मायेचा वटवृक्ष

 मायेचा वटवृक्ष  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ शिल्पा केतकर 

आज तिच्या पंचाहत्तरीचा सोहोळा आयोजित केला होता.. हॉल मध्ये सर्व जमा झाले होते हॉल तुडुंब भरला होता..

ती वाॅकर घेऊन चालत आली तिच्या बरोबर तिचा सांभाळ करणारी नर्स, मुलगा, सून नातवंड सगळेच होते.. ती येताच तिच्यावर पुष्पवृष्टी झाली तिला स्टेज वर छान अशा मखमली खुर्चीत  बसवल गेल

सगळया हॉल वर तिची नजर फिरली किती जण जमले होते फक्त तिच्या साठी तिच्या वरच्या प्रेमापोटी.. हे सगळे बघत असताना तिच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले होते. तिने सर्वाना नमस्कार करून अभिवादन केले.. आज असा तिचा वाढदिवस साजरा होईल अस तिला स्वप्नात देखील वाटल नव्हत... 

 विनयने त्याच्या नावाच मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं आणि ती सौ. संध्या विनय दिवेकर झाली. 

दिवेकरांच माप ओलांडून तिने गृहप्रवेश केला 

सासू सासरे दोघे ही प्रेमळ, पण कडक शिस्तीचे सासू च्या हाताखाली संध्या चाली रिती हळू हळू शिकत होती.. मुळात संध्याला घर संसार याची फार आवड, किती ही पै पाहुणे येऊ देत कधीही कपाळावर तिच्या आठी नाही कायमच हसतमुख. 

कामानिमित्ताने विनयला सतत बाहेरगावी जाव लागत असे, त्यामुळे काही वेळा  तो नसला की तिला कंटाळा यायचा, रोज विनय घरी आल्यावर दिवसभर काय झाल ते दोघे एकमेकांना सांगत असत. आता कामात तशी ती तरबेज झाली होती त्यामुळे तिची रोजची काम बाहेरची काम यांचा छान तिने मेळ साधला होता.. पण उरलेल्या वेळात काय करायच असा प्रश्न पडायचा 

त्यातच तिला त्यांच्या शेजारी राहतात त्यांच्या कडून कळालं की इथे जवळच एक अनुपमा ताई म्हणून आहेत त्या एक संस्था चालवतात पण कोणा करता, तर ज्या बायका विधवा आहेत, ज्यांना कोणीही घरचे  नाही  त्यांचा एक तास अभ्यास घेणे आणि एक तास त्यांना ज्यात आवड आहे ते शिकवणे, उदाहरणार्थ, शिवणकाम, लोकरीचे स्वेटर,.. अस बरच काही की ज्यामुळे त्या स्वतः च्या पायावर उभ्या राहतील. आता त्यांचा व्याप वाढू लागला होता त्यामुळे त्यांना दोन तासा करताच एखादी मदतनीस मिळाली तर हवी होती. 

संध्या विनयशी बोलली या विषयावर, त्याची काही हरकत नव्हती, पण दोन तासच कारण घरातल सगळ बघून तिने काय ते कराव यात घरात दुर्लक्ष होऊन चालणार नाही तस असेल तर तू दोन तास जाऊ शकतेस माझी काही हरकत नाही. 

संध्या अनुपमा ताईंना जॉईन झाली, तिला स्वतःला शिकवायची फार आवड, ती स्वतः उत्तम स्वेटर विणायची.. त्यामुळे तिच्या आवडत्या गोष्टींना सुद्धा एक प्रकारे चालनाच मिळाली अस म्हणायला हरकत नाही. 

हळू हळू संस्थेचा व्याप वाढत गेला.. आता संध्या च्या सासुबाई पण आनंदाने तिच्या बरोबर संस्थेत येत, पैशाचे हिशोब त्यांनी सासूबाईंन कडे सोपवले, त्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे तिला आता वेळ देता येऊ लागला. संस्था आता वाढली, नावारूपाला आली. 

मधल्या काळात अनुपमा ताई गेल्या आणि संस्थेची सगळी जबाबदारी संध्यावर पडली,  पण आता ती एकटी नव्हती संस्थेतल्या अंजली ताई, मीना ताई तिच्या बरोबर  तिच्या साथीला होत्या.

संस्थेतल्या बर्‍याच जणी शिकल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, काहींनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले, काही नोकरीला लागल्या, काहींनी पापड लोणची बनवून विकायला सुरवात केली, टेलरिंगचे स्वतःचे क्लास सुरू केले.. स्वतःच्या पायावर उभे रहात त्यांनी स्वतःच्या मुलांना पण शाळेत घालून त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला. एका छोट्या रोपट्याच कधी वटवृक्षात रूपांतर झाल संध्यालाच कळलं नाही. 

सगळ मागच आठवून संध्या मनोमन सुखावली होती.. आपल आयुष्य सार्थकी लागल याच तिला जास्त समाधान होत.. काळानुसार ती आता सगळ्यांची अक्का झाली होती. आणि संस्थेच्या नियमानुसार तिनी सगळा कारभार अता पुढील पिढी कडे सोपवला होता. 

याच सगळ्यांच्या लाडक्या अक्काला पंच्याहत्तर दिव्यांनी सगळ्यांनी ओवाळले.. तिचे औक्षण केले. प्रत्येकजण तिच्या बद्द्ल भरभरून बोलत होता.. सून, मुलगा, जेवणाच्या पंगतीत हव नको ते पहात होते, नातवंड येणार्‍या जाणार्‍यांच स्वागत करत होते. अजून काय हव माणसाला. 

आज खऱ्याअर्थाने सगळ्यांची संध्या अक्का या वटवृक्षाच्या शितल छायेत सुखावली होती. 

हा वटवृक्ष असाच बहरत राहू दे.. आणि सगळ्यांच्या आयुष्यात आनंद देत राहू दे.. अस म्हणून तिनी हात जोडून देवाला नमस्कार केला. 

© शिल्पा केतकर 🌹. 

Post a Comment (0)
Previous Post Next Post