढाय! 

    

    विचारांचा भुंगा मनात घोंघावत होता. इतक्यात बेल वाजली.परत अविनाश? परत तू? हो पाय निघतच नाही ग! मला थोडे तुझ्याशी बोलायचं आहे. अविनाश म्हणाला. अरे बोल ना मग शिल्पाने दुजोरा दिला. 

 

    खरच शिल्पा नव्याने आपण सुरुवात करू या! आपल्या प्रेमाला? एक मुर्त स्वरूप देऊया, तुझं मत मला जाणून घ्यायला आवडेल!पण तुझी हरकत नसेल तर? 

   अविनाश आता हि गोष्ट अजून अवघड झाली आहे. आता आपली मुले यौवनात आहेत.सोनिया माझ्यातील बदल स्विकारणे अशक्य आहे. असे मला वाटते. परत समाज काय म्हणेल. रंगेल म्हणून मला दुषणे  लावेल.

  कोण समाज शिल्पा कुठला समाज?कायम आपणच या समाजाला घाबरत राहिलो. शिल्पा काय मिळाले आपल्याला? 

    हो बरोबर आहे पण आता मी एक घटस्फोटित आहे अविनाश! मान्य आहे मला शिल्पा, पण तुझं अवघे वय चाळीस.आयुष्य कसं काढणार आहेस,एकटीने विचार कर? मी स्विकारायला तयार आहे तुला?तुझी काही हरकत अविनाशने शिल्पाला विचारले. 

    मी फक्त तुझ्यावर खरे प्रेम केले. तुझ्याशिवाय मनाला कधीच दुसऱ्या स्त्री विचार मनाला शिवला नाही. म्हणूनच तर आजपर्यंत अविवाहित राहिलो.मुलाबाळाचा प्रश्नच नाही. काय बोलतोस अविनाश? खरच तु लग्न केले नाहीस? माझ्या प्रेमापायी? 

  हो खरच, शिल्पा मी अविवाहित आहे. मला उगाच वाटायचे येशील परत माझ्या आयुष्यात? पण अश्या तर्‍हेने नव्हे, गैरसमज नको करून घेऊस अविनाश म्हणाला. नाही रे गैरसमज कसला? शिल्पा म्हणाली. 

  पण मला सोनियाची भिती वाटते. कशी स्विकारणार ती? तसं पाहता अविनाश माझं लग्न देखील एक अपघातच आहे बरका अविनाश!. सोनिया दिसते तशी नाही. ती मतीमंद आहे अविनाश!. हे आहे सत्य. 

आईबाबांनी वरवर चौकशी करून लग्न केले. लग्नानंतर शशांकचे रंग दाखवायला सुरुवात केली. तोपर्यंत फारच उशीर झाला होता. सोनिया माझ्या पोटात वाढत होती. शशांकला प्रतिष्ठा महत्वाची होती.तर घरात सासुसासऱ्याचा सेवेला केअर टेकर. 

  मी एवढी शिकलेली पण पार मातेरे झाले सगळ्या गोष्टीचे. केवळ सोनिया साठी सहन केले. आईबाबांना खुपदा सांगण्याचा प्रयत्न केला. पण पाढच्या बहिण भावाचे कारण देऊन निरुत्तर केले. मग मी ही माहेर बंदच केले. शेवटी तक्रार तरी कोणाकडे करायची.

  अविनाश खुपदा तुझी आठवण यायची. वाटायचे धावत तुझ्याकडे यावे, सगळे सगळे सांगावं. पण तु कुठे आहेस, काय करतो? काहीच माहिती नव्हती.

  सासरचे सगळे अत्याचार मी फक्त सोनिया साठी सहन केले. पुढे सोनिया चा जन्म झाला. 

    नियमानुसार माहेरीच.पण आईबाबांना वाटले. कायमची  इकडेच राहते कि काय? कारण मुलगी झाली म्हणून सासरकडील मंडळी नाराज कोणीही बघायला आले नाही. तीन महिन्यांनंतर मीच गेले सासरी आपणहून आईबाबा पण काही बोलले नाहीत.

 सासरी अगदी थंड स्वागत.शशांकने तर नीटसे सोनियाकडे बघितले ही नाही.सोनिया वाढत होती. पण वयानुसार तिची प्रगती कमीच. मनात संशयाची पाल चुकचुकत होतीच. "मन चिंती ते वैरी न चिंती" न राहून एके दिवशी शशांकला म्हणाले. 

  शशांक सोनियाला बालरोगतज्ज्ञाला दाखवायला हवे, त्या ने उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळले.सोनिया बरोबरच्या मुले चालायला लागली. पण सोनिया धड रांगत पण नव्हती.

  मग एकदा मीच घेऊन गेले डॉक्टरांकडे. डॉक्टरांनी मला समजावले. वयानुसार तिची समज कमी आहे. ती हळूहळू प्रगती करेल पण मेंदूची वाढ कमी असेल. म्हणजे वय तीन वर्षे झाले तर मेंदू दिड वर्षाच्या बाळाचा असेल. प्रयत्नवादी रहा हळूहळू होईल. फक्त व्यवस्थित उपचार मिळणे महत्वाचे. 

    सासू नेहमी टोमणे मारायची. मुलगी जन्माला घातलीस ती पण धड नाही. यात माझा काय दोष अविनाश??. शिल्पाला खुप भरून आले.तिचा हात हातात घेऊन अविनाशने तिच्या खांद्यावर थोपटले. 

  

  स्टेजवर स्त्री सक्षम आहे, ती निर्णय घेऊ शकते. अश्या विविध विषयांवर मोठमोठे वादविवाद करणारी मी वास्तव जगताना मात्र कमी पडले रे, काय माझ्या शिक्षणाचा उपयोग? 

  खुप शिकायचे होते. कलेक्टर व्हावे वाटायचे.पण एकदा आईनी माझ्या भविष्यावर सरळ पाणी ओतले. लग्न झाल्यावर शिक म्हणाली.

  अविनाश माहेरी एकादशी तर सासरी शिवरात्र, असो सगळे स्वप्न धुळीस मिळाली. त्यात पदरी मतीमंद पोर. 

  पुढे तर शशांकने माझे नावच टाकले. म्हणाला तुझ्याबरोबर संसार नाही करायचा मला. पुढचे पोर हि असेच निपजले तर? अविनाश फार मोठा शॉक होता तो मला! 

  मी शशांकला घटस्फोटाची नोटीस दिली.घर सोडले.अंगावरच्या कपड्यावर सोनियाला घेऊन स्वतंत्र राहू लागले.माझ्याकडे शिक्षण होतेच.त्याच्या जोरावर नौकरी मिळवली. सोनियाला एका जवळच्या शाळेत घातले. तिच्या प्रगतीसाठी डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू केली. 

  खुप कष्ट सोसावे लागले मला सोनियाला डॉक्टरकडे घेऊन जाणे येणे. तिच्यावरचे उपचार, होणारा खर्च खरच मला झेपणारा नव्हता. पण मी नोकरी करत घरी ट्यूशन चालू केल्या. आजूबाजूच्या शेजाऱ्यांची यासाठी मला खुपच मदत झाली. सोनियाला कोणीही वेगळी वागणूक दिली नाही. म्हणून हे सगळे मी करू शकले.आता हे सगळे वैभव माझी स्वकमाई आहे. 

    मुख्य म्हणजे समाजात माझे स्वतःहाचे स्थान आहे. मला मान आहे. माझ्या शब्दाला किंमत आहे.माझ्या शब्दावर कामे होतात. लोक आदराने मला पाहून उभे राहतात. 

  आता हे वैभव पाहून परत माहेर आणि सासर माझ्या नावाचा वापर करुन आपली कामे करुन घेतात.मला परत बोलावतात. पण मला काहीच वाटत नाही. मी त्यांच्या विनंतीचा सन्मान करत नाही. वेळ निघून गेली आता. 

   आज माझी सोनिया हाच माझा अलंकार आहे.आज हळूहळू तिची प्रगती होत आहे.तिच्या विषयी माझी खुप स्वप्न आहेत. त्यासाठीच मी प्रयत्न करते आहे. त्यासाठी मला कितीही कष्ट झेलावे लागले तरी मी झेलेल.शिल्पा परत अविनाशच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागली. 

  शिल्पा तु कर्तबगार स्त्री आहेस. मुळूमुळू रडणारी रडू बाई नाही.उठ तु चाल पुढे मी तुला साथ देईल.सोनिया सहित तुला मी स्विकारत आहे.मला आता कोणाची भिती नाही. 

 सोनिया दाराआडून बघत होती. तिची अकलन शक्ती कमी होती. पण समज येत होती.आईचं दु:ख तिला समजले. व्यवस्थित बोलता आले नाही. पण अविनाशकडे बोट दाखवून प्रसन्न चेहऱ्याने तिने आनंद मात्र व्यक्त केला. 

   शिल्पा मनोमनी समजली. सोनियाने अविनाशला स्विकारले. सोनियाला घट्ट मिठी मारून तिने अश्रूला  वाट मोकळी करून दिली. 

अविनाश म्हणत होता.मन शुध्द तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तु चाल पुढे रे तुला रं भिती कशाची!..

©️®️सौ. ऊज्वला रवींद्र राहणे

Post a Comment (0)
Previous Post Next Post