इवान (blessings of God) भाग अंतिम
अपर्णा पाटोळे
मागील भाग
👇
मेघाने कसं बसं स्वतःला सावरलं, चेहऱ्यावर उसना आनंद आणून एमिलीला सामोरी गेली.
नाॅर्मलच डेलिव्हरी झाल्यामुळे ,बाळ ही हेल्दी ,काहीच काॅमप्लीकेशन्स नसल्याने दोन दिवसात एमिलीला डिसचार्ज मिळाला. मेघा तीला घरी घेऊन आली,
कुणालला खुप महत्वाच्या मिटिंग साठी परदेशात जावे लागले आणि नंदिता आजारी आहे. एक महिन्याने दोघेही येतील.असे तिने एमिलीला सांगितले.
इवलेसे ते निष्पाप बाळ काय नशिब घेऊन आले? मेघाचा जीव कळवळायचा विचार करून. मेघाला आधिच अॅडव्हान्स भरपूर रक्कम कुणाल ने दिलेली होती. ठरलेली अमाउंट एमिलीच्या अकाउंट मधेही जमा केली गेली होती. सध्या तरी अर्थिक प्रश्न काहीच नव्हता.
बघता बघता महिना झाला. एमिलीला बाळाचा खूप लळा लागला होता. कुणाल नंदिता आल्यावर आपला त्याच्यावरचा हक्क संपणार या विचाराने ती अस्वस्थ होत होती.
असे किती दिवस चालणार? पुढे काय? याचा विचार करून मेघाने एमिलीला खरं काय ते सांगितलं.
ऐकून धक्का बसल्याने एमिलीचं डोकं गरगरायला लागलं तिकडे कुणालची बातमी समजल्यावर एमिलीच्या काळजीने रिचाला चैन पडत नव्हतं .
न राहवून ग्लोरीला घेऊन ती डाॅ. नमिता कडे गेली व तीलाही खरं काय ते सांगून टाकलं. ग्लोरीला हे सगळे ऐकून जबरदस्त धक्काच बसला.एमिली परस्पर असा काही निर्णय घेईल ? तिला विश्वासच बसत नव्हता. लगेचच तीने रिचाला बरोबर घेऊन दिल्लीला धाव घेतली.
ग्लोरीला तिथे बघून एमिली चक्राऊन गेली आणि प्रचंड घाबरली. कशासाठी हे सगळे केलं ते ग्लोरीला सांगत होती.
ग्लोरीला ते अजिबात पटलं नव्हतं. एवढा मोठ्ठा निर्णय घेण्याअधी कल्पना तरी द्यायची होती असं तिचं म्हणणं होतं. आता यातून मार्ग तरी कसा काढावा ती विचार करत होती. रागाच्या भरात जास्त काही बोलून गेले तर एमिली परत काहीतरी चुकीचा निर्णय घ्यायची आणि तिची अशी अवस्था बघता ती थोडी शांत राहीली. ते बाळ कुणालच्या नातेवाइकांकडे सुपुर्त करावं असं ठरवलं.
मेघाचे काम संपले होते. म्हणून ती तिच्या घरी निघाली. ग्लोरी एमिली पण मुंबईला आल्या .
थोड्या स्थिरावल्या मग अॅग्रीमेंटची काॅपी घेऊन कुणालच्या बहीणीकडे गेल्या, कुणाल नंतर त्याच्या प्राॅपर्टीची इनहेरिटर तीच होती कारण त्याला तिच्याशिवाय कोणी नव्हतंच. कुणालच्या बहीणीला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. ती त्या बाळाचा स्विकार करायला तयार झाली नाही.
डाॅ . नमिता हवी ती मदत करायला तयार होत्या , डी एन ए रिपोर्ट घेऊन आपण केस फाइल करू शकतो असं त्यांचं म्हणणं होतं.
आता वकील कोर्ट, कचेरी बदनामी याच्या चक्रात अडकायला नको. पुन्हा त्या निष्पाप अजाण बाळाचा मनापासून सांभाळ नाहीच केला तर ?म्हणून ग्लोरीने त्या बाळाचा स्वतःच सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. ग्लोरीने मुंबई सोडून गोव्याला जायचं ठरवलं..
जे काही झालं ती गाॅडची इच्छा समजून नव्याने आयुष्य सुरू करावं असं दोघींनी ठरवलं .
दोघी गोव्यात दाखल झाल्या. परत होम स्टे चालू करावे या विचारात होत्या . कुणाल चे पैसे आपल्यासाठी वापरायचे नाहीत हे ग्लोरीचं म्हणणं होतं.
तीने साठवलेल्या काही पुंजीतून नविन इंटेरिअर केले. छोटेसे कँटिन ही चालू केले.
नारळी पोफळीच्या झाडांमधे असलेले टुमदार घर .
घराबाहेर गार्डन , तिथूनच बिचवर जायला पायवाट होती.गार्डन मधे शेड करून तिथेच टेबल खुर्च्या अरेंज केल्या. झाडांना हॅमाॅक्स बांधले .
सकाळी समुद्राकडे बघत ब्रेफास्ट करायला ,संध्याकाळी , ड्रिंक्स घ्यायला आलेल्या गेस्टस् ला खुप आवडायचं.
घराच्या पुढच्या बाजूला तसेच वरच्या मजल्यावर गेस्ट रूमस होत्या . रूम मधे डबल बेड त्यावर सुंदर स्वच्छ बेडकव्हर्स खिडक्यांना फ्लोरल डिझाइनचे कर्टन्स ,स्वच्छता टापटीप यात काहीही कमी नव्हती. बाहेर मोठी बाल्कनी तिथून होणारे समुद्र दर्शन व समुद्राकडून येणारा उत्साहवर्धक वारा यामुळे फाॅरेन डेलिगेट्सही महिना महिनाभर येऊन राहू लागले.
ग्लोरीचे आपुलकीचे बोलणे तिने बनवलेल्या काॅन्टीनेंटल ,इंडियन फूडवर ते फार खुश असायचे. बिचवर शॅकस् ही चालू केले. पैसाही भरपूर मिळू लागला. हे सगळं छोट्या बेबीच्या पायगुणाने झालं असं ग्लोरीला वाटायचं.
देवाने दिलेला आशिर्वाद म्हणून एमिलीने त्याचे नाव ईवान ठेवलं. ईवान एकीकडे मोठा होत होता . होम स्टे पण चांगलं चालत होतं. ग्लोरीला एमिलीची काळजी होती. तीने शिक्षण पुर्ण करायला हवे. तीचं लग्न व्हावं असं वाटायचं.
एमिली ईवान मधे खुप रमून गेली होती. जे चाललय ते छान आहे असं ती ग्लोरीला म्हणायची.
नोव्होंबर ,डिसेंबर महिन्यात तर दोघींना अजिबात उसंत मिळायची नाही.
एक दिवस ग्लोरी मार्केट मधे गेलेली असताना , उंच पुरा गोरा पान ,डोळ्यांमधे निळसर झाक, साधारण तीशीतला यंग मुलगा होम स्टे ची एनक्वायरी करायला आला. डोअर बेल वाजताच एमिली ने दार उघडले अन् त्याला बघतच राहीली. त्याच्या निळ्या डोळ्यात हरवून गेली.
Excuse me. Hello m Darrel from u k!! can I get the rooms on rent at ur homestay? The beach view is amazing from dis place . तो तीला विचारत होता आणि ही त्याच्या डोळ्यात हरवली होती. Hellllo ,hellllo
त्याने तिला हाताने हालवले तेव्हा ती भानावर आली. can I get 2 rooms for 2 months?my perents r also join me after some days to celebrate christmas!! I’ll pay in advance.Wat’s the teriff?
Ohh yess you can . Well come असे म्हणत तीने डॅरल ला वरच्या मजल्यावरची रूम दाखवली. त्याने ती पसंत केली. डॅरल ने लगेच दोन्ही रूम्स बुक करून अॅडवान्स दिला. एमिलीने त्याला वेलकम ड्रिंक दिले. बाल्कनीतनू समोर दिसणारा व्ह्यू ,रूम चे इंटेरिअर , एमिली ने दाखलेली आपुलकी या सगळ्याने डॅरल खुश झाला. दोन चार दिवसांत डॅरल अगदी फॅमिली चा हिस्सा असल्यासारखा वाटू लागला. ग्लोरीच्या हातच्या सी फूडचा तर तो दिवाना झाला होता. अधून मधून छोट्या ईवानलाही तो खेळवायचा. ईवानलाही त्याचा लळा लागला होता.
रात्री एमिली ईवान साठी गार्डन मधे फिरत फिरत गाणी म्हणायची , डॅरल तीच्या गाण्याने ,गोड आवाजाने भारावून जायचा .
आता डॅरलला येऊन महिना झाला असेल. एमिली आणि डॅरल जास्तच एकमेकांबरोबर वेळ घालवू लागले . त्याच्याशी बोलताना एमिलीच्या चेहऱ्यावर आनंदाचं तेज असायचं, तिच्या स्वप्नाळू डोळ्यांमधे चमक यायची .
एमिली कारण काढून त्याच्या रूम मधे जात होती. त्याच्याशी बराच वेळ गप्पा मारत बसत होती.दोघं बीचवर फिरायला जात होते. हे ग्लोरीच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तिला ते खटकू लागलं.
एमिली कोणामधे गुंतून फसली जाऊ नये असे तिला वाटायचं.
डॅरल आज आहे आणि उद्या जर तो निघून गेला तर एमिलीला तो त्रास नको म्हणून तीने एमिलीला रागवूनच समज दिली.
इकडे डॅरल ही एमिली मधे गुंतत चालला होता. तीचा तो हसरा गोड चेहरा ,काळेभोर कुरळे केस, बोलके चमकदार डोळे, आपुलकीने बोलणं, या सगळ्यात स्वतःला हरवून जात होता.
ग्लोरीच्या रागावण्याने एमिली डॅरलला टाळायला लागली. दोन तीन दिवस त्याला दिसलीच नाही. पण ती खूप बेचैन झाली होती. इकडे डॅरल ची नजरही एमिलीला शोधत होती. शेवटी त्याने न राहवून ग्लोरीला विचारलंच.
ग्लोरीने त्याला स्पष्टच सांगितलं एमिली पासून लांब रहा.
तू इथे असशील तोवर मन रमवायला तिचा वापर करशील आणि नंतर तिचे मन मोडून एकटीला टाकून निघून जाशील तिच्या इमोशनस् बरोबर असा खेळू नकोस. "तुला काय अशा बऱ्याच गर्लफ्रेंडस असतील ,तुझ्यासारख्या फाॅरेनर्सचा काही भरोसा नसतो. पण माझी एमिली खुप हळवी आहे तीला हे सहन नाही होणार."
डॅरल तीला पटवून देत होता I really love her .I hv no any girl friend!!
She is my first and I think last love. I want to get married with her, Glory please trust me.
पण ग्लोरी काही ऐकायला तयार नव्हती. तीचा डॅरल वर विश्वासच नव्हता.
चार दिवस डॅरल ला न भेटल्याने एकडे एमिली अस्वस्थ झाली होती आणि डॅरलही.
ग्लोरी मार्केट ला गेलेली असताना न राहवून एमिली डॅरलला भेटायला त्याच्या रूम मधे गेली पण तो तिथे नव्हताच. तो बाहेर गेला होता. ती खूपच उदास झाली. थोड्या वळाने ग्लोरी मार्केट मधून आली. ग्लोरीला तीचा कोमेजलेला चेहरा बघवत नव्हता पण अशा चार दिवसांच्या प्रेमाला काही अर्थ नसतो. नंतर आपल्या वाट्याला दुःखा शिवाय काही उरत नाही ती एमिलीला समजावून सांगत होती.
रात्री उशिरा ग्लोरीचा डोळा लागल्यावर एमिली डॅरल ला भेटायला गेली. तीला बघून डॅरल ला खुप आनंद झाला . त्याने तिला घट्ट मिठीत घेतले. तीला त्याच्या मिठीत शिरून खुप शांत वाटत होतं त्या स्पर्शात तिला विश्वास जाणवत होता "At the erliest I want to get married with you. My parents are coming day after tomorrow . They’ll talk with ur mom don’t worry !!"
हे बोलून त्याने तिच्या कपाळाला किस केलं आणि त्याने तिला घाईने खाली पाठवलं.
एमिलीच्या मागोमाग आलेल्या ग्लोरीने हे सगळं ऐकलं होतं. ते ऐकून ग्लोरीलाही डॅरलवर विश्वास वाटला पण तिने तसं जाणवू दिलं नाही.
दुसर्या दिवशी सकाळी तिने डॅरल च्या आवडीचा ब्रेकफास्ट बनवला त्याला खालीच ब्रेकफास्टला बोलावले,आणि एमिलीच्या सरोगसी ची सगळी हकीकत सांगितली . डॅरल ला ते सगळं आधिच एमिलीने सांगितलं होतं.
डॅरल ला त्याबद्दल काहीच आक्षेप नव्हता.ईवान ची सगळी जवाबदारी स्वीकारायला तो तयार होता.
ग्लोरी त्याला म्हणाली लग्न झाल्यावर त्याला वर्षातून एकदा एमिली बरोबर इंडियाला इथे गोव्याला यावंच लागेल. त्याने ते मान्य करायला नकार दिला कारण त्याने एमिली बरोबर गोव्यातच राहायचा निर्णय घेतला होता. ते ऐकून ग्लोरी भलतीच खूष झाली. तुझे पेरेंटस आले की लगेचच चर्च मधे आपण दोघांचे लग्न करून टाकू.ती म्हणाली . डॅरलने त्यालाही नकार दिला .त्याने अट घातली लग्न यू के ला च होईल, ग्लोरीला पण तिकडे यावे लागेल नंतर आपण सगळेच परत येऊ फार तर आपण इथे एंगेजमेंट करून टाकू. ग्लोरीने ते मान्य केलं.
डॅरल चे आई वडील आले , डॅरलच्या चेहर्यावरचा आनंद बघून त्यांनी एमिलीला पसंत केले. एंगेजमेंट झाली. दोघे बीचवर फिरायला गेले. हातात हात घेऊन दोघं बीचवर फिरत होते. सन सेट झाला तरी दोघं एकमेकांमधे हरवले होते .. थोड्या वेळाने दोघं भानावर आले आणि घरी परतले.
एमिली फार खुश होती. ग्लोरीला हेच तर हवं होतं.
थोड्याच दिवसात सगळे ग्रेटर मॅन्चेस्टरला रवाना झाले. डॅरल चे तिथले घर फारच छान होते. त्याच्या डॅडचा तिथे मिल्क अॅन्ड मिल्क प्राॅडक्टस् चा बिझिनेस होता. घराजवळच फॅक्टरी होती. चीज ,योगर्ट, बटर , मिल्क पावडर, चाॅकलेटस् या सगळ्याचे प्लान्टस होते.
ग्लोरी एमिली ला डॅरल ने इंग्लंड , लिव्हरपुल , स्काॅटलंड सगळीकडे फिरवून आणले.
मॅन्चेस्टर मधिल रेड हिल चर्च मधे एमिली आणि डॅरलचे लग्न होणार होते.चर्चला सुंदर फुलांनी डेकोरेट केले होते.
व्हाईट कलरचा वेडींग गाऊन , लांबलचक मागे लोळणारा वेल,डोक्यावर डायमंड क्राऊन, मोकळे सोडलेले तिचे कर्ली केस त्यातून डोकावणारे डायमंडचे लोंबणारे इअररींगज् हलकासा मेकअप, एमिली अगदी परीसारखीच दिसत होती ब्लॅक कलरच्या थ्रि पिस सूट मधे डॅरल ही प्रिन्स चार्मिंग वाटत होता. पुढे दोन छोट्या पऱ्या कॅन्डलस् घेऊन मागे फ्लाॅवर बास्केट हातात असलेल्या दोन छोट्या पऱ्या अशा थाटात एमिलीची चर्चमधे एन्ट्री झाली. फादर ने बायबल वर्स वाचले, वेडींग कपलला त्यांची संमती विचारली. DO you take each other to be husband and wife ?do you promise to be faithful to each other in good times and bad times, in sickness and in health to love each other and to honor each other all the days of your life? एमिली डॅरल दोघंही I do म्हणाले. दोघांनी रिंगज् एक्सचेंज केल्या . टाळ्यांच्या कडकडाटात डॅरल एमिलीचे लग्न पार पडलं.
काही दिवसांत डॅरल एमिली ग्लोरी गोव्याला परत आले. सगळे काही छान झालं होतं.
हे छोट्या ईवान च्या येण्याने झालं असे ग्लोरी अन एमिलीला वाटायचं. ईवान मुळे मी गोव्याला आले तिथे मला माझा ड्रिम मॅन डॅरल मिळाला!!
ईवान माझ्यासाठी blessing of God छोटा एंजल आहे.असं एमिली नेहमी म्हणते.
प्रेमळ पतीचं प्रेम , पैसा आणि ईवान च्या बाललीला यात एमीली सुखात न्हाऊन निघाली होती. ईवान मोठा झाला.
डॅरल ने गोव्यामधे चालू केलेला रेस्टाॅरंटचा बिझिनेस पुढे ईवानच्या साथीने त्यानं खुप मोठा केला साऊथ गोवा मधे फाईव्ह स्टार हाॅटेल चालू केलं .तसंच बारडेझ मधे त्याच्या घराचं मोठं हाॅलिडे रिसोर्ट झालं!.
गोव्यातला बिझिनेस हळुहळु मुंबई पर्यंत वाढवत गेला. डबघाईला आलेला कुणालचा माॅल त्याने कुणालच्या बहीणीकडून खरं तर ईवानच्या आत्याकडून विकत घेतला.तोच माॅल परत नावारूपाला आणला.
जे त्याचं होतं ते त्याला परत मिळालंच!! . It's a blessing of God एमिली म्हणते.
समाप्त
अपर्णा पाटोळे (ADP)
वरील कथा अपर्णा पाटोळे यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.