इवान (the blessings of God)

 इवान (the blessings of God) भाग एक 

© Aparna .....



. मुंबईच्या बॅन्ड्रा हिल रोड भागात सॅम लोबो, त्याची पत्नी ग्लोरी व त्यांची लाडकी लेक एमिली असे एक आनंदी कुटुंब राहत होते. सॅमचे तिथेच छोटेसे ऑटोमोबाइल गॅरेज होते तर ग्लोरी एका नर्सरी स्कुल मधे टिचर होती. एमिली खुप चुणचुणीत, हुशार अशी मुलगी होती. सॅमचे गॅरेज त्या भागात चांगलेच नावाजलेले होते. कामे ही भरपूर मिळत होती. 


  गोवा सोडून सॅम आणि ग्लोरी जेव्हा मुंबईला आले तेव्हा परिस्थिती अगदीच बेताची होती. सॅमने मेहनत करून परिस्थितीवर मात केली. मुंबईत नावही कमावले.


 खरं तर गोव्याला बारडेज काॅन्डोलिममधे बिच लगत त्याचं मोठ्ठं घर होतं. त्याचे वडील लहानपणीच देवाघरी गेले होते. त्याची आई मार्था तिथे होम स्टे चालवायची. पण याला ओढ मुंबईची होती. ग्लोरीशी लग्न करून हा मुंबईत शिफ्ट झाला.


  मार्था कधी मुंबईत रमलीच नाही. तिच्या गोव्यावर तिचं फार प्रेम त्यामुळे ती काही सॅम बरोबर मुंबईला राहीलीच नाही. पुढे ती ही आजारपणाने देवाघरी गेली. 


गोव्यातलं घर आता बंदच ठेवलं होतं. 


  वर्षातुन कधितरी सॅम चक्कर मारत असे. मुंबईत त्याचा चांगलाच जम बसला होता. पैसेही चांगले कमवत होता. एमिलीला खुप शिकवायचं, मोठ्ठे करायचं त्यानं ठरवलं होतं. एमिली अभ्यासात हुशार तर होतीच , गाणे ही गोड गायची.


चर्चच्या , स्कुलच्या क्वायर मधे गिटार ही वाजवायची.


 पण या हुशार चुणचुणीत एमिलीच्या नशिबात काही वेगळंच 


लिहून ठेवलं होतं देवाने!


अचानक एक दिवस हार्ट अॅटॅकमूळं सॅम ही  देवाघरी गेला आणि परिस्थिती पार बदलून गेली.


   ग्लोरी अन एमिली वर मोठं संकट कोसळलं! एकट्या ग्लोरीवर एमिलीचे शिक्षण तिला मोठं करण्याची जबाबदारी पडली. खचून न जाता ती धीराने उभी राहिली. घरी ट्यूशन्स ही घेऊ लागली,जोडीला शिवणकाम करून दोघींचा खर्च निभावू लागली. 


   एमिली ग्रॅज्युएट झाली .  पुढे मुंबई तील नावाजलेल्या इनस्टिटूट मधून एम् बी ए (एच एस ) करायचं अशी तीची इच्छा होती.


पण परिस्थिती पाहता  ग्लोरी वर फीज चा बोजा तिला टाकायचा नव्हता.


सध्या मिळेल ती नोकरी करून पैसे साठवावे आणि शिक्षण पुर्ण करावे तीनं ठरवलं.


  घराशेजारीच राहणारी तीची मैत्रीण एका हाॅस्पिटल मधे नर्स चं काम करत होती


तिथे रिसेप्शनीस्ट ची जागा रिकामी आहे एमिलीला कळलं.


ती लगेच इंटरव्हू देऊन आली, सिलेक्ट झाली, जाॅइनही झाली. पगारही बरा मिळणार होता. 


मुंबईतील मोठं नावाजलेलं हाॅस्पिटल होतं ते.


 बरेच सेलेब्रेटीज ,इंडस्ट्रीयालिस्ट तिथे ट्रिटमेंट घेत. 


  महिन्याभरात एमिली त्या कामात रमून गेली ,   फीज चे पैसे साठवून मम्माला घर खर्चाला मदत करत होती. 


आलेल्या पेशंटस् त्यांच्या नातेवाइकांचे गोड हसून स्वागत करणे, आपुलकीने विचारपूस करणे.त्यांना धीर देणे अशा तिच्या लाघवी स्वभावाने फार कमी दिवसात तीने बरीच मने जिंकली!


 वर्षभरात बऱ्यापैकी पैसे जमतील मग आपल्याला MBA ला ऍडमिशन घेता येईल या विचाराने खूप खुश होती ती!!


 


  एक दिवस हाॅस्पिटल मधे इमर्जनसी केस आली. अटेम्ट टू स्यूसाईड केस होती. नंदिता मलहोत्रा नावाची साधारण चाळीशीला आलेली स्त्री होती. 


   एमिली तीला चांगलेच ओळखत होती. गायनॅक ट्रिटमेंट साठी येणारी रेग्युलर पेशंट होती ती. मुंबईतील मोठ्ठया ,फेमस माॅल चा ओनर कुणाल मलहोत्रा ची ती पत्नी!!. पैसा ,प्रसिद्धी, पतीचे अतोनात प्रेम सर्व सुखे तीच्या पायाशी लोळत असताना तीने असं करावं?


नंदिता वर ताबडतोब ट्रीटमेंट चालू झाली. कुणाल फार अस्वस्थ झाला होता. अॅडमिशन फाॅरमॅलिटीज कंप्लीट


करण्यासीठी तो एमिली कडे गेला .तीने पटापट फाईल तयार केली गेली. कुणाल ला धीराचे दोन शब्द ही ऐकवले.साधारण दोन तासात पेशंट बरीच स्टेबल झाली. कुणाल काळजीने खचून गेला होता. एनक्वायरी साठी पोलीस आले. कुणाल ला नको नको ते प्रश्न विचारून बेजार केले.


घर, ऑफिस मधील एमप्लाॅइज चे स्टेटमेंट घेतले गेले.


नंदिताच्या गायनॅक कडून माहीती मिळाली, कुणाल नंदिताच्या लग्नाला साधारण पंधरा वर्ष झाली असतील.


दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम पण पंधरा वर्षे होऊन संतती सौख्य काही लाभले नव्हते. दोष नंदिता मधे होता तीचे गर्भाशय अतिशय वीक होते शिवाय काही हार्मोनल काॅमप्लिकेशन्स होते. त्याचीच ट्रिटमेंट चालू होती पण यश मिळत नव्हते.दोन वेळा कनसीव्ह झाले पण मिसकॅरेज झाले. नंदीता डिप्रेशन मधे होती. ते वाढत गेले. आणि तीने हे पाऊल उचलले. अॅडाॅपशन साठी दोघेही तयार नव्हते.


  


  नंदिता शुद्धिवर आली . कुणाल ची चलबिचल थांबली.आपला प्रयत्न असफल झाला तीला जाणवलं. ती अजून निराश झाली.


  कुणाल ने जवळ घेत तीला धीर दिला. मूल होत नाही म्हणून कोणी आयुष्य संपवतं का? माझा थोडाही विचार नाही केलास? तुझ्याशिवाय मला ही जगण्यात इंटरेस्ट नाही. पुढच्या वेळी मला सांग आपण दोघेही एकत्र सक्सेसफूली स्यूसाइड करू!!


   कुणालच्या बोलण्याने नंदिता थोडी भानावर आली. तीला तिचा वेडेपणा लक्षात आला. स्त्री म्हणून तीला अपूर्णत्व जाणवत होते. त्याचा परिणाम तीने हे पाऊल उचललं.


 


  दोन दिवसांनी नंदिताला डिसचार्ज मिळाला. तीच्यावर अॅन्टी डिप्रेसिव्ह ट्रीटमेंट चालू झाली. थोड्याच दिवसात ती बरीच सावरली पण आई होण्याची आस तिला अस्वस्थ करत होती.


  तीच्या गायनॅक आणि काऊन्सेलर कडून सरोगसी बद्दल तीला माहिती मिळाली. ती त्या दृष्टीने विचार करू लागली. कुणाल अन् तीं गायनॅकशी या संदर्भात बोलायला आले. व्यवस्थित माहीती समजून घेतली. त्यासाठी शाररीक मानसीक दृष्टया निरोगी स्त्रीची निवड केली जाते.तीच्या गर्भाशयात आय व्ही एफ द्वारे तुमचाच अंकुर वाढवला जातो. तीची माहिती गुप्त राखली जाते. नंतर ती बाळावर कोणताही हक्क दाखवू शकत नाही. असं अॅग्रीमेंट केलं जातं. कदाचित त्या साठी तीला योग्य तो मोबदला द्यावा लागेल. अशा विलींग टू बी सरोगेट मदर्स ची आमच्याकडे लिस्ट असते.


  हि माहिती ऐकून दोघांनी विचारांती सरोगसीचा निर्णय घेतला खरा!! 


आता त्यासाठी सरोगेट मदर निवडणं चालू झालं. पण या दोघांना आपल्या बाळासाठी कोणीच योग्य वाटत नव्हतं. त्यासाठी शोध चालूच होता.


एमिलीची नर्स मैत्रीण रिचा गायनॅक सेक्शन मधेच काम करत असल्याने तीच्या कानावर सरोगसी बद्दलच्या या गोष्टी आल्या होत्या. बोलता बोलता ती एमिलीलाही हे सगळं बोलून गेली. एमिलीला त्याबद्दल खूप उत्सुकता  वाटली. तीने सरोगसी बाबत सर्व माहीती मिळवली. थोड्या दिवसांठी आपलं गर्भाशय जणू काही भाड्याने द्यायचं. सरोगेट मदर्सला त्या बदल्यात हवा तेवढा मोबदला मिळतो. 


एमिलीच्या डोक्यात चक्र फिरू लागलं आपणच कुणाल नंदिताच्या बाळाची सरोगेट मदर झालो तर??


   फार तर वर्ष भराचा प्रश्न! कुणाल नंदिता कडून आपल्याला भरपूर पैसे मिळतील!    आपली सगळी स्वप्न पुरी होतील!! 


पण…


    मम्मा तयार होईल का या सगळ्याला?


   गेले दोन दिवस ती या सगळ्या विचारांनी अस्वस्थ होती. शेवटी तीने सररोगेट मदर होण्याचा निर्णय पक्का केला. ती सुट्टी टाकून कुणाल नंदीताला भेटायला गेली. अपाॅइंट विना तिला कुणालला भेटता आलं नाही. म्हणून हाॅस्पिटल मधे येऊन गायनॅकाॅलाॅजिस्ट डाॅ.नमिता पटेल यांना भेटली. त्यांच्याकडेच नंदिता ट्रिटमेंट घेत होती. तीने डाॅ. पटेल यांच्याकडे कुणाल नंदितासाठी  सरोगेट मदर होण्याची इच्छा व्यक्त केली. पुर्ण विचार करून निर्णय घे. तुला तुझं आयुष्य आहे पुढं! .लग्न व्हायचय अजून तुझं! डाॅ. तिला समजावत होत्या.पण ती निर्णयावर ठाम होती.


    मग डाॅ. नमिता नी कुणाल नंदिता ला बोलावून घेतले.एमिली बद्दल माहीती दिली.


दोघांनीही एमिलीला पसंत केलं. त्यासाठी तिला मोठ्ठी रक्कम द्यायला ही तयार झाले. 


  इकडे एमिलीचं आणि तिकडे कुणाल नंदीता चं स्वप्न पुर्ण होणार होतं!!


एमिलीचे काही इनव्हेस्टीगेशनस् केले गेले. रिपोर्टस् नाॅर्मल आले. आता तीला ओव्हुलेशन स्टडी साठी रोज यावं लागणार होतं. 


   त्यानंतर आ व्हि एफ द्वारे गर्भधारणा केली जाणार होती. कन्सिव्ह झाल्यावर तीला कुणाल नंदीता बरोबर रहावं लागणार होतं. नोकरी सोडावी लागणार होती.फर्स्ट ट्रायमेस्टर मधे बरंच जपावं लागणार होतं.


  मम्माला काय सांगायचं ?ती यासाठी कधीच तयार होणार नाही तीला खात्री होती. बराच विचार करून तीने मम्माला सांगितलं मला हाॅस्पिटल कडून एक वर्षासाठी बेंगलोर ला ट्रेनिंग साठी पाठवणार आहेत त्यानंतर तीला प्रमोशन मिळणार आहे. मम्माला कसंबसं तयार केलं.


 फक्त  रिचाला या सगळ्याची माहिती होती . तिने एमिलीला प्राॅमिस दिले , याची वाच्च्यता कुठेही करणार नाही. 


  शेवटी ज्याची प्रतिक्षा होती तो दिवस आला आय व्ही एफ द्वारे एमिलीने कन्सिव्ह केले.

   मम्माचा निरोप घेऊन एमिली कुणाल नंदिता च्या घरी आली. तीन महीन्यानंतर तीला घेऊन ते दिल्ली च्या घरी रहायला जाणार होते. 


   दिल्लीला जाण्यापूर्वी दोन दिवस तीला घरी जाण्याची परवानगी मिळाली.दोन दिवसांसाठी सुट्टी मिळाली म्हणून मम्माला भेटायला आली व दोन दिवसांनी फ्लाईटने दिल्लीला रवाना झाली. दिल्लीतील एक प्रथितयश डाॅक्टर तीची डेलिव्हरी करणार होते. दिल्लीतील मलहोत्रांचं घर खुप मोठ्ठं होतं. एमिलीच्या दिमतीला एक मेघा नावाची नर्स अरेंज केली गेली होती. तीच्यावर एमिलीच्या खाण्यापिण्याची , औषधांची , तीला चांगली पुस्तके वाचून दाखवण्याची ,मोकळ्या हवेत फिरायला नेण्याची जवाबदारी सोपवली गेली.


   एमिलीला सोडून दुसऱ्या दिवशी कुणाल नंदिता मुंबईला आले. आता फक्त सहा महिन्यांची प्रतिक्षा होती. नंदिता कडून एमिलीची रोज चौकशी केली जात होती.


    अधून मधून एमिली ग्लोरीला ला फोन करत असे.सहा महिने पार पडले एमिलीची इ डी डी (expected due date)जवळ आली. तिला पेन्स चालू झाले.


पेन्स चालू झाल्यावर एमिलीला लगेचच हाॅस्पिटल मधे हलवण्यात आलं!! 


  मेघा ने  ताबडतोब कुणाल ला फोन करून कळवलं. नंदिता व कुणाल लगेचच दिल्लीला जाण्यासाठी एअर पोर्ट ला निघाले.


इकडे एमिली ने छानशा गोंडस मुलाला जन्म दिला. 


  खरं तर कुणाल नंदिता एव्हाना दिल्लीला पोहोचायला हवे होते.


मेघा कुणालला फोन लावून लावून बेजार झाली होती ही आनंदाची बातमी कळण्यासाठी!


  नंदिता ही फोन उचलेना. 


फोन लावता लावता हाॅस्पिटल लाॅबी मधे उभी असताना तिचं लक्ष न्यूज चॅनल वर फ्लॅश होत असलेल्या हेड लाईन कडे गेलं. मशहूर बिझिनेसमन कुणाल मलहोत्रा और उनकी पत्नी नंदिता की कार अॅक्सिडेंट मे मौत!!


  तिच्या पायाखालिल जमिन सरकली.


आता पुढे काय?एमिलीचे काय करायचं ? तीला काय सांगायचं? या सगळ्या विचारांनी तिच्या डोक्यात काहूर माजलं  गेलं. 


क्रमशः

पुढील भाग

👇

इवान भाग दोन

अपर्णा पाटोळे (ADP)

वरील कथा अपर्णा पाटोळे यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post