पालवी

पालवी  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ पार्वती तांदळे 

"आई,तु प्लीज इंग्लिश स्पिकींग कोर्स लाव, तिकडे अमेरिकेत गेल्यावर तुला इंग्रजी समजले पाहिजे"

"तुला समजते न मग मला काही गरज नाही शिकायची, आता या "आई,तु प्लीज इंग्लिश स्पिकींग कोर्स लाव, तिकडे अमेरिकेत गेल्यावर तुला इंग्रजी समजले पाहिजे"

"तुला समजते न मग मला काही गरज नाही शिकायची, आता या वयात मला कसं जमणार? "आई हसत म्हणाली. 

"उद्या काही कामानिमित्त तु एकटी बाहेर गेलीस, तर तुला समजले पाहिजे लोक काय म्हणतात ते, प्रयत्न करुन बघ तुला नक्की जमेल".

बरं ठीक आहे उद्या पासून जाते क्लासला"

"उद्या नाही, आजपासूनच जा"एवढे म्हणून सोनू घाईघाईने  हात धुवायला बेसिन कडे गेला.

  "अरे पडशील ना, सावकाश उठ"

"अगं आई,आता तु माझी काळजी करू नकोस, तु फक्त तुझी काळजी घे".असे म्हणत सोनू डायनिंग वरची आवराआवर करु लागला. 

त्याच्या कडे पाहून क्षणभर असं वाटलं मला खरंच आता काळजी करण्याची गरज नाही आज तोच माझी आई असल्या सारखा बोलतोय. 

एक सुंदर कथा वाचण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.

तुम्हाला नक्की आवडेल ही कथा.मुलं किती लवकर मोठी होतात आणि आपलीच आई होतात. मुलं आणि वृक्ष सारखीच.... प्रेम आणि ममतेने वाढवली तर भरभर वाढतात आणि आपल्यालाच एक दिवस सावली देतात. 

सोनू आज 26  वर्षांचा झाला होता. त्याला अमेरिकेत चांगल्या कंपनीने इंजिनिअर म्हणून बोलावले होते. मी खरंच खूप खूप आनंदी होते. माझ्या कष्टाचं आणि त्याच्या मेहनतीचं फळ माझ्या लेकराला मिळाले होते, पण भविष्य कितीही सुंदर असलं तरी भूतकाळातल्या वेदनांनी माणूस नको तेंव्हा का बरं घायाळ होतो? आजही कालच घडून गेल्या सारख्या गोष्टी आठवतात. तो दिवस..... ती निर्दयी माणसे...खरंच विसरता येत नाहीत. त्यादिवशी मी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या  डोळे उघडत नव्हते. अंगातून असंख्य वेदना जाणवत होत्या. आपण कुठल्यातरी दवाखान्यात आहोत आणि अवतीभवती माणसाचे आवाज येत आहेत एवढीच जाणिव काय ती उरली होती."सुलू डोळे उघड ना आता, काही तरी बोल आमच्याशी "असे म्हणत कोणीतरी गदागदा  हलवले. बहुतेक तो आवाज आईचा होता. तिच्या आवाजाने डोळे उघडून बघण्याइतकी शुद्ध नक्कीच आली होती. मोठ्या आशेने आई.. दादा.. बाबा...   पाहत होते.  "आई ,माझं बाळ गं". एवढेच कसेबसे अवसान आणून आईला विचारलं."तुझं बाळ चांगलं आहे पोरी,आता तु त्याच्या कडे बघून झालं गेलं विसर" असे म्हणूनआई माझ्या तोंडावरून हात  फिरवत होती.  त्या स्पर्शाने थोडावेळ सर्व वेदना मिटल्या  होत्या. 

सगळेजण मोठ्या आशेने  पाहत होते कदाचित वाचेल की नाही याची आशा संपली असेल. पण आज चार दिवसांनी सुलू शुध्दी वर आली होती.

पण तो दिवस तिच्या डोळ्यासमोरुन काही केल्या जात नव्हता  ज्या दिवशी तिच्या नवरा तिला मारुन , मेली म्हणून रक्ताच्या थारोळ्यात टाकून निघून गेला होता. ति भयाण रात्र आठवून अंगातून असंख्य वेदना वाहू लागल्या.त्या वेदना पेक्षा त्या वेदना देणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून माझा नवरा होता याचाच त्रास मला जास्त होत होता. 

        "आता काही ही झालं तरी आम्ही तुला त्या नराधमाकडे परत पाठवणार नाहीत" आई रडत रडत म्हणाली. 

"हो ताई, आता त्या राक्षसाला धडा शिकवल्या शिवाय मी शांत बसणार नाही " असं म्हणताना दादा किती हमसून हमसून रडत होता. 

कठीण परिस्थितीत पाठीशी खंबीरपणे  उभे राहणारे माहेर पाहून सुलूला मनोमन खुप बरे वाटले.

माझ्या पोटात वाढणारं बाळच  आता मला नवीन आयुष्य देणारं होतं बाकी माझ्या सगळ्या अपेक्षा... आशा कधीच मरण पावल्या होत्या. दैव आपलीच एवढी परीक्षा का घेत हे कधीच समजले नाही. काय कमी होतं माझ्यात.... कोणत्याही पुरूषांने जीव ओवाळून टाकावा एवढी देखणी होते मी. आई वडीलांची एकुलती एक लेक... चार भावात एक बहीण.... खरंच लाडाचीच  होते मी.... म्हणून तर   सात पिढ्या बसून खातील एवढ्या श्रीमंत घरात माझं लग्न झालं होतं. नवरा पेशाने वकील होता. स्थळ पाहताना तर चांगलेच पाहीले होते मग नशीबाचे फासे उलटे कसे फिरले? अजून पण मनाला प्रश्न पडतो. 

घर.. दार.. खानदान... शेती... नोकरी सगळं पाहीलं पण मुलगा जिथे नोकरी करत होता तिथेच चौकशी केली नाही. तशी करायची गरज ही वाटली नव्हती. कारण त्याच्या आईवडिलांनी भुरळच घातली होती. त्यांना हवा असलेला गडगंज हुंडा माझे भाऊ देणार होते. सर्व सगळ्यांच्या मनासारखे च झाले होते. मी ही नव्या आयुष्याची पंख लेवून आकाशात झेपावले होते पण ते पंख लवकरच कापले जाणार आहेत हे तेंव्हा कुठे मला माहीत होते? . 

लग्न झाल्यावर तीन महिन्यातच सर्वांचे खरे चेहरे दिसू लागले. मी दिवसेंदिवस विचारात राहू लागले.त्यातच मला दिवस राहिले. बाळाच्या येण्याने सगळं बदलेल ही एकच आशा उराशी कवटाळली.पण तीही संपली जेंव्हा त्यांनी मला ते आधीच दोन मुलींचे वडील असल्याचे सांगितले.... म्हणजे ते जिथं नोकरीला होते तिथे च त्यांचा खरा संसार होता. मग माझी अशी फसवणूक का करावी ह्या लोकांनी? काय चुकलंय की माणसंच चुकीची होती? मला तेंव्हा अंधारीच आली. डोळ्यासमोर माझी झालेली फसवणूक दात विचकावून नाचत होती. काय करणार होते मी आता?...माझे सासू सासरे मूग गिळून गप्प होते. जसे काही त्यांना आधीच सर्व माहित असावे. 

"तु गर्भपात कर आणि माझ्या आईवडीलांना सांभाळ, तरच राहा नाही तर माहेरी निघून जा" एवढेच बोलून नवरा निघून गेला तो आठ दिवसांनी उगवला. यावेळी मी सर्वांना निक्षून सांगितले मी गर्भपात ही करणार नाही आणि माहेरी पण जाणार नाही. माझ्या या निर्णयानंतर आठच दिवसात रात्री त्यांनी मला अशा पद्धतीने मारून रस्त्यात फेकून दिले. 

  पण जोपर्यंत देवाच्या मनात येत नाही तोपर्यंत कोणीच कोणाला मारु शकत नाही हेच आज मला खरे वाटले. त्यानंतर कोणी मला दवाखान्यात नेले काही च आठवत नाही. माझं बाळ आणि मी वाचलो होतो हीच गोष्ट माझ्या आईवडीलांसाठी खूप मोठी होती. त्यांनी मला कधीच काही कमी पडू दिले नाही पण मी माझा वेळ जावा  म्हणून शिवणकाम.... पार्लर शिकून घेतले. तेवढीच माझी कमाई .... ति पण जशीच्या तशी जमा होती. सोनूचं शिक्षण... माझा खर्च  घटस्फोट घेतल्यावर आलेल्या रक्कमेतून झाला. तशीही मी श्रीमंत बापाची लेक म्हणून मला काही च कमी पडले नव्हते पण घडलेल्या प्रसंगात माझी.... माझ्या बाळाची काय चूक होती हे च काळीज कुरतडून टाकत होते. सोनूच्या सहवासात मी सर्व विसरले असले तरी  त्या वेदना...त्या जखमा अशा कधीतरी अचानक वाहतात आणि मी त्यात वाहत जाते, पण अचानक समोर सोनू उभा राहतो आणि मला सावरतो.... मला नवी जगण्याची पालवी फोडतो. ती पालवी म्हणजे माझा सोनू...... होय  तो आहे म्हणून मी जगायला शिकले नाही तर कधीच जिवंत असून मेले असते. 

पार्वती तांदळे. 

एक सुंदर कथा वाचण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post