हिंदीतील सुप्रसिध्द दिग्दर्शकला करायचं होतं स्वतःच्या मुलीशी लग्न

बॉलीवूड इंडस्ट्रीतील अभिनेत्री जी तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मीडियाच्या चर्चेत असते. आम्ही बोलत आहोत चित्रपट निर्माते महेश भट्ट यांची मुलगी अभिनेत्री पूजा भट्ट यांच्याबद्दल. पुजाने वयाच्या १७ व्या वर्षी 'डॅडी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्या निरागस अभिनयाने चाहते खूप प्रभावित झाले. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार व्यक्तिरेखेद्वारे लोकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, त्यांचे वैयक्तिक आयुष्य वादांनी भरलेले आहे. 

पूजा भट्ट यांचे वैयक्तिक आयुष्य

24 फेब्रुवारी 1972 रोजी मुंबईत जन्मलेल्या पूजा भट्ट यांचे वडील बॉलिवूडचे ज्येष्ठ चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि आई महेश भट्ट यांची पहिली पत्नी किरण (खरे नाव लॉरेन ब्राइट) आहेत. पूजा भट्टला एक भाऊ देखील आहे, त्याचे नाव राहुल भट्ट आहे आणि तो फिटनेस ट्रेनर आहे. पूजा भट्टला दोन सावत्र बहिणी आहेत, त्यापैकी एक आलिया भट्ट आहे जी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे, तर दुसरी शाहीन भट्ट आहे जी एक लेखिका आहे. आलिया आणि शाहीन या महेश भट्ट यांची दुसरी पत्नी सोनी राजदान यांच्या मुली आहेत.

पूजा भट्ट आणि महेश भट्ट यांचे नाते 

वडील आणि मुलीचं नातं खूप खास असतं, त्यात फक्त पवित्रता असते. मात्र महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांचे नाते नेहमीच वादग्रस्त राहिले. महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांचा किसिंग सीन खुप गाजला. बाप आणि मुलीच्या अफेअरपर्यंत चर्चा रंगल्या होत्या. 

एका मॅगझीनच्या फोटोशूटवेळी महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांनी लीप लॉकिंग कीस करतानाचे फोटो शूट केलं होतं. पुजा भट्ट ९० च्या दशकात स्वतःची कारकीर्द घडवण्याच्या दृष्टीने वाटचाल करत होत्या. नेमक्या अशावेळीच मॅगझीनसाठी केलेलं हे फोटोशूट आणि त्याच्या बातम्या मिडियाने उचलून धरल्या होत्या.


मात्र, केवळ किसिंग फोटोशूटच नाही, तर महेशजींनी या वादाबाबत दिलेल्या वादग्रस्त स्पष्टीकरणामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते. महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत त्यांच्या वादग्रस्त फोटोसेशनचा मुद्दा शांत करण्यासाठी सांगितले होते की, जर पूजा त्यांची मुलगी नसती तर त्यांनी तिच्याशी लग्न केले असते. आणि तेच एका मॅगझिनने आपल्या टॉप स्टोरीमध्ये महेश भट्ट यांचे विधान जसेच्या तसे लिहिले होते, 'जर पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न करणे पसंत केले असते.' 

या एका विधानाने महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांच्या नात्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले, ज्यावर महेश आणि पूजा यांनी आजपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आलिया भट्ट ही पूजा भट्टची मुलगी आहे???

महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांच्या नात्याबद्दल मागील काही वर्षांपासून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया भट्ट यांना बोलावण्यात आलं होतं.  तेव्हा करणं जोहर यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना आलिया भट्ट यांनी  "मी महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांची मुलगी आहे." असं सांगितलं. "कॉफी विथ करण" या शो चा हे वक्तव्य असणारा एपिसोड प्रसारित झाल्यावर अनेक माध्यमांनी आलिया भट्ट यांचं विधान अक्षरशः उचलून धरलं.

त्यानंतर '2 स्टेट्स'च्या प्रमोशन दरम्यान, जेव्हा 'टाइम्स ऑफ इंडिया'ने आलिया भट्टंना या अफवांबद्दल विचारले तेव्हा आलिया म्हणाल्या की, 'कॉफी विथ करणमध्ये मला माझ्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल विचारण्यात आले होते. त्या शोचा एपिसोड प्रसारित झाल्यानंतर माझ्या लक्षात आले की, "मी महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांची मुलगी आहे" या वाक्यावरचं प्रसार माध्यमांनी जास्त भर दिला आहे. पण वडिलांनी आणि सावत्र बहिण असूनही पुजा भट्ट यांनी मला खुप प्रेमाने वाढवलं आहे. त्या अनुषंगाने मी हे वाक्य बोलले होते. पण त्याचा विचित्र अर्थ काढून तो प्रसारमाध्यमांनी व्हायरल करणे हे  फारच हास्यास्पद आहे. मला वाटतं ज्याने हे लिहिलं आहे त्याच्या मेंदूवर उपचार करायला हवेत."

आलियाच्या स्पष्टीकरणानंतर आलिया भट्ट या महेश भट्ट आणि पुजा भट्ट यांची मुलगी असल्याच्या बातम्यांचा धुरळा तात्पुरता खाली बसला. 

 ९० च्या दशकात पूजा भट्ट यांनी एका मासिकासाठी काही पुरुष मॉडेल्ससोबत बोल्ड फोटोशूट केले होते.  'द न्यू मोरालिटी' या कॅप्शनखाली हे फोटो पब्लिश झाले होते. जेव्हा लोक शॉर्टस् घातली म्हणून वादात अडकायचे, त्यावेळी पूजा भट्टने तिच्या बिकिनी अवतारातले फोटो शूट केले होते. इतकेच नाही तर  एका मॅगझिनसाठी तिने न्यूड बॉडी पेंट करून फोटोशूट केले होते.  

एकंदरीत काय महेश भट्ट यांची मुलगी पुजा भट्ट या एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. पूजा भट्ट यांचे त्यांचे वडील महेश भट्ट यांच्यासारखे नेहमीच वादांशी घट्ट नाते आहे. तिचे बोल्ड फोटोशूट असो किंवा तिचे वादग्रस्त वक्तव्य असो, ती अनेकदा चर्चेत असते.

महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांनी लग्न केल्याचा कुठेही उल्लेख नाही. 
Post a Comment (0)
Previous Post Next Post