पहिली परी (अक्षरचाफा कथा स्पर्धा)
✍🏻लेखिका- सौ.स्वरूपा कुलकर्णी
लग्न होऊन दोन वर्ष झाली.सईच्या सासूबाईंना अजुन पाळणा कसा हलला नाही याची काळजी वाटू लागली.सई व समीर दोघेही निर्धास्त.आत्ताच तर लग्न झालंय बघू पूढे.पण घरात मात्र सासू सासरे काळजीत.विमलबाई तशा मोकळेपणाने तिच्याशी बोलत नव्हत्या पण विनायकरावांला याविषयी काळजी बोलून दाखवत होत्या." अहो, समीरचं लग्न होऊन ५वर्ष झाली.अजुन पाळणा हलला नाही.दोघांचे वयही तिशीच्य् पुढे.काळजी वाटतो हो.." यावर विनायकबुवा मात्र हसून गोष्ट दुर्लक्षित करत होते."अगं एव्हडी काय काळजी करतेस.होईल सगळं वेळेवर.नको एव्हडा विचार करूस". विमलबाई मात्र तोपर्यंत हातात माळ घेतलेली असे.त्यांचं देवाला साकडं घालणं चालूच होतं.मन काही थार्यावर नव्हतं.
सई व समिरचे कायम एकमेकांशी खटके उडायचे.समिरने सईला तिच्या पुर्वआयुष्यासगट स्विकारलेलं होतं.पण ती मात्र कायम निराशेच्या गर्तेत जात राहीली.प्रेम ही गोष्ट नात्याचा श्वास असतो हे ती विसरली.त्यामुळे घरात कायम वितंडवाद होत राहिले.हे सगळं बघून विमलबाई विलक्षण चिंताक्रांत होत्या.
दिवस चालले होते आणि अचानक एक दिवस सईने ती गोड बातमी सांगितली.घरातले सगळे आनंदून गेले.सईने आधी ही बातमी समीरला सांगितली.आनंदाच्या भरात त्याने तिला मिठीच मारली.सई त्या अनपेक्षित मिठीने शहारून गेली.कित्ती कित्ती लाजली.मनात आनंदाचे हजार कारंजे उसळी मारून वर आले.आपण एक पाऊल स्वर्गातच ठेवलंय असं तिला वाटून गेलं.काय नी किती भाव मनी दाटले ते तीचं ह्रदयच जाणोजाणे.तिला झरझर जुने दिवस आठवले.तीचं समीरसोबतचं हे दुसरं लग्न.पहिला नवरा वेडसर निघाला म्हणून तिचं लग्न मोडलं होतं.तीचं मन त्या सार्या क्षणांना पाहू लागलं.खरंच किती अवघड वळण घेत होतो हा आयुष्याचा प्रवास.कधी बेभान तर कधी समंजस.कधी सुंदर कधी खतरनाक.ती आठवत राहीली,लग्नापुर्वीची ती.किती सुंदर,नाजुक,सुंदर बांधा, लांब दाट केस..तिचा मुळ रंग गोरा गोरा..त्यामुळे घरी दारी कौतुकात वाढलेली ती.. अभ्यासात,रांगोळ्यात,चित्रकलेत,लिखाणात,गाणे म्हणन्यात सगळ्याच गोष्टीत तरबेज..अगदी सर्वांगसुंदर..तिचा स्वभावही धार्मिक,सुसंस्कारीत,सभ्य..ती मादक नव्हती तर सात्विक सुंदर होती.त्यामुळे थोरामोठ्यांची लाडकी,लहानांची आदर्श अशी ताई होती..आईबापाने लाडाकोडात वाढवले..ती विज्ञान पदविधर होऊन मुंबईत नोकरीलाही होती.पण आजारपणामुळे नोकरी सोडून घरीच राहीली.पहिलं लग्न मोडल्यामुळे तिच्या घरच्यांचे हातपायच गळाले.ती दिसायला,वागायला इतकी छान असुनही तिचे दुसरे लग्न होणे अवघड झाले.सई दिवसेंदिवस निराश होऊ लागली.मन कशातच लागत नसे.तिच्या मैत्रिणीही येईनाशा झाल्या. आपलं हसणारं बागडणारं फुल असं कोमेजलं बघुन आई बाबा चिंतेत पडले.अखेर आत्याच्या ओळखितून समीरचं स्थळ आलं.तो दिसायला यथातथाच पण उंच व सुस्वभावी होता.सईने पहिल्या भेटितच होकार दिला.कुठलाही मागचापुढचा विचार न करता.कारण तिला बाबांची काळजी दिसत होती.तिने डोळे झिकून होकार कळवला. अखेर एका चांगल्या मुहुर्तावर तिचे नी समीरचे लग्न झाले.समिर स्वभावाने साधा..घर भाड्याचे..तो तालुक्यात राहाणारी तर सई शहरात वाढलेली..जीवनशैलीत खूप फरक पण सई सगळं सहन करत होती.कधीकधी तिला गावातलं शांत, कुठलेही सांस्कृतिक वारसा न जपणारे गाव तिला त्रास देत होते.ती दिवसेंदिवस मनाशी खात राही..लग्न झाल्यावर नव्याचे नऊ दिवस बरे गेले पण ती आतुन कोलमडलेली होती.कशीबशी आलेला दिवस ढकलत होती.तिचे हे दुसरे लग्न म्हणून तिने आसपास कोणाला कळू दिले नाही.ती मनमोकळं जगू शकत नव्हती.परंतू आज आशेचा एक सोनेरी किरण तिच्या आयुष्यात उगवला.ती मोहरली.एक छोट्टसं,नाजूकसं,गोड बाळ माझ्या उदरात मी वाढवणार व मी त्याच्या जन्मानंतर आई होणार! खरंच परमेश्वराचे किती आभार मानावे तेव्हडे थोडेच..ती मनातल्या मनात सर्व देवीदेवतांना नमस्कार करत होती.ती सासूबाईंसोबत आज कितीतरी दिवसांनी देवळात गेली.देवाचं मनोभावे दर्शन घेतलं.सगळं सुखरूप होऊदे ही प्रार्थना दोघिंनीही देवाकडे केली.तिला व सासुबाईंना पहिला मुलगाच हवा होता.ती बाळ कसं असेल या विचारातच पहिले २-३ महिने रमली होती.तीने बाळाची नावेही ठरवली.समिरही या संपूर्ण गरोदरपणात तिची काळजी घेत होता.या अवधित तो फारच संवेदनाशिल झाला होता.तीची काळजी तो बाळाच्या काळजीइतकीच महत्वाची मानत होता.गर्भसंस्कार शिबीरात ती जाऊन आली.घरीही सिडी ऐकत होती.सांगितलेलं पथ्य अत्यंत काळजीने जपत होती.आपल्याला होणारा मुलगा कसा असेल हा विचार आला की तो आपल्यासारखा गोरापान असावा असे तिला होई.पण समिरचा रंग आठवला की ती कासाविस होई.नको माझे बाळ गोरेपानच हवे..ती चिंतातूर होई.सासरे, सासूबाई व ती मुलगाच हवा म्हणून आग्रही होते.पण समिरचं मत पूर्ण वेगळं होतं.त्याला मुलगीच हवी हेती.
बघता बघता ९ महिने वर ९ दिवस झाले.कळा यायची चिन्हे दिसत नव्हती.डॉ.सविता मॅडम मात्र सांगत होत्या ," बाळाची हालचाल चांगलिये,वजन चांगलंय.पोटात पाणी उत्तम आहे.काळजी नको.नॉर्मलच होईल".सई मात्र काळजीत होती.कारण तिची पहिलीच वेळ. कार्तिक एकादशीचा दिवस.तिला बारिक कळा यायला लागल्या.ताबडतोब दवाखान्यात अॅडमिट केलं.दुपारी ३ पर्यंत तिला जिवघेण्या कळा येत होत्या.तीचा देवावर पूर्ण विश्वास होता.अखेर ती घटिका आली.बाळ जन्माला आलं.सविता मॅडम खूश होऊन म्हणाल्या,"सई तुला खूप छान गोरपान बाळ झालंय"ती पटकन उत्सुकतेने म्हणाली, मुलगा की मुलगी..पुढलं वाक्य ऐकताच तीला भोवळच आली.कारण ती मुलगी होती.अगदी अर्धा सेकंड रडली ती.पण बाहेर समिरला कळलं आपल्याला बाबा म्हणनारी मुलगी जन्मलिये.त्याने सगळ्या हॉस्पिटलमध्ये जिलेबी वाटली.त्याने बाळाला न पहाताच मुलगीये हे सांगणं त्याच्या आईला पटलं नाही.सईच्या आईबाबांनाही मुलगा होणेच अपेक्षित होते.पण इकडे मुलगी पहाताच सई चक्कर येऊन बेशुद्ध झाली.मोठ्या शिकस्तिने तीला शुद्धिवर आणलं गेलं.ती नाराज होती.मुलीचं तोंडही बघायची तिची इच्छा होईना.सासूबाईही फुगल्या.नाराजीने एकाच जागी बसून राहिल्या.
इकडे समिर मात्र आपली भविष्यवाणी खरी ठरल्याच्या आनंदात व स्वप्नपुर्तीच्या धुंदीत सगळ्यांना आनंदाने फोन करून सांगत होता,"माझ्या घरी परी आलीये,गोड परी" सई मात्र धक्कयाने गलितगात्र झाली.तिची मनोकामना अपूर्ण राहीली.जेंव्हा पहिल्यांदा समिरने "अगं सई बघ आपली परी कशी गोड दिसतिये ते.मला बाबा म्हणनार"तीने एक कटाक्षही टाकला नाही.फारच आग्रहाने जेव्हा तिने पहिल्यांदा दूध तिला पाजले तेंव्हा मात्र ती रोमांचित झाली.पहिला तिच्या मुठीचा स्पर्श.तिचा गोड टोपड्यात बांधलेला नुकत्याच कळीने जन्म घेतल्यासारखा टवटवीत चेहरा...ती सुखावून गेली.वाह काय रूप ते.निरागसतेचा पू्र्णअवतार.लोभस रूप परमेश्वराचे.तिने हळूच अलगद मुलीला पाजले व पटापट मुके घेत "माझी परी "म्हणत आनंदाश्रूंनी तिला भिजवून टाकले.सासूबाई लांबून पहात होत्या.त्याही वरमल्या.त्यांचेही डोळे पाणावले.नातीच्या आगमनाचे सोहळे करायचे हे त्यांनी मनोमन ठरवून टाकले.
परी फारच गोरी नी सुंदर टपोर्या डोळ्यांची होती.सईला तर माझ्या विराण आयुष्यात सापडलेला झराच ती आहे असे वाटू लागले.ती सुखाच्या हिंदोळ्यावर आरूढ झाली.जसेजसे दिवस जात होते सई स्वतःचं बालपण तिच्यात पहात होती.तिचं हळूहळू मोठं होणं ती पहात होती.बाळाच्या नामकरण विधीला एक गोसावी बाबा बाळाचं भविष्य वर्तवून गेले.मुलगी खूप भाग्यशाली आहे ती देशविदेशात नाव काढेल.तुमचं नाव मोठं करेल.सई मनापासून सुखावली.समिरचा उत्साह तर ओसंडून वहात होता.अतिशय थाटामाटात बाळाचं बारसं झालं.सर्वांच्या संम्मतिने कार्तिकी असं नाव ठेवलं.ती आताशा समिरच्या स्वभावाचा जवळून अभ्यास करत होती.तो किती समंजस,प्रेमळ व सुस्वभावी पती आहे याची तिला नव्याने ओळख झाली.ती समिरवर खूप प्रेम करायला लागली.परीच्या आयुष्यात येण्याने तिचे आयुष्य उजळून गेले.त्या दोघातील वाद जाऊन संवाद आला.रूष्ट स्वभाव जाऊन प्रेमाची धारा बरसू लागली.घर खरोखर प्रेमाच्या बंधनात बांधलं गेलं.सुखाची अखंड बरसात सुरू झाली.परीच्या आगमनाने त्यांचे दांपत्य जीवन बहरून गेले.
दुसर्या वेळी सईला मुलगा झाला..तिला बहिणभाऊ नसल्याने त्यांच्यातिल प्रेमाचा तो मुग्ध आविष्कार बघून ती सुखावली.कार्तिकी व सौमित्र अनेक बाललीला करत मोठे झाले.
एकदिवस समिर,सई व दोघे मुलं हिलस्टेशनवर गेले.सई व समिर मुलांना लांबुनच दरी बघा म्हणून सांगत होते.अचानक सौमित्रचा पाय घसरला तो गडगडत उतारावरून दरीच्या दिशेने जाऊ लागली.समिर क्षणात धावला.सौमित्रने आक्रंदून बचावासाठी हाक मारली.तो गडगडत एका झाडाच्या फांदिला पकडून दरीत लोंबकळत राहीला.सई जागिच बेशुद्ध झाली.समिर गडबडून गेला.आणि कार्तिकी कुठे म्हणून पाहू लागला .तर ती सौमित्रच्या दिशेने जातांना दिसली.समिरचे मन घाबरून गेले.आता कसं होणार या विचाराने त्याची मती कुंठीत झाली.एका वेळी दोघांचे प्राण संकटात पाहून तो हताश झाला.इकडे कार्तिकीने गडगडतच ते झाड गाठले.स्वतःची ओढणी सौमित्रच्या दिशेने फेकून जीवाच्या आकांताने त्याला वर ओढू लागली.तिचे प्रयत्न काम करत नव्हते.कारण सौमित्र मनाने घाबरून गेला होता.पण कार्तिकीने धाडस दाखवले व त्याचे हात ओढणीने घट्ट बांधले.त्याला वर ओढतांना श्वास कंट्रोलमध्ये आणायला सांगितला.त्याची भिड चेपल्यावर त्याला ओढून काढले.समिर तोपर्यंत मागून आलाच होता.त्याने हात दिल्यावर तो सावरला.. आज सौमित्रला आपली ताई किती ग्रेट आहे ते कळले.त्या भिम पराक्रमामुळे सई व समिरचे बाहू स्फुरण पावले व अशी झाशीची राणी जन्मली आपल्या पोटी म्हणून वक्षभर अभिमान वाटला.त्यानंतर कार्तिकीला राष्ट्रिय पुरस्काराने सन्नानित करण्यात आले.कार्तिकीला त्यासाठी दिल्लीला बोलावले गेले.ती आपल्या आई बाबांसोबत दिल्लीला गेली.एका मोठ्या शाही कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते तिला गौरवण्यात आले.सईच्या डोळ्याचे पारणे फिटले.ती आपले कन्यारत्न मोठ्या कौतुकाने पहात राहिली.व तिच्या जन्माच्यावेळी आपले विचार किती मागासलेले होते या विचाराने लाजली.आज कार्तिकीने आपल्या जिवावर उदार होऊन भावाचा जीव वाचवला म्हणून तिचे सर्वत्र कौतूक झाले.तीची मुलाखत घेतली गेली.तेंव्हा जीवनातील सर्वात मोठा आदर्श कोणता असे विचारल्यावर तिने माझी आई हे उत्तर दिले.ते ऐकून सर्वत्र कडकडाट झाला.हा सर्वोच्च मातृसन्मान होता.सई अभिमानाने तिच्याकडे बघत होती.माझी मुलगी कार्तिकी हा तिचा अभिमान आज जगासमोर पहातांना तीने समिरकडे वळून बघितलं.तो आनंदाश्रूंनी चिंब झाला होता.सई व समिर कृतकृत्य झाले.
अंगावर शहारे आले एकदम... खूप छान कार्तिकी मधून झाशीच्या राणीचे दर्शन झाले...
ReplyDelete