संदूक आठवणींची

 

          संदूक आठवणींची  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ वृषाली पुराणिक

"विहू अरे बघ ना कोण आलय,तुझ्याकडे"विभा म्हणाली.

विहान जोरात ओरडून,"आई मी गमतीच्या मूडमध्ये अजिबात नाही, please मला disturb करू नकोस."

विहान च्या दारावर टक टक,"काय रे काय करतो आहेस?"


विहान चा शालेय मित्र प्रणव आत येता येता विचारतो.


विहान, "अरे यार! किती दिवसांनी भेटतो आहेस, कसा आहेस आणि सध्या काय करतोयस?"

प्रणव," अरे जरा दमानं. किती प्रश्न विचारतोयस आणि काय रे शहाण्या एवढा कशात बिझी होतास? विभा मावशीला डिस्टर्ब नको करू वगैरे म्हणाला."

विहान, "अरे काही नाही, ती उगाचच सारखी रूममध्ये येते व टाइमपास करते."


प्रणव "ओहो! लकी यार"

विहान,"I think you are lucky Your   mom is working  and she is busy the whole day.Nobody is disturbing you. You can enjoy your 'me time' "

प्रणव ,"बरं,माझे जाऊ दे, तू सांग पुढे काय?"

विभा विहानच्या रूममध्ये शिरत म्हणाली , "प्रणव कसा आहेस तू? आणि प्रिया कशी आहे?


 खूप वर्षात काहीच contact झाला नाही.


 बरं आता मस्त कॉफी करते तुम्हाला आणि हो ! आता रात्रीचे जेवण करून जा, का आज  sleepover करतोस?"

विहान,' विभा कडे एक look  देऊन," आई थोडा space दे ना यार आम्हाला.तू जरा जा मी सांगतो काही लागले तर."

प्रणव उत्साहात,"मावशी कॉफी चालेल तुझ्या हातची आणि हो मी तसा रिकामटेकडाच आहे. Sleepover चा  plan भारी आहे, मी थांबतो इथे."

विहान अरे,"what about your mom? you haven't informed her na?, is she ok for this?"

प्रणव,"don't worry विहु nobody in our house would object. and since I am with you, means it's safe for them.

विभा खुशीत दोघांना कॉफी देते व 


  विहानचा एकंदर मूड बघून  काढता पाय घेते, जाताना जेवायला बाहेर या सांगून ती जाते.

विहान रूम लॉक करून.

प्रणव कसा आहेस? आणि what about next ?

प्रणव थोडा हसून,"काही नाही यार, I have started job in MNC ,so 5 day's busy. weekend's मित्रांबरोबर टाइमपास चालू आहे."

What about you? आणि शहाण्या पुण्यात येऊन पंधरा दिवस झाले कळवले पण नाही मला?

विहान आश्चर्याने,"अरे मग, तुला कसे समजले?"

प्रणव मिस्कील हसत.

विहान,"don't tell me, माझ्या आईने सांगितले."

प्रणव,"कारे, मी आलेले तुला आवडले नाही का?"

विहान,"नाही रे तसे काहीच नाही ,पण आई म्हणजे anyways it was pleasant surprise for me."

प्रणव, "hope so"

रात्रीचे जेवण झाल्यावर प्रणव व विहान गच्चीवर गप्पा मारत बसले.


गप्पांचा ओघ शाळेतला पहिला दिवस. विहानचा अगदी पहिला मित्र म्हणजे प्रणव.

प्रणव," काय मज्जा होती ना? ते दिवस खरच छान होते, मला परत लहान व्हायला आवडेल."

विहान,"come on bro, now you are sounding like my आई हं:, ती पण दररोज माझे लहानपणीचे किस्से सांगून ,फोटो दाखवून दररोज तीच ती एक गोष्ट सांगते. Now I am 23rd years old.तिला बहुदा मी पाच वर्षाचाच वाटतो.

प्रणव जोरात हसत, तुझे व विभा मावशीचे किस्से आठवून मी पण अजून खूप हसतो.


It was stress buster for me. सांग ना काही नवीन किस्से….

विहान,"ए वेडा आहेस का जरा, grow up bro , पण एक latest गंमत सांगतो, 'ती आता माझ्या convocation आली होती व तिने एका ना आमचा फोटो काढायला सांगितला , त्यांच्याकडे DSLR camera होता व ते random clicks करत होते. आई पण ना भारी, तिला ते फोटोग्राफर वाटले व त्यांना कॉपी कधी मिळेल कॉन्टॅक्ट नंबर देऊ का वगैरे विचारत होती…


He was so awkward then ,he finally  introduced himself and then she said sorry to him…..  fortunately ते माझ्या मित्राचे बाबा होते.' जाम मजा आली होती…..

दोघेही 'खिखिखिकी'  हसत .

प्रणव,"विहान तुला आठवतंय आपली पहिली भेट, मयूर शूज मध्ये झाली होती" 

विहान,"हो यार ,मी तर कधीच विसरू शकणार नाही ते."

प्रणव,"माझी आई, बाबाची जाम खेचते त्याच्यावरून…


आपल्या शाळेचा पहिला दिवस होता ना, शूज च्या दुकानात खूपच गर्दी होती. शूज दाखवायलाही तिथे फारशी लोकं नव्हती.


विभा मावशीने तुला स्टुलावर बसवले व म्हणाली," किती वेळ लागेल अजून, माझ्या मुलाचाही साईज दाखवा ना?" 


माझा बाबा, माझ्यासाठी एक शूज पायात घालून बघत होता, तिला वाटले तो दुकानदारच आहे. माझी आई बाबाला सांगत होती, जरा नीट आवरून चल, तो तसाच झोपेतून उठून आला होता गबाळ्यासारखा. तेव्हापासून आई बाबाला तो किस्सा 


आठवून नीट नाही आवरलं तर काय होईल सांगते आणि दोघेजण  खोखो हसतात…..

विहान उत्साहात, हो ना 'यार' ,घरी आल्यावर तिने माझ्या बाबाला सांगितले व आम्ही पण एवढे खदाखदा हसलो…. पण तुझ्या बाबांना व प्रिया मावशीला आईचा राग आला नाही हे मात्र बरे झाले.

प्रणव, she is innocent. मला अजूनही आठवतंय आपल्या annual day च्या वेळेस ती ऑफिसमध्ये सुट्टी काढून तुझा मेकअप करण्यासाठी यायची व टीचर सगळ्या मुलांचा मेकअप करायला तिला लावायचे.

विहान, हो रे, mini kg त मला डान्स येत नव्हता ,तर ती घरी माझ्याकडून डान्स ची प्रॅक्टीस करून घ्यायची आणि तुला आठवतंय मला चांदोबा केला होता fancy dress competition मध्ये. 

प्रणव,"हो तुला फर्स्ट प्राइज मिळाले होते". मी तर जाम रडलो होतो ,आईने मला नुसतं तसंच पाठवले होते , आणि तुला स्टोरी टेलिंग मध्ये पण पहिले बक्षीस मिळाले होते ना?

विहान,"कसली सॉलिड एक्टिंग करून घेतली होती तिने माझ्याकडं न."

प्रणव,"विहान तुझ्या लहानपणी किती छान किस्से आहेत नाही का?" माझ्या आठवणीतली माझी आई म्हणजे फक्त ऑफिस, तिला माझ्यासाठी कधी वेळच नव्हता."

विहान," she is now VP ना ?


सगळ्यांना सगळ्याच गोष्टी मिळतात असे नाही , तुम्ही दरवर्षी मोठाल्या ट्रीप ला जायचा ,मला तर तेव्हा जाम रडू यायचं आम्ही जवळच कुठेतरी जायचो."

प्रणव,"विहान, तुझ्याकडे खूप छान मेमरीज आहेत, तुझ्या आठवणीत विभा मावशी तुझ्या प्रत्येक शाळेतल्या कार्यक्रमाला हजर असायची, तुला ग्राउंड वर पण घेऊन यायची. मी आपला बोरिंग व्हॅन मधून शाळेत, ग्राउंड वर जायचो. कुठला हॅपनिंग किस्सा झाला तरी ऐकायला आई व बाबाला कधी वेळच नसायचा रे."

अचानक पावलांचे आवाज होतात.

विहान,"not again! आई वर येतेय बहुतेक"

विभा उत्साहात,"गरम गरम कॉफी आणली आहे."

विहान," तू इतक्या रात्री काय करतीयेस?


मी केली असती ना? तू पण ना?"


This is called poking and I hate this..

विभा थोडी हिरमुसली होऊन खाली निघून जाते.

प्रणव,"विहान , का रे! चिडतोय तिच्यावर?


किती प्रेमाने तिने आपल्यासाठी कॉफी केली.


आमच्या घरी एवढा आदर  कोणीही करत नाही. लहानपणी तर तुझं पान हलयाचे नाही   तिच्याशिवाय आणि आता इतकाच स्वावलंबी झाला आहेस का तू?"

विहान,"ए गप रे! मोठा आला विभा मावशीचा चमचा, लहानपणी पण शाळेतले प्रत्येक किस्से तू तिला जाऊन सांगायचास."

प्रणव,"हो रे ! तुला आठवतंय का ,त्या पिटीच्या टीचर , आपल्या शाळेत गणपती बसणार होते म्हणून लेझीम मध्ये तुला घेतले होते . विभा मावशी पीटीच्या टीचारांना आधीच  म्हणाली  होती, विहान ला जमत नसेल तर तुम्ही घेऊ नका. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या,‌नाही तो छान करतो.

तू खूप दमला होतास, म्हणून थोडा वेळ बसलास तर त्यांनी तुला पनिशमेंट दिली होती व तू डीहायड्रेट होऊन चक्कर येऊन पडला होतास. 


विभा मावशीला जेव्हा मी सांगितले ,तेव्हा ती जाम चिडली होती. तिने थेट त्यांची कंप्लेंट प्रिन्सिपल मॅडम कडे केली होती.


अजून दोन-तीन मुलांना पण त्यांनी अशी शिक्षा केली होती ,पण त्यांच्या पालकांची काही बोलायची हिम्मत झाली नव्हती.


विभा मावशीने कम्प्लेंट केल्यामुळे पुढे कधीही पिटीच्या टीचरानी कोणालाही पनिशमेंट दिली नाही. सगळेजण विभा मावशीला जाम टरकुन असायचे. 

विहान,"हो रे! मला कधीच कुठल्याही मुलांनी शाळेत त्रास दिला नाही 


आणि आई तर पी टी ए मेंबर असल्यामुळे सगळ्या टीचर माझ्याशी खूपच छान वागायच्या."

प्रणव म्हणाला,"मी तुझा दोस्त म्हणून माझाही फायदा झाला"  I think she loves you lot…


प्रणव,"विहान तुझ्या Birthday party व ते decoration …."


विहान," अरे यार…आई पूर्ण घरच सजवायची , छोटा असताना छान वाटायचं पण पाचवी सहावीत मला जाम ऑकवर्ड व्हायचं . 


Colourful  झिरमिळ्या लावून दिवाळी सारखं लाइटिंग करून डेकोरेशन करायची. तुझा बर्थडे मस्त Mc Donald's मध्ये व्हायचा जाम मजा यायची."


प्रणव,"मला तर कायम तुझा बर्थडे कधी येतो असं व्हायचं. विभा मावशी प्रत्येक तुझ्या 


बर्थडे ला वेगवेगळ्या शेपचा केक करायची, प्रत्येक बर्थडे चा सरप्राईज मेनू असायचा, छान घरीच. सगळ्यांना गेम खेळायला लावायची व सगळ्यांना छान बक्षीस पण द्यायची.


माझा बर्थडे नेहमीसारखा Mc Donald's मध्ये व्हायचा बर्गर ,कोल्ड्रिंक आणि तोच राउंड शेप चा केक, it was so boring "

विहान, हसत…"हो यार नंतर नंतर आम्हाला पण खूप बोर व्हायचं"

प्रणव थोडासा चिडून,"काय सांगतोस? 


बोलला नाहीस कधी?


 मी आईला म्हणायचो यावर्षी विहान सारखा माझा बर्थडे घरीच कर. विभा मावशी करते तसं काहीतरी सरप्राईज मेन्यू कर ,तर ती म्हणायची मला वेळ नाही माझं ऑफिस आहे. विभा मावशी चा जॉब लाईट ड्युटीचा आहे. 

विहान,"काय सांगतो! असं म्हणायची? माझी आई पण एका चांगल्या पोझिशनला होती बर का ! हा she always chosen me over her job. म्हणूनच कदाचित म्हणावं तेवढं तिचं करिअर flourish झाले नाही.

प्रणव, हो ना , माझा बाबा पण म्हणायचं ती खूप सिन्सिअरली जॉब करते व प्रत्येक टारगेट पूर्ण करून ऑफिसमध्ये तिला बक्षीस  मिळते. माझा बाबा पण सेम ग्रुपच्या कंपनीमध्ये पण दुसऱ्या डिव्हिजनला तेव्हा होता ना.

विहान, " हो रे! पण मला कधी कधी तिची खूपच काळजी वाटते, आता मी out of country जाणार आहे, पुढे जॉब कुठे मिळेल माहित नाही. ती जेवढी माझ्यात involved  होईल तेवढा तिलाच त्रास होईल, म्हणून सध्या मी थोडासा rude वागतो, ते तिच्याच भल्यासाठी आहे.

प्रणव एकदम चकित होत," don't worry विहू काही लागलं तर मी आहे ना.  मला जसे जमेल तशीचक्कर मारत जाईन. पण तू असं बोलून मावशीला hurt नको करूस.

विहान खाली जाऊन विभाला वर घेऊन येतो.


आई,"let me accept माझ्या व प्रणवच्या पूर्ण गप्पा फक्त आणि फक्त तुझ्या भोवतीच होत्या. Thank you तू खूप छान मेमरी आम्हाला दिल्या. I love you आई."

विभाचे डोळे भरून आले .


आज कित्येक वर्षानंतर  विहानने तिला मिठी मारून I love you म्हणाला होता.

खाली बाबाने चार कप कॉफी केली व तो पण विहान ,विभा व प्रणवच्या गप्पांमध्ये शामिल झाला.

विहान म्हणाला,"प्रणव तुला माहिती आहे का माझ्या आईला पण  प्रमोशन मिळाले आहे She is  VP of our life….


 Very Prestigious ….

विहान उत्साहात म्हणाला,"प्रणव ऐक आई साठी मी दोन ओळी तयार केल्या आहेत"

प्रणव,"ईर्शाद"

  बाबा आश्चर्याने विहांनकडे पहात म्हणाला,"अरे वा खूप वर्षांनी कविता केलीयेस, छोटा असताना तु शीघ्र कविता करायचास"

विहान थोडेसे हसून आईचे दोन्ही हात ओंजळीत घेऊन म्हणाला,

"आई म्हणजे  अजब रसायन


हक्काचे व प्रेमाचे वेगळेच मिश्रण

कुठलीच बंधने इथे नाहीत


प्रेमाचा झरा कधी आटतच नाही

धरतीवरचा हाच कल्पतरू


दुसरी तुला उपमाच नाही

निरंतर तुझा सहवास हवा


घराला तुझा आशिर्वाद हवा

आई म्हणजे  अजब रसायन


हक्काचे व प्रेमाचे वेगळेच मिश्रण"

विभा साठी हा खूपच भावुक क्षण होता.

बाबा व प्रणव नी टाळ्या वाजवून दाद दिली.

ही रम्य पहाट कधी संपू नये आयुष्यात असे सर्वांना वाटू लागले.

समाप्त


Post a Comment (0)
Previous Post Next Post