टोणगे घराण्याची बखर (अक्षरचाफा कथा स्पर्धा)
✍️ साधना गोखले
टगेवाडीतला मन्या दगडे "हे एक अतरंगी व्यक्तीमत्व होते.अभ्यास सोडून बाकी सगळॆ धंदे तो करून बसला होता.
गावातले बरेच उडाणटप्पू तरूण त्याचे मित्र होते.आणि देवाला सोडलेल्या वळॣसारखे सगळॆ दिवसभर उंडारत असायचे.मन्याच्या डोक्यात नेहमी नवीन नवीन कल्पना यायच्या.एकदा त्याने बेवारस झुरळ पालनकेंद्र सुरू केले.घराच्या मागच्या अंगणात एका गंजलेल्या पत्र्याच्या पेटीत हा सारा खजिना ठेवून तो निश्चिंत होता.
एकदा रात्री त्याच्या घरात अंगणाच्या बाजूने चोर शिरले.त्यांना ती पेटी दिसल्यावर मागचापुढचा विचार न करता त्यांनी ती पेटी तोडली,आणि....आतल्या सेनेने त्यांचा ताबा घेतला.त्या झुरळऻंना बाजूला करता करता ते आरडाओरडा करू लागले.या गडबडीत गाव जागे झाले,आणि चोरांना पोलिसांच्या ताब्यात दिले गेलॆ.तेव्हापासून त्याला #झुरळॆ असे टोपणनाव पडले.
एकदा एका दुचाकीस्वाराच्या खिशातले पाकीट त्याने हळॣच काढून घेतले.पुढच्या वळणावर तो थांबल्यावर मन्याने त्याला पाकीट परत देऊन भलेमोठे लेक्चर दिले,आणि त्याच्याच पाकीटातले १०००/_रू.बक्षिस म्हणून काढून घेतले.
आईवडील या सगळ्याला कंटाळले होते,पण मन्या त्यांना मी आपल्या घराण्याचे नाव उज्वल करून दाखवीन.असे सांगून गप्प बसवायचा.
एकदा त्याच्या डोक्यात गावातल्या २-३ जुन्या वाड्यांचे सर्वेक्षण करायचे खूळ आले.लगेच त्याने तालुक्याला जाऊन एक कॅमेरा....आदि साहित्य आठ दिवसांकरता भाड्याने आणले.आणि दुसर्या दिवसापासून त्याची मोहीम सुरू झाली.
दुसर्या दिवशी जेवण झाल्यावर आपला जिगरी दोस्त सदा वाकडेला घेऊन तो निघाला.
सगळॆ गाव फिरून झाल्यावर ते गावाबाहेरच्या एका वाड्याजवळ आले,आणि.....
काय तुम्ही पण लगेच तो पडका वाडा भुताटकीने भारलेला होता,असा अंदाज बांधलात ना?पण तसं नाहीये.तो वाडा #टोणगेवाडा म्हणून प्रसिध्द होता.आणि टोणग्यांचा सध्याचा वंशज अनेक वर्षांपासून मुंबईला असल्याने त्याला भलेमोठे कुलूप होते.
पण असल्या अडचणी मन्यासाठी अगदीच किरकोळ होत्या.त्याने दगडाने कुलूप तोडून वाड्यात प्रवेश केला.
तो तीनमजली वाडा अतिभव्य आणि जुन्या पध्दतीचा होता.मधे चौक,आणि प्रत्येक मजल्यावर दोन्हीबाजूला मोठमोठ्या खोल्या होत्या.मागे भलेमोठे स्वैपाकघर,न्हाणीघर होते.परसदारी एक आड,आणि फुलझाडे होती.मन्या सगळॆ पहात पुढेपुढे जात होता.दुसर्या मजल्यावर एका खोलीच्या दारावर लिहिलेल्या अक्षरांनी त्याचे लक्ष वेधून घेतले.तिथे लिहिले होते....#टोणगेघराण्याचीबखर
खोलीचे दार उघडताच कोंदट,कुबट वासाने मन्या आणि सदाचे डोके भणाणले.पण हाताने जाळ्या बाजूला करत ते पुढे गेले.मध्यभागी आठदहा मोठ्या गाठोड्यांवर रूमाल नं.१....२..... असे लिहिले होते.दोघेजण धूळ बाजूला करून खाली बसले,आणि त्यांनी पहिल्या रूमालाची गाठ सोडली.त्यातल्या कागदपत्रांचे वर्णन पुढीलप्रमाणे
#शहाजीराजांच्या पागेतील ५०व्या घोड्याचे मोतदार (नंतर बढती मिळऻलेले सरदार) श्रीमंत धोंडीराम कावळऻजी टोणगे यांची वंशावळ
धोंडीराम कावळऻजी टोणगे
यांना एकुण ८ पत्नी आणि ६० मुले होती.त्याचा तपशील पुढीलप्रमाणे
#प्रथमपत्नी .....रमाबाई धोंडीराम
संतती....६कन्या (सीताबाई,गीताबाई,धोंडाबाई,भिकाबाई,कमळऻबाई,कृष्णाबाई),४पुत्र.....(कोंडाजी,जिवाजी,विष्णू,शंकर)
द्वितीय पत्नी....उमाबाई धोंडीराम
संतती.....
१०पुत्र,४कन्या.....
तृतीय पत्नी.....लक्ष्मीबाई धोंडीराम
संतती.....९कन्या....
या सगळ्याला सदा कंटाळला.
"मन्या,बास रे या टोणग्यांना किती पोरं होती,हे कळलं,आता बंद कर तो रूमाल."🤓🤓
मग दुसरा रूमाल उघडला.त्यात टोणगे यांच्या जीवनातील कौटुंबिक आनंदाचे प्रसंग वर्णन केले होते.
#प्रसंग_१
चौथी पत्नी लताबाईच्या सहाव्या मुलाचे बारसे.....
स्वयंघोषित सरदार टोणगे यांच्या चौथ्या पत्नीच्या सहाव्या चिरंजीवांचे बारसे थाटात पार पडले.
नामकरणसमयी या एकुणात ४७ व्या अपत्याचा भार सोसून पाळण्याच्या कडा कमजोर झाल्या होत्या.खानदानी पाळणा,म्हणून प्रत्येकवेळॆला हाच वापरला जाई.
यासमयी त्यांच्या सत्तावीसाव्या पुत्राची पत्नी गंगाबाई हिने रचलेला पाळणा....
आलास तू,आलास तू टोणगे कुळऻत
जसा मोहाचा एक नारळऻत
नीज रे छकुल्या टोणग्या बाळऻ
मी चूळ भरते खळखळऻ
धाकला भावंडात नंबर ४७
गोड जसा फूल आले वेलीस. 🤣🤣😁
दुसरा प्रसंग लग्नाचा होता.
स्वयंघोषित सरदार टोणगे लिहितात.....
आमच्या तिसाव्या कन्या रूख्मिणीबाई यांचा विवाह शेजारच्या मुलुखातील सरदार रेडे यांचे सतरावे चिरंजीव माणिकराव यांच्याशी येत्या दशमीला करण्याचे योजिले आहे.
त्याच्या तयारीसाठी बैठक बोलावली होती,पण ती अचानक रहित करावी लागली,कारण रूख्मिणीबाई माध्यान्हीपासून घरातून गायब आहेत.त्यांच्या शोधासाठी शोधपथकं पाठवली आहेत.
त्याप्रसंगीचे संभाषणही संवादरूपाने दिले होते.😁
#सरदार_टोणगे....मासाहेब,रूख्मिणीबाई कुठे आहेत?वाड्यात त्यांचा मागमूसही नाही!🤔
#मासाहेब....गेल्या असतील गाव कोळपायला!,एकदा सासरी गेल्या की सुटलो आपण!"🤓🤓
इतक्यात सेवक एक पत्र आणून टोणग्यांच्या हाती देतो.
पत्र असे असते
प्राणप्रिय रूख्मिणी,
तुला प्रथम जेव्हा हनुमान मंदिरात पाहिले, तेव्हाच मी मनोमन तुझा धर्मपत्नी म्हणून स्विकार केला आहे.पण प्राणेश्वरी,आपल्यातील सांपत्तिक दरी खूप मोठी आहे.
तू एक सरदारकन्या आणि मी एक पाणक्या.....पण आपण ह्या कशाची तमा न बाळगता विवाहबं
विवाहबंधनात बध्द झाले पाहिजे.तुझ्यासाठी मी या काव्यपंक्ती लिहिल्या आहेत.
हे कमलिनी,हे गंधमोहिनी
माझ्या ह्रदयाच्या पुष्करिणीत
विहार करणार्या
मालिनी...
माझ्या काळजावर तुझेच नाव कोरलेले आहे.
मी जरी लोकांकडे पाणी भरण्याचे काम करत असलो,तरी माझ्या प्रेमाची रिती घागर तुलाच आपल्या प्रेमामृताने भरायची आहे.
#तुझातहानलेलाचातक
बभ्रुवाहन_खाटपे 🤣
"मन्या,हे लव्हलेटर प्रकरण त्या काळऻत पण होते की!" सदा आज आपल्याला एक महत्वाची माहिती हाती आली आहे.आपण ही बखर सापडल्याची माहिती स्थानिक वर्तमानपत्रात देऊन चार पैसे मिळवूया."😁😁
अरे पण मन्या.....
त्याला काही बोलू न देता ते तीनचार कागद घेऊन मन्या त्या वाड्यातून बाहेर पडला.
आई,आई लवकर जेवायला वाढ,भूक लागलीय.". 'आलास दिवसभर उंडारून!अरे दुपारी गिळॣन बाहेर पडलास,ते आत्ता उगवतोयस,एवढा सत्तावीस वर्षांचा घोडा झालास,लाज वाटायला पाहिजे.'😡त्याची आई कावून बोलली.
सत्तावीस वर्षांचा झालो,तर लाज वाटण्यासारखे काय आहे?'🤔 आता तुला बायका बुढ्ढी घोडी म्हणतात,शेजारच्या गद्रेकाकू तर तुला खोटी पिसं लावलेली कोंबडी म्हणतात,तरी तुला काही वाटत नाही,मग मला लाज का वाटावी?"🤓🤓
मन्या,मेल्या माझी लाज काढतोस?"जरा कामधंदा बघ आता,उंडगेगिरी थांबव,आई म्हणाली.
"आई,आज, तू नुसता एरंडासारखा वाढलास," म्हणायची विसरलीस की काय?"मन्या भाकरीचा बकाणा तोंडात कोंबता कोंबता म्हणाला.🤣🤣
दुसर्या दिवशी मन्याने त्याला सापडलेली पाने स्थानिक वर्तमानपत्र #दै.बोंबाबोंब चे संपादक आगलावे यांना नेऊन दिली.आणि रद्दीचा गठ्ठा घेऊन गेला.
रात्री जेवून त्याने ताणून दिली.पण सकाळ-सकाळ अचानक बसलेल्या लाथेने त्याचा निद्राभंग झाला.
"काय रे नालायका,टोणगे घराण्याचा दर २५ रू. किलो?आणि बभ्रूवाहन खाटपे जातीचा आंबा २०० रू.किलो?" काल तू लिहिलेल्या यादीचा हा कागद !'
ह्याह्याह्याह्या...बाबा,आज उठल्या उठल्याच पेग मारलात की काय?'कैच्याकै बरळताय.'
यावर "नालायक,उंडग्या तुला काल सामान आणायला यादी दिली होती ना ?"आणि तू हा गोंधळ घालून ठेवलास?"😂शेवटी मीच तोंडी सांगून सामान आणले.
कोण टोणगे,कोण खाटपे?"'
बाबा,ती बखरीतली पानं आहेत.किराणा आणि भाजीची यादी लिहिताना त्याच विचारात असल्याने हा गोंधळ झाला.
मी टोणगे घराण्याची बखर"यावर संशोधन करणार आहे.काल त्या टोणगेवाड्यात जाऊन हे कागद आणले.
असे म्हणून तीर्थरूपांना आश्चर्यात टाकून मन्या तिथून निघून गेला.
दुपारी परत तो टोणगेवाड्यात गेला.कालच्या उघडलेल्या रूमालावर एक उंदीर बसून त्याच्याकडे बघत होता.काठीने त्याला मारून सोबत आणलेल्या वहीत मन्या लिहू लागला
काल इथून ढापून नेलेल्या चार-पाच कागदांवरून टोणगे आणि खाटपे घराण्याच्या वैराचे कारण आपल्याला समजू शकते.अर्थात याला फक्त माझ्या संशोधनाचा आधार आहे.🤓
आजच्या संशोधनाची सुरवातच रक्तपाताने झाली.रूमालावर बसलेल्या मूषकाचा नाईलाजाने वध करून मी माझे संशोधन पुढे नेतोय.😁
त्याने दुसरा रूमाल उघडला.
टोणग्यांची लफडी"अशा शीर्षकाचे बाड खोलून तो पाहू लागला.
स्वयंघोषित सरदार टोणगे यांची वर्तणूक उपनामाप्रमाणेच होती.🤓आठ पत्नी असतानाही त्यांचे पंचक्रोशीतल्या प्रत्येक गावात जिव्हाळ्याचे संबंध होते.
पुढची पिढी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारी निघाली.प्रथमपत्नी रमाबाईंचे तिसरे पुत्र विष्णु यांनी गावातील हिराबाईशी केलेली मैत्री सहन न झाल्याने त्यांच्या (विष्णू हो)चौथ्या पत्नीने आत्महत्या केली.
आठव्या पत्नीची सातवी कन्या निलाक्षी त्यांचे कट्टर वैरी खाटपे यांचे नातू ळक्ष्यराम (नावरुशीत #ळ अक्षर आले होते म्हणून ळक्षराम)यांच्या प्रेमात पडून घरातून पळॣन गेल्याची सुरसकथा ऐकावयास मिळते.
गावात अनेकांना फसवून त्यांनी लक्षावधी मोहरा प्राप्त केल्या.
अशाप्रकारे मन्याने त्या वाड्यातील आठही रूमालातील कागदपत्रांची छाननी करून काही निष्कर्ष काढले.
१)टोणगे घराण्यातील तमाम पुरूष लफडेबाज होते.
२)त्यांच्या घरातील बंदुकांना वाघ,सिंह सोडा,पण सशाचेही रक्ताचा स्पर्श झाला नव्हता.🤓
३)विषेश कामगिरीच्या नावाखाली त्यांनी फक्त अनेक लग्ने करून वारेमाप प्रजा वाढवली.😁
४)त्यांच्या काळऻत साथीचे आजार,अपमत्यू आदींचे लक्षणीय प्रमाण असूनही एवढी वंशवृध्दी झाली,मग ते आत्ताच्या काळऻत असते तर.....🤣🤣
५)शिक्षणाचा किंवा त्यासंबंधीचा उल्लेखही यात आढळत नाही,यावरूनच त्यांना अंगठेबहाद्दर या पदवीने गौरवण्यात आले होते.
६)ज्याने हा इतिहास लिहिला त्याच्या नावाचा पत्ता लागत नाही,कारण पहिल्या प्रकरणाचे पहिलेच पानाला वाळवी लागल्याने ले*क---- थो....दादाहे* सु* सु*सु* एवढीच अक्षरे शाबूत आहेत.🤣
हे संशोधन मी पूर्ण केले आहे.
अशारितीने त्याचे पुढचे तीनचार फार धावपळ करण्यात गेले.
सगळ्या कागदपत्रांचे बाड घेऊन तो वृत्तपत्र कार्यालयात गेला.
तिथे लेख छापून आल्यावर त्याला "शी टिव्हीकडून मुलाखतीसाठी बोलावणे आले,आणि तो रातोरात स्टार झाला.🤓😎मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला.
यामुळॆ गावातली सौंदर्यवती सुशी टुकटुकेने त्याला प्रेमपत्र पाठवले.तो हवेत तरंगायला लागला.
पण हे फार काळ टिकले नाही.
एक दिवस भल्या पहाटे कुणीतरी त्याच्या घराचे दार जोरात खडखडवले.कुटंय तो मण्या?'मण्या....मण्या भायेर ये आधी!'
कोण तडफडलं,इतक्या सकाळ-सकाळ?'असे बडबडत सौ.नाजुका दगडे बाहेर आल्या.बघतात तर एक अगडबंब राक्षसासारखा दिसणारा मागे केस बांधलेला माणूस उभा होता.त्याला बघून टॉमीसुध्दा शेपुट घालून आत पळऻला.
त्यांना असं बघताना बघून तो म्हणाला...."ए म्हातारे,तोंड मिट,माशी जाईल आतमधे!"हा सगळऻ गोंधळ ऐकून मन्या बाहेर आला.
"आई,कोण आलंय?' 'अरे बापरे!दिव्यातला जिन्न इथे कसा?'
"मी दिव्यात राहणारा वाटलो काय रे चिरकुट?'
मी खाटपे घराण्याचा वंशज! बभ्रूवाहन खाटपे माझा खापर-खापर पणज्याचा खापर खापर पणजा!
अरे वा!मुलाखत घ्यायला आलात ना?"
मुलाखत घेईल माझा बाप!मी जाब इचारायला आलोय.'
काय रे मेल्या,कसला जाब?' तू गप म्हातारे,मधी नाक खुपसू नको.'🤓🤓
"आपल्याला म्हातारी म्हटल्याने सौ दगडे भयंकर संतापल्या.😁
ए,मी फक्त ४५ वर्षांची आहे.म्हातारी काय म्हणतोस?"
"आई,गुंडाला खरं वयं काय सांगतेयस?"🤣
ए,तुमची नाटकं बंद करा.'काय रे फुसक्या लवंगी फटाक्या!'लै चरबी चढली व्हय.आमच्या खाटपे घराण्याला बदनाम करतो काय?'बभ्रूवाहन पणज्यानी टोनग्यांच्या लेकीशी लफडं केलं काय?" (तो गुंड मन्याची धुलाई करता करता म्हणाला.)
"अहो,हे मी नाही,ते सु सु....
" तसलं काय करायचं नाय.😁
"अहो,ते सु सु नावाच्या इतिहासकाराने लिहिलय,मी नाही." मन्या सुजलेल्या गालावरून हात फिरवत म्हणाला.इतक्यात एक ८०-८५ वर्षांच्या म्हातार्या आजी मन्याची चौकशी करत आल्या.
कुठेय तो दगडधोंडा?,त्याचं थोबाडच फोडते आता!'रूख्मिणीबाई म्हणजे माझ्या पणजीची खापरपणजी बरं का!"
ती तिच्या लग्नाची बोलणी चालू असताना पळॣन गेली,होय रे पडवळऻ!'ते सुध्दा खाटपे अशा अडनावाच्या माणसाबरोबर?"🤓अरे करपलेल्या वांग्या,अशी बदनामी करतोस होय आमची?मी टोणगे घराण्याची लेक आणि लांडग्यांची सून आहे,तुझी मुंडी मुरगाळॣन टाकीन."
"आजी,तुमचा चष्मा पडला.'असे म्हणणार्या मन्याला खाटपे घराण्याच्या राक्षसाने झुरळऻसारखे उचलून लांब फेकले.म्हातारी तणतणत निघून गेली.ह्या प्रकरणाचा बराच गवगवा झाला.टोणग्यांच्या परदेशातील वंशजांनी मन्याविरोधात तक्रार दाखल केली.ते प्रकरण मिटवताना त्याच्या वडिलांना नाकीनऊ आले.खाटपेच्या त्या राक्षसाला मारहाणीच्या आरोपावरून अटक झाली.
मन्याला टुकटुकेने नकार दिला.नंतर काही दिवस तो शांत होता.वडिलांना वाटलं,मुलगा सुधारला.😎
एके दिवशी मन्या वडिलांना म्हणाला,'बाबा मी आता हे सगळं सोडून दिलंय,आता मी वेरूळ अजिंठाला चाललोय.'. 'ट्रीपला का ?"
नाही बाबा,मी तिथे राहून त्या काळऻतले लोक,जुलाब,किंवा जंत झाल्यावर काय औषध घ्यायचे,यावर संशोधन करणार आहे."🤣🤣😁
वडील आ" वासून बघत राहिले.
#समाप्त
story by Mrs. Sadhana Gokhale