गुलमोहर

गुलमोहोर...   (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

लेखिका - शिल्पा केतकर.

आई मला अजिबात लग्नच करायच नाहिये तू मला उगीच भरीस घालू नकोस मी बरी आहे एकटी आहे ती, तुला काय नकोशी झाले आहे का? शमा जरा चिडूनच बोलली...आईच्या डोळ्यात पाणी आलेल तिला कळल.. बाबा गेल्या पासून आई थोडी हळवी झाली होती.. आणि खर तर हेच कारण होत लग्न न करण्याच.. मी सासरी गेले की आईकडे कोण बघणार अशी चिंता तिला वाटायची.. ती पटकन आई जवळ गेली.. आणि गाल फुलवून बोलली ए आई अस रडू नको ना सॉरी रागाच्या भरात बोलले ग आणि तुला माहित आहे ना कारण.. अस बोलून तिने आईला मिठी मारली..
आता काही बोलून उपयोग नाही ही पोरगी माझ काही ऐकायची नाही, मामीलाच फोन करून बोलवून घेते तीच हिला पटवू शकते.. अस मनात विचार करत असताना
काय ग कसला विचार करतेस
आई - छे काही नाही ग
शमा - खर खर सांग
आई - आग खरज नाही करत कसला विचार ..बर राहील आता हा विषय नको.. आज रविवार ना मस्त तुला आवडतात म्हणून आळूच्या वड्या करणार आहे
आहा आई किती मनकवडी आहेस..
चल आता कामाला लागते... आई मी करू का मदत तुला..
आई - नको आग माझी झाली आहे तयारी सगळी आपल्या पुरत्या आणि सोसायटी मध्ये आपल्या नेहमीच्या चार घरी.. द्यायला नेहमी प्रमाणे
शमा - म्हणजे तुझ्या भाषेत पंगती प्रपंच... बर आई ऐक मी खाली आहे माझ्या लाडक्या गुलमोहोर झाडाच्या पारावर बसते.. मस्त वाटत मला तिथे, अर्धा तासात वर येते..
किती आवडतो ग तुला हा गुलमोहोर..  काय गुज गोष्टी करत असतेस ग त्याच्या बरोबर, अगदी लहानपणापासून पाहतेय, लोकांना मोगरा, गुलाबच वेड तर तुला या गुलमोहराच
हो आहे खर वेड मला या झाडाच लाल गडद रंगांनी बहरलेल झाड काय दिसत आहा, त्याच्या फुलांचा सडा पडला की जणू अस वाटत त्यानी पायघड्याच घातल्या आहेत आपल्या साठी, त्याच्या सावलीत काय छान वाटत म्हणुन सांगू.. एकदम शांत शांत, मन प्रसन्न होत बघ.
आई आयडिया तू सारख लग्न कर म्हणत असतेस ना मग  माझी अट ज्या मुलाला गुलमोहर आवडत असेल ना त्याच्याशी मी लग्न करेन.. अस म्हणत डोळे मिचकावत खाली निघून जाते..
काय बाई हिची अट तर म्हणे गुलमोहर आवडणारा नवरा हिला हवा.. आता काय पत्रिका देताना त्यात काय अस लिहायच.. तुमच्या मुलाला गुलमोहोर आवडतो का?  वेड्यातच काढतील अस म्हणत आई स्वतःशीच हसते.. इतक्यात तिच्या एक लक्षात येत इतके दिवस खर तर अगदी मगाशी सुद्धा नाही नाही म्हणणारी नकळत हो म्हणतेय की लग्नाला निमित्त ते गुलमोहोराच झाड का असेना..

ताई तू काळजी करू नकोस एकदा का मुलगा आवडला ना की स्वतःहून तयार होईल बघ ती लग्नाला, ती आली की मी बोलते तिच्याशी... आणि हो मी एक स्थळ पण आणल आहे माझ्या मावशीने सांगितल, माझ्या मावशीला आपल्या शमा करता अगदी योग्य वाटल, आणि खरोखर स्थळ उत्तम आहे, मी सगळी चौकशी केली आहे.. त्यामुळे काळजीच कारण नाही
आई - तू पाहिल आहेस ना मग चिंताच  नाही, काय करतो मुलगा.. माहिती सांग ना
मामी - हो हो सांगते.. मुलाच नाव शतानिक  देसाई छान शिकलेला आहे, वडिलोपार्जित व्यवसाय आहे, आपल्या शमा सारखाच एकुलता एक आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्व्यसनी आहे.. मुलाला आई वडील आणि वडीलांची आई म्हणजे आजी असे सगळे आहेत
मुली कडून अपेक्षा फार नाहीत.. घरातल्यांना धरून ठेवणारी, सण वार, रिती भाती सगळ आनंदाने करणारी सुसंस्कृत मुलगी हवी आहे, तिला नोकरी करायची असेल तरी त्यांची हरकत नाही किंवा घरातल्या व्यवसायात लक्ष घालायच असेल तरी घालू शकते.. आणि मला अस वाटल आपली शमा अगदी योग्य आहे या स्थळा करता, आपली शमा सण वार किती आनंदाने साजरे करते, इथे जर जमल ना तर ताई खरज आपल्या शमाने नशिब काढल अस म्हणायला हरकत नाही..
कोणाच्या नशीबा बद्दल बोलताय अस म्हणतच शमा आत आली, अय्या मामी कधी आलीस अस म्हणत मामीच्या गळ्यात पडते, किती दिवसांनी भेटतेस..
आई - आधी हात पाय धू पाहू, देवा समोर दिवा लाव, तो पर्यंत मी चहा टाकते, मामी पण थांबली आहे तुझ्या करता चहा घ्यायची
मामी आलेच फ्रेश होऊन, मग मस्त गप्पा मारू
हा बोल कशी आहेस, किती दिवसांनी आलीस
मामी - आग गधडे मागच्या महिन्यात तर येऊन  गेले, त्यावेळी तू मैत्रिणी बरोबर बाहेर गेली होतीस
शमा - अरे हो विसरलेच.. बर ते जाऊ दे आमचा  मामुडी कसा आहे.. आणि आमचे भाऊ वहिनी
मामी - सगळे मज्जेत आहेत, मामाला आठवण येत असते तुझी, लाडाची भाची ना तू.. जमेल तस येऊन जा, कोल्हापूर वरुन सांगली काय लांब नाही
शमा - हो मामी नक्की येईन, पण काय करणार एक रविवार मिळतो.. मला पण सगळ्यांची खूप आठवण येते.. पण नक्की येईन
मामी - बर शमा मला जरा बोलायच आहे, चल जरा बाहेर जाऊ मोकळ्या हवेत..निवांत बोलता येईल
शमा - मामी मला माहीत आहे काय आहे बोलायच ते.. चल मस्त खाली गुलमोहोराच्या पारावर बसू
चल.. मग बोलू

शमा आपण विषयावर  येऊ मला सांग तुला लग्न का करायच नाहिये?
आग मामी माझ लग्न झाल तर आई एकटी पडेल, तिच्या कडे कोण पाहणार, एकदा सासरी गेले की अडकायला होईल.. मला काळजी वाटते तिची बाबा गेल्यावर किती हळवी झाली आहे, बघतेस ना
सगळ कळतय मला पण आग एक कोणी तरी आधी जाणार हे सत्य आहे आणि ताई हळू हळू यातून बाहेर येईल. आणि खर सांगू का आता ताईला तुझ लग्न तिच्या मनाप्रमाणे व्हायला हवे आहे एवढीच इच्छा आहे अणि मला सांग तुझा बाबा असता तर तू लग्नाला तयार झाली असतीस की नाही.. तुझ्या बाबाच स्वप्न होत तुझ लग्न अगदी धुमधडाक्यात लावून द्यायच, एकुलती एक लेक तू मग तू तुझ्या बाबाच स्वप्नं पूर्ण नाही का करणार आणि  तुला अस वाटतय ना आई एकटी पडेल, आग पण आपण सगळे आहोतच की, मी, मामा, बाकी तुझ्या दोन मावश्या, बाकीचे नातेवाईक तिला आपण थोडच एकट पडू देणार आहोत.. आणि तू येशीलच की भेटायला काय हव नको पहायला... हो ना, वेडाबाई.. अस म्हणत तिच्या पाठीवरून हात फिरवते...
शमा - पटतय तुझ बोलण मला.. तरी पण
हे बघ आता पण बीण काही नाही.. एक उत्तम स्थळ आहे.. मुलाची माहिती छान आहे आईशी बोलले आहे मी
मामीला मधेच तोडत.. वा छान बरीच आहेस की.. तू म्हणजे सगळ ठरवूनच आली आहेस की अस म्हणत हसते, पण एक सांगते, मला पटला मुलगा, तरच मी लग्नाला होकार देईन
मामी हसत तिला म्हणते,नक्कीच तुला कोणी जबरदस्ती करणार नाही.. पण मुलाला पाहिल्या शिवाय.. कस कळणार ना तो चांगला आहे की वाईट.. काय हो ना
दोघी हसत वर आल्या त्यावेळीच आई काय समजायचं ते समजून गेली.. अणि नकळत देवाला हात जोडून म्हणाली पांडुरंगा सगळ काही माझ्या मुलीच्या मना सारख होऊ दे...

शमा झालीस का तयार.. आई ने हाक मारली
शमा - हो हो  आले, शमा बेडरूम चा दरवाजा उघडून बाहेर येते.. छान सॅटीन सिल्क ची प्लेन मोरपंखी साडी आणि त्यावर सैलसर वेणी, साडीवर शोभून दिसेल असा नेकलेस.. फारच खुलून दिसत होती शमा
थांब हो आधी दृष्ट काढते.. किती नक्षत्रा सारखी दिसतेय माझी पोर.., जा देवाला आणि बाबांच्या फोटोला नमस्कार कर..
आई, मामी, मामा नमस्कार करते हा.. चला तुम्ही उतरा मी कुलूप लावून येते
आई बाबांच्या फोटो पुढे उभी राहते.. आज आपल्या लाडक्या लेकी करता स्थळ पहायला जात आहोत आशीर्वाद द्या.. तुम्ही आहातच माझ्या सोबत नेहमी.. अस म्हणत नमस्कार करते.. आणि निघते.

बंगल्याच्या आत मध्ये शिरतानाच खूप छान प्रसन्न वाटत होत... बगीचा फारच छान होता.. बाहेर एक छोटासा झोपाळा पण बसवला होता
अरे या.. नमस्कार 🙏 घर सापडल ना लगेच... या.. बसा
आग ऐकलस का पाहुणे मंडळी आली हो, येताना पाणी घेऊन ये.
हो, हो आले
नमस्कार मी मिसेस देसाई मुलाची आई आणि या माझ्या सासुबाई.. सगळ्यांनी एकमेकांची ओळख करून घेतली.. शमा सगळ्यांच्या पाया पडली
देसाई - आरे आपली ओळख झाली पण आमचे चिरंजीव कुठे आहेत..
मिसेस देसाई- अरे शतानिक येतोस ना
वरुन आवाज आला.. हो हो आलो..
मस्त पांढरा कॉटन चा झब्बा आणि जीन्स.. सोनेरी कडा असलेली चष्म्याची फ्रेम.. एकदम रूबाबदार व्यक्तिमत्त्व...  आई, मामा, मामी तर पाहातच राहिले..
आणि शमा ती तर बघताक्षणी त्याच्या प्रेमात पडली
ती त्याच्या कडे टक लावून बघत होती..
तितक्यात नमस्कार मी शतानिक.. अस त्यानी म्हटल्यावर ती एकदम भानावर आली, तो सगळ्यांच्या पाया पडला. चहा, खाण वैगेरे झाल्यावर.. मिसेस देसाई बोलल्या.. अरे शतानिक शमा ला घर दाखव ना आपल म्हणजे तुम्हाला पण एकमेकांशी  मोकळेपणाने बोलता येईल...
हो हो.. चला या.. अस म्हणत तो पुढे झाला आणि शमा त्याच्या मागे चालू लागली.. वरती गेल्यावर त्याने तिला त्याच्या खोलीत नेले
या ही माझी खोली.. बसा.. एकदम निवांत बसा.. पाणी हव आहे का..
शमा - नाही नको.. तुम्ही पण बसा ना
तो समोरच्या टेबलावर बसला
आणि तिच्या कडे रोखून बघत म्हणाला खूप छान दिसताय तुम्ही.. शमा एकदम लाजली ती त्याच्या कडे चोरट्या नजरेने बघत म्हणाली Thank you.. तुमची काही हरकत नसेल तर एक विचारू का?
शतानिक हो अवश्य विचारा, तुमच्या मनात जे काय असेल ते, उलट मनमोकळे पणाने बोललात तर जास्त आवडेल मला
शमा - नाही तस काही खूप विचारायच नाहिये, फक्त एवढच की तुम्हाल तुमची लाइफ पार्टनर कशी हवी आहे
शतानिक - थोडासा हसतो.. माझ्या खूप काही अपेक्षा नाहीत.. एकच अट आहे त्यात चपखल बसणारी हवी.. ती अट म्हणजे घराला घरपण देणारी नाती जोडणारी घरातील माणसांना आपल्या प्रेमाने बांधून ठेवणारी हवी, छोट्या मोठ्या कुरबुरी होत असतात, आणि  त्या व्हायला ही हव्यात त्याशिवाय आयुष्यात मजा पण नाही हो ना.
तो बोलत असताना शमाला वाटल हा अगदी आपल्या मनातलच बोलत आहे, कारण तिला सुद्धा, नाती जपायला फार आवडायची.. सगळ्यांच्या मध्ये मिळू मिसळून राहण तिला आवडायच
शतानिक जरा घसा खासकरून, बर अजून काही विचारायचं आहे का, संकोच बाळगू नका.. विचारा
शमा म्हणते माझ्या आईला मी एकुलती एक माझा बाबा दोन वर्षापूर्वी देवा घरी गेला.. तिला कधी माझी गरज लागली किंवा .. मला तिची आठवण आली तर मी तिला भेटायला जाऊ शकते का?
शतानिक तिच्याकडे बघून हसतो आणि म्हणतो अहो हा काय प्रश्न आहे? कधीही जाऊ शकता, शेवटी आई आहे ती तुमची.. आपली पहिली जबाबदारी म्हणजे आपले आई वडील.. आणि हो जस तुम्ही सासूला अहो आई म्हणून स्विकारता तस मला पण आवडेल मुलीच्या आईला अहो आई म्हणायला..
शमाला तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली.. आणि मनोमन ती आनंदली
शतानिक - अरे आपण नुसतेच बोलत बसलो, या  इकडे माझी बाल्कनी दाखवतो, तुम्हाला फुल, झाड आवडतात ना? मला तर फार आवडतात, मला स्वतःला बाग कामाची फार आवड आहे.. माळी काका आहेत आमचे पण मला जसा वेळ मिळेल तसा मी बागकाम करत असतो.. या अस म्हणत तो बाल्कनीचा दरवाजा उघडतो... आणि समोरच ते झाड पाहून शमाला इतका आनंद होतो,आनंदाने जवळ जवळ ती ओरडतेच
अय्या गुलमोहोर.. किती छान, तुम्हाला आवडतो
शतानिक - हो प्रचंड मला आणि माझ्या आजोबांना.  माझ्या लहानपणी आम्ही दोघांनी मिळून हे झाड लावल होत बागेच्या मागच्या बाजूला, आता उन्हाळा सुरू झाला आहे ना बहरेल आता मस्त लाल रंगाने.. अस म्हणत तो बाल्कनी मधल्या बाकीच्या कुंड्यांमधली झाड अजून बागेत काय काय लावल आहे सांगत असतो
शमा - फार छान केली आहे हा तुम्ही बाग खूप आवडली मला, आमच्या सोसायटी मध्ये पण एक गुलमोहोराच झाड आहे मला वेळ मिळाला की मी तिथे पारावर जाऊन बसते खूप छान वाटत.. तुम्ही पण तुमच्या झाडाला पार का करून घेत नाही, करून घ्या ना
शतानिक - हो जरूर.. आणि तुमच्या नाही आपल्या गुलमोहोराच्या झाडाला... तुम्ही इकडे आलात की अगदी तुमच्या मना सारखा चालेल ना... अस म्हणत तिच्या कडे प्रेमाने बघतो,  खर तर शमाच्या गालावर उमटलेली लाल गुलाबी रंगाची छटा त्याला तिचा होकार सांगून गेली..
थोडास खाकरत... मी माझा निर्णय सांगितला आता तुमच्या कडून अपेक्षा आहे..
शमा ला काय बोलायच सुचत नाही... त्याची नजर चुकवत ती पण त्याला होकार देऊन टाकते..
शतानिक - हे जर तुम्ही माझ्या डोळ्यात पाहून सांगितल तर मला खूप आवडेल...
शमा हलकेच त्याच्या नजरेला नजर देते.. नाजूक हसून त्याला होकार देते...
शतानिक - चला मग खाली जाऊ, घरातल्यांना पण आपला निर्णय सांगायला हवा ना... तिच्या जवळ जातो आणि हलकेच तिचा हात हातात घेतो.. मी आयुष्यभर तुम्हाला साथ देईन.., काही झाल तरी आपण एकमेकांची साथ सोडायची नाही... आता ही आपली साता जन्माची साथ.. 😊  चला जाऊ खाली..

दोघे ही खाली येतात
मिसेस देसाई - अरे या दाखवलस का घर तिला, काय ग आवडल ना..?
शतानिक - आग फक्त माझी बेडरूम दाखवली, बाकीच घर पुढच्यावेळी दाखवेन
मिस्टर देसाई - पुढच्यावेळी म्हणजे..
शतानिक -  आग म्हणजे आम्ही दोघांनी एकमेकांना पसंत केल आहे.. म्हणजे आता ती येईलच ना आपल्या कडे त्यावेळी दाखवेन.
सगळ्यांचे चेहरे एकदम आनंदित होतात... अरे किती छान.. चला शमाचे मामा कामाला लागा, साखरपुडा लवकरात लवकर उरकून घेऊ.. शमा च्या आई चालेल ना?
आई - हो हो.. नक्कीच
शमाच्या आईला फार फार आनंद होतो, नकळत त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. इतक्यात
मिसेस देसाई आतून मिठाई घेऊन येतात चला तोंड गोड करा, मी दोन दिवसात आमच्या गुरुजींशी बोलते आणि तुम्हाला कळवते.. बाकीच आपण नंतर ठरवू..
मामी - हो हो.. चालेल, आता निघतो आम्ही, तुमच्या फोन ची वाट बघतो.
शमा सगळ्यांच्या पाया पडते.. सगळे जायला निघतात, शमा थोडी दारात घुटमळते आणि मागे वळून एकदा बघते.
शतानिक  तिच्याकडेच पहात असलेला तिला जाणवत दोघांची परत नजरा नजर होते.. ती त्याच्याकडे बघून गोड हसते आणि जायला निघते
गुलमोहराला आज खऱ्या अर्थाने बहर यायला सुरुवात झाली आहे.

©®शिल्पा केतकर 🌹 🌹..

#अक्षरचाफा_कथास्पर्धा

कथेचे सर्व हक्क पूर्णपणे लेखिकेकडे सुरक्षित. शब्दचाफा ब्लॉगिंग कथेवर कोणताही हक्क नाही. 


Post a Comment (0)
Previous Post Next Post