चक्रव्यूह

।श्री।।      

 चक्रव्यूह   (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

   ✍️ अश्विनी शिरूर 

      समोर ठेवलेल्या बाबांच्या कलेवराकडे ती निर्जीवपणाने पाहत होती... आत्या, काकू तिला रडवण्याच्या मागे होत्या आणि तिला मात्र हे खरं आहे की खोटं हे कळेना झालं होतं...का बाबा, का गेलात असे निघून...लग्न लावून दिलं कि संपते का जबाबदारी....आता काय करू मी? आई एक वर्ष आधी गेली होती, ताई परदेशात , ती आणि ताई दोघी बहिणीच.... ताई तिकडे असल्यामुळे इथल्या इथे बाबांकडे बघता यावं, यासाठी ओळखीत,  नेहमी घरी येणाऱ्या समीर बरोबर तिने लग्न केलं होतं....त्याला तिच्या बाबतीत सगळं माहिती होतं ....आई बाबा तिचे लाड करत पण ताई त्यांची खूप लाडकी आहे असं तिला नेहमी वाटे, ताई गोरी,  सुंदर, sincere , हुशार.....तर ती सावळी, दंडगोबा, दंगेखोर....पण ताई च आणि तिचं चांगलं गुळपीठ असे....


ताई चं लग्न झाल्यावर आई कायम म्हणे, " हिला एक मुलगा झाला की मी सुटले!" मग तिला खूप राग येई ...मी कोणी नाहीच तुमची असं म्हंटलं कि आईबाबा हसत आणि म्हणत हो, "कोंड्यावर घेतलंय तुला"..


    कुठे तरी मनात हा सल होताच तिच्या....त्यात graduation झाल्यावर ताई च लगेच लग्न झालं आणि ती पुण्याला गेली....2 वर्षात तिच्या mr. ना कॅनडा ला जॉब लागला आणि ताई ला बाळाची चाहूल लागली....आई चा आनंद गगनात मावेना....जीजू तिकडे गेले आणि ताई इकडे आली ....गोंडस मुलगा झाला आणि त्याला घेऊन ताई कॅनडा ला गेली आणि 6 महिन्यात आई ने तिचे शब्द खरे केले...ती गेली आणि बाबा म्हणाले की तुझं लग्न झालं की मी सुटलो, just graduation झालं होतं...काही समजे पर्यंत ह्या घटना पाठोपाठ घडल्या आणि समीर च्या बोलण्यात अडकून लग्न झालं....लग्ना नंतर अवघ्या महिन्या भरात आपला निर्णय चुकला कि काय अशी शंका येऊ लागली, कारण...समीर अतिशय आळशी होता, लाडात वाढलेला ..त्यामुळे जबाबदारी नाही...सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही aim नाही.....निवांतपणा हेच ब्रीद....कष्टांची तयारी नाही....घरात पारंपरिक वातावरण, सोवळं ओवळ खूप....ती अगदीच गांगरून गेली.


2तास भेटणारा माणूस आणि 24 तास सहवासात राहणारा माणूस इतके वेगवेगळे असतील असं वाटलं नव्हतं त्यामुळे काय करावं समजत नव्हतं...लग्नाला 5 महिने झाले होते आणि pregnancy कन्फर्म झाली....बाबांना सांगू आणि देवाला जाऊ असं ठरवलं आणि बाबा हे असे निघून गेलेत....काय करू मी.....आत्ता खरी ती भानावर आली.....एकच आक्रोश केला आणि बेशुद्ध झाली....ताई 4 दिवसांनी आली, आता आम्ही दोघीच या जगात एकमेकींना.....बाळंतपण कोण करणार , जबाबदारी पडेल म्हणून नातेवाईकांनी हात झटकले....मुलगा झाला....ती पण तक्रारी विसरून रमली संसारात...हुशार अतिशय active अश्या श्रेयस मध्ये गुंतून गेली...पण अवघ्या 3 वर्षात समीर च्या business चे 12वाजले....कर्ज झालं....सासर्यानी थोडी मदत केली, तिच्या बाबांचे पैसे आले होते ते दागिने सगळं गेलं....एवढा शिकलेला masters केलेला माणूस घरात बसून राहिला, भरीत भर म्हणजे drinks आणि पत्ते दोन्हीच व्यसन लागलं....तिला तर काहीच सुचेना....सगळ्या पद्धतीने समजावलं पण गाव सोडायला किंवा नोकरी करायला तयार होईना. पैशाची चणचण भासू लागली...श्रेयस ची फी भरायला पैसे नाहीत अशी कंडिशन झाली..... ताई त्याच दरम्यान आली होती तिने पैसे दिले आणि श्रेयस कडे बघत करता येईल असं छोटा मोठा oriflem , tupper ware , दागिने विकणे असं चालू करून दिलं..... श्रेयस पाहिलीत गेल्यावर नोकरी चालू केली ....समीर निवांत च होता, कोणत्याही प्रकारची मदत करायचा नाही, घरकाम, श्रेयस ला सोडणे किंवा आणणे, त्याचा अभ्यास कशातही लक्ष घालत नसे, रात्री घरी उशिरा येणे, चिडचिड करणे यामुळे ती अगदी कंटाळून गेली होती, ताई वेगळं होण्याचा सल्ला देत होती खरं तिच्या एकटीच्या कमाई वर श्रेयस ला घेऊन वेगळं राहणं अवघड होतं.... तो पैसे मिळवत नसला तरी त्याने जाणिवेने राहावं, प्रेम तरी द्यावं, जे जमेल ते करावं असं तिला वाटत होतं पण त्याच्या स्वभावामुळे ती वैतागून गेली होती, साध्या साध्या गोष्टींची अपेक्षा होती तिला, स्वयंपाक चांगला झालाय म्हणावं, साडी छान दिसते म्हणावं, तू दमतेस असं म्हणावं ....पण एका शब्दानेही तो कौतुक करत नसे.....


    तिच्या लक्षात आलं होतं की तो खुप स्वार्थी होता, स्वतः पलीकडे तो इतरांचा अगदी श्रेयस चा हि विचार करत नसे, seprate होण्याचा decision तिने घेतला तेव्हा श्रेयस 10 वर्षाचा होता. जेव्हा तिने त्याला हे सांगितलं तेव्हा त्याला धक्का बसला कारण कोणीच नाही हिला , हि कुठे जाते असं त्याला वाटत होतं....4 दिवसांनी जेव्हा तिची तयारी बघितली तेव्हा त्याने तिला नोकरी मिळाली मला , तू विचार कर ...श्रेयस चा विचार कर, मी नीट वागेन पण मला सोडून जाऊ नको अशी विनवणी केली....सासू सासरे पण म्हणाले की आता सुधारेल नाही तर अजून बिघडेल ...drinks सोडले आहेत ...मोडणे सोपं आहे जोडणं कठीण .....सगळ्यांचा विचार करून तिने त्याला चान्स द्यायचा ठरवला....त्याने मात्र खूप व्यवहारी विचार केला होता, हे त्यानेच निर्लल्ज पणे सांगितलं नंतर....ऑड वयात परत लग्न होणार नाही, आईला काम होत नाही मग काम स्वयंपाक आणि आई बाबांचं कोण करणार ...त्यापेक्षा ह्या मूर्ख बाई ला च गुंडाळले तर बरं!पण तोपर्यंत वेळ पुढे गेली होती... काही प्रमाणात सुधारणा झाली....2-3वर्ष बरी गेली...पण पत्ते सुटेनात.....श्रेयस ला हि आता समजायला लागलं होतं....त्यांचं आणि समीर चा वाद होत होता....नोकऱ्या बदलायच्या, 6 महिने काम करेल तर 6महिने बसून असं चाललं होतं....ती मात्र नोकरीत चांगली सेट झाली होती....पण पैसे पुरत नव्हते...कधी ताई कडून, कधी मैत्रिणी कडून घेऊन भागवभागवी करावी लागत होती ....श्रेयसच्या 12 वि ला तर समीर ने मला त्याला शिकवायला जमणार नाही , नोकरी करुदे आणि external शिकुदे अशी भूमिका घेतली....श्रेयस ने engineering केलं....तिने कर्ज काढून शिकवलं....ह्या मधल्या काळात सासऱ्यांचं आजारपण , hospitalaztion , सगळं तिने निभावलं.... सासरे गेले, सासूबाई चं आजारपण झालं....त्या विक्षिप्त झाल्या होत्या, समीर मनाला येईल तसं वागत होता त्यामुळे श्रेयस आणि समीर च भांडण होत होतं.... शेवटी श्रेयस ने तिला घेऊन बाजूला राहायचं ठरवलं आणि ती आणि श्रेयस वेगळे राहायला लागले. श्रेयस जरी तिच्या बरोबर असला तरी त्याला बाबा बद्दल प्रेम होतं.... हळवा होता श्रेयस खूप...त्यामुळे तो बऱ्याचदा बाबांवर चिडायचंही आणि माफ पण करायचा....श्रेयस ला नोकरी लागली आणि समीर अजून निवांत झाला....श्रेयासच्या emmotional स्वभावाचा समीर खूप फायदा घेत असे....


      मधल्या काळात ऑफिस मधल्या अंकुश बरोबर तिची छान wavelength जुळली होती...अंकुश स्वभावाने खूप लाजरा बुजरा होता...पण एक दिवस तिने डब्यात ओल्या नारळाच्या करंज्या आणल्या त्याला खूप आवडल्या... खुप कौतुक केलं त्याने...मग ते नेहमी डबा एकत्र खाऊ लागले, तो सगळे पदार्थ आवडीने खायचा न कौतुक पण करायचा....ते एकमेकांबरोबर सगळं share करू लागले होते,कधी तिने साडी नेसली कि तो लगेच पसंती दाखवायचा...नवीन ड्रेस घातला कि कसा आहे वगैरे सांगे, तिचा मूड लगेच ओळखे, खोदून खोदून विचारून घेई आणि धीर देत राही... त्याची फॅमिली सुद्धा खूप छान होती तर अंकुश ची बायको नम्रता तिची चांगली मैत्रीण झाली होती....अंकुश गप्पा मारायला घरी येत असे....समीर ला अंकुश चा राग होता....त्याला वाटायचं ती अंकुश बरोबर तुलना करते आणि अर्थात अंकुश चं पारडं खूप जड होतं... तो त्याच्या family वर खूप प्रेम करत असे आणि तो खूपच जबाबदार होता....


      एक दिवस श्रेयस समीर कडून आला ते चिडून च आला....त्याने तिला समोर बसवले आणि सांगितलं की आज पासून अंकुश घरी आलेलं मला चालणार नाही....बाबांच्या कानावर तुमच्या दोघांच्या बाबतीत काही न काही आलंय.... ती अवाक झाली....सगळ्या गोष्टींची शहानिशा करून घेतली तिने दुसरे दिवशी...समीर अर्थात खोटा ठरला....श्रेयस लाही चूक कळली ...तरी तो लोकांसाठी आपण जपून राहिलेलं बरं म्हणून अंकुशच्या घरी न येण्या वर ठाम होता...पण तिच्या डोक्यात मात्र राग धुमसत होता...किती छोट्या छोट्या अपेक्षा होत्या तिच्या ...प्रेम, कौतुक, आधार, काळजी..पण तेवढेही समीरने कधी केलं नव्हतं.


    इतकी वर्षे प्रामाणिक राहून कष्ट करून संसार ओढल्याचं हे फळं?


    कोणत्याही प्रकारचे apriciation नसताना मुला साठी इथे पर्यंत आलो सांभाळून घेत ते हे ऐकून घेण्यासाठी?


      तारुण्य, उमेदीच्या सगळ्या वर्षांची राख झाली तरी निमूट सहन केलं त्याचं काय?


    आपण मुलाच्या मैत्रिणी त्यांचं एकत्र राहणं फिरणं accept करतो तर त्याला आई चा मित्र हि कल्पना सहन होऊ नये? तो पुढच्या पिढीचा कि मी?


    ज्या मुलासाठी हे सगळं सहन केलं तो हि बंधनं आता मला घालणार?माझा माझ्या मनाचा विचार करावा असं त्याला वाटू नये?


    मी divorce घेऊन remarriage करावं असं ताई चं म्हणणं होतं... श्रेयसने remarriage ला नकार दिला....मला कोणी तरी पार्टनर पाहिजे हा विचार बहुतेक त्याच्या मनात येतच नाही...मलाही आगीतून फुफाट्यात जाण्याची भीती आहे...पण एक चांगला मित्र मला नक्कीच हवा आहे...का त्याला हे जाणवू नये ....


   लग्न झाल्या पासून ह्या चक्रव्यूहात अडकले आहे...पहिला समाज, मग मुलगा, आणि परत समाज आणि मुलगा ....कशी सुटका होणार ह्यातून...काय मार्ग आहे....तिने स्वतः साठी जगायचं कि नाही? कशी बाहेर पडणार ह्या चक्रव्यूहातून????

अश्विनी शिरूर.


Post a Comment (0)
Previous Post Next Post