लव यू डियर

 लव यू डीयर  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ रश्मी कवीश्वर पिंप्रीकर
==========

नियती, घरा जवळच्या बगीच्यात येऊन बसली. निवांत एक कोपरा शोधत, बाकावर जाउन बसली, आणि रडू आलं. कुणी आपल्याला बघत नाही नं हे बघून तिनं आपलं मन मोकळं करून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 

थोड्या वेळानी मन शांत झाल्यावर, मन भूतकाळात जाऊन रमलं...माहेरी  आई-वड़िलांची लाडकी, मोठा भाऊ...सगळेच कौतुक करायचे, कधी कुठली कमतरता नाही की, कुणी कधी काही बोलले नाही. मनाचे "राजा" होतो.

घरी शिक्षणाचं वातावरण होतं.  बी.ए. झाल्यावर इतिहास विषयात एम.ए. पूर्ण केलं. इतिहास खूप आवडीचा विषय होता. पुढे आजून शिकायचं होतं. आपल्या देशातील मंदिरं व त्यांनचा इतिहास या वर खूप कुतूहल वाटायचे, कशी बांधली असतील ? त्यावर केलेली नक्काशी, वास्तुरचनाकार, शास्त्रज्ञ, राजे महाराजे...कसं असेल वैभव...खरोखरच खूप इतिहास आवडायचा, आणि पुढे  जाऊन प्रत्यक्ष तिथे भेट देऊन अभ्यास करायची खूप इच्छा होती. 

पण आपलं नेहमीचं, घरोघरी जे तेच आमच्या घरी, "किती शिकवणार मुलीला, लग्नाचं वय होत चाललंय, चांगला मुलगा पाहून लग्न लावून टाका ".

असे काही "जुमले" नातेवाईक आणि जवळच्यांकडून ऐकायला यायचे. मला  भरतनाट्यम नृत्य ही शिकायचं होते...पण सासरचे काय म्हणतील? तुझ्या सासरी चालेल की नाही,  या वर  मग नृत्य शिकायचे राहून गेले. माझी तशी कुठलीच तक्रार नहव्ती.  विवेक दादा पण स्पर्धा परिक्षा देऊन बैंकेत मोठ्या पदावर लागला. 

अश्यात एक दिवस, नितीन सरदेसाई यांच स्थळ सांगून आलं. घरी मोठी बहीण लग्न झालेली, ती कोल्हापूर ला असते, आणि हा मुलगा लहान, आई सोबत राहतो...वडिल पाच वर्षापूर्वीच एका अपघातात गेले. सध्या आई आणि नितीन पुण्यात राहतात. नितीन  एका अमेरिकन कंपनीत काम करत होते. 

घरी सर्वांनीच या स्थळा करता संमती दिली. आणि लवकरच"शुभमंगल " झाले.घरी आलेले पाहुणे लग्नानंतर गेले, आता फक्त नियती आणि आई  (सासुबाई) घरी असायच्या. नितीन आपल्या कामात व्यस्त असायचा. कधी कधी ऑफिसच्या कामानिमित्त देशात आणि परदेशी ही जावं लागायचे.पण नियती कडे त्याचं लक्ष असायचे, ती आपल्या घरात नवीन आहे, तिला रूळायला वेळ लागेल हे तो जाणून होता. तिच्या आवडीने, कलाने वागायचा प्रयत्न करायचा.  एकूण काय आनंदी वातावरण होतं. 

तर दुसरी कडे, नियती पण आई सोबत जुळवून घ्यायचा प्रयत्न करित होती, घरातल्या सर्व गोष्टीत मन लावून  समजून घेत होती...सगळंच काही नवीन होतं.आई पण स्वयंपाकात मदत करायच्या, चुकले की समजवून सांगायच्या....

कधीतरी फार बोर व्हायचं, काही तरी करावं असं वाटायचे.  एक दिवशी नियतीने नितीन ला विचारलं...मला पुढे शिकायचे आहे, बी. एड करून शिक्षिका व्हायचंय, असा विचार करते आहे, तर चालेल का? 

हो, हा तर फार उत्तम विचार आहे, नक्की कर,आईला देखील आनंद होईल. 

तिला खूप आनंद झाला, लगेच तयारीला लागली. घरातील आवरून बी. एड चा अभ्यास आणि काॅलेज सुरू केलं. पाहता पाहता दीड वर्ष होत आलं, लवकरच तिचा रिझल्ट लागेल या आशेवर होती नियती. 

तरी देखील कुठेतरी मनात एकटेपणा जाणवायचा. नितीन पण कामात व्यस्त असायचा. नितीन ने आपल्या सोबत वेळ घालवावा असं वाटायचं. बोलायला बरोबरीच कुणी असावं,  ही घालमेल मनात व्हायची. 

एक दिवस, घराजवळच भरतनाट्यम नृत्य चे क्लासेस दिसले. परत मनात विचार येउ लागले की लग्ना आधी जमले नाही, आता करू का?  विचारायला काय हरकत आहे. मी आज नक्कीच विचारेन. घरी गेल्यावर नितीन ला विचारलं. त्यानी लगेच होकार दिला, किती आनंद झाला नियती ला...आईनां देखील सांगितल. त्या पण जुन्या मताच्या नाहीत, लगेच हो म्हणाल्या.

आता नवीन स्वप्नात रमली नियती. नृत्यकला ची खूप आवड होती. लगेच तिथे जाऊन फार्म भरून एडमीशन घेतली. आठवड्यातून तीन दिवस क्लास असायचा. दुसरी कडे आजून बी.एड चा रिजल्ट लागायचा होता, तो पर्यंत भरतनाट्यम चे धडे घ्यायचे हे मनाशी पक्क केलं.  लहान मुलांन पासून ते पंचवीस तीस वय गटातले नृत्य शिकायला यायचे. संध्याकाळी पाच ते सहा बैच मधे तिचं नाव होतं. या बैच मधे एकूण दहाजण होते...तीन लहान मुलं सोडली तर सगळेच पंचवीस ते तीस वयोगटातील होते. समवयस्क असल्याने गप्पा गोष्टी, हसत खेळत डान्स व्हायचा. नंतर अर्धा तास घरी जायच्या आगोदर  परत गप्पा मारत घरी जायचे सगळेच.  एकूण काय मजेशीर दिवस चालले होते नियती चे.

घरी आल्यावर रोजच्या गंमती जमती आईनां सांगायची. नितीन ला देखील आफिस मधून आल्यावर क्लास मधे घडलेल्या गंमती सांगायची. 

हं, ठीक आहे...तुझ्या मनासारखे होतंय नं मग ठीक आहे. 

मला आफिसच काम आहे, अमेरिकेतील एका क्लायंट सोबत मिटींग आहे....असं म्हणून नितीन कामाला लागला.

ह्म्म्म.....मनातून खूप सांगायच होतं पण राहूनच गेले.

भरतनाट्यम शिकायला, तिच्या क्लास मधला महेश सोबत मैत्री झाली. महेश तीन महिन्यापासून शिकत होता. त्याला आता चांगलेच जमायला लागले होते. तो देखील तिच्या चुका दुरुस्त करून सांगायचा. मनाने मोकळा आणि खूप बडबडा होता. सतत त्याचे पीजे जोक्स चालू असायचे. आमच्या बैच तो लाडका होता. सकाळी काॅलेज आणि संध्याकाळी नृत्य शिकायचा. एम. बी. ए. च्या शेवटच्या वर्षात होता. नृत्याची त्याला खूप आवड होती. 

नकळतच नियती आकर्षित व्हायला लागली, त्याच्या सोबत दिवस भरात घडणाऱ्या गोष्टी शेअर करू लागली. तू असं कर, अमुक करू नको, हे बरोबर नाही...मैत्री वाढू लागली. घरून त्याच्या साठी खाऊ घेवून जाऊ  लागली. 

घरी, आईनां प्रश्न पडला की इतरवेळी बडबड करणारी ही नियती घरी गप्प गप्प का असते? सुरवाती ला दुर्लक्ष केलं पण पंधरा वीस दिवस झाले तरी काही बदल नाही. कदाचित दमून जात असेल, नृत्य करून...आल्यावर परत घरची कामे असतात, हा विचार करून थोडं दुर्लक्ष केलं.

या सर्व गोष्टी हून, दोन महिने हून गेले. भरतनाट्यम व्यवस्थित सुरू होते. पण आजून ही घरात शांत असते, हे मला नितीन ला सांगायला हवं...तु तरी निदान लक्ष दे.

नियती आणि महेश ची मैत्री चांगलीच जमली, घरातल्या सगळ्या गोष्टी ती शेअर करायची, तो आपलं ऐकून घेतो, समजून घेतो...चुकलं असेल तरी सांगतो...ही भावना नियती च्या मनात होती.

एक दिवस, क्लास झाल्यावर नियतीने महेश ला विचारलं...अरे ॠतिक रोशन चा सिनेमा लागलाय, आपण जाऊ या का? 

महेश नी दोन मिनीटं विचार करून सांगितल...तु तुझ्या नवर्‍याबरोबर जा, आणि त्याच्या सोबत प्रामाणिक राहा.  असं म्हणून महेश तिथून निघून गेला. 

नियती ला काही सुचेना, काय बोलाव...काय कराव,  हा असा का वागला? नको ते प्रश्न मनात यायला लागले. महेशच्या बोलण्या मुळे नियती खूप दुखवल्या गेली. तो असा का वागला?  आणि तिला रडू आवरेना....रडतच घरा जवळपासच्या बगीच्यात कोपर्‍यात येऊन बसली...आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 

हा विचार ,आता येत होता की खरंच नितीनचं तिच्यावर किती प्रेम आहे, आपल्याला बी.एड शिकू दिलं, नंतर भरतनाट्यम ला पण प्रेमाने संमती दिली. आई देखील समजून घेतात....आपणच चुकलो, खूप वाईट आहे मी, हे काय करत होते? मनाचा वेंधळेपणा, आजून काय...

इतक्यात, पाठीमागून आवाज आला...नियती, नियती.....

तेव्हा कुठे भानावर आली नियती...वळून बघितलं तर,नितीन मागे उभे होते....अग, किती आवाज दिले? एकटी इथे काय करत बसली? एक आनंदाची बातमी आहे...तुझा बी. एड चा रिजल्ट लागलाय, बघ तुला 78% मिळाले आहे...डिस्टिंक्शन नी उत्तीर्ण झाली आहे तु....वा, चला मॅम, सेलिब्रेशन तो बनता है.....

हे ऐकता, भानावर आली नियती, आणि तिला रडूच आलं....चटकन उभी राहिली आणि नितीनला मिठी मारली....

लव यू डियर,....बोला कुठे जायचं? नितीन म्हणाला. 

ॠतिक रोशन च्या सिनेमा ला जाऊ या आपण.....असं म्हणून तिने डोळे पुसले. आज एक नवीन नियती,नव्या रूपात, उत्साहात पुढे जायला आतुर होती. 

सौ.रश्मी कवीश्वर पिंप्रीकर 

Post a Comment (0)
Previous Post Next Post