महिलांसाठी योगाभ्यास - एक वरदान

 महिलांसाठी योगाभ्यास – एक वरदान

✍️ सौ. मानसी कानडे 

“बालिका अहं बालिका नवयुग जनिता बालिका |

नाहम अबला नाहम दुर्बला आदिशक्ती अहं अम्बिका ||”

आजच्या स्त्रीचे यथार्थ वर्णन या ओळीतून केलेले आहे. आजची स्त्री कुठल्याच क्षेत्रात मागे नाही तर सर्वच आघाडया समर्थपणे सांभाळणारी आहे.  म्हणूनच अशा बहुगुणी स्त्रीला स्वत:ला सशक्त व निरोगी ठेवण्यासाठी योगाभ्यासाची नितांत गरज आहे. योगशास्त्रातील आदियोगी भगवान शिव यांनी सुध्दा माता पार्वती यांना प्रथम योग शिकवला. ऋग्वेद काळातही स्त्रीया वेद, वाडमय  व योगज्ञानाने परिपूर्ण होत्या. याचा प्रत्यया मैत्रेयी, गार्गी, कौसल्या, मदालसा, शारदा देवी यांचे चरित्र वाचून येतो. 

सध्याच्या स्थितीत स्त्रियांचे योग संदर्भात काही गैरसमज दिसून येतात. यातील महत्वाचा गैरसमज म्हणजे घरातील दैनंदिन रोजची कामे केली तर योग करण्याची गरज नाही. आपण दैनंदिन कामे करतांना श्वास-प्रवास याचा विचार करत नाही. त्याची सजगता जाणत नाही. शरीराचा थकवा पण लक्षात न घेता कार्य करत राहतो. 

याऊलट दैनंदनि योगाभ्यास करुन जर घरातील कामे केली तर त्याचा दर्जा आणि वेगही सुधारतो. अजुन एक गैरसमज म्हणजे केवळ जाड महिलांनीच योग करावा. योग या शब्दाची व्याप्ती फक्ता शरीरापुरती नाही तर मन, शरीर व आत्मा यांची एकरुपता साधणे म्हणजे योग. या अर्थाने प्रत्येकालाच जीवनात सकारत्मकता, ऊर्जा व आनंद वृध्दीसाठी योगसाधना महत्वाची आहे यात शंका नाही. 

महिलांच्या आयुष्यात तीन टप्पे महत्वाचे असतात. या प्रत्येक टप्प्यावर योगसाधना ही वरदानच ठरते. पहिला टप्पा हा पौंगडाव्स्था. 12 ते 16 या वयात ऋतुप्राप्ती होते. शरीरात अनेक स्तरावर बदल घडुन येतात. शारीरीक व मानसिक जडणघडण होते. ती योग्या रीतीने होण्यासाठी नियमीत आसन, सुर्यनमस्काराचा सराव, प्राणायाम, मुद्रा व ध्यानाचा अभ्यास महत्वाचा आहे.  सध्या या वयातील मुली pcos, pcod यासारख्या समस्यांना बळी पडतात.  पौंगडावस्थेमुळे मुलींमध्ये उदासीनता, भित्रेपणा, यासारखे आजार मुलांच्या तुलनेत जास्ता प्रमाणात दिसून येतात. बहुतेक  स्त्रियांना मासिक पाळीच्या आधी किंवा त्यादरम्यान लहरीपणा, चिडचिड, उदासिनता असे त्रास होतात. काही स्त्रियांमध्ये हे त्रास तीव्र तर काहींमध्ये सौम्या स्वरुपाचे असतात. ब-याच स्त्रियांचा असा गैरसमज आहे की, या काळात योगाभ्यास करु नये. पण या काळातही काही हालचाली, प्राणायम, ध्यान याचा अभ्यास हा काळ सुसहय करतो. या काळात सात्विक आहारावर भर देणे महत्वाचे ठरते. योगाभ्यास व आहाराचे पालन केल्याने दिवसरभ्र आनंदी व ताजेतवाणे वाटते. 

महिलांच्या आयुष्यातील  महत्वाचे वळण म्हणजे विवाह. विवाहानंतर पती-पत्नी जेंव्हा  बाळाचा विचार करतात म्हणजेच गर्भधारणा करण्यापुर्वी सुध्दा योगाभ्यासातून शरीरशुध्दी  आवश्याक आहे. जसे चांगले पीक येण्यासाठी सुपीक जमीन महत्वाची आहे, तसेच सदृढ व निरोगी बाळ जन्माला येण्यासाठी पती-पत्नीचे शारिरीक व मानसिक आरोग्या चांगले असणे आवश्याक आहे. यामुळे पती-पत्नी दोघांनाही योगाभ्यासातून शरिराची आंर्तबाहय शुध्दी करणे महत्वाचे ठरते. या सर्व प्रक्रियेनंतर जन्माला येणारे मुल हे निश्चितच आरोग्यसंपन्ना व तेजपूर्ण असते हे संधोधनातून सिध्दा झाले आहे. यादृष्टीने योगाभ्यास महिलांसाठी वरदानच आहे. 


संत तुकारामांनी म्हाटलेच की, 

“शुध्दा बीजाच्या पोटी – फळे रसाळ गोमटी”

महिलांच्या आयुष्यातील दुसरा टप्पा म्हणजे गर्भधारणाचा काळ. या काळात तिच्यावर स्वात:ची  व पोटातील बाळाची अशी दुहेरी जबाबदारी असते. या काळात महिला आनंदी व समाधानी असणे अपेक्षित असते. पण या काळात काही स्त्रियांना समाधानी वाटते तर काहींना अज्ञानामुळे भीती पण वाटू शकते. 

काही त्रास नव्याने सुरु होतात. या काळात योगसाधना ही संजीवनी प्रमाणे कार्य करते. नियमीत योगाभ्यासाने आई व बाळ दोघांचे आरोग्या चांगले राहते. जन्माला येणारे बाळ सुदृढ व निरोगी होते यात शंका नाही. मातेच्या पुर्नजन्माचा हा प्रवास वेदनादायी न होता आनंदमयी ठरतो. भारतीय संस्कृतीतील गर्भसंस्काराचे महत्वा सांगणारा संदर्भ महाभारतात सुध्दा आहे. 

गर्भधारपणाकडे महिलेने नवनिर्मितीची सुवर्णसंधी म्हणून पाहिले व त्यादृष्टीने योग्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगसाधना केली तर ही नवनिर्मिती उत्कृष्टा दर्जाची होते यात शंका नाही !

महिलांच्या आयुष्यातील तिसरा टप्पा तितकाच महत्वाचा पण काहीसा दुर्लक्षित असा आहे व तो म्हणजे रजोनिवृत्तीचा काळ.  या काळात वजन वाढणे, चिडचिड होणे, शरीराचा दाह होणे यासारखी लक्षणे दिसतात.  यामुळे याकाळात योगसाधना ही महिलांची जिवलग सखी ठरते. जिच्या सहवासात महिला आपली सर्व दु:खे विसरतात. योगनिद्रा, अजपाजप, अंर्तमौंन यासरख्या अंतरंग योगाचा अभ्यास मानसिक आरोग्या उत्ताम ठेवतो. परिणामी शारिरीक स्तरावरही त्याचा सकारात्माक परिणाम होतो. मासिकपाळी जातांना बहुतेक स्त्रियांना निद्रानाशाचा अनुभव येतो. झोप निट न झाल्यामुळे दुस-या दिवशी त्यांना अशक्तापणा, निरुत्साह, उदासिनता जाणवते. अशा तक्रारींमुळे व मेंदुतील बदलांमुळे स्त्रियांना नैराश्या येते. संधोधनानुसार या वयात विस्मृतीच्या आजाराची लक्षणे दिसु शकतात. त्यामुळे शांत झोपेसाठी ॐ कार साधना, भ्रामरी प्राणायम, योगनिद्रा यांचा अभ्यास महत्वाचा आहे . 

वृध्दापकाळातील महिलांसाठी सुध्दा योगाभ्यास वरदानच आहे. या वयात असणारी एकटेपणाची भावना, असुरक्षितता, शारिरीक  व मानसिक        त्रास यामुळे काही जणींचे जीवन असहय होते. या काळातील योगाभ्यास जीवनात सकारात्मकता घेऊन येतो. शारिरीक मर्यादा लक्षात घेऊन आसनांचा सराव, प्राणायम, ध्यान यांचा अभ्यास करावा. या वयात संसाराप्रती असणारी असक्ती कमी होणं गरजेचं आहे. यादृष्टीने योगसाधनेचा विचार केल्यास आयुष्याच्या संध्याकाळी आध्यात्मिकतेची पहाट घेऊन येणारी योगसाधना वरदानच ठरते यात शंका नाही. 

महिला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मुलांच्या, पतीच्या व इतर कुटुंबाच्या सेवेत स्वात:ला गुंतवुन घेतात. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. वाढत्या वयानुसार समस्या जाणवतात. दुखणं अंगावर काढल्याने समस्या अजून जटिल होत जातात. ताणतणाव वाढतो, त्याचा परिणाम कामावर होतो. या सर्वांमधुन बाहेर पडण्यासाठी महिलांनी थोडं स्वार्थी होणं गरजेचं आहे. त्यासाठी स्वात:ला पण वेळ दयावा. स्वात:वर प्रेम करणं तेवढंच महत्वाचं आहे. स्वात:ला कमी न लेखता, दुर्लक्ष न करता स्वात:च्या निरोगी व सुंदर आयुष्यासाठी स्वात:च प्रयत्ना करणं गरजेचं आहे. 


भगवान श्रीकृष्णांनी गीतेत उपदेश केला आहे की, 

“उदधरेत आत्मना आत्मनं न आत्मानं अवसादयेत |  

1 आत्मा एव हि आत्मनो बंधु: आत्मा एव रिपु: आत्मान: || 

आपणच आपली सखी होऊन नियमित योगाभ्यास करावा. यामुळे महिलांच्या अनेक समस्या दूर होवु शकतात. वाढते वजन नियंत्रणत येते, विकार बरे होतात. शुगर, गर्भाशयाच्या तक्रारी, thyroid, इत्यादी तक्रारींवर योग वरदान म्हणून सिध्दा झाले आहे. अनेक आजार हार्मोन्सा असंतुलनामुळे सुरु होतात. नियमित प्राणायम, आसन, सुर्यनमस्कार, ध्यान असा योगाभ्यास केल्याने अनेक सकस्या सोडवता येतात.

यामुळे समस्या निर्माण होण्याआधीच सावध होणं गरजेचं आहे. स्त्रियांच्या आरोग्यावर व स्थैर्यावर कुटुंबाचे भविष्या अवलंबुन आहे. त्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी सुध्दा तिच्या शारिरीक व मानसिक आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं आहे. प्रत्येक स्त्रिने सुध्दा योगाभ्यासाला महत्वा देऊन आपले जीवन  आरोग्यापुर्ण  जगावे 

पूर्वीच्या स्त्री बाबत म्हटले जात असे की –

“जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उध्दारी”

आता 21 व्या शतकातील आधुनिक स्त्री बाबतीत मला असे म्हणवयास वाटते की –

“योगसाधना जिच्या घरी-दारी ती जगाते उध्दारी”


….सौ. मानसी कानडे ( M.Sc. Yoga)

वरील लेख सौ. मानसी कानडे, परभणी यांनी स्वखुशीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी दिला आहे. आमचा या लेखावर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित 
Post a Comment (0)
Previous Post Next Post