सपनाची सासू

 

#सपनाची_सासू

 #अक्षरचाफा_कथा_स्पर्धा


Sush

   

        अतिशय प्रसिद्ध चित्रपट ' एक दुजे के लिये, नव्वद च्या दशकातील सर्वात लोकप्रिय ठरलेली उत्कट प्रेम कथा. आजही लोकांच्या मनातून उतरलेली नाही.

      मी तेव्हा हायस्कूल मध्ये शिकत होते.आणि फॅमिली सोबत हा चित्रपट थियेटर मध्ये जाऊन बघितला होता.त्यावेळी प्रेम कथेचा इतका जास्त विचार केला नव्हता.पण जस जसे वय वाढत गेले.आणि घरा घरा मधून टी वी आणि विविध चॅनेल वर हा चित्रपट बघण्यास मिळाला.

आणि प्रत्येक वया नुसार ,प्रतेक वेळी ह्या चित्रपटाचा प्रभाव मनावर वेगवेगळा पडत गेला. चित्रपटात काम करणारे कलावंत त्यांची भूमिका किती जिवंत पणाने निभावताना दिसत होते.अगदी आपल्या जवळपास ची घटना आल्यासारखे वाटायचे.

एक दुजे के लिये मध्ये असणारी गोड मुलगी सपना आणि तिची शिस्त प्रिय ,कडकलक्ष्मी ,व्यवहारी,मुलीच्या चांगल्या भवितव्या साठी स्वतः च्या ममतेला पाषाणाचे हृदय बनवणारी आई.मला आजही तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टिकोनातून बघायला भाग पाडते.

आपण आजू बाजूला नीट मोकळे पणाने नजर फिरवली तर अशा चित्रपटा मधल्या घटना किंवा मनावर छाप पाडणारे व्यक्तिमत्त्व आपल्याला सहजपणे दिसून येतात.

एक दुजे के लिये,ह्या चित्रपटाची कथा थोडीशी बदलली तर .......

सपना ची शिस्तप्रिय, कड्क लक्ष्मी,कठोर अंतकरणाची आणि मुलीच्या भवितव्यासाठी स्वतः वाईट पना स्वीकारणारी आई....

जर आई नसून सासू दाखवली असती तर....??!!

अशा स्त्रीने सपना सारख्या मुलीसोबत कौटुंबिक स्तरावर कसा व्यवहार केला असता....??!!

चित्रपटामध्ये आई ची भूमिका करणारी शेवटी वाईट ठरली गेली.मग ती जर सासू च्या भूमिकेत असती तर विचारायला च नको...मग ती अतिशय क्रूर, भयंकर दुष्ट ठरली गेली असती.नक्कीच.

"सपना ची सासू,ही माझ्या नजरे समोर दिसणारी एक सत्य कथा आहे.

सपना आणि वासू ,दोघेही सॉफ्ट वेअर इंजिनियर .एका नामांकित mnc कंपनी मध्ये जॉब करत आहेत.म्हणजेच दोघेही छान सुशिक्षित,संस्कारित,आणि वेळ मॅच्युअर म्हणाजेच प्रगल्भ विचार सरणीचे असणार यात शंका नाही.

दोघांनी मिळून निर्णय घेतला की,त्यांना एकमेकांसारखा योग्य जीवन साथी मिळनार नाही.दोघांनीही आपापल्या घरी हा निर्णय सांगून टाकला.अन् यामध्ये काही. बदल होऊ शकणार नाही.असेही ठाम पने सांगून टाकले.

लव्ह मॅरेज म्हंटले की सगळ्यात आधी घरच्यापुढेप्रश्न उभा राहतो ,तो म्हणजे मुलगा किंवा मुलगी कोणत्या जातीची,कोणत्या धर्माची आहे.बहुतेक वेळा लव्ह मॅरेज हे दोन वेगवेगळ्या जाती धर्मा मध्ये होत असतात.

सपना आणि वासू यां दोघांची फॅमिली ही छान सुशिक्षित, प्रतिष्ठीत आहेत.तरीही त्यांनाही हा जातीधर्मा चा प्रश्न सतावत आहे.

         सपना च्या घरच्यांना काळजी होती ती,सपनाच्या भविष्याची.कारण सपना लग्नकरून तिकडे वासू च्या घरी जाणार होती.जे काही प्रोब्लेम येणार होते ते सपनाला च येणार होते.तिला एकटीला नवख्या वातावरणा मध्ये तड जोड करावी लागणार होती.

त्यामानाने वासू चा काहीच प्रश्न नव्हता.तो लग्ना नंतर ही त्याच्याच घरात,त्याच्या शहरात,राहणार होता.तडजोडीचा प्रश्न त्याला पडला नसता च. वासुची फॅमिली तशी पण छोटी फॅमिली होती.वासू ला एक बहिण आहे,आणि ती तिच्या सासरी दुसऱ्या शहरात तिच्या संसारात बिझी होती.वासू चे वडील थोड्याच दिवसापूर्वी काहीशा आजारपणात दगावले होते .आता वासू ची आई आणि वासू , एव्हढीच त्याची फॅमिली आहे. वासूची आई तिचे शिक्षणक्षेत्र तली. कामगिरी संपवून निवृत्तीचे दिवस व्यवस्थित पने काढत आहे. तसे बघितले तर,काहीच प्रॉब्लेम नव्हता.

पण समाजातील चालीरीती, रूढी,परंपरा,यांनी मानसाला ईतके व्यापून टाकले आहे की,प्रत्येक कुटुंबामध्ये स्वतःचे व्यक्तीगत प्रॉब्लेम पेक्षा या प्रॉब्लेम चाच किती त्रास असतो.

जात , पात,धर्म,भेद,म्हणजे तरी काय.त्याचा एवढा मोठा बाऊ का करतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे ,त्या त्या जाती पती मध्ये,धर्म भेदांमध्ये,वंश परंपरे ने चालत आलेल्या चालीरीती,खाणे पिणे,राहणीमान,वेश भूषा,बोलीभाषा,सन उस्तव,साजरे करण्याचे वेगवेगळे प्रकार,कोण उच्च कोण नीच,गरिबी श्रीमंतीचे भेदभाव, अशा अनेक कारणांमुळे लव्ह मॅरेज म्हणजे, जन्मा पासून लागलेल्या किंवा असलेल्या सवयी,लग्ना नंतर अचानक बदलून टाकाव्या लागतात.

आणि सुरवात होते.. वाद विवाद, घर गुती भांडणे,क्लेश कलह,त्यामुळे उदभवणारे मन स्तापी जीवन.पण.....

.....पण इथे मात्र मी रोज बघत आहे,की वासू ची आई तिचे मुलाचे लग्न झाल्यापासून खुप आनंदी,मन मोकळे आणि निश्चिंत जीवन जगत आहे....!

मी :- काय म्हणता वासू ची आई,तुमच्या मुलाचे लग्न झाल्यापासून तुम्ही खूप वेगळ्या दिसायला लागलाय,एक छान तेज तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

वासू ची आई:- हो ग सुश,अगदी बरोबर ओळखलं स. आनंदी राहणे खरंच खूप सोपे असते ग. स्वतः ला शांत आणि समाधानी जगायचे असेल तर आहे तो वर्तमान मोठ्या मनाने स्वीकारला की स्त्री आपोआपच आनंदी राहू शकेल.

मी;- पण वासु च्या आई,तुमची सून एकदम वेगळ्या वातावरणातून आलेली आहे.तुम्हाला अवघड जात असेल ना...??

वासू ची आई:- काही नाही ग,अवघड काहीच नाहीये.तुमची इच्छा पाहिजे फक्त बदल स्विकारण्याची बदल घडवून आणण्याची .तू तो एक दुजे के लिये,चित्रपट पाहिला असशील ना..?

मी:- अरे हा,तो तर माझा आवडता चित्रपट होता.

वसुची आई :- मग त्या चित्रपटात सपना च्या आईने त्या दोघांच्या प्रेमाला कशा मुळे विरोध केला बघितले स ना...!!

मी :- हो ना,किती वाईट असते ना ती.

वासू ची आई:- मग आता आमच्या घरामधे बघ ना.सपना ज्या घरामधून आली आहे,तिथे खुप छान संस्कार आहेत ,तिला सगळे कसे नीट नेटके,लागते.रोजची देव पूजा करते.सगळे विधी नियम नेमाने पाळते.आणि विशेष म्हणजे पूर्ण शुद्ध शाकाहारी आहे.तिला मटण,मच्छी चा वास जरी आला तरी त्रास व्हायचा.तरी तिने वासू सोबत लग्ना चा निर्धार केलाच होता ना.मला तिचा तो स्वभाव खुप च भावला बघ...!!

मी:- हो का,,पण तुमच्या घरी तर वेगळेच वातावरण आहे.धर्माच्या विधी किती वेगळ्या आणि आठवड्यातून दोन तीन वेळा तरी नॉन व्हेज असते ना...!!

वासू ची आई :- फक्त खाण्या पिण्याच्या सवयी आणि धार्मिक विधी वेगळे आहेत म्हणून तिने कुठे माघार घेतली.ती खूप समंजस आहे..!

मी :- आणि तुम्ही पण छान संभाळून घेताय की तिला.!

वासू ची आई:- वासूने आणि सपनाने लग्ना आधी च सर्व प्लॅन करून ठेवले होते.सपनाने तिची परंपरा जपायची अन् तिचे धर्म,तिच्या सवयी,तिचे खाणे पिणे,राहणीमान तिनेच सांभाळायचे.वासुचा काही प्रश्न नव्हता च.प्रश्न होता तो फक्त माझाच.आणि म्हणून मी ही स्वतः ला बदलायला तयार झाले. " लग्न होऊन आली आहे म्हणून असे का ,,तसे का ,म्हणून टो कायचे नाही." हे मनाशी ठरवले.आणि सपनाला सांगितले की," तुझ्या सवयी तुलाच माहिती आहेत.लहान पना पासून वागत आलीस,तसेच इथेही वाग. म्हणजे तुला अवघड जाणार नाही.आणि मला ही समजून घे.माझ्या ही सवयी तुझ्या येण्या मुळे दबावा खाली येऊ नयेत.आणि आता तुम्हाला सर्व सुनेचे एकावे लागेल अशी अपेक्षा ही ठेऊ नकोस.कारण अवास्तव अपेक्षा निराशेला कार निभुत असतात .नाही का ."....

मी:- मग आता कसा आहे तुमचा दिनक्रम किती बदल जाणवतोय ..??

वासू ची आई :- अग मी ही आयुष्य भर घर , मुले,संसार,आणि नोकरी सांभाळली आहे.स्त्रीला किती जनुकाय तारे वरची कसरत करावी लागते.याचा चांगलाच अनुभव आहे.ती सर्व अनुभवांची शिदोरी मी माझ्या मुलीला आणि सुनेला वाटून देत आहे.

            माझी सासू खुप जुन्या विचारांची होती .माझी सासू म्हणायची की," आम्ही ही खुप काबाड कष्ट केलेत.खुप झिजलोय ,आता तुला ही तेच. करावे लागेल.संसार टिकवण्यासाठी सर्व प्रकारच्या हाल,अपेष्टा,तडजोडी, कराव्या लागतील.मी तुझी सासू आहे,माझ्या कडून तुझ्या जनमदात्या आई ची आपेक्षा करू नकोस ".... असे त्या ठाम पने अन् स्पश्ट च सांगायच्या मला.हे आजही आठवले तर मन दुखी होते...., रडू येते आजही....

.....आणि हाच अनुभव मी माझ्या मुलीला आणि सुनेला येऊ देणार नाही.असे ठरवले आहे....

" किती त्रास होतो हे जर तुम्हाला माहित आहे.तर तो त्रास तुम्ही दुसऱ्यांना कसा देऊ शकता...!?? 

माणुसकी मध्ये खुप मोठे बळ आहे ..शक्ती आहे ....आनंद आणि आशीर्वाद आहे.तो कसा उपभोगायचा हे ही तुमच्याच हातात आहे....!!!

मी:- वासू ची आई खरंच नशीबवान आहे तुमची सून सपना.

वासू ची आई:- सपना पूर्ण शुध्द शाकाहारी आहे,म्हणून तिने आमच्यावर जबरदस्ती केली नाही अन् आम्ही हो तिच्या वर.शनिवार रविवार त्या दोघांचा विक ऑफ असतो.तेव्हा किचन पूर्ण माझ्या ताब्यात असते.मग आम्ही मटण मच्छी,चिकन किंवा काहीही नॉन व्हेज करतो.ती किचन मध्ये येत नाही.पण आठवडा भराच्या अतिरिक्त स्वच्छतेची ,कामे करते.मुलांच्या शाळेच्या ॲक्क्टिविटी ची तयारी करते.काही शॉपिंग असेल तर ती ही करून घेते.बाथरूम पासून गॅलरी पर्यंत सगळे स्वच्छ करून झाडे कुंद्यांची ही देख भाल करते.ती ची ब्युटी पार्लर ची अपॉइंटमेंट घेऊन स्वतः ला नीट नेटके करून घेते.आम्ही ही पाहिजे ते करून खातो.सोमवार पासून तिचे खाणे पिणे ,जॉब , रूटीन चालू होते.सकाळी मी किचन मध्ये जात ही नाही. अन् काही सांगत ही नाही.पण रात्रीचा अर्धा स्वयंपाक मी. करून ठेवते.ती घरी आली की मग आमचा चहा पाणी झाला की. मी संध्याकाळच्या वॉकिंग साठी मुलांना घेऊन जवळच्या गार्डन मध्ये जातो.मुले खेळतात, बागडतात.आणि रात्री आम्ही एकत्र जेवून दहा चे आसपास झोपायला जातो.

मी:- खरचं वासू ची आई लाख मोलाचे विचार आहेत तुमचे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकली,जाणीव ठेऊ शकली ,तर समाजातील निम्म्या हुन जास्त कुटुंब कलहे, संपुष्टात येतील........

नाहीतर घरांमध्ये असे वातावरण असते की ,सासू तिच्या सुनेला जणुकाय मागच्या जन्माची वैरीण आल्यासारखे वागवते.त्यांच्या मागच्या पिढीच्या सासवां च्या त्रासाची परत फेड कारणासाठी आपण सासू झालो आहोत.अशी विचार सरणी ही बहुतेक वेळा मनोविकृती होऊन जाते.

" स्त्रियांना देवाने मातृत्व दिले आहे.मात्र ते मातृत्व ती स्त्री नात्यांच्या नावा प्रमाणे बदलून टाकते." ही पूर्णच बदलायला हवे....!!!

एक दुजे के लिये.....आम्ही सगळे एकमेकांसाठी आहोत.हे फक्त प्रियकर प्रेमिका,पती पत्नी,एवढ्याच नात्या पुरते मर्यादित नाही.तर लग्ना सारख्या पवित्र विधी मधून सासू सासरे,आणि इतर सदस्य ही नाती आपोआपच लागली जातात हे विसरून चालणार नाही.तर ही नाती सुध्दा एकमेकांसोबत विधिलिखित असतात.आणि म्हणून दोन वेगवेगळ्या देशातील, जातीपातीे तील,धर्म भेदातील माणसे ही काहीतरी कामा निमित्त एकत्र येतात आणि एकमेकांसाठी आयुष्य भरासाठी एक दुजे के लिये च्या ,नाते संबंधाने ओवले जातात.....!!

* फेमिनिझम म्हणजे स्त्री पुरुष समानतेचे लढे , युगानयुगे लढले जात आहेत.अजून पुढे किती युगे हे लढे लढले जातील .पण त्याच बरोबर सासू सून सारख्या प्रेमा च्या, जाणिवेच्या , समजुतदार कीच्या,नात्यात ही वैचारिक समानता स्थापितझाली तर कुटुंबाचे,तद्वतच समाजाचेच नव्हे तर पूर्ण विश्वाचे नंदन वन होऊ शकेल.

         स्त्रियांनी मनावर घेतले तर अवघड नाही आणि अश्यक्य तर मुळीच नाही.*

"सपनाची सासू " ही कथा आहे ,आजच्या नवयुगातील सासू सुनेची .ज्या. म्हणत आहेत..... हम बने...तुम बने...एक दुजे के लिये.....!!

©®Sush.

Sushma Bhosle Ingle

Post a Comment (0)
Previous Post Next Post